In this Article
तुमच्या गर्भाशयातल्या बाळांच्या सर्वात महत्वाच्या टप्प्यांपैकी हा एक टप्पा आहे कारण ९ व्या आठवड्यात जुळ्या बाळांच्या शरीरातील काही महत्वाच्या अवयवांचा विकास होतो. त्यामुळे तुमच्या शरीरात सुद्धा असंख्य बदल घडून येतात. येत्या आठवड्यात पहिल्या तिमाही जवळ येऊ लागताच, तुमचे शारीरिक आरोग्य उत्कृष्ट आहे हे सुनिश्चित करणे आणखी आवश्यक बनले आहे. नोकरी करणार्या महिला त्यांच्या गरोदरपणाबद्दल त्यांच्या मॅनेजरशी चर्चा करण्याच्या निर्णयावर येऊ शकतात आणि सुट्टीवर कधी जायचे आहे याबद्दल टाइमफ्रेम तयार करू शकतात. कामाची सवय असणाऱ्या नोकरी करणाऱ्या स्त्रियांसाठी घरी बैठ्या जीवनशैलीचा अवलंब करणे हा खूप मोठा बदल आहे.
९ आठवड्यांत बाळांची वाढ
तुमच्या गर्भाशयात जुळी किंवा एकाधिक बाळे असली तरीही, ९व्या आठवड्यापर्यंत त्यांची प्रगती अगदी महत्वाच्या टप्प्यावर पोहोचली आहे आणि बाळाचे बरेच अवयव ह्या कालावधीत तयार होण्याच्या मार्गावर आहेत.
बाळांचे डोळे जवळजवळ पूर्णपणे तयार झालेले आहेत, ह्या डोळ्यांचे पापण्यांनी संरक्षण केले आहे. तोंड आणि नाक ह्यासारख्या चेहऱ्यावरील वैशिष्ट्यांना देखील योग्य आकार मिळू लागतो. त्यांच्यासमवेत, डोक्याच्या बाजूने कान तयार होऊ लागतात आणि पावलांमधून बोटे तयार व्हायला लागतात. बाळांची बोटे देखील अगदी स्पष्ट दिसू लागतात.
बाळांच्या शरीरात, विकसित झालेले बहुतेक अंतर्गत अवयव त्यांची योग्य स्थिती घेतात आणि पुढे वाढतच राहतात. हृदयाचे सामान्यत: सर्व चार कक्ष पुरेसे विकसित होतात, ज्यामुळे हृदय त्याचे कार्य अधिक चांगले करते. ह्या काळात दात तयार होतात आणि हिरडीपर्यंत येतात. योग्य वेळेला ते बाहेर येतात.
बाळांचे आकार केवढा आहे?
गरोदरपणाच्या ९व्या आठवड्यापर्यंत प्लेसेंटा पूर्णपणे तयार झाल्यामुळे, बाळांची उंची आणि वजन वेगाने वाढू लागते. ह्या टप्प्याची समाप्ती चिन्हांकित करते आणि विकासाच्या पुढच्या टप्प्यासाठी प्रारंभ करते. त्यांचा आकार कदाचित द्राक्षे किंवा चेरीइतका मोठा असू शकेल आणि वेगाने होणारी वाढ स्वीकारण्यास ते तयार आहेत.
सामान्य शारीरिक बदल
एका बाळासह गर्भवती असलेल्या स्त्रीच्या तुलनेत एकाधिक बाळांसह गर्भवती असलेल्या स्त्रीच्या शरीरात वेगळे बदल होतात. काही बदल हे दोघींमध्ये सारखे असतात आणि ती स्त्री किती बाळांसह गरोदर आहेत ह्याच्याशी त्याचा संबंध नसतो.
