Firstcry Parenting
Search
Parenting Firstcry
Home बाळ आरोग्य तुमच्या बाळाचे कान कसे स्वच्छ कराल?

तुमच्या बाळाचे कान कसे स्वच्छ कराल?

तुमच्या बाळाचे कान कसे स्वच्छ कराल?

एक नवीन पालक म्हणून, तुमच्यावर बाळाच्या बऱ्याच जबाबदाऱ्या असतील बाळाचे कान स्वच्छ करणे हे सुद्धा एक काम आहे. बाळाचे आरोग्य चांगले राहावे म्हणून तुम्ही बाळाच्या छोट्या छोट्या गोष्टींकडे लक्ष द्याल (जसे की त्याचे कान स्वच्छ करणे किंवा नख कापणे) इत्यादी. बाळाचे कान स्वच्छ करताना बाळाची सुरक्षितता जास्त महत्वाची आहे. तुमच्या बाळाच्या कानात मळ तयार होईल आणि तसे होणे खूप सामान्य आहे. तुम्ही तुमच्या बाळाचे कान स्वच्छ करू शकता असे बरेच मार्ग आहेत परंतु तुमच्यासाठी आणि तुमच्या बाळासाठी सर्वोत्तम पद्धत शोधणे महत्वाचे आहे

कानातील मळ (इअरवॅक्स) म्हणजे काय?

बाळाच्या कानातील मळ (इअरवॅक्स), त्याला सेरुमेन म्हणूनही ओळखले जाते. हा कानात तयार होणारा एक चिकट पदार्थ आहे. ह्यामध्ये मृत त्वचेच्या पेशी असतात आणि कानाच्या अस्तरात असलेल्या ग्रंथींद्वारे तो तयार होत असतो. कानात तयार होणारा मळ काहीवेळा त्रासदायक असू शकतो. परंतु बाळाच्या शरीरशास्त्रानुसार ते एक सामान्य लक्षण आहे. तसेच बाहेरच्या संसर्गाचा शरीरात प्रवेश रोखण्यासाठी शरीराची ही एक नैसर्गिक पद्धत आहे.

बाळाच्या कानामध्ये किती प्रमाणात मळ असणे सामान्य आहे?

बाळाच्या कानामध्ये मळ तयार होत असतो, परंतु त्याचे प्रमाण जास्त असणे असामान्य आहे. दोन्ही कानातील मळ नेहमी सारखा असू शकत नाही एका कानात दुस यापेक्षा जास्त प्रमाणात मळ असू शकतो. बाळाचा कान जर बालरोगतज्ञ, स्पष्टपणे बघू शकले तर बाळाच्या कानातील मळाचे प्रमाण योग्य आहे असे समजावे. जर मळ घट्ट होऊन बाळाचा कांन बंद झाला किंवा बाळाच्या कानातील पिवळसर मळामुळे बाळाला अस्वस्थता येत असेल तर ती समस्या असू शकते.

माझ्या बाळाचा कान दुखत आहे कानातील मेणामुळे किंवा कानातील संसर्गामुळे तो दुखतो आहे का?

माझ्या बाळाचा कान दुखत आहे - कानातील मेणामुळे किंवा कानातील संसर्गामुळे तो दुखतो आहे का?

जेव्हा बाळांना त्यांच्या कानामध्ये अस्वस्थता जाणवते तेव्हा बाळे त्यांचा कान चोळू लागतात किंवा हाताने ओढतात. काही वेळा कानात बोटे घालून तो खाजवण्याचा प्रयत्न करतात. कानातील मळामुळे अस्वस्थता आल्यास ही बाळाची सामान्य प्रतिक्रिया असते. परंतु कानातील मळामुळे बाळाला ताप येत नाही किंवा झोपेच्या समस्या उद्भवत नाहीत कारण कानात मळ तयार होणे सामान्य आहे.

कानात बघितल्यास जास्त प्रमाणात तयार झालेला मळ लगेच लक्षात येतो. कधीकधी, कानातून थोडा तपकिरी रंगाचा द्रव स्त्राव होऊ शकतो. जर तुमच्या बाळाला वेदना होत असतील, किंवा कानातील मळ नेहमीपेक्षा वेगळा दिसत असेल, तर हे दुखणे कानाच्या संसर्गामुळे असण्याची शक्यता आहे. संसर्गाचे स्पष्ट लक्षण बाळाला खूप ताप येणे किंवा दुधाळ पांढऱ्या रंगाचा पू बाळाच्या कानातून बाहेर पडणे हे आहे. बाळाच्या कानाचा पडदा फाटला असल्याचे सुद्धा ते लक्षण आहे. ह्या स्त्रावामुळे बाळाला तीव्र वेदना आणि अस्वस्थता येऊ शकते. इतर गोष्टींसोबतच जर तुमच्या बाळाची चिडचिड होत असेल किंवा झोपल्यवार बाळ रडत असेल आणि अतिसाराने ग्रस्त असेल तर ही सर्व लक्षणे कानाच्या संसर्गाची आहेत आणि तुम्ही लवकरात लवकर तुमच्या बाळाला बालरोगतज्ञांना दाखवणे गरजेचे आहे.

