In this Article
आधारकार्ड हे भारतातील प्रत्येक नागरिकासाठी ओळखीचा सर्वात विश्वासार्ह आणि महत्वाचा पुरावा बनला आहे. ह्यामध्ये कार्डधारकाचे महत्वपूर्ण असे बायोमेट्रिक तपशील आहेत जे तयार करणे फार कठीण आहे. वय काहीही असो, आधारकार्ड देणारी संस्था म्हणजेच, यूआयडीएआयने ही योजना प्रत्येक भारतीय नागरिकासाठी शक्य केली आहे.
मुलांना आधार कार्डची आवश्यकता का आहे?
जरी आपले मूल १८ वर्षांचे नसले तरीही तरीही आधार कार्ड आपल्या मुलासाठी उपयुक्त ठरू शकते. आधार कार्ड असण्याचे काही फायदे येथे आहेत.
१. ओळख पुरावा
सर्व वयोगटातील लोक त्यांच्या ओळखीचा पुरावा म्हणून आधार कार्डचा वापर शकतात. आधार कार्डचा उपयोग आहे हा विमान आणि रेल्वेचे बुकिंग करण्यासाठी, शाळांमध्ये प्रवेश इत्यादी, तसेच प्रौढ आणि मुलांची ओळख स्थापित करण्यासाठी वापरले जाऊ शकते. १८ वर्षांचे झाल्यावर मतदार ओळखपत्र, पॅनकार्ड, ड्रायव्हिंग लायसन्स, इत्यादींसारखी शासनाकडून इतर अधिकृत कागदपत्रे मिळविण्यासाठीही आधारकार्ड खूप उपयुक्त आहे.
२. बँक खाती उघडण्यासाठी
आपल्या मुलांसाठी बँक खाती उघडण्यासाठी, आधार कार्ड वापरले जाऊ शकते. आज बहुतेक बँका राहण्याचा आणि ओळखीचा पुरावा म्हणून आधार कार्ड स्वीकारतात. मुलाला त्याचा जन्म प्रमाणपत्र आणि आयडी पुरावा द्यावा लागेल, परंतु येथे, जन्म प्रमाणपत्र उपलब्ध नसल्यास मुलाचे आधार कार्ड वापरले जाऊ शकते. तथापि, अल्पवयीन मुलासाठी बँक खाते उघडण्यासाठी पालकांचे आधार कार्ड असणे जरुरीचे आहे.
३. म्युच्युअल फंडाची गुंतवणूक
तुमचे मूल अल्पवयीन असले तरी तुम्ही त्याच्या नावावर म्युच्युल फंडाची गुंतवणूक करू शकता. सहसा, मुलाचे जन्म प्रमाणपत्र आवश्यक असते, परंतु बर्याच कंपन्या आजकाल आधारकार्ड देखील स्वीकारतात.
आपल्या मुलाच्या आधार कार्डसाठी अर्ज कसा करावा?
मुलांसाठी आधारकार्डची नोंदणी करण्यासाठी नोंदणी प्रक्रिया वेगळी आहे
१. पाच वर्षे व त्याखालील वयोगट
- ५ वर्षांपेक्षा कमी वयाच्या मुलाच्या आधारकार्ड नोंदणीसाठी जवळच्या आधार नोंदणी केंद्रास भेट द्या.
- ते आपल्याला एक फॉर्म प्रदान करतील. हा आधार नोंदणी फॉर्म भरा. आपण आपल्या आधार क्रमांकासह फॉर्म भरावा.
- लक्षात ठेवा की आपल्या ५ वर्षांपेक्षा कमी वयाच्या मुलासाठी आधार कार्ड नोंदणी करताना दोघांपैकी एका पालकाने त्यांचे आधार तपशील प्रदान केले पाहिजेत.
- ते आपल्या मुलाचा फोटो घेतील.
- पालकांच्या आधार कार्डवरून, पत्त्यासह अन्य तपशील भरले जातील.
- मुलाचे जन्म प्रमाणपत्र सादर करणे अनिवार्य आहे.
- आयरिस स्कॅन आणि फिंगरप्रिंट्स ५ वर्षांपेक्षा कमी वयाच्या मुलांसाठी घेतले जाणार नाहीत.
- आधार कार्यकारणी ह्यानंतर तुम्हाला पोचपावती स्लिप देतील. ह्या स्लिपमध्ये नावनोंदणी क्रमांक असेल.
- हा नोंदणी क्रमांक आपल्याला आधार कार्डच्या निर्मितीची स्थिती तपासण्यात मदत करू शकेल.
- ९० दिवसांच्या आत आपल्या मुलाला आधार कार्ड मिळेल.
२. पाच वर्षांपेक्षा जास्त वयाच्या मुलांसाठी
- आधार नोंदणी केंद्रात मिळालेला नावनोंदणी फॉर्म भरा.
- आपण मुलाच्या जन्माच्या दाखल्याची आणि त्याच्या शाळेच्या ओळखपत्राची एक प्रत प्रदान केली पाहिजे. संस्थेच्या लेटरहेडवरील डिक्लरेशन दिलेत तरी चालेल.
