गर्भारपण

गरोदरपणातील विषमज्वर (टायफॉईड): कारणे,लक्षणे आणि उपचार

गरोदरपणाचा काळ हा जागरूक राहण्याचा काळ आहे कारण ह्या काळात गर्भवती स्त्रीने प्रत्येक बाबतीत अधिक सावधगिरी बाळगणे आवश्यक आहे. जेव्हा एखादी स्त्री गर्भवती असते तेव्हा तिला स्वत: ची जास्त काळजी घेणे आवश्यक असते कारण ह्या काळात बरीच गुंतागुंत उद्भवू शकते. गरोदरपणात, एखाद्या महिलेस काही विशिष्ट संसर्ग देखील होऊ शकतात ज्यामुळे गंभीर रोग होऊ शकतात. विषमज्वर म्हणजेच टायफॉईड असाच एक आजार ज्याचा गर्भवती स्त्रीला त्रास होऊ शकतो. टायफॉईड गर्भवती स्त्रीला आणि तिच्या गर्भात वाढणार्‍या बाळाच्या आरोग्यास हानिकारक ठरू शकतो. ह्या रोगाबद्दल आणि त्यावर उपचार कसा केला जाऊ शकतो ह्याबद्दल अधिक जाणून घेऊयात.

टायफॉईड म्हणजे काय?

टायफॉईड हा एक जिवाणू संसर्ग आहे ज्यामुळे तीव्र ताप, उलट्या आणि अतिसार होऊ शकतो. हा आजार साल्मोनेला टायफीमुळे होतो. हा एक जिवाणू संसर्ग आहे जो सहजपणे पसरतो. जीवाणू सामान्यत: आतड्यांमधून पसरतात, रक्तप्रवाहात ह्या जिवाणूंची संख्या वाढते आणि हळूहळू अवयवांवर त्याचा परिणाम होतो. टायफॉइडच्या लक्षणांमध्ये गॅस्ट्रोइंटेस्टाइनल समस्या आणि उच्च ताप आढळतो. पॅराटीफाइड हा देखील एक असाच रोग आहे जो साल्मोनेला पॅराटीफि या जीवाणूमुळे होतो परंतु त्याचे दुष्परिणाम कमी असतात. टायफॉइड ला कारणीभूत साल्मोनेला टायफिटीमुळे अन्न विषबाधा देखील होते.

कारणे काय आहेत?

टायफॉईड ताप स्वच्छतेच्या अभावामुळे होतो. संसर्गास कारणीभूत ठरण्याचे एक महत्त्वाचे कारण म्हणजे पिण्याच्या पाण्याची निकृष्ट गुणवत्ता होय. जीवाणूंचा संसर्ग झाल्यानंतरचा मानवी कचरा देखील टायफॉईड होण्यास कारणीभूत आहे. स्वच्छताविषयक सुविधा नसलेल्या सार्वजनिक शौचालयाचा वापर केल्यास देखील टायफॉईड होऊ शकतो. मूलभूतपणे, संक्रमित व्यक्तीशी कोणत्याही प्रकारचा संपर्क किंवा ज्या ठिकाणी स्वच्छतेचा अभाव आहे अशा परिसराशी संपर्क आल्यास हा अत्यंत संसर्गजन्य रोग होऊ शकतो

चिन्हे आणि लक्षणे

टायफॉइडची अनेक लक्षणे आहेत आणि त्यातील बहुतेक लक्षणे मलेरियाच्या लक्षणांसारखीच आहेत. म्हणूनच, या रोगाचे निदान करणे कठीण होते. परंतु टायफॉइडची लक्षणे जिवाणूंचा संसर्ग झाल्यावर ६ ते ३० दिवसांच्या दरम्यान केव्हाही दिसू लागतात. टायफॉइडची लक्षणे खालीलप्रमाणे आहेतः

टायफॉईड संसर्ग कसा पसरतो?

साल्मोनेला टायफी हा जीवाणू मनुष्यांच्या आतड्यांमधे आणि रक्तप्रवाहात राहतो आणि शरीराच्या इतर अवयवांमध्ये आणि ऊतींमध्ये पसरतो. पुढील काळात हा संसर्ग पसरतो: टायफॉईड हा एक अत्यंत संसर्गजन्य आजार आहे. तो अगदी सहजतेने पसरू शकतो. म्हणजेच जर तुम्ही एखाद्या संक्रमित व्यक्तीसोबत काही गोष्टी शेअर केल्यास तुम्हाला हा आजार होण्याची दाट शक्यता आहे. विषाणूचा धोका स्वच्छता न राखल्याने होतो, अनेक लोकांना त्याचा त्रास होऊ शकतो आणि साथ येऊ शकते.

