Firstcry Parenting
Search
Parenting Firstcry
Home गर्भधारणा होताना गर्भधारणेसाठी प्रयत्न करताना गरोदर राहण्यासाठी दिवसातून किती वेळा लैंगिक संबंध ठेवले पाहिजेत?

गरोदर राहण्यासाठी दिवसातून किती वेळा लैंगिक संबंध ठेवले पाहिजेत?

गरोदर राहण्यासाठी दिवसातून किती वेळा लैंगिक संबंध ठेवले पाहिजेत?

जर बाळाचा विचार करीत असाल तर तुम्ही त्यासाठी शारीरिक आणि मानसिक तयारी सुरु केली असण्याची शक्यता आहे. गर्भधारणेची शक्यता वाढवण्यासाठी योग्य वेळी लैंगिक संबंध ठेवणे ही पहिली पायरी आहे. आकडेवारीनुसार गर्भधारणेसाठी ७८ वेळा समागम करणे आवश्यक आहे.म्हणजेच साधारणतः सहा महिने!

गर्भवती होण्यासाठी दररोज लैंगिक संबंध ठेवणे आवश्यक आहे का?

पटकन गर्भधारणा व्हावी ह्या उत्साहात, आपण दररोज लैंगिक संबंध ठेवू इच्छित असाल परंतु सुरुवातीच्या एक किंवा दोन महिन्यांपर्यंत ते मजेदार आणि आनंददायक असू शकते. परंतु, जर गर्भधारणा झाली नाही तर दररोज सेक्स कंटाळवाणे होऊ शकते. ज्या वारंवारतेने तुम्हाला संभोग करण्याची आवश्यकता आहे ते तुम्ही निवडलेल्या पद्धती आणि तुमच्या प्रजनन समस्येवर अवलंबून असेल. शुक्राणूंची कमी संख्या किंवा कमकुवत शुक्राणू, ह्यामुळे दररोज संभोग केल्यास प्रतिकूल परिणाम होऊ शकतो. एखाद्या चांगल्या डॉक्टरांचा सल्ला आपल्यासाठी आणि आपल्या जोडीदारासाठी काय चांगले आहे हे ठरवण्यासाठी मदत करू शकतो.

गर्भधारणेसाठी किती वेळा लैंगिक संबंध ठेवावेत?

लवकर गर्भधारणा होण्यासाठी नक्कीच अधिक वेळा सेक्स करण्याची आवश्यकता असेल. तुम्हाला किंवा तुमच्या पतीला कोणत्याही प्रजनन समस्या नसल्यास, दररोज सेक्स करणे ही चांगली कल्पना आहे. परंतु काही दिवसांनी त्यातील आनंद निघून जातो आणि ते निव्वळ काम होऊन जाते. म्हणून, प्रणय कायम ठेवण्याचा प्रयत्न करा आणि नंतर एकमेकांसाठी काहीतरी खास करून भावना जागृत करा.

प्रजननक्षमता जास्त असलेल्या काळात अनेकदा लैंगिक संबंध ठेवा

प्रत्येक स्त्रीच्या मासिक चक्रात, काही दिवस तिची प्रजननक्षमता सर्वात जास्त असते. हा कालावधी ओळखणे आणि त्या दरम्यान दररोज संभोग केल्याने गर्भधारणेची शक्यता वाढते. मासिक पाळीचा मागोवा ठेवणे आणि ओव्यूलेशनचे संभाव्य दिवस चिन्हांकित करणे गर्भधारणेची शक्यता वाढवण्यासाठी उपयुक्त ठरू शकते. सहसा, दरमहा ओव्हुलेशनच्या पाच दिवस आधी अत्यंत प्रजनन क्षम असल्याचे मानले जाते. तुमची प्रजनक्षमता सर्वात जास्त केव्हा आहे हे जाणून घेण्याचे बरेच मार्ग आहेत. शरीराचे मूलभूत तापमान मोजणे, ग्रीवाच्या श्लेष्मावर लक्ष ठेवणे आणि ओव्हुलेशन किट वापरणे इत्यादी मार्गानी तुम्हाला दरमहा तुमच्या सुपीक दिवसांची ओळख तुम्हाला होईल. फर्टिलिटी मॉनिटर्स आणि कॅलेंडर्स सुद्धा तुम्ही वापरू शकता.

