In this Article
- बाळ योगर्ट खाण्यास कधी सुरुवात करू शकते?
- लहान मुलांसाठी योगर्टचे आरोग्यविषयक फायदे
- दह्याचे पौष्टिक मूल्य
- साधे आणि गोड नसलेले योगर्ट लहान मुलांसाठी का चांगले आहे?
- तुम्ही साध्या योगर्टची चव आणखी चांगली कशी करू शकता?
- प्रोबायोटिक्स काय आहेत आणि ते लहान मुलांसाठी का चांगले आहेत?
- तुमच्या बाळाला दुधाची ऍलर्जी असल्यास किंवा लैक्टोज असहिष्णु असल्यास काय कराल?
- लहान मुलांना योगर्ट देताना करावयाच्या उपाययोजना
- घरी योगर्ट बनवण्याच्या पद्धती
बाळांना दिल्या जाणाऱ्या पहिल्या काही खाद्यपदार्थांमध्ये योगर्टचा समावेश होतो. बऱ्याचदा योगर्ट गायीच्या दुधापासून बनवले जाते. परंतु म्हैस, बकरी किंवा उंटाच्या दुधापासून देखील योगर्ट बनवता येते. तुमच्या बाळाच्या आरोग्यासाठी योगर्टचे खूप फायदे आहेत. बाळाच्या आहारात तुम्ही योगर्टचा समावेश कसा करू शकता आणि त्यापासून बाळाच्या आरोग्यासाठी जास्तीत जास्त फायदे कसे मिळवू शकता याबद्दल आपण ह्या लेखात चर्चा करणार आहोत.
बाळ योगर्ट खाण्यास कधी सुरुवात करू शकते?
सात ते आठ महिने वयाच्या बाळाला योगर्ट दिले जाऊ शकते असे अनेक बालरोगतज्ञ सांगतात. दुसरीकडे, काही बालरोगतज्ञांना असे वाटते की योगर्ट हे बाळाला देण्यासाठी पहिला अन्नपदार्थ आहे. वयाच्या सहाव्या महिन्यापासून तुम्ही बाळाला योगर्ट देण्यास सुरुवात करू शकता. बाळाची योग्य वाढ आणि विकास होण्यासाठी बाळाला चरबीची आवश्यकता असते. त्यामुळे तुम्ही बाळासाठी चरबीयुक्त दह्याची निवड केली पाहिजे.
लहान मुलांसाठी योगर्टचे आरोग्यविषयक फायदे
लहान मुलांसाठी योगर्ट चांगले आहे का असा प्रश्न बऱ्याच स्त्रियांना पडतो. तर ह्याचे उत्तर होय असे आहे. लहान मुलांसाठी योगर्टचे काही फायदे खालीलप्रमाणे आहेत.
1. रोगप्रतिकारक शक्तीसाठी चांगले
योगर्टमध्ये लॅक्टिक ऍसिड असल्यामुळे लहान मुलांमध्ये चांगली रोगप्रतिकारक शक्ती निर्माण करण्यासाठी योगर्ट खूप प्रभावी आहे. नियमित योगर्ट खाल्ल्याने रोग निर्माण करणारे जीवाणू (अतिसार, आमांश इ.) पोटातून बाहेर टाकले जातात.
2. जठराच्या त्रासासाठी फायदेशीर
योगर्टमधील लॅक्टिक ॲसिड शरीरातील ॲसिड-अल्कली संतुलन न्यूट्रल करण्यास मदत करते. त्यामुळे पोटाची जळजळ आणि गॅस्ट्रिक समस्या दूर राहण्यास मदत होते.
3. बाळांमधील निद्रानाशावर उपयोगी
बाळाला नियमितपणे योगर्ट दिल्याने तुमच्या बाळाला चांगली झोप येण्यास मदत होते. याशिवाय, तुम्ही तुमच्या बाळाला चांगली झोप लागण्यासाठी दह्याने मसाज देखील करू शकता.
