In this Article
आपल्या छोट्या मुलाच्या भविष्यासाठी बचत करणे हा आपण घेत असलेल्या स्मार्ट निर्णयांपैकी एक आहे. आपल्या मुलासाठी पैसे वाचवण्याचा सर्वात जुना परंतु सुरक्षित मार्ग म्हणजे पोस्टाची बचत खाती आणि आपल्या मुलासाठी ते करण्याची ही सर्वात योग्य वेळ आहे.
तुमच्या मुलासाठी पोस्टामध्ये बचतीचे कोणते पर्याय पर्याय उपलब्ध आहेत?
तुमच्या मुलासाठी तुम्ही गुंतवणूक करू शकता अशा काही पोस्टाच्या योजना आहेत आणि त्यापैकी काही योजनांची नावे पुढीलप्रमाणे – पोन्मागन पोधुवैप्पू निधी, पोस्ट ऑफिस राष्ट्रीय बचत प्रमाणपत्र योजना, पोस्टाचे रिकरिंग डिपॉझिट, पोस्ट ऑफिस मासिक बचत योजना, किसान विकास पत्र आणि सार्वजनिक भविष्य निर्वाह निधी इत्यादी. यापैकी बर्याच योजना किमान ५०० रुपये देऊन उघडल्या जाऊ शकतात आणि बाजारभावाप्रमाणे व्याजाचा दर बदलत राहतो. पोस्ट ऑफिस बचत योजना खाते उघडण्याचा सर्वात चांगला भाग म्हणजे पोस्ट ऑफिस आणि ते सहसा जवळजवळ प्रत्येक ठिकाणी असते. या व्यतिरिक्त, संपूर्ण सिस्टम डिजिटल झाल्यास, पोस्ट कार्यालये देखील त्यांचे अनुसरण करीत आहेत, जेणेकरून तुम्ही तुमच्या व्यवहारांवर लक्ष ठेवू शकता.
पोन्मागन पोधुवैप्पू निधी योजनेचा तपशील
आमच्या पोस्ट ऑफिसमध्ये मुलींसाठी अनेक योजना आहेत, परंतु मुलांसाठी तशा फार काही योजना आहेत असे म्हणता येणार नाही. तथापि, अलीकडे, तामिळनाडू सरकारने आपल्या देशातील मुलांसाठी पोस्टाची योजना आखली. ह्या योजनेला पोन्मागन पोधुवैप्पू निधी असे म्हणतात. ही योजना तुमचे मूल दहा वर्षांचे होण्यापूर्वी कधीही सुरु करू शकता. हे खाते उघडण्यासाठी लागणारी किमान रक्कम रू. ५०० आणि जास्तीत जास्त रू. १. ५ लाख इतकी असते. ठेवीदार म्हणून आपण या खात्यात वर्षामध्ये फक्त बारा वेळा पैसे जमा करू शकता. ठेवीचा व्याजदर हा ९. ७०% होता. तथापि, सरकारच्या विविध धोरणांनुसार आणि बाजाराच्या परिस्थितीनुसार तो दरवर्षी बदलतो. प्राप्तिकर अधिनियम (कलम ८० सी) नुसार तुम्ही कर लाभ आणि रु.दीड लाखाच्या मर्यादेपर्यंत कपात करू शकता. या व्यतिरिक्त, या गुंतवणूकीवर मिळणारे कोणतेही व्याज देखील याच कायद्यानुसार क्लेम केले जाऊ शकते. ही योजना कर्जाच्या अर्जासाठी ठेवीदार असलेल्या पालकांनाही तारण ठेवण्याची परवानगी देते. तथापि, खाते उघडल्या च्या चार वर्षानंतरच असे करण्यास अनुमती दिली जाईल.
ही योजना संपूर्ण भारतभर लागू होते का?
नाही, ही योजना केवळ तामिळनाडू राज्यात लागू आहे.