गरोदरपणात टायफॉइडची लस कशी दिली जाते?

जेव्हा एखादी महिला गर्भवती असते, तेव्हा तिची रोगप्रतिकार शक्ती कमी असते त्यामुळे तिला टायफॉईड संसर्ग होऊ शकतो. म्हणूनच त्यासाठी लस घेण्याची सूचना दिली जाते. टायफॉईड चा धोका आपणास निर्माण झाल्यास लसीकरण उपलब्ध होऊ शकते. थेट लस घेण्याऐवजी (जी बाळाच्या आरोग्यासाठी हानिकारक ठरू शकते)गर्भवती महिलांना सामान्यत: निष्क्रिय पॉलिसेकेराइड लस प्रकार व्ही. आय. (Vi) दिली जाते. गर्भवती महिलांना संसर्ग होण्याच्या धोक्याच्या दोन आठवडे आधी लस देण्याचा सल्ला दिला जातो

निदान

टायफॉइडची लक्षणे मलेरिया आणि डेंग्यूच्या लक्षणांप्रमाणेच आहेत. म्हणूनच, लक्षणांच्या आधारे या रोगाचे निदान केले जाऊ शकत नाही. कधीकधी ही लक्षणे डॉक्टरांना रोगाचे निदान करण्यास मदत करू शकतात, परंतु बहुतेक प्रकरणांमध्ये, नेहमीची लक्षणे टायफॉईडची सुरूवात झाली आहे किंवा नाही ह्याचे निदान करण्यास सक्षम नसतात. म्हणून ताप एका आठवड्यापेक्षा जास्त काळ टिकत असेल तर, टायफॉईडचे निदान करण्यासाठी डॉक्टर विडल चाचणी सुचवू शकतात. तुमचे डॉक्टर तुम्हाला हीमोग्लोबिन किंवा अस्थिमज्जा ऑर्डर चाचणी करण्यास सांगू शकतात.

विषमज्वर उपचार

टायफॉइडवर सहसा प्रतिजैविक औषधांनी उपचार केला जातो. टायफॉइडवर उपचार करण्यासाठी नेहमीचा कालावधी ७-१४ दिवस असतो. काहीवेळा, बहुधा तो ताप असतो ज्यासाठी आपण खरोखर औषधे घेऊ शकता. टायफॉईडच्या लक्षणांचा सामना करण्यासाठी घरी योग्य आहार आणि भरपूर द्रवपदार्थ पिऊन स्वतःची चांगली काळजी घ्यावी. संक्रमित व्यक्तीचा संपर्क टाळणे सर्वात चांगले जेणेकरुन संसर्ग पसरणार नाही. गरोदरपणात टायफॉइडचा उपचार करणे कठीण होऊ शकते. टायफॉइडवर उपचार करण्यासाठी वापरल्या जाणार्‍या नेहमीच्या प्रतिजैविकांना सामान्यत: गर्भवती महिलांना दिले जात नाही कारण ते बाळासाठी धोकादायक असतात. अशा परिस्थितीत टायफॉइडवर सेफलोस्पोरिन आणि अ‍ॅम्पीसिलीन / अ‍ॅमोक्सिसिलिनचा उपचार केला जातो. तथापि, ही औषधे केवळ डॉक्टरांच्या सल्ल्याने घेतली पाहिजेत.

कुठली गुंतागुंत निर्माण होऊ शकते?

जर एखाद्या महिलेस गरोदरपणात टायफॉइडचा ताप असेल तर तो तिच्या आरोग्यावर तसेच बाळाच्या आरोग्यावरही प्रतिकूल परिणाम करू शकतो. जर ह्या रोगाचे निदान वेळेत करून उपचार न घेतल्यास गर्भपात होण्याचा धोका जास्त असतो. विषमज्वरामुळे, एखाद्या महिलेला काही दिवस अशक्त वाटू शकते आणि ती काही काळ द्रव आहार देखील घेऊ शकते. परिणामी, बाळाला त्याच्या योग्य वाढीसाठी आणि विकासासाठी पुरेसे पोषण मिळणार नाही. जर एखाद्या स्त्रीला गरोदरपणात टायफॉइड संसर्गाचा त्रास होत असेल तर बाळाचा अकाली जन्म किंवा वजन कमी होण्याची शक्यता जास्त असते.तसेच, तोंडी सक्रिय लसीकरण बाळासाठी गंभीरपणे धोकादायक असल्याचे सिद्ध होऊ शकते.

टायफॉईड होण्यापासून स्वतःचे रक्षण कसे करावे?

