Firstcry Parenting
Search
Parenting Firstcry
Home बाळ बाळांची नावे ‘क’ अक्षरावरून मुलींची अर्थासहित १५० नावे

‘क’ अक्षरावरून मुलींची अर्थासहित १५० नावे

‘क’ अक्षरावरून मुलींची अर्थासहित १५० नावे

बाळाचे नाव ठेवण्याचे काम खूप छान असते पण पालकांचे बाळाच्या नावाविषयी काही विशिष्ट क्रायटेरिया असतील तर ते काम कधी कधी कठीण होते. आजकाल पालकांना आपल्या बाळाचे नाव एकदम वेगळे असावे असते वाटते, परंतु घरातील मोठ्या लोकांच्या म्हणण्याप्रमाणे, बाळाच्या राशीनुसार एखाद्या अर्थपूर्ण नावाचासुद्धा शोध घ्यावा लागतो. ह्या व्यतिरिक्त छोट्या नावाचा सुद्धा ट्रेंड आलेला दिसतो तसेच बाळाच्या पालकांना बाळाचे नाव आधुनिक आणि ट्रेंडी सुद्धा हवे असते. ह्या सगळ्या गोष्टी लक्षात घेऊन नाव ठेवणे खरंच खूप कठीण होऊन जाते. परंतु तुम्ही अजिबात टेन्शन घेऊ नका. आम्ही आहोत ना! आम्ही तुमच्या बाळासाठी अनेक नावांची यादी तयार केलेली आहे आणि हा लेख सुद्धा त्याचाच भाग आहे.

पासून सुरु होणाऱ्या नावांची काही कमतरता नाही, तरी सुद्धा काही निवडक नावांच्या आधारे आम्ही हा लेख लिहिला आहे. ह्या लेखामध्ये हिंदू, मुस्लिम, शीख आणि ख्रिश्चन धर्माच्या नावांचा समावेश केलेला आहे. जर तुम्ही तुमच्या छोट्या परीसाठी एखादे वेगळे आणि क्युट नाव शोधत असाल तर पुढे वाचा.

पासून सुरु होणारी मुलींची नावे

खाली दिलेल्या लिस्ट मध्ये अक्षरापासून सुरु होणारी १५० नावे दिलेली आहेत. ह्या नावांची तुमच्या छोट्या परीसाठी नाव निवडण्यास मदत होईल.