अल्पवयीन मुलांसाठी पोस्टाच्या बचत योजना
वर नमूद केल्याप्रमाणे, मुलींसाठी बर्याच योजना आहेत, परंतु मुलांसाठी मर्यादित पर्याय आहेत. तथापि, काही मानक बचत योजना आहेत ज्या आपण अल्पवयीन मुलाच्या नावाने उघडू शकता आणि त्यामध्ये पुढील गोष्टींचा समावेश आहे –
१. पोस्ट ऑफिसचे राष्ट्रीय बचत प्रमाणपत्र
आमच्या देशातील नागरिकांच्या विकासासाठी पैसे उभे करण्याच्या उद्देशाने पोस्ट ऑफिस राष्ट्रीय बचत प्रमाणपत्र योजना १९५० मध्ये सुरू केली गेली. जर तुम्ही १८ वर्षांपेक्षा कमी वयाच्या मुलांच्या नावाने पैसे वाचवण्याची योजना बघत असाल तर तुम्ही हे खाते उघडू शकता.
२. पोस्ट ऑफिस रिकर्निंग डिपॉझिट
इतर बँकांप्रमाणेच भारतीय पोस्ट आवर्ती ठेव खाते व्याज देते. या आवर्ती ठेव खात्यात पाच वर्षांच्या योजनेचा समावेश आहे जेथे खातेधारक किंवा ठेवीदारास दर महिन्याला विशिष्ट रक्कम जमा करणे आवश्यक आहे. त्यानुसार व्याज देण्यात येते.
३. पोस्ट ऑफिस मासिक बचत योजना
ही योजना देशातील सर्वात सुरक्षित योजनांपैकी एक मानली जाते, कारण परतावा आणि गुंतवणूक ही सरकारच्या रडारखाली येते आणि त्यानुसार त्या व्यवस्थापित केल्या जातात. पोस्ट ऑफिस मासिक योजनेत मासिक देय दिले जाते, ज्याच्या आधारे गुंतवणूकदाराला केलेल्या प्रत्येक गुंतवणूकीवर रक्कम मिळते. आपण आपल्या मुलासाठी हे खाते उघडू शकता, परंतु त्यासोबतच एकत्रित मासिक उत्पन्न योजना खाते देखील उघडणे आवश्यक आहे.
४. किसन विकास पत्र
ही योजना १९८८ मध्ये सुरू झाली जेव्हा ती प्रथम सादर केली गेली. आपल्या देशातील निम्न आणि मध्यम उत्पन्न असलेल्या सामान्य कुटुंबांमध्ये, ही योजना सन २०११ मध्ये थोड्या काळासाठी बंद केली गेली होती, परंतु लोकांच्या मागणीमुळे ती पुन्हा सुरु करण्यात आली.
ज्यांना वर्षाच्या कालावधीसाठी मोठी रक्कम जमा करायची असते त्यांच्या साठी किसान विकास पत्र ही बचत योजना चांगली आहे, आणि त्याद्वारे पूर्व निर्धारित केलेल्या दराने व्याज मिळते. अल्पवयीन मुलाच्या वतीने सरकारी गुंतवणूक योजना, किसान विकास पत्र ह्या योजना, पालक किंवा कायदेशीर पालक उघडू शकतात.
५. सार्वजनिक भविष्य निर्वाह निधी
पब्लिक प्रॉव्हिडंट फंड ही कर बचत गुंतवणूक योजना आहे जी प्रथम १९६८ साली सुरू केली गेली होती. एक गुंतवणूकदार म्हणून आपण ही योजना कायम ठेवू शकता आणि १५ वर्षांच्या कालावधीसाठी या निधीमध्ये गुंतवणूक करू शकता. या योजनेचा एक फायदा म्हणजे आपण या योजनेंतर्गत येणाऱ्या अनेक प्राप्तिकर लाभांचा दावा करू शकता. पालक किंवा कायदेशीर पालक अल्पवयीन मुलांसाठी सार्वजनिक भविष्य निर्वाह निधी उघडू शकतात.
लोक लग्न, आरोग्य, शिक्षण किंवा करिअर यासारख्या कारणास्तव आपल्या मुलांसाठी पैसे वाचवतात – कारण काहीही असो, आपल्या मुलासाठी पैसे वाचवण्याचे असंख्य फायदे आहेत आणि पैशाची गरज निर्माण झालीच तर ते उपयोगी ठरतात. त्यामुळे वरीलपैकी कोणती योजना आपल्यासाठी सर्वोत्तम कार्य करते ते पहा आणि लगेच बचत करण्यास प्रारंभ करा.
आणखी वाचा:
भारतामध्ये बाळाचे नियोजन करताना साधारणपणे किती खर्च येतो?
लहान मुलांसाठी आधार कार्ड – तुमच्या मुलाच्या आधार कार्डासाठी अर्ज कसा कराल?