Firstcry Parenting
Search
Parenting Firstcry
Home गर्भधारणा होताना योजना आणि तयारी संतती नियमनासाठी शुक्रजंतूनाशक

संतती नियमनासाठी शुक्रजंतूनाशक

संतती नियमनासाठी शुक्रजंतूनाशक

संतती नियमनाच्या विविध पद्धतींविषयी तुम्ही ऐकलेच असेल. त्यापैकीच एका पर्यायाचा विचार करूयात, हा पर्याय नको असलेली गर्भधारणा रोखण्यासाठी परिणामकारक आहे. जरी संतती नियमनाचे खूप पर्याय उपलब्ध असले तरी, शुक्राणूनाशक वापरायला सर्वात सोपा पर्याय आहे. हि संततिनियमनाची अशी पद्धत आहे ज्याचा सतत वापर करावा लागत नाही.

शुक्रजंतूनाशक काय आहे?

शुक्राणूनाशक ही संततिनियमनाच्या अशी पद्दत आहे ज्यामुळे संभोगादरम्यान शुक्राणूंची हालचाल कमी होते आणि गर्भधारणेची शक्यता कमी होते. हे शुक्राणूनाशक जेल, फोम, फिल्म्स, सपॉझिटरीज अशा वेगवेगळ्या स्वरूपात उपलब्ध होते. गर्भनिरोधक गोळ्या घेत असताना ह्याचा वापर करू शकता. शुक्राणूनाशक ही संततिनियमनाची परिणामकारक पद्धती आहे आणि त्यामुळे बऱ्याच जोडप्याना मदत झाली आहे.

शुक्रजंतूनाशक काय आहे?

शुक्रजंतूनाशकाचे प्रकार

शुक्राणूनाशक हे वेगवेगळ्या स्वरूपात उपलब्ध आहेत जसे की:

  • शुक्रजंतूनाशक फोम
  • गर्भनिरोधक आवरण
  • शुक्रजंतूनाशक जेली
  • गर्भनिरोधक जेल, फोम किंवा जेली
  • शुक्रजंतूनाशक क्रीम आणि जेल
  • गर्भनिरोधक स्पंज

ह्याचे कार्य कसे होते?

शुक्रजंतूनाशक हे एक प्रकारचे रसायन असते ज्यामुळे शुक्रजंतू गर्भाशयाच्या मुखापर्यंत पोहोचण्याआधीच नष्ट केले जातात. गर्भधारणा टाळण्यासाठी शारीरिक संबंध ठेवण्याआधी ते वापरतात. खालील दोन प्रकारे त्याचे कार्य चालते

  • गर्भाशयाचे मुख झाकले जाते, त्यामुळे शुक्रजंतू आणि स्त्रीबीजांचा संयोग होत नाही.
  • ह्यामुळे शुक्रजंतूंची हालचाल कमी होते (ते मारले जातात), आणि स्त्रीबीजांपर्यंत पोहोचत नाहीत

शुक्रजंतूनाशकाची परिणामकारकता

शुक्रजंतूनाशक ही इतर संततिनियमनाच्या पद्धतींसारखीच परिणामकारक पद्धती आहे. ही पद्धती सुरक्षित आहे परंतु त्यामुळे गर्भधारणा होण्यापासून १००% संरक्षण मिळत नाही. ते योग्य प्रकारे वापरले पाहिजेत आणि ते विशिष्ट कालावधीत सक्रिय असतात. जरी काळजीपूर्वक वापरले तरी सुद्धा १०० स्त्रियांमधील २८ स्त्रियांना ते वापरून सुद्धा गर्भधारणा होते. इतर गर्भनिरोधकाची साधने न वापरल्यास शुक्रजंतूनाशकाचा परिणाम होण्याचा दर हा ७५% आहे. तसेच, गर्भनिरोधक गोळ्या घेण्यापेक्षा हे बरे आहे कारण त्याचा कुठलाच दुष्परिणाम होत नाही.

शुक्रजंतूनाशकाची परिणामकारकता

शुक्रजंतूनाशक जास्त परिणामकारक होण्यासाठी काय कराल?