- जर अद्याप आपल्या मुलास शाळेत प्रवेश मिळालेला नसेल तर पालकांचे आधार कार्ड किंवा लेटरहेडवर तहसीलदार/राजपत्रित अधिका–यांनी दिलेले फोटो असलेले ओळख प्रमाणपत्रदेखील ओळख पुरावा म्हणून स्वीकारले जाईल.
- तथापि, या प्रकरणात मुलाचे जन्म प्रमाणपत्र देखील अनिवार्य आहे.
- राजपत्रित अधिकारी / तहसीलदार / खासदार किंवा आमदार यांनी लेटरहेड वर दिलेला किंवा ग्रामपंचायत प्रमुख किंवा इतर कोणत्याही समकक्ष प्राधिकरणाने दिलेला पत्त्याचा दाखला देऊ शकता. इतर पत्त्याचे पुरावे स्वीकारले जाणार नाहीत.
- नावनोंदणी प्रक्रियेदरम्यान चेहऱ्याचे छायाचित्र आणि दहाही बोटांचे स्कॅन आणि बुबुळांचे फोटो घेतले जातील. जेव्हा मूल १५ वर्षांचे होईल तेव्हा या प्रक्रियेची पुनरावृत्ती होईल.
- प्रत्येक इतर प्रक्रिया प्रौढ व्यक्तीसाठी आधार कार्ड मिळवण्यासारखीच असते.
- यूआयडीएआयने मुले आणि प्रौढांसाठी आधार कार्डचे स्वतंत्रपणे वर्गीकरण केलेले नाही. प्रत्येक नागरिक आधार कार्डसाठी अर्ज करू शकतो आणि कोणत्याही वयात ते मिळवू शकतो. तथापि, जर १५ वर्षाखालील मुलास आधार कार्ड मिळाल्यास त्यांना १५ वर्षानंतर पुन्हा फोटो आणि बायोमेट्रिक्स घ्यावे लागतील.
३. ऑनलाईन नोंदणीसाठी
- आपल्या मुलासाठी आधार कार्ड मिळविण्यासाठी ऑनलाइन नोंदणी देखील करता येते. भारतीय अद्वितीय ओळख प्राधिकरण (यूआयडीएआय) वेबसाइटला भेट द्या. आपल्याला आधार कार्ड नोंदणी लिंक सापडेल.
- आवश्यक फॉर्म मिळवा आणि मुलाचे नाव, पालकांचा फोन नंबर, पालक किंवा पालकांचा ईमेल आयडी इत्यादी सर्व तपशील भरा. आपण भरलेला ईमेल आयडी आणि क्रमांक कायम असल्याचे सुनिश्चित करा.
- सर्व वैयक्तिक तपशील भरल्यानंतर, आपले डेमोग्राफिक तपशील जसे की पालकांचे ठिकाण, परिसर, जिल्हा, राज्य इ. प्रदान करा.
- एक अपॉइंटमेंटसाठीचे बटण असेल. त्यावर क्लिक करा. त्यानंतर तुम्हाला निवडलेल्या आधार कार्ड नोंदणी केंद्रात अपॉईंटमेंटची वेळ मिळेल.
- जेव्हा आपण अपॉईंटमेंट निश्चित करणे पूर्ण करता, तेव्हा वाटप केलेल्या दिवशी कार्यालयात जा. आपल्यासोबत आवश्यक कागदपत्रे आणि संदर्भ क्रमांक घेऊन जा. तुम्ही तुमच्याजवळ फॉर्मची प्रिंटआउट देखील ठेवली पाहिजे.
- केंद्रात, पालकांच्या आधार कार्डसह सर्व कागदपत्रांची पडताळणी केली जाईल.
- पडताळणीनंतर, मुलाचे वय ५ वर्षांपेक्षा जास्त असेल तर बायोमेट्रिकचा तपशील घेतला जाईल जो त्यांच्या आधार कार्डशी जोडला जाईल.
मुलांसाठी एम–आधार आणि ई–आधार कार्ड कसे वापरावे?
पालक त्यांच्या मुलाच्या आधार कार्डवर त्यांचे स्वत: चे फोन नंबर नोंदवू शकतात आणि त्यांच्या स्मार्टफोनमध्ये नेहमीच त्यांच्या मुलाचे आधार कार्ड ठेवण्यासाठी एम–आधार अॅप वापरू शकतात. हे ऍप तब्बल ३ आधार कार्ड ठेवण्यासाठी डिझाइन केलेले आहे. ह्यामध्ये पालक आपल्या मुलाच्या आधार कार्डसह स्वतःच्या आधार कार्डचे व्यवस्थापन करू शकतात. जेव्हा त्यांना ओळख पटविणे आवश्यक असेल तेव्हा आधार कार्ड दाखवले जाऊ शकते कारण हे खूप उपयुक्त आहे. ५ वर्षापेक्षा कमी वयाच्या तसेच ५ ते १५ वर्षे वयोगटातील मुलांच्या पालकांना ह्याचा उपयोग होऊ शकतो.