445979140-H.webp (1024×700)

ओव्यूलेशन सुरु होण्याच्या एक आठवडा आधी किंवा मासिक पाळी संपल्यानंतर आठवड्यातून दररोज दुसर्‍या दिवशी लैंगिक संबंध ठेवण्याची शिफारस डॉक्टर करतात. शरीर प्रत्येक वेळी सारखेच कार्य करत नसले तरी तुमची शेवटच्या मासिक पाळीची तारीख लक्षात ठेवा.

प्रजननक्षमता कमी असतानाच्या कालावधीत लैंगिक संबंध

हे खरं आहे की तुमची प्रजननक्षमता जास्त असलेल्या दिवसांमध्ये लैंगिक संबंध ठेवल्याने तुमची गर्भधारणेची शक्यता वाढते, परंतु याचा अर्थ असा नाही की तुम्ही कमी प्रजननक्षमता असलेल्या दिवसांमध्ये सेक्स करणे थांबवले पाहिजे. जरी ह्या काळात लैंगिक संबंध ठेवल्याने गर्भधारणा झाली नाही, तरी संशोधनाद्वारे असे दिसून आले आहे की संभोग केल्याने ह्या कालावधीत महिलांच्या रोगप्रतिकारक शक्तीमध्ये बर्‍याच प्रकारे बदल होतो आणि त्यामुळे गर्भधारणेची शक्यता वाढू शकते.

गर्भधारणा होण्यासाठी लैंगिक संबंध कधी मर्यादित ठेवावेत?

जर पुरुष किंवा स्त्रीला प्रजनन समस्या असतील आणि त्यासाठी ते उपचार घेत असतील किंवा त्याचे मूल्यांकन केले जात असेल तर डॉक्टर ह्या सर्व चाचण्या होईपर्यंत लैंगिकसंबंध न ठेवण्यास सांगू शकतात. सहसा, जर जोडप्यांना प्रजननविषयक समस्येचा सामना करावा लागला असेल तर त्यांना प्रजननक्षमता जास्त असलेल्या कालावधीत दररोज संभोग करण्याचा सल्ला दिला जातो. नुकत्याच झालेल्या अभ्यासानुसार, ओव्यूलेशन काळ जवळ असताना, एकाच दिवसात दोनदा संभोग केल्यास विशेषत: पुरुष वंध्यत्वाच्या बाबतीत.सकारात्मक परिणाम होऊ शकतात,

बाळाचा निर्णय घेतल्यावर तो एक मजेदार आणि रोमांचक प्रकल्प म्हणून सुरूवात होऊ शकते. परंतु एक दोन महिन्यांचा काळ उलटून देखील यश मिळाले नाही तर तणाव निर्माण होऊन त्याचा परिणाम तुमच्या साथीदारासोबतच्या नात्यावर सुद्धा होऊ शकतो. प्रजनक्षमता जास्त असलेल्या काळात शारीरिक संबंध ठेवल्यास गर्भधारणेची शक्यता खूप जास्त वाढते. तसेच, हे देखील खरे आहे की काही मूलभूत समस्या नसल्यास प्रत्येक महिन्यात अनेकदा शारीरिक संबंध ठेवल्यास गर्भधारणा देखील होते. तर मग, तुमच्या दोघांसाठी तुम्हाला जे चांगले वाटेल ते करा आणि नियमितपणे प्रयत्न करून एक वर्षानंतरही तुम्हाला गर्भवती होणे अवघड वाटत असेल तर संकोच न करता वैद्यकीय मत घ्या.

आणखी वाचा: गर्भधारणा होण्यासाठी किती कालावधी लागतो?

RELATED ARTICLES
MORE FROM AUTHOR
संपादकांची पसंती
Please Wait Updating Your Article