4. अतिसारावर उपचार करण्यासाठी प्रभावी
योगर्टमुळे अतिसारावर उपचार होतात. एका अभ्यासात हे सिद्ध झाले आहे की ज्या बाळांना अतिसाराचा त्रास होतो त्यावर उपचार म्हणून त्यांना योगर्ट दिले जाते. उपचारांसोबत योगर्ट दिलेली बाळे लवकर बरी होतात.
5. भरपूर प्रमाणात पोषक तत्वे
योगर्ट हे पोषक तत्वांनी युक्त आहे आणि वाढत्या बाळासाठी ते एक आदर्श अन्न आहे. दह्यामध्ये जीवनसत्त्वे अ,क, बी-६, डी, ई, के, रिबोफ्लाविन, फोलेट आणि नियासिन असतात. कॅल्शियम, फॉस्फरस, पोटॅशियम, मॅग्नेशियम, जस्त, सोडियम आणि इतर खनिजांची उपस्थिती बाळाच्या सर्वांगीण विकासासाठी फायदेशीर आहे.
6. यूटीआयच्या उपचारात उपयुक्त
योगर्ट लहान मुलांमध्ये मूत्रमार्गाच्या संसर्गावर उपचार करण्यास मदत करते. प्रोबायोटिक्स संसर्ग बरा करण्यास मदत करतात आणि लघवी करताना होणारी जळजळ योगर्टमुळे कमी होते.
7. हिपॅटायटीस आणि कावीळसाठी आदर्श अन्न
कावीळ आणि हिपॅटायटीस हे दोन्ही यकृताशी संबंधित आजार आहेत. त्यामुळे शरीरात अमोनिया तयार होतो. आयुर्वेदासारखे औषधोपचार अशा वेळी बाळांना योगर्ट देण्यास सांगतात.
दह्याचे पौष्टिक मूल्य
पौष्टिक घटक | प्रति 100 ग्रॅम पोषण मूल्य | पौष्टिक घटक |
प्रति 100 ग्रॅम पोषण मूल्य
|
ऊर्जा | 60 कॅलरीज | फायबर | 0 ग्रॅम |
पाणी | 88 ग्रॅम | एकूण लिपिड | 3.20 ग्रॅम |
कर्बोदके | 4 ग्रॅम | कॅल्शियम | 120 मिग्रॅ |
प्रथिने | 3.5 ग्रॅम | मॅग्नेशियम | 12 मिग्रॅ |
साखर | 4.5 ग्रॅम | जस्त | 0.50 मिग्रॅ |
सोडियम | 40 मिग्रॅ | पोटॅशियम | 150 मिग्रॅ |
लोह | 0.05 मिग्रॅ | थायमिन | 0.030 मिग्रॅ |
फॉस्फरस | 94 मिग्रॅ | फोलेट | 7 मायक्रोग्रॅम |
व्हिटॅमिन सी | 0.5 मिग्रॅ | व्हिटॅमिन ए | 98 मायक्रोग्रॅम |
रिबोफ्लेविन | 0.140मिग्रॅ | व्हिटॅमिन डी | 0.1 मायक्रोग्रॅम |
व्हिटॅमिन बी | 6 0.030 मिग्रॅ | नियासिन | 0.070 मिग्रॅ |
व्हिटॅमिन बी-12 | 0.35 मिग्रॅ | ||
व्हिटॅमिन ई | 0,05मिग्रॅ | ||
व्हिटॅमिन के | 0.2 मायक्रोग्रॅम |
वर नमूद केलेली पोषण मूल्ये 100 ग्रॅम दह्यात असलेल्या विविध जीवनसत्त्वे आणि खनिजांची अंदाजे मूल्ये आहेत.
साधे आणि गोड नसलेले योगर्ट लहान मुलांसाठी का चांगले आहे?
