In this Article
- डोळ्याखालची काळी वर्तुळे म्हणजे नक्की काय आणि ती कशामुळे तयार होतात?
- लहान मुलांच्या डोळ्याखाली काळी वर्तुळे असणे सामान्य आहे का?
- बाळांच्या डोळ्याखालील काळी वर्तुळे म्हणजे काय?
- बाळांच्या डोळ्याखाली काळी वर्तुळे असण्याची कारणे
- बाळाच्या डोळ्याखालील काळ्या वर्तुळांवर उपाय
- लहान मुलांच्या डोळ्यांखाली काळी वर्तुळे येऊ नये म्हणून काय कराल?
- डोळ्याखालील काळ्या वर्तुळांचा, ताप येणे किंवा दात येणे ह्याच्याशी काही संबंध आहे का?
- लहान मुलांच्या फुगीर डोळ्यांचा काळ्या वर्तुळाशी काही संबंध आहे का?
- काळी वर्तुळे खराब आरोग्य किंवा अयोग्य झोप दर्शवतात का?
- काळी वर्तुळे ही डोळ्याखालील पिशव्यांशी संबंधित आहेत का?
मोठ्या माणसांमध्ये डोळ्याभोवतालची काळी वर्तुळे जेवढी आढळतात तितकी लहान बाळांमध्ये सामान्यपणे आढळत नाहीत. जरी बाळाच्या डोळ्यांभोवती ती दिसत असली तरी ते काळजीचे कारण नाही. बहुतेकदा हि काळी वर्तुळे ऍलर्जीमुळे किंवा बाळाची पुरेशी झोप न होण्यामुळे अथवा बाळ थकल्यामुळे सुद्धा दिसून येतात. काही वेळेला त्यामागे दुसरे कारण असू शकते.
डोळ्याखालची काळी वर्तुळे म्हणजे नक्की काय आणि ती कशामुळे तयार होतात?
बाळाच्या डोळ्याखालील काळी वर्तुळे म्हणजे एक प्रकारचे डाग असतात आणि ते डोळ्यांखालील भागात अधिक ठळक असतात. डोळ्याकडील भागावर परिणाम करून काळी वर्तुळे निर्माण करू शकतात असे अनेक घटक असतात. बाळाच्या डोळ्यांच्या सभोवतालच्या संवेदनशील त्वचेला इंग्रजीमध्ये ‘पेरिओर्बिटल स्किन‘ असे म्हणतात. ही त्वचा बऱ्याचदा पातळ आणि नाजूक असते. ह्या त्वचेखाली लहान रक्तवाहिन्या असतात त्यांना इंग्रजीमध्ये ‘इन्फ्राओर्बिटल व्हेनस प्लेक्सस‘ म्हणतात. जेव्हा ह्या भागाला आणि तेथील रक्तवाहिन्यांना सूज येते तेव्हा ह्या रक्तवाहिन्या त्वचेच्या जवळ आल्यामुळे गडद दिसतात. त्यामुळे हा संपूर्ण भाग काळा वर्तुळाकार दिसतो. काही बाळांना परागकणांची ऍलर्जी होते आणि त्यामुळे नाक बंद होते तेव्हा बाळाच्या डोळ्याभोवती काळी वर्तुळे दिसू शकतात. नाकाच्या सभोवतालची पोकळी म्हणजेच सायनस पोकळी, जिवाणू आणि इतर घटकांनी संक्रमित झाल्यास ‘सायनुसायटिस‘ होतो आणि त्यामुळे देखील डोळ्याभोवती काळी वर्तुळे तयार होतात.
लहान मुलांच्या डोळ्याखाली काळी वर्तुळे असणे सामान्य आहे का?
होय, बाळांच्या डोळ्यांभोवती काळी वर्तुळे असणे पूर्णपणे सामान्य आहे. बाळांच्या डोळ्याखालील त्वचेला लहान रक्तवाहिन्यांमुळे रक्तपुरवठा होतो आणि काही वेळा त्यामुळे काळी वर्तुळे तयार होऊ शकतात. डोळ्याखालील त्वचा संवेदनशील असणे आणि डोळ्याखाली काळी वर्तुळे असण्याचा कौटुंबिक इतिहास असेल तर बाळाच्या डोळ्याखाली सुद्धा काळी वर्तुळे येण्याची शक्यता असते.
बाळांच्या डोळ्याखालील काळी वर्तुळे म्हणजे काय?
बऱ्याचदा बाळांच्या डोळ्याखाली काळी वर्तुळे असल्यास ते चिंतेचे कारण नसते. त्यामागील कारणे म्हणजे थकवा, ऍलर्जी किंवा फक्त अनुवांशिक असू शकतात. परंतु, अत्यंत दुर्मिळ प्रकरणांमध्ये, ट्यूमरमुळे काही वेळा डोळ्याखाली काळी वर्तुळे येऊ शकतात. जर तुमच्या लक्षात आले की तुमच्या बाळाला डोळ्याभोवती विलक्षण खोल अशी काळी वर्तुळे आहेत, तर तुमच्या डॉक्टरांशी त्वरित संपर्क साधा.