जर तुम्ही गरोदरपणात टायफॉइड संसर्गापासून स्वत: ला रोखू इच्छित असाल तर तुम्ही योग्य स्वच्छता राखली पाहिजे. स्वयंपाक करण्यापूर्वी, खाण्यापूर्वी आणि स्वच्छतागृह वापरल्यानंतर हात धुणे ह्यासारखी सावधगिरी बाळगल्यास तुम्ही स्वतःची काळजी घेण्यात मदत होते. हा संसर्ग रोखण्यासाठी आपण काय करू शकता ते येथे आहेः

सामान्य प्रश्न

. टायफॉईड लस जन्म दोषास कारणीभूत ठरू शकते का?

जर गर्भवती महिलेने पॉलिसेकेराइड लसऐवजी सक्रिय लसीकरण निवडले नाही तर असा कोणताही अभ्यास नाही ज्याने हे सिद्ध केले आहे की टायफॉईड लस बाळामध्ये जन्मजात दोष निर्माण करू शकते सक्रिय लशींच्या बाबतीत, बाळ जन्मजात दोषांसह जन्माला येऊ शकते.

. टायफॉईड लसीमुळे गर्भपात होऊ शकतो का?

टायफॉइडचे निदान न झाल्यास आणि गरोदरपणात वेळेत उपचार मिळाले नाहीत तर त्या महिलेचा गर्भपात होऊ शकतो. तथापि, गर्भवती महिलेस एक निष्क्रिय (किंवा ठार) लस दिली जाते, जी सुरक्षित आहे आणि बाळाला कोणतीही हानी पोहोचवित नाही. गरोदरपणात एखाद्या महिलेस टायफॉइडची थेट लस देऊ नये कारण ती बाळाच्या आरोग्यासाठी घातक ठरू शकते.

. टायफॉइडचा गर्भवती महिलेवर आणि तिच्या बाळावर कसा परिणाम होतो?

या आजारामुळे गर्भवती महिलेला थकवा येऊ शकतो. गरोदरपणात संपूर्ण दिवस भरण्यापूर्वी आईचे शरीर कमकुवत करते. तसेच, उपचारांमध्ये बहुतेक द्रवयुक्त आहाराचा समावेश असल्याने, आई आणि बाळ दोघांचे पोषण कमी होऊ शकते. जर वेळेवर रोगाचा उपचार केला नाही तर गर्भपात होण्याची शक्यता जास्त आहे. जीवाणू बाळापर्यंत पोहोचल्यास, जन्माच्या वेळी काही विकृती निर्माण होण्याची शक्यता असते किंवा बाळाचा अकाली जन्म होऊ शकतो किंवा त्याचे वजन कमी असू शकते.

. टायफॉइड लसीमुळे मुलामध्ये आकलन आणि वर्तणुकीशी संबंधित समस्या उद्भवू शकतात?

हे सिद्ध करण्यासाठी कोणताही अभ्यास झालेला नाही ज्या मातांना गर्भावस्थेच्या पहिल्या महिन्यात निष्क्रिय लस दिली गेली आहे आणि टायफॉईड यशस्वीरित्या प्रतिबंधित केले गेले आहे, त्या बाळाला कोणत्याही प्रकारे संसर्ग होण्याची शक्यता नाही.

घ्यावयाची खबरदारी

योग्य स्वच्छता राखून टायफॉईडचा प्रतिबंध केला जाऊ शकतो. आपले हात धुवा, उकळलेले किंवा सुरक्षित स्त्रोतांचे पाणी प्या, भाज्या आणि फळे खाण्यापूर्वी चांगल्या धुवा, चांगले शिजवलेले अन्न खा आणि शौचालय स्वच्छ ठेवा. म्हणजे तुम्ही निरोगी रहाल! गरोदरपणात, स्त्रीने स्वत:ची अगदी उत्तमप्रकारे काळजी घेतली पाहिजे. टायफॉईड प्राणघातक असू शकतो म्हणून हा आजार रोखण्यासाठी स्वत: ची काळजी घेतली पाहिजे. वर नमूद केलेल्या प्रतिबंधात्मक सूचनांचे अनुसरण करून आपण गरोदरपणात सुरक्षित राहू शकता आणि ह्या संक्रामक आजारापासून बचाव करू शकता. आणखी वाचा: गरोदरपणात छातीत जळजळ होणे: लक्षणे, कारणे आणि उपचार गरोदरपणात होणारी सर्दी: कारणे, लक्षणे आणि उपचार
Published by
मंजिरी एन्डाईत
Last Updated On

Recent Posts

All Rights Reserved