संततिनियमनाच्या इतर साधनांसोबत जसे की, गोळ्या किंवा कॉन्डोम सोबत वापरल्यास ते जास्त परिणामकारक होते. जर तुम्ही शुक्रजंतूनाशक वापरत असाल तर शारीरिक संबंध ठेवण्याआधी १० मिनिटे ते वापरावे. काही वेळा ते परिणामकारक होण्यासाठी जास्त वेळ सुद्धा लागू शकतो. तसेच, ते घातल्यानंतर एक तासानंतर त्याच्या परिणामकतेवर अवलंबून राहू नका कारण एक तासानंतर त्याचा परिणाम नाहीसा होऊ शकतो. संततिनियमनाची कुठलीही पद्धती १००% परिणामकारक होण्यासाठी पुरुषाने स्खलनाआधी बाहेर काढून घेणे चांगले. त्यामुळे शुक्रजंतूं योनीमार्गात प्रवेश झाला नाही ह्याची खात्री होते.

लैंगिक संबंधांमधून पसरणारे आजार शुक्रजंतूनाशकांमुळे प्रतिबंधित होतात का?

शुक्रजंतूनाशक हे संततिनियमनाच्या इतर पद्धतींसारखेच असते. लैंगिक संबंधांतून पसरणाऱ्या आजारांचा विचार केल्यास शुक्रजंतूनाशकांपासून अगदी खात्रीशीररित्या संरक्षण मिळत नाही. किंबहुना त्याचा जास्त वापर केल्यास संसर्ग किंवा लैंगिक संबंधांमधून पसरणारे आजार होऊ शकतात. त्यामधील रसायनामुळे योनीमार्ग आणि पुरुषांच्या जननेंद्रियाला त्रास होऊन शरीरात सूक्ष्म जिवाणूंचा प्रवेश होऊ शकतो. जर ते काँडोम्स सोबत वापरले तर लैंगिक संबंधातून पसरणारे आजार प्रतिबंधित होऊ शकतात.

ते कसे वापराल?

शुक्रजंतूनाशक वापरणे तसे सोपे आहे. जे शुक्रजंतूनाशक तुम्ही विकत आणता त्यासोबत येणाऱ्या पत्रकावर सूचना असतात. त्या सूचनांचे पालन काळजीपूर्वक करा.

ते कसे वापराल?

आरामदायक स्थिती घेण्यासाठी किंवा उभे राहण्यासाठी किंवा झोपण्यासाठी जागा शोधा. योनीमार्गात हळुवारपणे जेल किंवा आवरण किंवा स्पंज किंवा सपोजीटोरी घाला. टॅम्पून वापरतो तसेच शुक्रजंतूनाशक वापरावे. ते किती काळ परिणामकारक होणार ह्याविषयी जाणून घेण्यासाठी त्यासोबत आलेल्या सूचना वाचा आणि त्यांचे पालन करा. काही शुक्रजंतूनाशकांचा परिणाम होण्यासाठी ५ ते १० मिनिटे लागतात आणि त्यापैकी बऱ्याच शुक्रजंतूनाशकांचा परिणाम १ तासापर्यंत रहातो. जर तुम्हाला लैंगिक संबंध एक तासापेक्षा जास्त वेळ किंवा खूप वेळा ठेवायचे असतील तर तुम्ही शुक्रजंतूनाशक जास्त प्रमाणात वापरले पाहिजे, परंतु त्यामुळे लैंगिक संबंधातून होणारे आजार होण्याची शक्यता आहे. म्हणून, विकत घेण्याआधी आणि वापरण्याआधी त्यावरील सूचनांचे पालन करा.

शुक्रजंतू नाशके संततीनियमनाची पद्धत आहे का?

शुक्रजंतूनाशके हा काही संततिनियमनासाठी कायमचा उपाय नाही. ही अगदी जलद आणि सोपी पद्धत आहे. ह्याचा परिणाम मर्यादित कालावधीसाठी (काही तास) असतो. म्हणून हे संपूर्णतः रीव्हर्सिबल आहे.

तुम्ही काँडोम्स सोबत हे वापरू शकता का?

कंडोम सोबत वापरल्यास हे परिणामकारक आहे. शुक्रजंतूनाशक आणि कॉन्डोम दोन्ही वापरल्यास लैंगिक आजार रोखण्यास त्यांचा उपयोग होतो.