अर्ज सादर केल्याच्या ६० दिवसानंतरही तुम्हाला आधार कार्ड मिळाले नाही, तर तुम्ही तुमच्या अर्जाची स्थिती ऑनलाईन तपासून पाहू शकता. जर ऑनलाईन स्थिती आपले आधार कार्ड तयार असल्याचे दर्शवित असेल तर आपण ई–आधार कार्ड डाउनलोड करू शकता आणि नंतर प्रिंटआउट घेऊ शकता. ई–आधार कार्ड नेहमी वैध असते.
लहान मुलांच्या (बाल) आधार कार्डसाठी आवश्यक कागदपत्रे
आपल्याला आवश्यक असलेल्या कागदपत्रांच्या याद्या येथे आहेत
१. पाच वर्षे व त्याखालील वयोगटातील मुलांसाठी
- मुलाचे मूळ जन्म प्रमाणपत्र.
- कोणत्याही एका पालकांचे आधार कार्ड.
- आपण दोन्ही कागदपत्रांच्या मूळ प्रती त्यांच्या सत्यप्रतीसह प्रदान कराव्यात.
२. पाच वर्षे व त्यापेक्षा अधिक वयोगटातील मुलांसाठी
मुलाचे जन्म प्रमाणपत्र आणि ओळखपत्रापैकी कोणताही एक खाली दिलेला पुरावा :
- त्याच्या शाळेचे ओळखपत्र.
- लेटरहेडवर संस्थेचे बोनफाइड प्रमाणपत्र.
- पालकांचे आधार कार्ड.
- तहसीलदार / राजपत्रित अधिका–यांनी लेटरहेडवर दिलेले ओळखपत्र ज्याच्यावर लहान मुलांचा फोटो आहे.
सामान्य प्रश्न
तुम्हाला तुमच्या मुलासाठी आधार कार्ड मिळण्याच्या प्रक्रियेबद्दल बरेच प्रश्न असू शकतात. त्यापैकी काहींची उत्तरे येथे आहेत.
१. मुलांसाठी आधार कार्ड असणे सक्तीचे आहे का?
मुलांसाठी आत्तापर्यंत आधार कार्ड असणे बंधनकारक नाही, परंतु त्यासाठी त्यांची नावनोंदणी करण्यात काही नुकसान नाही.
२. मुलांच्या आधार कार्डचा प्रोसेसिंग काळ किती आहे?
तुमच्या घरच्या पत्त्यावर आधार कार्ड पोहोचण्यासाठी तुम्ही नोंदणी केलेल्या दिवसापासून ९० दिवसांचा कालावधी लागेल.
३. बाल आधार कार्डचा रंग काय आहे?
जर तुमच्या मुलाचे वय ५ वर्षांपेक्षा कमी असेल तर तुम्हाला निळ्या रंगाचे बाल आधार कार्ड मिळेल. हे कार्ड तो केवळ ५ वर्षाचा होईपर्यंत वैध असेल. तो ५ वर्षांचा झाल्यावर आपल्याला त्याचे बायोमेट्रिक्स सबमिट करावे लागतील कारण बाल आधार कार्ड यापुढे वैध राहणार नाही.
४. १५ वर्षांचे झाल्यावर मुलाचे आधार कार्ड अद्यतनित करणे अनिवार्य आहे काय?
होय, तो १५ वर्षाचा झाल्यावर बायोमेट्रिक्स आणि छायाचित्र सादर करणे अनिवार्य आहे. यास फक्त काही मिनिटे लागतात आणि ही सेवा विनामूल्य आहे.
५. शाळा प्रवेशासाठी आधार कार्ड अनिवार्य आहे काय?
अनेक शाळांकडून असे म्हटले जाते की पालकांनी शाळेत प्रवेश घेताना आधार कार्ड तयार केले असले तरी ते बंधनकारक केले गेले नाही.
६. मुलांसाठी आधार नोंदणीसाठी काही फी आहे का?
नावनोंदणीचा खर्च सरकार उचलते आणि मुलाची नोंद घेण्यासाठी कोणतेही शुल्क आकारले जात नाही. मुलाच्या बायोमेट्रिक अपडेटसाठीसुद्धा शुल्क आकारले जात नाही.
आधार कार्ड मिळवणे अद्याप मुलांसाठी सक्तीचे नसले तरी त्यांची नावनोंदणी करणे अधिक चांगले आहे कारण यामुळे भविष्यात त्यांचे जीवन सुकर होईल. जेव्हा मुलास ओळखीचा पुरावा हवा असेल तेव्हा आधार कार्डाची मदत होईल. जरी मूल वेगवेगळ्या शैक्षणिक शिष्यवृत्तीसाठी परदेशात जाण्याचा विचार करीत असेल, तरीही आधार कार्ड असल्यामुळे ती कार्यवाही सुकर होईल.