सहसा, बाजारात उपलब्ध असलेले सर्व प्रकारचे योगर्ट गोड असतात. वाढत्या बाळासाठी साखर चांगली नाही कारण त्यामुळे दात किडणे आणि बाळाच्या वजनाच्या समस्या उद्भवू शकतात. दह्यातील साखरेचे प्रमाण कसे तपासून पाहायचे असा प्रश्न तुम्हाला पडला असेल कारण दह्यात काही प्रमाणात नैसर्गिक साखर देखील असते. म्हणून, तुम्ही लेबलवरील पोषणविषयक माहितीमध्ये साखर, सुक्रोज, फ्रक्टोज इ. चे प्रमाण तपासून पहा. पूर्ण चरबीयुक्त दुधापासून बनवलेले योगर्ट बाळांना द्यावे कारण ते बाळाच्या वाढीसाठी आवश्यक असते.
तुम्ही साध्या योगर्टची चव आणखी चांगली कशी करू शकता?
जरी साधे योगर्ट खरोखर चांगले असले तरी, तुम्ही त्यामध्ये फळे आणि भाज्या घालून बाळाला देऊ शकता. जर तुम्ही लहान बाळांना योगर्ट देत असलात तरी तुम्ही फळे किंवा भाज्यांची प्युरी घालून बाळांसाठी फ्लेवर्ड योगर्ट बनवू शकता. परंतु, जर तुमचे बाळ चावू शकत असेल, तर तुम्ही दह्यामध्ये मऊ फळे किंवा भाज्यांचे तुकडे घालू शकता. असे फ्लेवर्ड योगर्ट बाळाला आवडेल. लहान बाळांसाठीच्या फ्लेवर्ड योगर्ट रेसिपीमध्ये सफरचंद, केळी, स्ट्रॉबेरी, एवोकॅडो किंवा ओट्स दह्यामध्ये असू शकते. परंतु, तुमचे बाळ एक वर्षाचे होईपर्यंत तुम्ही योगर्टला चव येण्यासाठी त्यामध्ये मध घालणे टाळावे.
प्रोबायोटिक्स काय आहेत आणि ते लहान मुलांसाठी का चांगले आहेत?
दह्यामध्ये प्रोबायोटिक्स असू शकतात. ते तुमच्या बाळाच्या आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहे. हे प्रोबायोटिक्स दुधापासून योगर्ट बनवण्यासाठी वापरले जातात. तुमच्या बाळाच्या आतड्यात चांगले बॅक्टेरिया वाढण्यास मदत करतात. परंतु, योगर्टच्या सर्व प्रकारांमध्ये प्रोबायोटिक्स नसतात. मग प्रश्न येतो की एखाद्या विशिष्ट ब्रँडच्या दह्यात चांगले बॅक्टेरिया आहेत की नाही हे तुम्हाला कसे कळू शकते?. हे माहिती करून घेण्याचा कुठलाही निश्चित मार्ग नसला तरी, तुम्ही लेबलवरील माहिती वाचू शकता.
तुमच्या बाळाला दुधाची ऍलर्जी असल्यास किंवा लैक्टोज असहिष्णु असल्यास काय कराल?
जर तुमच्या बाळाला दुधाची ॲलर्जी असेल किंवा बाळ लैक्टोज असहिष्णु असेल, तर तुम्ही बाळाला डॉक्टरांचा सल्ला घेतल्याशिवाय योगर्ट देऊ नका. परंतु, जर दुग्धजन्य पदार्थामुळे तुमच्या बाळाला ऍलर्जी झाली असल्याची तुम्हाला खात्री नसेल तर तुम्ही बाळाला योगर्ट देण्याआधी किमान तीन दिवस थांबावे. अशा प्रकारे तुम्ही योगर्ट किंवा इतर कोणत्याही खाद्यपदार्थामुळे बाळाला ऍलर्जी होते आहे का हे माहिती होण्यासाठी तुम्ही किमान 3 दिवस थांबले पाहिजे.
ऍलर्जीच्या प्रतिक्रियेमुळे लाल चट्टे उठणे, तोंडाभोवती सूज येणे किंवा उलट्या होणे अशी लक्षणे दिसतात. ही लक्षणे योगर्ट खाल्ल्यानंतर दोन ते तीन तासांत दिसू शकतात.
