Firstcry Parenting
Search
Parenting Firstcry
Home बाळ अन्न आणि पोषण बाळांच्या आहारात चिकनचा समावेश करणे

बाळांच्या आहारात चिकनचा समावेश करणे

बाळांच्या आहारात चिकनचा समावेश करणे

चिकन हा प्रथिनांचा एक चांगला स्त्रोत आहे. प्रथिने शरीरातील प्राथमिक बिल्डिंग ब्लॉक्स आहेत. चिकन मध्ये चरबीचे प्रमाण कमी असते त्यामुळे त्याचा समावेश आहारात पौष्टिक मांस म्हणून केला जाऊ शकतो. जर तुम्ही तुमच्या लहान मुलाच्या आहारात चिकनचा समावेश करण्याचा विचार करीत असाल तर त्याचे शरीर त्यासाठी तयार आहे की नाही हे तुम्ही आधी बघितले पाहिजे.

तुमचे बाळ चिकन खाण्यास कधी सुरुवात करू शकते?

बाळाने एकदा घनपदार्थ खाण्यास सुरुवात केली की बाळाच्या आहारात चिकनचा समावेश हळू हळू केला पाहिजे. एकदा तुमचे बाळ सहा महिन्यांचे झाले की, तुम्ही त्याला वरणाचे पाणी आणि तांदळाचे पाणी, उकडलेले आणि मॅश केलेले बटाटे, उकडलेल्या अंड्यातील पिवळा बलक इत्यादी देऊ शकता. एकदा तुमचे बाळ ८ महिन्यांचे झाल्यावर तुम्ही त्याला उकडलेले चिकन देऊ शकता. तुम्ही त्याला चिकनची प्युरी देऊ शकता. परंतु त्याला एका दिवशी दोन टेबल स्पून पेक्षा जास्त प्युरी देऊ नका.

चिकनचे पौष्टिक मूल्य

चिकनमध्ये बाळाला फायदेशीर ठरू शकणारी पोषणमूल्ये भरपूर प्रमाणात असतात. चिकनच्या पोषणमूल्यांविषयीचे टेबल इथे दिलेले आहे. १०० ग्रॅम कच्च्या चिकनमध्ये असलेली पोषणमूल्ये ह्या टेबल मध्ये दिलेली आहेत.

पौष्टिक घटक प्रति १०० ग्रॅम पोषक मूल्य
प्रथिने ३१ ग्रॅम
चरबी .६ ग्रॅम
ऊर्जा १६५ किलोकॅलरी
व्हिटॅमिन ए २१ आययू
व्हिटॅमिन बी १ .१ मिग्रॅ
व्हिटॅमिन बी २ .२ मिग्रॅ
व्हिटॅमिन बी ३ १३.७ मिग्रॅ
व्हिटॅमिन बी ६ .६ मिग्रॅ
व्हिटॅमिन बी १२ .३ एमसीजी
फोलेट ४ एमसीजी
व्हिटॅमिन सी
व्हिटॅमिन डी
व्हिटॅमिन ई .३ मिग्रॅ
व्हिटॅमिन के .३ एमसीजी
पॅन्टोथेनिक ऍसिड १ मिग्रॅ
कॅल्शियम १५ मिग्रॅ
लोह १ मिग्रॅ
सोडियम ७४ मिग्रॅ
फॉस्फरस २२८ मिग्रॅ
पोटॅशियम २५६ मिग्रॅ
मॅग्नेशियम २९ मिग्रॅ
झिंक १ मिग्रॅ
सेलेनियम २७.६ एमसीजी

लहान मुलांसाठी चिकनचे आश्चर्यकारक आरोग्यविषयक फायदे

लहान मुलांसाठी चिकनचे आश्चर्यकारक आरोग्यविषयक फायदे

चिकनमध्ये असलेले विविध पोषक घटक बाळाला खालील आरोग्यविषयक फायदे देतात.