बाळाच्या कानात मळ तयार होण्याची कारणे

केसांच्या वाढीसारखीच, कानात मळ तयार करणे ही मानवी शरीराच्या नैसर्गिक प्रक्रियेपैकी एक आहे, केसांच्या वाढीप्रमाणे कानाच्या पडद्याच्या सुरक्षेसाठी संरक्षण यंत्रणा म्हणून लहान मुलाचे कान सतत मळ तयार करत असतात. एकदा तयार झाल्यावर, मळ हळूहळू कानातून बाहेर काढला जातो. कानाच्या पोकळीमध्ये अत्यंत लहान केस असतात. त्यांना इंग्रजीमध्ये सिलियाअसे म्हणतात. हे लहान केस मळ तयार करण्याचे काम करतात.

कानाच्या त्वचेची वाढ देखील बाह्य दिशेने असल्याने, मळ कानाच्या पोकळीतून बाहेर ढकलला जातो. सामान्यत: हा मळ निरुपद्रवी आणि किंचित गुळगुळीत असतो. जर तुमचे बाळ पुरेसे द्रवपदार्थ घेत नसेल तर हा मळ घट्ट होतो. तसेच, हा मळ कापसाने बाहेर काढण्याचा प्रयत्न केल्यास तो कानाच्या पोकळीत आणखी आत जातो . अशा पद्धतीने कानामध्ये हा मळ साठत राहतो आणि त्यामुळे कानाच्या पोकळीमध्ये अडथळा निर्माण होतो.

आपल्या मुलाचे कान कसे स्वच्छ करावेत?

आपल्या मुलाचे कान कसे स्वच्छ करावेत?

बाळाचे कान स्वच्छ करण्याचे पुरेसे मार्ग आहेत. आम्ही खाली सर्वोत्तम मार्गांचा उल्लेख केला आहे आपल्या मुलासाठी सर्वोत्तम असलेला उपाय वापरून पहा.

. मऊ कापडाचा वापर

कोमट पाण्यात मऊ कापड बुडवून कानातला मळ काढून टाकणे हा एक सर्वोत्तम मार्ग आहे. सर्वात आधी,कापड कोमट पाण्यात बुडवा आणि जास्त पाणी काढून टाकण्यासाठी ते पिळून घ्या. नंतर त्या कापडाने बाळाच्या कानाच्या बाहेरील भाग पुसून घ्या, जेणेकरून कानाच्या बाहेर पडलेला मळ हळूहळू स्वच्छ होईल. बहुतेक मळ आपोआप कानाच्या बाहेर पडेल. उरलेला मळ पुसला जाऊ शकतो. मऊ कापड कानाच्या पोकळीच्या आत ढकलू नका. आपल्या बाळाला बालरोगतज्ज्ञांकडे घेऊन जा आणि बाळाचे कान तपासून घ्या. तुमचे बालरोगतज्ञ लहान साधन वापरून कानातील मळ बाहेर काढू शकतात.

. बाळांसाठीचे कानात घालण्याचे थेंब वापरणे

जर कानातील मळ खोलवर असेल तर तुम्हाला कानात घालायचे थेंब वापरण्याची आवश्यकता असू शकते. बाळाच्या कानात थेंब घालण्यापूर्वी, तुम्ही बाळाच्या बालरोगतज्ञांनी शिफारस केलेली औषधे वापरल्याची खात्री करा. बाळाला शांत करा आणि त्याला काही क्रियाकलापांमध्ये गुंतवून ठेवा, किंवा बाळ शांत असते किंवा आराम करीत असते अशी दिवसाची वेळ निवडा. कानात घालायच्या थेंबांची बाटली तुमच्या हातात ठेवा. म्हणजे ती थोडी उबदार होईल. तुमच्या बाळाला मांडीवर झोपवा आणि बाळाचा मळामुळे बंद झालेला कान तुमच्याकडे करा. ड्रॉपरने बाटलीतले काही थेंब काढून घ्या.

ड्रॉपर बाळाच्या कानाजवळ ठेवा आणि बाळाच्या कानाची पोकळी पूर्ण भरेपर्यंत हळूहळू द्रावण सोडा. कानाच्या आत हे द्रावण काही मिनिटे तसेच ठेवा. तुमच्या बाळाला एक विचित्र संवेदना वाटू शकते, म्हणून त्याला शांत करा. कानात घातलेल्या ह्या द्रावणामुळे मळ मऊ होईल आणि नंतर कानातून वाहून जाईल. नंतर वॉशक्लॉथ कोमट पाण्यात बुडवा, जास्तीचे पाणी पिळून काढा आणि कोणतेही अतिरिक्त थेंब व कानातून वाहणारा मळ स्वच्छ करा. बाळाच्या कानात वॉशक्लोथ घालण्याचा प्रयत्न करू नका. तुमच्या डॉक्टरांनी सांगितल्याप्रमाणे किमान तीन ते पाच दिवस या उपचारांची पुनरावृत्ती होणे आवश्यक आहे.