बाळांच्या डोळ्याखाली काळी वर्तुळे असण्याची कारणे
लहान मुलांमध्ये डोळ्याखाली काळ्या वर्तुळांची काही सामान्य कारणे येथे आहेत:
- सर्वात सामान्य कारण म्हणजे बाळाच्या डोळ्यांखाली त्वचा नाजूक आणि पातळ असते आणि त्यामुळे रक्तवाहिन्या गडद दिसतात आणि त्यामुळे बाळाच्या डोळ्याखाली काळी वर्तुळे दिसतात
- काळी वर्तुळे देखील अनुवांशिक आहेत. जर कुटुंबातील सदस्यांना डोळ्यांच्या खाली काळी वर्तुळे असतील तर आश्चर्य वाटून घेऊ नये. बाळांच्या डोळ्याखाली सुद्धा ती असतील
- काही बाळांची त्वचा इतरांच्या तुलनेत तुलनेने पातळ असते ज्यामुळे ती अधिक काळसर दिसते
- थकलेल्या बाळांच्या डोळ्याखाली काळी वर्तुळे दिसू शकतात. उन्हात खूप काळ राहिल्यास किंवा झोप नीट न झाल्यास त्यांची त्वचा फिकट दिसू शकते आणि डोळ्यांभोवतीची त्वचा गडद होऊ शकते.
- क्वचित प्रसंगी काळी वर्तुळे जीवाणू संसर्ग, एक्झामा, सायनसचा संसर्ग, श्वसन संसर्ग आणि निर्जलीकरण ह्या घटकांमुळे होऊ शकतात
- ऍलर्जीमुळे देखील डोळ्यांखाली काळी वर्तुळे येऊ शकतात आणि त्यास ‘ऍलर्जिक शाईनर्स‘ असे म्हणतात. श्वसनाशी संबंधित ऍलर्जी आणि नाक चोंदले गेल्यामुळे डोळ्यांखालील रक्तवाहिन्यांमध्ये रक्त प्रवाह मर्यादित प्रमाणात होऊ शकतो आणि काळी वर्तुळे दिसू शकतात.
बाळाच्या डोळ्याखालील काळ्या वर्तुळांवर उपाय
तुमच्या बाळाच्या डोळ्याखालील काळी वर्तुळे कमी करण्याचे काही मार्ग आहेत:
- त्यांना योग्य वेळी पुरेशी विश्रांती मिळेल याची खात्री करा. त्यांना पौष्टिक पदार्थ खायला द्या आणि त्यांना सक्रिय ठेवा जेणेकरून त्यांचे निरोगी वजन वाढेल
- जर बाळांना ऍलर्जीमुळे काळी वर्तुळे झाली असतील तर त्यांना परागकण, धूळ किंवा प्राण्यांपासून दूर ठेवा. कोमट पाण्यात भिजवलेल्या स्वच्छ कापडाने त्यांच्या डोळ्याखालील भाग स्वच्छ करा
- चेहऱ्यावर आणि डोळ्यांवर अनावश्यक ओरखडे येऊ नयेत म्हणून त्यांचे हात स्वच्छ ठेवा आणि त्यांची नखे कापा
लहान मुलांच्या डोळ्यांखाली काळी वर्तुळे येऊ नये म्हणून काय कराल?
ऍलर्जी आणि थकवा हे डोळ्याभोवती काळी वर्तुळे येण्यास कारणीभूत घटक वगळता, डोळ्याखाली येणारी काळी वर्तुळे टाळता येत नाहीत. अनेक स्त्रिया ही काळी वर्तुळे जाण्यासाठी उटण्याचा वापर करतात परंतु हा उपाय प्रभावी ठरत नाही उलट त्यामुळे हानी होऊ शकते.
डोळ्याखालील काळ्या वर्तुळांचा, ताप येणे किंवा दात येणे ह्याच्याशी काही संबंध आहे का?
पालकांनी ताप आणि दात येणे यांचा संबंध काळ्या वर्तुळांशी जोडणे सामान्य आहे परंतु ते एकमेकांशी संबंधित असल्याचा कोणताही पुरावा नाही.
लहान मुलांच्या फुगीर डोळ्यांचा काळ्या वर्तुळाशी काही संबंध आहे का?
नाही, त्याचा काळ्या वर्तुळांशी काही संबंध नाही. खूप वेळ रडणे किंवा अस्ताव्यस्त स्थितीत झोपणे ह्यामुळे डोळ्यांना सूज येऊ शकते.
काळी वर्तुळे खराब आरोग्य किंवा अयोग्य झोप दर्शवतात का?
लहान बाळांच्या डोळ्याभोवती असलेली काळी वर्तुळे ही कमी झोप झाल्याची आणि झोपेचे चक्र नियमित नसल्याचे लक्षण क्वचित असते.
काळी वर्तुळे ही डोळ्याखालील पिशव्यांशी संबंधित आहेत का?
डोळ्याखालील पिशव्या तुमच्या बाळाच्या डोळ्याखालील त्वचेखालील चरबीमुळे असू शकतात आणि त्यांचा काळ्या वर्तुळाशी काहीही संबंध नाही.
डोळ्याखालील काळी वर्तुळे बहुतेकदा चिंतेचे कारण नसते आणि ती आपोआप नाहीशी होतात.
आणखी वाचा:
बाळाच्या डोळ्याच्या संसर्गासाठी १० सर्वोत्तम घरगुती उपचार
तुमच्या बाळाचे कान कसे स्वच्छ कराल?