In this Article
- सनबर्न म्हणजे काय?
- बाळांमधील सनबर्नची लक्षणे काय आहेत?
- उन्हामुळे तुमच्या मुलांच्या त्वचेच्या नुकसानीबद्दल तुम्ही काळजी करावी का ?
- बाळाच्या सनबर्नवर कसे उपचार करावेत आणि त्यापासून बाळास आराम कसा मिळेल ?
- सनबर्न झालेल्या बाळासाठी तुम्ही टाळल्या पाहिजेत अशा गोष्टी
- सनबर्न झालेल्या बाळाच्या त्वचेसाठी नैसर्गिक उपाय
- तुम्ही लहान बाळांमधील सनबर्न कसे रोखू शकता?
- डॉक्टरांचा सल्ला कधी घ्यावा?
तुमच्या बाळाला बाहेर जास्त आवडते का ? मग तुमच्या बाळाला सनबर्न होणे अगदी सामान्य आहे. लक्षणे, उपचार आणि मुलांना हा सनबर्नचा त्रास होऊ नये म्हणून प्रतिबंधात्मक उपायांबद्दल जाणून घ्या.
सनबर्न म्हणजे काय?
सनबर्न ही अशी अवस्था आहे जेव्हा त्वचा अतिनील किरणांच्या सानिध्यात (युव्हीए आणि युव्हीबी किरणे) जास्त प्रमाणात आढळल्यास त्वचेचा तो भाग लालसर रंगाचा, कोमल होतो आणि खवखवतो. काही दिवसात सनबर्न त्वचा झालेल्या भागातील त्वचा फिकट गुलाबी होते आणि सोलवटली जाते.
बाळांमधील सनबर्नची लक्षणे काय आहेत?
उन्हात एक दिवस बाहेर पडल्यानंतर, तुमच्या बाळामध्ये खालील लक्षणांवर लक्ष ठेवा.
- त्वचेचा लक्षणीय क्षोभ होणे
- त्वचेला फोड येणे
- ३ डिग्री किंवा अधिक ताप
- तीव्र डोकेदुखी
- खूप जास्त घाम
- चक्कर व हलकी डोकेदुखी
- बेशुद्ध होणे
- किरकिर करणे
- निर्जलीकरण
- फोडांमध्ये पू
- उलट्या होणे
उन्हामुळे तुमच्या मुलांच्या त्वचेच्या नुकसानीबद्दल तुम्ही काळजी करावी का ?
उन्हाशी संपर्क आल्यास ६ महिन्यांच्या बाळाच्या त्वचेचे नुकसान होण्याचा उच्च धोका असतो. लहानपणी, मेलेनिन अद्याप विकसित झालेले नसते. म्हणूनच लहान वयात थेट सूर्यप्रकाशाशी संपर्क असल्यास मेलेनोमा तसेच त्वचेचा कर्करोग होण्याचा धोका असतो.
बाळाच्या सनबर्नवर कसे उपचार करावेत आणि त्यापासून बाळास आराम कसा मिळेल ?
आपल्या बाळाला सनबर्न पासून आराम देण्याचे आणि उपचार करण्याचे अनेक मार्ग येथे आहेत.
- जर तुमच्या मुलाचे वय ६ महिन्यांपेक्षा कमी असेल तर नेहमीपेक्षा जास्त स्तनपान द्या. तथापि, मोठ्या मुलांना तुम्ही भरपूर पाणी किंवा ताज्या फळांचा रस पिण्यास देऊ शकता
- सनबर्न झालेल्या भागावर थोड्या वेळासाठी एक थंड ओले सूती कपडा ठेवा. थोड्या वेळानंतर पुन्हा हीच प्रक्रिया करा
- आपण तिथे काकडीचे काही तुकडे किंवा किसलेली काकडी देखील लावू शकता
- कोरफड लावल्यास मदत होऊ शकते
- बाळाला मस्त अंघोळ घाला. परंतु बाळाच्या त्वचेला घासू नका. परंतु त्याऐवजी फक्त कोरडे टिपून घ्या.
- बाळाला फक्त सूती आणि सैल फिटिंग कपडे घाला
- तुमच्या बाळास उन्हापासून शक्य तितके दूर ठेवा, कमीतकमी बाळाची त्वचा बरी होईपर्यंत असे करत रहा
सनबर्न झालेल्या बाळासाठी तुम्ही टाळल्या पाहिजेत अशा गोष्टी
तुमच्या कडे एखादे सनबर्न झालेले बाळ असेल तर काही गोष्टी टाळल्या पाहिजे. येथे कुठल्या गोष्टी टाळायला हव्यात त्यांची यादी दिली आहे.