पासून नाव नावाचा अर्थ धर्म
कृपा उपकार, दया, देवाचा आशीर्वाद हिंदू
कुंजल कोकिळा हिंदू
कलिका कळी हिंदू
कायरा शांतिपूर्ण, अद्वितीय हिंदू
केशा अत्यानंद हिंदू
किंजल नदीकिनारा हिंदू
कोमल नाजुक, सुंदर हिंदू
कोयना कोकिळा, नदीचे एक नाव हिंदू
कनुशी प्रिय, आत्मीय हिंदू
काव्या कविता हिंदू
कृपा उपकार, दया, देवाचा आशीर्वाद हिंदू
कलिका कळी हिंदू
कायरा शांतिपूर्ण, अद्वितीय हिंदू
केशा अत्यानंद हिंदू
कश्मीरा काश्मीरहून येणारी हिंदू
करीना शुद्ध, निर्दोष, निष्पाप हिंदू
कृष्णा रात्र, प्रेम, शांती हिंदू
कोंपल अंकुर हिंदू
कविता कवीने केलेली रचना हिंदू
काजल डोळ्यांचे सौंदर्य वाढवण्यासाठी वापरला जाणारा पदार्थ हिंदू
करिश्मा चमत्कार, जादू हिंदू
कैवल्या मोक्ष, परमानंद हिंदू
काम्या सुंदर, परिश्रमी, सफल हिंदू
कियारा स्पष्ट, चमकदार, प्रसिद्ध हिंदू
किंशुक एक सुंदर लाल फूल हिंदू
किसलय नवीन पालवी हिंदू
कौमुदी चांदणी, पौर्णिमा हिंदू
कयना विद्रोही हिंदू
कुसुमिता उमललेले फूल हिंदू
कुशली चतुर, प्रवीण हिंदू
कुशाग्री बुद्धिमान हिंदू
कोयल सुंदर आवाज असणारा एक पक्षी हिंदू
कुनिका फूल हिंदू
कुंदा चमेली हिंदू
कस्तूरी हरणाच्या बेंबीत सापडणारा एक सुगंधी पदार्थ हिंदू
कपिला एक दिव्य गाय, दक्ष प्रजापतीची कन्या हिंदू
कुमुदिनी पांढऱ्या कमळाच्या फुलांचा तलाव हिंदू
कुमकुम सिंदूर हिंदू
कुजा देवी दुर्गेचे एक नाव हिंदू
कृषिका धेय्यापर्यंत पोहोचण्यासाठी कठीण श्रम करणारी हिंदू
कृपी द्रोणाचार्यांच्या पत्नीचे नाव हिंदू
काजोल काजळ हिंदू
किशोरी युवती हिंदू
कादम्बरी देवी, उपन्यास हिंदू
कर्रूरा राक्षसांचा नाश करणारा हिंदू
कृष्णवेणी नदी, केसांची बट हिंदू
कौशिकी देवी दुर्गेचे एक नाव हिंदू
कोमिला नाजूक शरीर असलेली हिंदू
किश्वर देश, क्षेत्र हिंदू
कीर्तिका प्रसिद्ध कार्य करणे, प्रतिष्ठा देणारी हिंदू
किराती देवी दुर्गा, गंगा नदीचे एक विशेषण हिंदू
कांचन सोने, धन, चमकदार हिंदू
किमया चमत्कार, देवी हिंदू
कियाना प्रकाश, चंद्रमा देवी हिंदू
केयरा पाण्याने भरलेली सुंदर नदी हिंदू
केयूर फिनिक्स सारखा पक्षी हिंदू
केनिशा सुंदर जीवन हिंदू
केलका चंचल, कलात्मक हिंदू
केरा शांतिपूर्ण, अद्वितीय हिंदू
कीर्तिशा प्रसिद्धि हिंदू
कीर्तना भजन हिंदू
काया शरीर, मोठी बहीण हिंदू
काहिनी युवा, उत्साही हिंदू
कामदा उदार, त्यागी, दानी हिंदू
कविश्री कवयित्री, देवी लक्ष्मी हिंदू
कौशिका प्रेम आणि स्नेहाची भावना हिंदू
कात्यायनी देवी पार्वतीचे एक रूप हिंदू
काशवी उज्जवल, चमकदार हिंदू
कशनी देवी लक्ष्मी, विशेष महिला, फूल हिंदू
काशी पवित्र हिंदू
कर्णप्रिया कानांना ऐकायला चांगले वाटणारे हिंदू
कनुप्रिया राधा हिंदू
कंगना हातात घालायचा दागिना हिंदू
काँची सोन्यासारखे चमकदार हिंदू
कामेश्वरी देवी पार्वतीचे एक नाव, इच्छा पूर्ण करणारी देवता हिंदू
कमलाक्षी कमळासारखे सुंदर डोळे असलेली हिंदू