. स्नायूंमध्ये वाढ

चिकन हा प्रथिनांचा समृद्ध स्त्रोत आहे आणि बाळाच्या स्नायूंच्या वाढीस प्रोत्साहन देण्यासाठी प्रथिने आवश्यक असतात. हे देखील आढळले आहे की वनस्पतींच्या प्रथिनांच्या तुलनेत प्राण्यांच्या स्त्रोतांमधील प्रथिने शरीराद्वारे सहज पचवली जातात.

. रक्ताभिसरण सुधारते

चिकनमधील लोहाचे प्रमाण शरीरातील लाल रक्तपेशींच्या निर्मितीस मदत करते. चिकनमध्ये पोटॅशियम देखील असते. पोटॅशियम रक्तवाहिन्या निरोगी राखण्यास मदत करतात.

. रोग प्रतिकारशक्ती वाढवते

चिकनमध्ये झिंक आणि मॅग्नेशियमसारखे सूक्ष्म पोषक घटक असतात आणि ते आपल्या बाळामध्ये प्रतिकारशक्ती निर्माण करू शकतात आणि संक्रमण व आजारांना प्रतिबंध करू शकतात.

तुमच्या बाळासाठी चिकन शिजवण्याचे सर्वोत्तम मार्ग

जर तुम्ही तुमच्या बाळाला चिकन देऊ इच्छित असाल तर त्याचे मार्ग तुम्हाला माहिती असणे जरुरीचे आहेत. आणि ते खालीलप्रमाणे.

  • १९० डिग्री सेल्सिअस तापमानावर चिकन २० मिनिटे बेक करावे. आपण ते बेक करण्यापूर्वी त्याचे अगदी लहान तुकडे करावेत. एकदा बेक केल्यावर, तुम्ही त्याची लहान मुलांसाठी प्युरी करू शकता किंवा १२ महिन्यांपेक्षा जास्त वयाच्या मुलांसाठी त्याचे बारीक तुकडे करू शकता.
  • चिकनचे पातळ काप करा. चिकन बुडेल इतके पाणी सॉसपॅन मध्ये घ्या. हे मिश्रण २० मिनिटे किंवा चिकन शिजेपर्यंत उकळवा. तुम्ही पाणी गाळून ते इतर डिशसाठी वापरू शकता किंवा पाण्याबरोबर चिकन प्युरी करू शकता आणि ते तुमच्या बाळाला देऊ शकता.
  • चिकनचे लहान तुकडे पाण्यात बुडतील इतके पाणी घालून ते पूर्णपणे उकळून घ्या. ३० मिनिटे किंवा चिकन पूर्णपणे शिजेपर्यंत हे मिश्रण शिजवून घ्या आणि नंतर त्याची प्युरी करा. चिकन शिजवण्याचा हा सर्वोत्तम मार्ग आहे कारण त्यामुळे रोगजनक किटाणू मारले जाऊन चिकन मऊ शिजते.

लहान मुलांना चिकनची ऍलर्जी होऊ शकते का?

तुमच्या बाळाला कोणतेही अन्नपदार्थ देताना तुम्ही त्या पदार्थाची बाळाला ऍलर्जी तर येणार नाही ना ह्याबाबत सावध असणे आवश्यक आहे. आपल्या बाळाला नेहमी एका वेळी एक अन्न पदार्थ द्या. जर त्याने कोणतीही प्रतिकूल प्रतिक्रिया दर्शविली तर त्वरित डॉक्टरांचा सल्ला घ्या.

लहान मुलांची पचनसंस्था नाजूक असते तसेच रोगप्रतिकारक शक्ती कमी असते. त्यामुळे मुलांना ऍलर्जी होण्याचा धोका असतो. चिकन शिजवल्यावर ऍलर्जीचे प्रमाण कमी होऊ शकते. तरीसुद्धा तुम्ही ऍलर्जीच्या लक्षणांवर लक्ष ठेवले पाहिजे. ऍलर्जीची लक्षणे खालीलप्रमाणे

  • सूज: चेहरा, मान, पापण्या, घसा आणि नाक ह्यांना सूज आल्यास ते ऍलर्जीचे लक्षण असते. आपल्या बाळाला डोळे उघडणे किंवा श्वास घेणे देखील कठीण होऊ शकते.
  • ओटीपोटात वेदना: ओटीपोटात पेटके किंवा वेदना होण्यासोबत सोबत अतिसार आणि उलट्या होऊ शकतात.
  • त्वचेवर पुरळ उठणे: शरीरावर खाज सुटणारे लाल फोड येणे
  • थकवा: बाळामध्ये अशक्तपणा आणि मंदपणा येणे

तुम्ही तुमच्या बाळाच्या चिकन सूपमध्ये मीठ घालावे का?