- फोड फोडू नका. असे करणे वेदनादायक असू शकते आणि प्रभावित भागात जखम होऊ शकते
- जेव्हा त्वचा बरी होण्यास सुरुवात होते तेव्हा खाजवू नका किंवा सोलू नका. त्वचेला नैसर्गिकरित्या बरे होऊ द्या
- त्वचेच्या त्या भागावर कोणतीही पेट्रोलियम–आधारित किंवा अल्कोहोल–आधारित उत्पादने वापरण्याचे टाळा
- त्वचेवर, विशेषत: प्रभावित भागावरसर्व प्रकारचे स्प्रे किंवा मलम टाळा
सनबर्न झालेल्या बाळाच्या त्वचेसाठी नैसर्गिक उपाय
सनबर्न झालेल्या बाळाच्या त्वचेसाठी बरेच नैसर्गिक उपाय आहेत त्यापैकी काही खाली दिले आहेत
१. चहा
ताज्या बनवलेल्या हिरव्या आणि काळ्या चहामधील टॅनिन आणि अँटीऑक्सिडंट्स सनबर्नमुळे होणारी उष्णता शोषून घेतात.
ते कसे वापरावे
- उकळलेला चहा थंड होऊ द्या
- एकदा तो थंड झाला की सूती वॉशक्लोथ किंवा कापसाचा एक छोटा बॉल घ्या आणि बाधित भागात लावा नंतर प्रभावित भाग थंड पाण्याने स्वच्छ धुवा. बाधित भागावर टी बॅग देखील लावू शकता किंवा आंघोळ करण्यापूर्वी थंड पाण्यात थोडा ताजा तयार केलेला चहा घाला
२. ओट्सचे जाडे भरडे पीठ
ओट्समध्ये अँटीऑक्सिडंट्स समृद्ध असतात आणि असे म्हटले जाते की त्यामध्ये अँटीइंफ्लामेंटरी गुणधर्म आहेत
ते कसे वापरावे
- आंघोळीच्या पाण्यात बारीक केलेले ओट्सचे पीठ घाला आणि तुमच्या बाळाला काही काळ त्यात बसू द्या
- नंतर बाळाला थंड पाण्याने स्वच्छ धुवा आणि नुसते टिपून कोरडे करा
- तुम्ही ओट्सचे बारीक केलेले पीठ, मध आणि दूधाची पेस्ट बनवून बाधित भागावर लावू शकता. थोड्या वेळाने, तो भाग थंड पाण्याने स्वच्छ धुवा
३. लव्हेंडर आणि नारळ तेल
मायक्रोबियल गुणधर्म असलेले नारळ तेल उन्हामुळे होणारा त्वचेचा क्षोभ बरे करतो आणि त्यामधील लॉरिक ऍसिड पेशींच्या वाढीस मदत.करते, तसेच दुसरीकडे, लैव्हेंडर ऑइलचा त्वचेवर सुखदायक परिणाम होतो
ते कसे वापरावे
- कॉटन बॉल वापरुन प्रभावित भागावर हे मिश्रण लावा. तुम्ही तुमच्या बाळाच्या आंघोळीच्या पाण्यात हे मिश्रण घालू शकता.
४. मध
हे प्रतिजैविकांसारखे कार्य करू शकते आणि बरे होण्याच्या प्रक्रियेस गती देऊ शकते
ते कसे वापरावे
- ओल्या कॉटन बॉलचा वापर करून बाधित भागावर मध लावा
- ओट्सचे पीठ किंवा बेकिंग सोडा सारख्या इतर घरगुती घटकांमध्येही मध मिसळून सनबर्न झालेल्या भागावर लावता येऊ शकते
५. दूध
दुधातील प्रथिने सनबर्न शांत करतात आणि त्वचेला आर्द्रता देतात
ते कसे वापरावे
- एक कप दूध ३ भाग थंड पाण्यात मिसळा
- त्यात एक सूती कपड घाला आणि मग कापड पिळून घ्या
- नंतर प्रभावित ठिकाणी थंड ओले टॉवेल लावा (तुम्ही बर्फ देखील घालू शकता परंतु लहान मुलांसाठी, ते टाळले जाणे चांगले).
