बाळ

दाट केसांसाठी बाळाचे मुंडण करणे – हे खरे आहे की खोटे?

बर्‍याच लोकांचा असा विश्वास आहे की बाळाचे मुंडण केल्यास केस दाट होऊ शकतात. जर आपल्या बाळाचे केस मऊ आणि कोमल परंतु विरळ असतील तर आपल्या बाळाचे केस जाड व दाट होतील ह्या आशेने तुम्हाला त्याचे मुंडण करावेसे वाटेल. तुमच्यापैकी काहीजण बाळाचे केस चांगले वाढावेत म्हणून आपल्या बाळाच्या डोक्याचे मुंडण करण्याचा पर्याय निवडू शकतात, तर इतर काही जण त्यांच्या प्रथेचा भाग म्हणून हे करू शकतात. परंतु एखाद्या मुलाचे मुंडण केल्याने खरेच त्याचे केस वाढतात का? का ते केवळ एक मिथक आहे? बरं, तर बाळाच्या केसांच्या वाढीसाठी मुंडण करण्याचा पर्याय हा किती खरा आणि खोटा ह्याविषयी अधिक जाणून घेण्यासाठी हा लेख पुढे वाचूयात.

बाळाचे मुंडण करण्यासाठी योग्य वय काय आहे?

तुम्ही तुमच्या बाळाचे मुंडण करण्याचे ठरवत असाल तर किमान आपल्या बाळाचे डोके टणक होईपर्यंत प्रतीक्षा करावी अशी शिफारस केली जाते. बाळाच्या हालचालींचा अंदाज लावता येत नाही आणि मुंडण करताना आपल्या बाळाला हालचाल न करता स्थिर बसणे आवश्यक आहे. आपल्या बाळाचे मुंडण करणे केवळ कठीणच नाही तर ते विविध प्रकारच्या प्राणघातक रोगांनाही कारणीभूत ठरू शकते. काही संस्कृतींमध्ये, मुंडन करणे जन्माच्या सातव्या महिन्याच्या सुरुवातीस होऊ शकते, इतर संस्कृतीत ते पहिल्या, दुसर्‍या आणि काही वेळा अगदी मुलाच्या वयाच्या चौथ्या वर्षातही केले जाऊ शकते.

बाळाचे मुंडण केल्याने केस दाट वाढतात का?

आपल्यास असे वाटत असेल की बाळाचे डोके मुंडण केल्याने केसांची वाढ चांगली होते, तर पुन्हा विचार करा. पुष्कळ तज्ञांचे असे मत आहे की मुंडण केल्याने केसांची चांगली वाढ होत नाही. एखादी वैज्ञानिक वस्तुस्थिती समोर ठेवून हे अधिक स्पष्ट केले जाऊ शकते. खरं सांगायचं झालं तर केसांच्या फॉलिकल्स पासून केस वाढतात, जे टाळूच्या खाली असतात. आपण केस काढून टाकता तेव्हा केसांच्या फॉलिकल्स वर त्याचा परिणाम होत नाही. अशा प्रकारे हे केसांच्या फॉलिकल्सना चांगले नाही तर ते केसांवर सुद्धा काही परिणाम करत नाही. खरेतर, चार महिन्यांनंतर आपल्या मुलाचे केस चांगले वाढतात. तसेच, बाळाच्या केसांचा पोत आणि घनता मुख्यत: जनुकांवर अवलंबून असते, याचा अर्थ असा की तुमचे केस चमकदार असल्यास तुमच्या मुलाचे सुद्धा मोठे झाल्यावर चमकदार केस होण्याची शक्यता असते.

बाळाचे मुंडण करण्याची भारतीय परंपरा

बाळाचे मुंडण करण्याची परंपरा बर्‍याच देशांमध्ये पाळली जाते. विविध संस्कृती आणि वंशाचे लोक आपल्या बाळाच्या जन्माच्या काही वर्षांतच मुंडण करतात. भारतीय परंपरा आणि संस्कृतीतही हे फार प्रचलित आहे. बाळाचे मुंडण करणे धार्मिक आणि शुभ भावनांशी संबंधित आहे. बर्‍याच संस्कृतीत हे सौंदर्य लक्षण आहे आणि अशा प्रकारे मुंडण केल्याने निरोगी आणि मजबूत केसांच्या वाढीस उत्तेजन मिळू शकते. वर चर्चा केल्याप्रमाणे मुंडण केल्याने केसांची चांगली वाढ होऊ शकते ह्याचे कोणतेही शास्त्रीय पुरावे नाहीत. तथापि, मुंडण केल्याने केस एकसारखेच वाढू शकतात, ज्यामुळे केस एकसमान व आरोग्यदायी दिसू शकतात.

सहजतेने बाळाचे डोके मुंडण करण्यासाठी टिप्स

तुम्ही तुमच्या बाळाचे मुंडण करण्याचे ठरवत असल्यास, ते करण्यासाठी तुम्ही एखाद्या व्यावसायिकाला नियुक्त करावे असे आम्ही सुचवितो. ह्या क्षेत्रातील तज्ञ असलेल्या लोकांना मुंडण करण्याबद्दल अधिक चांगली माहिती असते. तथापि, आपल्या सोईसाठी, येथे काही टिप्स आहेत ज्या तुम्हाला कोणत्याही अडचणीशिवाय आपल्या बाळाचे मुंडण करण्यास मदत करतील:

बाळाच्या मुंडणानंतर काय करावे?

आपल्या बाळाला चांगले उबदार पाण्याने अंघोळ घातल्यानंतर तुम्ही तुमच्या मुलाच्या डोक्यावर कोणतेही जंतुनाशक लावू शकता. प्रक्रियेदरम्यान झालेल्या कोणतीही जखम किंवा कापले गेले असल्यास त्याची काळजी हे जंतुनाशक घेईल. यानंतर, खाज सुटणे आणि कोरडेपणा टाळण्यासाठी तुम्ही तुमच्या मुलाच्या डोक्यावर कोणत्याही चांगल्या तेलाने किंवा मॉइश्चरायजरद्वारे मॉइश्चरायझिंग केले पाहिजे

जर एखाद्या मुलाला क्रेडल कॅप असेल तर आपण त्याचे मुंडण करावे का?

क्रेडल कॅप म्हणजे बाळाच्या टाळूवरची त्वचा कोरडी आणि मृत असणे. मुंडण केल्यामुळे क्रेडल कॅपच्या समस्येपासून सुटका मिळेल असे काही पालकांना असे वाटू शकते. तथापि, हे नेहमीच लागू होत नाही. मुंडण करण्याऐवजी तुम्ही क्रेडल कॅप बरे करण्यासाठी नैसर्गिक तेले, औषधी शैम्पू आणि इतर प्रतिबंधात्मक उपाय करू शकता. आपल्या मुलाचे मुंडण करणे हि तुमची निवड असली पाहिजे. कुणीतरी सक्ती करते म्हणून ते करू नका. लक्षात ठेवा की तुम्ही तुमच्या मुलाचे मुंडण करण्याची योजना आखली असली तरीही, त्याने त्यासाठी तयार असले पाहिजे. तसेच ते करण्याआधी तुमच्या बाळाच्या डॉक्टरांचा सल्ला घेतल्यास योग्य निर्णय घेण्यास मदत होईल. आणखी वाचा: बाळाच्या केसांच्या वाढीसाठी १० टिप्स तुमच्या बाळाच्या आरोग्यासाठी नारळाच्या तेलाचे सर्वोत्तम १२ फायदे
Published by
मंजिरी एन्डाईत
Last Updated On

Recent Posts

All Rights Reserved