जरी बाळांमधील लैक्टोज असहिष्णुता ही समस्या सामान्य नसली तरी, जर तुमच्या बाळाला लैक्टोज असहिष्णुता असेल तर तुम्ही बाळाला योगर्ट देऊ शकता. याचे कारण असे की योगर्ट बनवण्याच्या प्रक्रियेदरम्यान दुधातील लैक्टोजचे प्रमाण कमी होते त्यामुळे ते लहान मुलांना सहज सहन करता येते.
लहान मुलांना योगर्ट देताना करावयाच्या उपाययोजना
लहान मुलांना योगर्ट देण्यापूर्वी तुम्ही खालील उपाय करू शकता:
- घरी बनवलेले योगर्ट बाळाला द्या:बाळाला घरी बनवलेले योगर्ट देणे चांगले असते. असे योगर्ट बनवायला खूप सोपे असते. हे योगर्ट करण्यासाठी तुम्हाला फक्त उबदार, पूर्ण चरबीयुक्त दूध आणि एक चमचा योगर्ट आवश्यक आहे.
- पूर्ण चरबीयुक्त योगर्ट द्या:तुमचे डॉक्टर जोपर्यंत सांगत नाहीत तोपर्यंत तुमच्या बाळाला पूर्ण चरबीयुक्त दुधाचे योगर्ट द्या. अशावेळी तुम्ही बाळाला स्किम्ड मिल्क योगर्ट देऊ शकता.
- योगर्टची साठवणूक:योगर्ट लवकर आंबट होऊ शकते. म्हणून ते थंड ठिकाणी किंवा रेफ्रिजरेतर मध्ये ठेवणे चांगले.
- तुमच्या बाळाला साखर न घातलेले योगर्ट द्या:तुमच्या बाळाच्या दह्यात साखर किंवा मध घालू नका. चवीनुसार तुम्ही फळे किंवा भाज्या घालू शकता.
- इष्टतम तापमान:उन्हाळ्यात योगर्ट सेट करणे सोपे आहे, परंतु हिवाळ्यात ते अवघड होऊ शकते. तुम्ही दूध आंबवण्यापूर्वी 50-55 अंशांपर्यंत गरम करू शकता.
- साधे योगर्ट द्या:त्यात बेरी घालून योगर्ट देऊ नका कारण यामुळे लहान मुलांना ऍलर्जी होऊ शकते. त्याऐवजी, सध्या दह्याचा पर्याय निवडा.
- चवीनुसार फळे घाला:तुमच्या बाळासाठी योगर्टचा स्वाद वाढवण्यासाठी तुम्ही त्यामध्ये केळी किंवा आंब्याची प्युरी घालू शकता.
घरी योगर्ट बनवण्याच्या पद्धती
लहान मुलांना घरी बनवलेले योगर्ट देणे चांगले आहे आणि तुम्ही 1 वर्षाखालील मुलांसाठी घरी या प्रकारे योगर्ट बनवू शकता:
साहित्य:
- अर्धा लिटर दूध
- ¼ कप योगर्ट (साधा प्रकार)
पद्धत:
- जड-तळ असलेल्या पॅनमध्ये दूध उकळवा.
- दुधाला उकळी आली की गॅस बंद करून ते एका डिश मध्ये घाला.
- दूध खोलीच्या तपमानावर आल्यावर, डिशमध्ये योगर्ट घाला.
- 7-8तास तसेच राहू द्या.
- सेट झाल्यावर योगर्ट फ्रीजमध्ये ठेवा.
बाळाला गाईचे दूध देणे चांगले नसले तरीसुद्धा, तुम्ही बाळाला योगर्ट देऊ शकता. दातांच्या समस्या टाळण्यासाठी बाळाला फ्लेवर्ड योगर्ट देऊ नका.
आणखी वाचा:
बाळांसाठी सोया दूध: आरोग्यविषयक फायदे आणि दुष्परिणाम
बाळाच्या आहारात पनीरचा समावेश करणे – फायदे आणि पाककृती