कामाक्षी देवी पार्वती, देवी लक्ष्मी हिंदू
कामाख्या देवी दुर्गा हिंदू
कल्याणी शुभ, सौभाग्य, पवित्र गायीचे नाव हिंदू
कालिंदी यमुना नदीचे नाव हिंदू
कलापी मोर हिंदू
कादंबिनी मेघमाला हिंदू
कनक सोन्याने बनलेली हिंदू
केसर एक सुगंधित पदार्थ हिंदू
कुहू कोकिळेचे मधुर बोल हिंदू
कामिनी एक सुंदर महिला हिंदू
काव्यांजलि कविता हिंदू
कनिका छोटा कण हिंदू
कोकिला कोकिळा, मधुर आवाज असणारी स्त्री हिंदू
कलापिनी मोर हिंदू
कल्पका कल्पना करणे हिंदू
कमलजा कमळातून निर्माण झालेला हिंदू
कमलालया आनंदित, सुंदर, कमळात राहणारी हिंदू
कामिता इच्छित हिंदू
कनकप्रिया देवावर प्रेम करणारी हिंदू
कनिष्का लघु, छोटी हिंदू
कण्णगी अन्यायाविरुद्ध आवाज उठवणारी, दक्षिण भारतातील इतिहासातील एक प्रसिद्ध महिला हिंदू
करीश्वी चांगली मनुष्यप्राणी हिंदू
कालांजरी देवी पार्वतीचे एक नाव हिंदू
केसरी केशरासारखी हिंदू
कारुण्या अनुकंपा, दयाळू हिंदू
कालिनी सूर्याची मुलगी हिंदू
कामना सुंदर, इच्छा, कमळ हिंदू
कर्णिका कमळ, अप्सरा हिंदू
कल्या स्तुति, स्तवन हिंदू
कामायनी प्रेमाचे प्रतीक हिंदू
कनाली सूर्य, तेजस्वी हिंदू
कौशाली निपुण, प्रवीण, कुशल हिंदू
कविशा श्री गणेश, छोटी कविता हिंदू
कशिश आकर्षण मुस्लिम
कशफ शोध घेणारी मुस्लिम
कैनात दुनिया, विश्व मुस्लिम
कलीला प्रिय मुस्लिम
कमालिया पूर्णता, परंपरावादी मुस्लिम
करीमा उदार, परोपकारी, कुलीन मुस्लिम
कौरीन सुंदर मुलगी मुस्लिम
कौसर स्वर्गातील एक झरा मुस्लिम
किआ एक नवीन सुरुवात मुस्लिम
कुब्रा महान, वरिष्ठ मुस्लिम
कुलुस पवित्रता मुस्लिम
कुंज़ा लपलेला खजिना मुस्लिम
काबिरा अपार, महान, मोठा मुस्लिम
काशिरा आनंद देणारी मुस्लिम
करमदीप देवाच्या कृपेचा दीपक शीख
कमलनीत स्वतंत्रता, साहस शीख
कंवलजोत कमळाचा प्रकाश शीख
करनसुख आनंदी, प्रसन्न शीख
कवनीर चांगली कविता करणारी शीख
किरनरूप सूर्यकिरणांसारखी शीख
कुलविंदर युद्धात जिंकणारी शीख
कंवलरूप कमळासारखी शीख
करमत गौरव, सम्मान शीख
कलजोत कलेचा प्रकाश शीख
कांचनजोत सोनेरी प्रकाश शीख
कंवलनैन कमळासारखे डोळे असलेली शीख
कैरोलिन आनंदाचे गाणे ख्रिश्चन
केली जिवंत, उत्साहाने भरलेली ख्रिश्चन
कैरेन शुद्ध, पवित्र ख्रिश्चन
क्रिस्टीन येशूची अनुयायी ख्रिश्चन
काजा डेझीचे फुल ख्रिश्चन
केलिएंड्रा खूप प्रिय ख्रिश्चन
कैलीन चंद्र, चंद्रासारखी सुंदर ख्रिश्चन
कैमिली स्वतंत्र ख्रिश्चन
कैंडेंस शानदार, चमकदार ख्रिश्चन
कैंडी चमकदार, पांढरी ख्रिश्चन
केटी निर्दोष, विशुद्ध, पवित्र ख्रिश्चन
कैरियाना प्रिय, क्युट ख्रिश्चन
कैलीशा भाग्यवान स्त्री ख्रिश्चन
कैटरिना शुद्ध ख्रिश्चन

आता तुम्हाला पासून सुरु होणाऱ्या निवडक नावांची लिस्ट मिळाली आहे. ह्यातील तुम्हाला आवडणारे नाव निवडा आणि तुमच्या लाडक्या लेकीला त्या नावाने हाक मारण्यास उशीर करू नका.

RELATED ARTICLES
MORE FROM AUTHOR
संपादकांची पसंती
Please Wait Updating Your Article