- बाळांच्या वाढीमुळे गर्भाशयाच्या आकारातही वाढ होते. हा विस्तार संपूर्णपणे बाळांच्या संख्येवर अवलंबून असतो. काही वेळा ते पपईइतके मोठे असू शकते किंवा त्याहीपेक्षा जास्त मोठे असू शकते. गर्भाशयाचा आकार वाढू लागताच गर्भाशय त्याची दिशा देखील समायोजित करते, ज्यामुळे ते किंचित वरच्या बाजूला झुकलेले असते
- या आठवड्यात देखील तुम्हाला वारंवार लघवीला जावेसे वाटेल आणि हा त्रास तुम्हाला बरेच दिवस होत राहील. गर्भाशयाच्या आकारात वाढ झाल्यामुळे मूत्राशयावर दाब पडतो आणि त्यामुळे तुम्हाला सतत लघवीची भावना निर्माण होते
- सतत चढ-उतार होणाऱ्या संप्रेरकांच्या पातळीमुळे स्त्रियांना डोकेदुखी होऊ शकते. यापूर्वी मायग्रेन झालेल्या मातांना पुन्हा त्यांचा सामना करावा लागू शकतो. ही परिस्थिती सामान्य असली तितकी ती आरामदायक नाही. थकवा, तणाव, चिंता यांच्यासह डोकेदुखीमुळे गरोदरपणाची मजा आणि आनंद सहजपणे दूर होतो
- ज्या नोकरी करणाऱ्या स्त्रियांना त्यांच्या कामाच्या वेळापत्रकानुसार संगणकाच्या पडद्यासमोर दीर्घ कालावधीसाठी बसण्याची आवश्यकता असते त्यांना डोकेदुखीचा सामना करावा लागतो आणि त्यांच्या डोळ्यांवरील ताण देखील वाढतो. ह्याचा प्रतिकार करण्यासाठी विश्रांती घेणे हा एकच मार्ग आहे
- वजनात होणारी वाढ हळूहळू होत राहते, जरी ह्याचा फारसा फरक पडला नाही तरी ह्या काळात वजनातील अस्थिरता उद्भवते त्यामुळे तुमचे वजन काही दिवस कमी आणि नंतर पुन्हा वाढण्याची शक्यता असते
- गर्भाशयाचा वाढता आकार आणि स्तनांकडे रक्ताचा वाढलेला प्रवाह यामुळे त्यांचा आकार वाढू शकतो. या विस्तारामुळे त्वचेवरही दबाव वाढतो, त्यामुळे त्वचा ताणली जाते आणि कधी कधी त्वचेला खाज सुटते
- ऍसिडिटी आणि बद्धकोष्ठता उद्भवू शकते, ज्यामुळे वायू पास करण्याची आणि ढेकर काढण्याची प्रवृत्ती वाढते. ह्याविषयी काळजी करण्याचे काही कारण नाही परंतु समाजात असताना वायू पास केल्यास ते ओशाळवाणे वाटू शकते. योग्य आहार घेतल्यास असे होण्याची शक्यता कमी होऊ शकते
- ९व्या आठवड्यात एखाद्या स्त्रीमध्ये मळमळ आणि मॉर्निंग सिकनेसची भावना सर्वात तीव्र होते. बर्याच स्त्रिया या वेळी त्यांच्या गरोदरपणाचा तिरस्कार करतात आणि चिडचिड करतात. काही वेळा त्यामुळे निराशा येऊ शकते. परंतु, ही लक्षणे येत्या आठवड्यात कमी होण्यास सुरवात होईल
जुळ्या बाळांसह गरोदरपणाच्या ९ व्या आठवड्यातील लक्षणे
शरीरात होत असलेल्या वेगवेगळ्या बदलांशिवाय, ९ व्या आठवड्यात जुळे होण्याची चिन्हे आपल्यामध्ये भावनात्मक आणि सूक्ष्म मार्गाने प्रकट होऊ शकतात.
- संप्रेरकांच्या उच्च पातळीमुळे ह्या काळात मूड सविंग्स अगदी तीव्र होतील. दिवसभरात कुठल्याही वेळी तुम्हाला छोटीशी डुलकी काढावीशी वाटेल. काही वेळा, काहीही कारण नसताना तुम्ही कुटुंबातील सदस्यांवर चिडचिड कराल
- या आठवड्यात एचसीजी हार्मोन्सची पातळी खूप वाढते. मळमळ होणे हा या टप्प्यावरचा सर्वात भयंकर परिणाम आहे आणि एका बाळासह गर्भवती असलेल्या स्त्रियांपेक्षा एकाधिक बाळांसह गरोदर असलेल्या स्त्रियांमध्ये हा परिणाम आणखी तीव्र स्वरूपात जाणवतो.जर बाळांची संख्या जास्त असेल तर शरीरात त्यांचे समर्थन करण्यासाठी जास्त कठोर परिश्रम करण्याची आवश्यकता आहे, ज्यामुळे एचसीजीचा उच्च स्त्राव होतो आणि ही लक्षणे आणखीनच वाढतात