६. टोमॅटो
टोमॅटोमध्ये उत्तम अँटिऑक्सिडेंट्स असतात आणि मृत त्वचेच्या पेशी काढून टाकण्यासाठी आणि पेशींचे झालेले नुकसान भरून काढण्यासाठी मदत करतात
ते कसे वापरावे
- टोमॅटोचीप्युरी बनवा
- मग स्वच्छ टॉवेल वापरुन टोमॅटोचा रस बाधित भागावर लावा
७. कॉर्न फ्लोर
सर्व प्रकारच्या त्वचेच्या पुरळांसाठी हा एक जुनाट उपाय आहे
ते कसे वापरावे
- पाण्याचा वापर करून कॉर्न फ्लोरची पेस्ट बनवा
- सर्व बाधित भागावर हे लावा आणि काही वेळानंतर स्वच्छ धुवा
- परत सनबर्न आल्यास त्वचेच्या ओलसर भागावर कॉर्न फ्लोर शिंपडावे आणि स्पंज किंवा पावडर पफ वापरून तुम्ही ते त्वचेच्या बाधित भागावर लावू शकता
८. कोरफड
कोरफड पल्प वेदनांपासून आराम देते आणि सन बर्न देखील बरे करते
ते कसे वापरावे
- कोरफड पल्प काढून घ्या
- नंतर प्रभावित भागावर तो लावा
९. बटाटा
कोरफड आणि काकडी प्रमाणे बटाट्यांचा देखील त्वचेवर थंड प्रभाव पडतो
ते कसे वापरावे
बटाटा किसून घ्या आणि सनबर्नवर लावा
१०. काकडी
काकडीचा अँटीऑक्सिडेंट आणि एनाल्जेसिक घटक सनबर्न पटकन बरे करते. तर, सनबर्नचा उपचार करण्यासाठी आपण काकडी वापरू शकता
ते कसे वापरावे
- काकडी बारीक चिरून किंवा किसून घ्या
- बाधित भागावर ते लावा
तुम्ही लहान बाळांमधील सनबर्न कसे रोखू शकता?
लहान मुलांमधील सनबर्न शक्य तितक्या प्रत्येक मार्गाने टाळले पाहिजे. नवजात मुलांमध्ये सनबर्न रोखण्यासाठी काही उपाय आहेत –
- खोलीत थेट येणारा सूर्यप्रकाश टाळण्यासाठी खिडक्यांवर काढण्यायोग्य जाळीचे आवरण असावे
- एकतर सकाळी लवकर सूर्यास्ताच्या आधी किंवा सूर्यास्तानंतर बाळांना बाहेर घेऊन जावे
- तुमच्या बाळाचे हात पाय हलक्या सूती कपड्यांनी झाकलेले असावेत
- तुमच्यामुलाच्या चेहऱ्याचा सूर्यापासून बचाव करण्यासाठी विस्तीर्ण काठ असलेली टोपी वापरल्यास चांगले
- ६ महिन्यांपेक्षा जास्त वयाच्या मुलांच्या बाबतीत, बाहेर जाण्याच्या ३० मिनिटे आधी मुलांसाठी सनबर्न क्रीम लावू शकता
- सकाळी १० ते संध्याकाळी ४ दरम्यान बाळाला शक्यतो सावलीत खेळू द्या
- उन्हात बाहेर पडल्यावर तुमच्या मुलाने अतिनील किरणांपासून संरक्षण देतील असे सनग्लासेस घातले असल्याची खात्री करा
डॉक्टरांचा सल्ला कधी घ्यावा?
नवजात बालकांना सनबर्न झाल्यास पालकांसाठी ते वेदनादायी असू शकते. म्हणूनच मुलांमध्ये होणारा त्वचेचा त्रास टाळण्यासाठी क्रीम लावणे हा एक उत्तम मार्ग आहे. परंतु, बाळाच्या चेहर्यावरील सनबर्न ही सर्वात सामान्य गोष्ट आहे कारण चेहरा बाळाच्या शरीरावरचा एक भाग आहे जो उन्हाला जास्त सामोरा जात असतो.
जर आपल्या मुलाला सूर्य प्रकाशाने होणारा त्रास होत असेल तर ही लक्षणे पहा.
- शरीरावर फोड
- बाळाला मळमळ होते आणि थंडी वाजून येणे, ताप, डोकेदुखी, वेदना आणि डिहायड्रेशनचा त्रास होतो
- सनबर्न मुळे होणाऱ्या फोडांमध्ये पू होतो आणि ते संसर्ग झाल्याचे लक्षण आहे
बाळाला चेहऱ्यावर सनबर्न झाल्यास ते जीवघेणे नसते. परंतु त्याचे होणारे परिणाम बाळासाठी वेदनादायक आणि त्रासदायक ठरू शकतात. म्हणूनच, हे टाळणे चांगले असते
आणखी वाचा: बाळांमधील उष्माघात