आपल्या बाळाचे कान स्वच्छ करताना सुरक्षितता पाळा

तुम्ही तुमच्या बाळाचे कान स्वच्छ करण्यासाठी वर नमूद केलेल्या पद्धती वापरून पाहू शकता. परंतु, बाळाचे कान स्वच्छ करताना काय करू नये आणि काय वापरू नये हे लक्षात ठेवणे सुद्धा तितकेच महत्वाचे आहे. लहान मुलाचे कान स्वच्छ करण्याचा मुख्य नियम म्हणजे पालकांनी बाळाचा कान स्वच्छ करण्यासाठी कॉटन बड्स वापरू नये. ते वापरणे जरी सोयीचे वाटत असले तरीसुद्धा त्यामुळे कानातील मळ कानाच्या पोकळीमध्ये आणखी पुढे सरकतो. ह्यामुळे समस्या आणखी वाढते आणि कानात मळ साठत राहतो आणि कानाच्या पोकळीमध्ये अडथळा निर्माण होतो. कानात बोटे घालून मळ काढण्याचा प्रयत्न केल्यास सुद्धा असेच होते. कानाच्या पोकळीत काही चिकटून राहिल्यास मळ साठून राहतो आणि त्यामुळे कानाच्या पडद्यास हानी पोहोचू शकते. त्यामुळे कानाचा पडदा फटू शकतो. जर कानातील मेणाची समस्या वाढली तर बाळाच्या बालरोगतज्ञांना विचारून तुम्ही कानात मळ विरघळवणाऱ्या औषधाचे थेंब घालू शकता.

आपल्या बाळाचे कान स्वच्छ करताना घ्यावयाची काळजी

बाळाचे कान स्वच्छ करणे हे वाटते तितके सोपे काम नाही. तुमच्या छोट्याश्या चुकीमुळे देखील बाळाला तीव्र वेदना होऊ शकतात. आपल्या बाळाचे कान स्वच्छ करताना तुम्ही कुठल्या गोष्टी कराव्यात आणि कुठल्या करू नयेत ते इथे दिलेले आहे.

हे करा

  • तुमचे बाळ शांत आणि व्यस्त असल्याची खात्री करा
  • स्वच्छ वॉशक्लोथ वापरा
  • मळ जास्त प्रमाणात तयार होत असल्यास डॉक्टरांचा सल्ला घ्या

हे करू नका

  • कानांच्या आत कोणत्याही टोकदार वस्तू वापरू नका
  • कॉटन स्वॅब किंवा इअरबड घालणे टाळा
  • जास्तीचा मळ काढून टाकण्यासाठी थंड पाणी वापरू नका
  • जबरदस्तीने कानात पाणी किंवा कोणतेही द्रव फवारू नका
  • बाळाचा कान खूप वेळा किंवा खूप कठोरपणे स्वच्छ करू नका

डॉक्टरांकडे केव्हा जावे?

डॉक्टरांकडे केव्हा जावे?

जेव्हा तुमच्या बाळाच्या कानात मळाचे प्रमाण जास्त असते आणि तुम्ही वर नमूद केलेल्या उपायांनी मळ काढण्यास असमर्थ असता तेव्हा तुमच्या बाळाला बालरोगतज्ञांकडे घेऊन जा. तसेच, जर बाळाच्या कानातून पांढरा द्रव येत असेल व कान दुखणे, ताप येणे, किंवा मळ काढल्यानंतर ऐकायला कमी येणे ह्यासारखी लक्षणे असतील तर लवकरात लवकर आपल्या बाळाच्या डॉक्टरांशी संपर्क साधा.

बाळाच्या कानात मळाचे प्रमाण जास्त नसेल किंवा त्यामुळे संसर्ग होत नसेल तर त्यामुळे बाळाला कुठल्याही प्रकारचा त्रास होत नाही. आपल्या बाळाचे कान स्वच्छ करण्यासाठी सुरक्षित आणि काळजीपूर्वक उपाय निवडणे फायदेशीर ठरेल. परंतु, ह्याचा काही उपयोग नसल्यास आणि बाळाच्या आरोग्याच्या संदर्भात तुम्हाला काही असामान्य लक्षणे आढळून आल्यास बालरोगतज्ञांशी संपर्क साधा.

आणखी वाचा:

बाळांमधील पोटशूळावर (कोलिक) घरगुती उपाय
बाळांच्या एक्झिमासाठी १० सर्वोत्तम नैसर्गिक उपाय

RELATED ARTICLES
MORE FROM AUTHOR
संपादकांची पसंती
Please Wait Updating Your Article