लहान मुलांसाठी चिकन सूप बनवताना मीठ घालू नका. बाळ वर्षापेक्षा लहान असताना त्याच्या अन्नपदार्थांमध्ये मीठ न घालणे चांगले असते. बाहेरून काही न घातल्यामुळे बाळांना अन्नपदार्थांची नैसर्गिक चव घेता येईल.

आपल्या बाळाला चिकन देण्यापूर्वी सुरक्षिततेच्या काही टिप्स

आपल्या लहान मुलाला चिकन देण्यास सुरुवात करताना, येथे काही सुरक्षितता टिप्स दिलेल्या आहेत त्यांचे पालन आपण करू शकता. त्यामुळे चिकन नीट हाताळले न गेल्यास किंवा त्याची साठवणूक नीट न झाल्यास होणारी गुंतागुंत टाळता येईल.

  • सेंद्रीय चिकन विकत घ्या आणि जर तुम्ही संपूर्ण कोंबडी विकत घेत असाल तर ती गुबगुबीत असल्याची खात्री करा. चिकनमध्ये खूप हाडे असावीत. जर तुम्ही नॉनऑरगॅनिक चिकन खरेदी करत असाल, तर सावध रहा कारण काही वेळा त्यांना हॉर्मोन्सची इंजेक्शन्स दिलेली असतात
  • डाग नसलेले आणि अपारदर्शक त्वचा असलेले चिकन विकत घ्या
  • जेव्हा आपण गोठवलेले चिकन खरेदी करता, तेव्हा पॅकेजमधील कोणत्याही गोठलेल्या द्रवपदार्थावर लक्ष ठेवा. गोठलेले द्रव असलेले गोठवलेले चिकन खरेदी करणे टाळा, कारण चिकन वितळवून पुन्हा गोठवले असण्याची शक्यता असते त्यामुळे ते खाणे असुरक्षित असते
  • ताजे चिकन रेफ्रिजरेटरमध्ये दोन दिवसांपेक्षा जास्त ठेवू नका
  • फ्रिज मध्ये गोठवलेले चिकन वितळवा. तुम्हाला जर लगेच चिकन शिजवायचे नसेल तर ते मायक्रोवेव्ह मध्ये वितळवू नका. कारण तसे केल्यास चिकन आतमधून शिजण्याची प्रक्रिया सुरु होते आणि जर ते तसेच ठेवले तर जिवाणूंची वाढ होऊ शकते
  • दूषितता टाळण्यासाठी चिकन तयार करताना इतर खाद्यपदार्थांपासून दूर ठेवा. चिकनचे तुकडे केल्यानंतर तुम्ही तुमचे हात, कटिंग बोर्ड आणि भांडी स्वच्छ धुवा
  • चिकनला पाणी सुटले तर चिकन शिजले आहे असे समजावे. आपण मांस थर्मामीटर सुद्धा वापरू शकता. संपूर्ण कोंबडीचे अंतर्गत तापमान ८२.२ अंश सेल्सिअस असावे. हाड असलेल्या चिकनचे अंतर्गत तापमान ७६.६ डिग्री सेल्सियस असावे. बोनलेस चिकनचे अंतर्गत तापमान ७१.१ डिग्री सेल्सियस असावे.

लहान मुलांसाठी चिकनच्या पौष्टिक पाककृती

येथे लहान मुलांसाठी काही पौष्टिक पाककृती दिलेल्या आहेत आणि त्या तुम्ही करून बघू शकता.

. चिकन प्युरी

बाळासाठीची ही सोपी चिकन प्युरी रेसिपी आपल्या लहान मुलाला चिकनची ओळख करून देण्याचा सर्वोत्तम मार्ग आहे.