- गरोदरपणाचा ९ वा आठवडा तुमच्यासाठी सर्वात कठीण असू शकतो. तुमच्या शरीरात होणारे बदल तसेच तुमचे कुटुंब, घर आणि स्वत: ची काळजी ह्या सगळ्यामुळे तुमच्यामध्ये खूप कमी ऊर्जा शिल्लक राहते. पुरेशी झोप मिळण्यासाठी तुम्हाला झोपेचे वेळापत्रक ठरवण्याची शिफारस केली जाते
- मळमळ झाल्यामुळे लाळ वाढते तसेच ह्या आठवड्यात आपल्या नाकातील श्लेष्माचे अत्यधिक उत्पादन देखील होते.रक्ताच्या वाढलेल्या प्रवाहामुळे नाक चोंदल्यासारखे होते, तसेच त्यानंतर नाकातील श्लेष्मा वाढल्यामुळे सर्दीसारखी परिस्थिती निर्माण होते
जुळ्या बाळांसह गरोदरपण – ९ वा आठवडा – पोटाचा आकार
तुम्ही आधी घालू शकत असलेल्या बऱ्याचशा पँट्स आता सहज बसत नाहीत. वजन आणि कंबरेच्या भागातील वाढ स्पष्ट होईल आणि तो फक्त तुम्हाला जाणवेल. पोटाच्या आकारात होणारा बहुतेक बदल गर्भाशयाच्या वाढीचा परिणाम आहे आणि बऱ्याच स्त्रियांमध्ये थोडा पोटाचा उंचवटा दिसू लागेल
जुळ्या बाळांसह गरोदरपण – ९ वा आठवडा – अल्ट्रासाऊंड
जेव्हा तुम्ही गरोदरपणाच्या ९ व्या आठवड्यात पोहोचता तेव्हा अल्ट्रासाऊंड केल्यास तुम्हाला तुमच्या बाळांच्या नवीन विकासाची ओळख होते. हे कमी व्हिज्युअल आणि अधिक आभासी आहे. डॉक्टर तुम्हाला तुमच्या बाळांच्या हृदयाचे ठोके ऐकण्याची परवानगी देतील. आपल्या जुळ्या किंवा एकाधिक बाळांची स्थिती त्या ठोक्यांना वेगळी करण्यास सक्षम ठरेल, परंतु कधी कधी तुम्हाला ते एकसंध आणि अगदी वेगाने पडताना सुद्धा ऐकू येतील
काय खावे?
बाळाच्या वाढीस अनुकूल अशी पोषकद्रव्ये प्रदान करू शकते अशा आहाराचे अधिक महत्व आहे
उकडलेले मांस हा एक उत्तम पर्याय आहे. हंगामी फळे आणि भाज्यांमुळे अधिक आवश्यक पौष्टिकता सुनिश्चित होते. लोहाच्या कमतरतेमुळे थकवा येऊ शकतो. लोह समृद्ध अन्नपदार्थांसह लोहाची पातळी संतुलित करणे महत्वाचे आहे.
आपल्या आहारात हिरव्या भाज्या, लाल फळे, सुका मेवा या सर्व गोष्टींचा समावेश करणे चांगले आहे. जन्मपूर्व पूरक जीवनसत्वे घेतल्यास हा आहार आपणास निरोगी ठेवू शकतो
गरोदरपणातील काळजीविषयक टिप्स
गरोदरपणाच्या या टप्प्यात स्वत: ला सुरक्षित ठेवण्यासाठी काही टिप्स लक्षात घेतल्यास तुम्हाला आगामी आठवडे आणि महिने सुरक्षित राहण्यास मदत होते.
हे करा
- आपल्या स्तनांना आधार देणारी आणि त्यांच्या संवेदनशील त्वचेला त्रास होणार नाही अश्या प्रसूतीच्या ब्रा ची निवड करा
- प्रत्येक आठवड्याला आपल्या वजनाचे निरीक्षण करा आणि काही किलो कमी करण्याबद्दल चिंता करू नका
हे टाळावे
- योनीतून रक्तस्त्राव होत असल्यास किंवा कोणताही दुर्गंधीयुक्त स्त्राव बाहेर पडल्यास लैंगिक संबंध ठेवणे टाळा
- मसालेदार, गोड किंवा चरबीयुक्त पदार्थ खाऊ नका कारण त्यामुळे मॉर्निंग सिकनेस आणखी वाढू शकतो
आपल्याला काय खरेदी करण्याची आवश्यकता आहे?
तुमचा मॉर्निंग सिकनेसचा त्रास आणखी वाढेल, म्हणून गरोदर स्त्रियांसाठी सुरक्षित असलेले काही शुगर-फ्री च्युइंगम मिळविणे खूपच उपयुक्त ठरेल. आपल्या भावना लिहून ठेवण्यासाठी आणि स्वत: ला शांत आणि निवांत ठेवण्यासाठी डायरी लिहिण्यास प्रारंभ करा.
जेव्हा एखादी स्त्री जुळ्या बाळांसह ९ आठवड्यांची गर्भवती असते, तेव्हा तिने तिच्या आयुष्यात कधीही अनुभवलेला नसेल इतका ताण तिच्यावर असू शकतो. असंख्य शारीरिक बदलांमुळे गरोदरपणातील सर्व आनंद पूर्ण घेतला जाऊ शकत नाही. तुम्ही तुमच्या पतीची वेळोवेळी मदत घ्या आणि थोडा वेळ जाऊ द्या कारण उत्तम क्षण लवकरच येतील!
मागील आठवडा: जुळ्या किंवा एकाधिक बाळांसह गरोदरपण – ८ वा आठवडा
पुढील आठवडा: जुळ्या किंवा एकाधिक बाळांसह गरोदरपण – १० वा आठवडा