तुम्ही शुक्रजंतूनाशक कुठून विकत आणू शकता आणि त्याची किंमत किती असते?

शुक्रजंतूनाशक हे औषधांच्या दुकानात, ऑनलाईन मिळू शकतात. ते क्लिनिक्स, सुपर मार्केट किंवा काही वैद्यकीय केंद्रांमध्ये सुद्धा उपलब्ध असतात. तुम्हाला त्यासाठी प्रिस्क्रिप्शन ची गरज नसते आणि शुक्रजंतूनाशक विकत घेण्यासाठी वयाची सुद्धा अट नसते.

शुक्रजंतूनाशकाची किंमत ब्रँड आणि प्रकारानुसार बदलते. काही आरोग्य केंद्रांमध्ये ते फुकट सुद्धा मिळते.

शुक्रजंतूनाशकांचे फायदे

शुक्रजंतूनाशकांचे फायदे खालीलप्रमाणे

त्यामध्ये कुठलीही संप्रेरके नसतात

ज्यांना संप्रेरके असलेली औषधे घेता येत नाहीत त्यांच्यासाठी शुक्रजंतूनाशक हा एक चांगला पर्याय आहे कारण गर्भनिरोधक गोळ्यांमध्ये संप्रेरके असतात. पोटातून औषधे घेणे ज्यांना नकोसे वाटते, ते लोक सुद्धा शुक्रजंतूनाशक वापरतात.

वाजवी किंमत आणि वापरण्यास सोपे

शुक्रजंतूनाशक खूप स्वस्त असतात, आणि काही तर फुकट उपलब्ध असतात. ते विकत घेण्यासाठी डॉक्टरांच्या प्रिस्क्रिप्शनची गरज नसल्यामुळे सुलभ आहे. ते सुलभ वाहतूक करण्याजोग्या पॅकेजमध्ये उपलब्ध असतात आणि तुमच्या आजूबाजूच्या परिसरातील दुकानांमध्ये उपलब्ध असतात

शुक्रजंतूनाशकांमुळे लैंगिक क्रियेत अडथळा येत नाही

तुम्ही लैंगिक संबंध ठेवण्याआधी १५ मिनिटे ते वापरू शकता त्यामुळे संभोगादरम्यान गर्भनिरोधकाचे साधन वापरण्यासाठी मध्ये थांबण्याची गरज नाही. त्याचा परिणाम एक तासभर राहतो म्हणून तुम्ही कुठल्याही अडथळ्याविना त्या क्षणाचा आनंद घेऊ शकता.

दुसऱ्या औषधांशी हस्तक्षेप करत नाही

शुक्रजंतूनाशक हे संप्रेरक विरहित असतात आणि जर तुम्ही इतर कुठली औषधे घेत असाल तर हस्तक्षेप करत नाहीत.

शुक्रजंतूनाशकांचे तोटे

शुक्रजंतूनाशकांचे तोटे खालील तोटे आहेत

शुक्रजंतूनाशक वापरताना गचाळपणा वाटू शकतो

शुक्रजंतूनाशकांची घाण वाटू शकते उदा: जेल, फेमस, सपोज़ीटोरिज योनीमार्गातून बाहेर येऊ शकतात. फिल्म्स किंवा आवारणासारखी शुक्रजंतूनाशक थोडी बरी असतात कारण त्यामुळे असे होत नाही.

शुक्रजंतूनाशकांमुळे लैंगिक संबंधातून पसरणाऱ्या आजारांपासून संरक्षण मिळत नाही

लैंगिक संबंधातून पसरणाऱ्या आजारापासून संरक्षण मिळण्यासाठी हा योग्य पर्याय नाही. किंबहुना, खूप जास्त प्रमाणात वापरल्यास त्यामुळे असे आजार बळावण्याची शक्यता असते. जास्त वापरल्यास जननेंद्रियाकडील नाजूक भागास हानी पोहचू शकते आणि त्यामुळे लैंगिक संबंधांपासून पसरणारे आजार किंवा संसर्ग होऊ शकतो.