लागणारे साहित्य

  • बोनलेस चिकनचे तुकडे
  • पाणी

तयारी कशी करावी?

  • चिकन मऊ होईपर्यंत प्रेशर कुकरमध्ये किंवा बाहेर शिजवून घ्या
  • चिकन थंड करा आणि ब्लेंडरमध्ये प्युरी करा
  • जर तुम्ही कोंबडी भाजली असेल तर तुम्हाला चिकनचे लहान तुकडे करावे लागतील जेणेकरून ब्लेंडर मध्ये ते मिश्रण फिरवून घेता येईल

. चिकन आणि रताळे पुरी

जीवनसत्त्वे आणि खनिजांनी समृध्द, रताळे आणि चिकन दोन्ही तुमच्या बाळाच्या आहारात उत्तम भर घालू शकतात.

लागणारे साहित्य

  • २ कप चिरलेले रताळे
  • २ कप बोनलेस चिकनचे तुकडे
  • पाणी

कृती

  • चिकन आणि रताळे मऊ होईपर्यंत वेगळे शिजवा
  • ब्लेंडर मध्ये घालून प्युरी करा

. चिकन स्ट्यू

जर तुम्ही तुमच्या बाळाला योग्य घन पदार्थांची ओळख करून देण्यासाठी थोडा वेळ वाट बघू शकत असाल आणि त्याला चिकनची पोषक तत्व मिळावीत असे तुम्हाला वाटत असेल तर चिकन स्ट्यू हा एक उत्तम पर्याय आहे.

लागणारे साहित्य

  • हाडांसहित चिकनचे तुकडे
  • पाणी

तयारी कशी करावी

  • चिकनचे पोषक घटक पाण्यात मिसळावेत म्हणून चिकन ३० मिनिटे पाण्यात उकडून घ्या किंवा प्रेशर कुकर मध्ये शिजवून घ्या
  • थंड होऊ द्या आणि बाळाला देण्यापूर्वी सूप काढून घ्या

. सफरचंद आणि चिकन पुरी

ही पाककृती सोपी, पौष्टिक आणि स्वादिष्ट आहे.

लागणारे साहित्य

  • /४ कप चिकन, बोनलेस
  • बिया काढून चिरलेले सफरचंद १/४ कप

तयारी कशी करावी

  • चिकन आणि सफरचंद मऊ होईपर्यंत वेग वेगळे शिजवा
  • ब्लेंडरमध्ये, आवश्यक सुसंगतता प्राप्त करण्यासाठी दोन्ही घटकांची प्युरी करा

. चिकन, तांदूळ आणि पीच प्युरी

फळे घालून केलेली चिकनची ही आणखी एक डिश आहे जी तुम्हाला आवडेल

लागणारे साहित्य

  • /२ कप चिकन, बोनलेस
  • २ कप शिजवलेला तांदूळ (पांढरा किंवा तपकिरी)
  • १ पिकलेले पीच
  • १ टेबलस्पून आईचे दूध किंवा फॉर्म्युला

तयारी कशी करावी

  • चिकन आणि तांदूळ वेगळे शिजवा
  • पीच सोलून गर काढून घ्या
  • ब्लेंडरमध्ये पीच, दूध, भात आणि चिकन आवश्यक सुसंगततेसाठी बारीक करून घ्या

योग्य काळजी घेऊन तुमच्या लहान मुलाच्या आहारात चिकनचा समावेश करा. आपल्या बाळाला चिकन देण्यास केव्हा सुरुवात करावी, ते किती प्रमाणात द्यावे तसेच चिकन देण्याचा सर्वोत्तम मार्ग कोणता ह्या तुमच्या सगळ्या प्रश्नांविषयी तुमच्या डॉक्टरांशी चर्चा करा.

आणखी वाचा:

बाळाच्या आहारात पनीरचा समावेश करणे – फायदे आणि पाककृती
बाळांसाठी धान्य (बाजरी) – प्रकार, आरोग्यविषयक फायदे आणि पाककृती

RELATED ARTICLES
MORE FROM AUTHOR
संपादकांची पसंती
Please Wait Updating Your Article