तुम्हाला ते अगदी हुशारीने वापरावे लागतील

शुक्रजंतूनाशकांचा परिणाम होण्यासाठी विशिष्ट वेळेची मर्यादा आहे. जर ते सक्रिय होण्या अगोदर तुम्ही संभोग केला किंवा ते निष्क्रिय झाल्यानंतर तुम्ही संभोग केला तर तुम्ही अडचणीत येऊ शकता. खूप जास्त प्रमाणात ते वापरल्यास सुद्धा अडचणी येऊ शकतात. तुम्ही जेव्हा शारीरिक संबंध ठेवता तेव्हा प्रत्येक वेळी ते वापरले पाहिजे आणि ते पुनःपुन्हा वापरू शकत नाही त्यामुळे तुम्ही ते वापरताना हुशारीने वापरले पाहिजे.

शुक्रजंतूनाशकांचे दुष्परिणाम सुद्धा होतात

नोनोझायनॉल९ ह्या घटकामुळे शुक्रजंतूनाशकामुळे एचआयव्ही आणि लैंगिक संबंधांमधून बळावणारे आजार वाढतात. शुक्रजंतूनाशके वापरल्यावर चुरचुरल्या सारखे होऊ शकते. जर तुम्हाला तुमच्या योनिमार्गामध्ये आणि तुमच्या पतीच्या लिंगाजवळील भागात चुरचुरल्यासारखे वाटले तर तुम्हाला त्याची ऍलर्जी असू शकण्याची शक्यता आहे. तुम्ही इतर ब्रँडचे शुक्रजंतूनाशक वापरून बघू शकता.

जर तुम्ही बाळाला स्तनपान करीत असाल तर तुम्ही शुक्रजंतूनाशक वापरू शकता का?

स्तनपान जरी सुरु असले तर शुक्रजंतूनाशकांचा वापर करणे सुरक्षित आहे कारण त्यामध्ये कुठलीही संप्रेरके नसतात.

जर तुम्ही बाळाला स्तनपान करीत असाल तर तुम्ही शुक्रजंतूनाशक वापरू शकता का?

जर तुम्ही शुक्रजंतूनाशक वापरण्यास विसरलात किंवा ते चुकीच्या पद्धतीने वापरलेत तर?

जर तुम्ही शुक्रजंतूनाशक चुकीच्या पद्धतीने वापरलेत तर ते काळजीचे कारण असू शकते. गर्भनिरोधक गोळ्या जवळ ठेवणे चांगले. ह्या गोळ्या लवकरात लवकर वापरणे चांगले कारण त्यामुळे नको असलेली गर्भधारणा होत नाही.

शुक्रजंतूनाशकांचा वापर कुणी टाळला पाहिजे?

जर तुम्हाला खालीलपैकी कुठल्याही गोष्टी असतील तर तुम्ही शुक्रजंतूनाशकांचा वापर टाळला पाहिजे:

  • तुम्हाला आणि तुमच्या पतीला जेल, क्रीम किंवा गोळ्यांच्या स्वरूपातील शुक्रजंतूनाशकांची ऍलर्जी असेल तर
  • जर तुम्हाला गर्भाशयाचे दुहेरी मुख किंवा योनीमार्गात पडदा असेल तर शुक्रजंतूनाशक वापरणे अवघड होऊ शकते
  • जर तुम्हाला ते आरामदायकरीत्या वापरता येत नसेल तर
  • जर तुम्हाला एच. आय. व्ही. किंवा लैंगिक संबंधांपासून पसरणारे आजार होण्याची शक्यता असेल तर शुक्रजंतूनाशकांमुळे संसर्ग होऊ शकतो

शुक्रजंतूनाशक संततिनियमनाची सर्वात सोपी पद्धत आहे. जर ती योग्यरीत्या आणि वेळेवर वापरली तर खूप परिणामकारक होऊ शकते, परंतु शुक्रजंतूनाशकाचा पर्याय निवडताना तुम्हाला त्याविषयीच्या धोक्यांची आणि फायद्याची पूर्ण माहिती असली पाहिजे.

आणखी वाचा:

लवकर आणि सहज गर्भधारणेसाठी काय कराल?
गर्भधारणा होण्यासाठी किती कालावधी लागतो?

RELATED ARTICLES
MORE FROM AUTHOR
संपादकांची पसंती
Please Wait Updating Your Article