वाईटावर चांगल्याचा विजय साजरा करणारा नऊ दिवसांचा नवरात्रोत्सव आता लवकरच सुरु होणार आहे! ह्या वर्षी 15 ऑक्टोबर 2023 ते 23 ऑक्टोबर 2023 ह्या नऊ दिवसात देवीचा हा उत्सव साजरा होणार आहे. आम्ही ह्या लेखात दिलेल्या संपूर्ण नवरात्रीच्या ड्रेस कलर गाइडसह ह्या रंगीबेरंगी उत्सवाचा आनंद घ्या!
सणासुदीचा काळ आला की नवरात्रीत घालायचे रंग कुठले ह्याचा विचार आपण करत बसतो. नवरात्रीचे रंग कसे ठरवले जातात? ते दरवर्षी का बदलतात? तर हे रंग पंचांगानुसार, सण सुरू होणार्या आठवड्याच्या दिवसाच्या आधारे ठरवले जातात. प्रत्येक दिवसाचा रंग दुर्गा देवीच्या विशिष्ट रूपाला समर्पित असतो.
15 ऑक्टोबर ते 23 ऑक्टोबर पर्यंत, प्रत्येक दिवशी वेगळ्या रंगाचा पोषख परिधान करून हा उत्सव साजरा केला जातो. आपल्या मुलांचे संरक्षण करण्यापासून ते कुटुंबाला आनंदी ठेवण्यापर्यंत सर्व काही घरातील स्त्रिया करीत असतात. खरोखरीच स्त्रिया योद्धा असतात!
2023 साठी नवरात्रीच्या रंगांची यादी
नवरात्री 2023 साठी आम्ही ह्या लेखामध्ये रंगांचे मार्गदर्शक दिलेले आहे. त्या अनुषंगाने नवरात्री 2023 मध्ये दररोज घालण्यासाठीचे रंग शोधा.
दिवस 1 – 15 ऑक्टोबर – नारिंगी
नवरात्रीचा उत्सव मोठ्या थाटामाटात आणि उत्साहात सुरू होतो. ह्या दिवशी घटस्थापना केली जाते आणि देवीला नैवेद्य दाखवला जातो. पहिल्या दिवसाचा रंग नारिंगी आहे – हा रंग उत्साही ऊर्जेचे प्रतीक आहे. हा रंग अंतःकरण उजळवून टाकतो.
दिवस 2 – 16 ऑक्टोबर – पांढरा
नवरात्रीचा दुसरा दिवस तितक्याच उत्साहात साजरा केला जातो. ह्या दिवसाचा रंग पांढरा आहे, हा रंग शांतता, निष्ठा आणि शहाणपणा दर्शवतो. शैलपुत्री मातेची पूजा केली जाते आणि तिच्या मूर्तीला पांढऱ्या रंगाची साडी नेसवली जाते. ही देवी, दुर्गेचे पहिले रूप आहे.
दिवस 3 – 17 ऑक्टोबर – लाल
हा नवरात्रीचा तिसरा दिवस संपूर्ण जोमाने आणि उत्साहात साजरा केला जातो. तुमची आवड आणि प्रेम व्यक्त करण्यासाठी या दिवशी लाल रंग घाला. देवीची ओढणी सुद्धा लाल रंगाची असते. ह्या दिवशी सुंदर लाल वस्त्र धारण करून देवीसारखे निर्भय व्हा.
दिवस 4 – 18 ऑक्टोबर – गडद निळा
नवरात्रीच्या चौथ्या दिवशी चंद्रघंटा किंवा कपाळावर अर्धा चंद्र असलेल्या देवीची पूजा केली जाते. ही देवी लालित्य आणि समृद्धीचे प्रतीक आहे. तिच्या मांडीवर तिचा छोटा मुलगा कार्तिक आहे. शाही निळा रंग हा शक्ती आणि अभिजातपणाचे आणि आईच्या असुरक्षिततेचे प्रतीक आहे. गरज पडल्यास ती आपल्या मुलांचे रक्षण करण्यासाठी उग्र रूप धारण करू शकते.
दिवस 5 – 19 ऑक्टोबर – पिवळा
कुष्मांडा हे दुर्गेचे रूप आहे. पौराणिक कथेनुसार, ती संपूर्ण जगाची निर्माती मानली जाते! पाचव्या दिवसाचा रंग पिवळा आहे. हा रंग तेजाचे आणि आशीर्वादाचे प्रतीक आहे.
टीप: ह्या पिवळ्या रंगाच्या कपड्यांचे वेगवेगळे पर्याय आहेत. लाल आणि गुलाबी रंगासोबत पिवळा रंग सर्वोत्तम रित्या जोडला जातो.
दिवस 6 – 20 ऑक्टोबर – हिरवा
ह्या दिवशी पश्चिम बंगाल आणि भारताच्या इतर भागांमध्ये दुर्गा पूजा पूर्ण उत्साहात सुरू होते. षष्ठी ही जगभरातील बंगाली लोकांसाठी चार दिवसांच्या उत्सवाची सुरुवात आहे. ह्या दिवशी माँ दुर्गेच्या कात्यायनी रूपाची पूजा केली जाते. ह्यामागे अशी कथा आहे की काता नावाच्या ऋषींना स्वतःच्या मुलीच्या रूपात देवीची इच्छा होती. या दिवशी, हिरवा पोशाख करा – प्रजनन, शांतता आणि जीवनाच्या नवीन सुरुवात करण्यासाठीचे प्रतीक म्हणून हा रंग आहे. हिरव्या रंगाचा पारंपरिक पोशाख तुमच्यावर खुलून दिसेल. आणि तुमच्यामध्ये सणाचा उत्साह वाढवेल.
दिवस 7 – 21 ऑक्टोबर – राखाडी
शारदीय नवरात्रीचा सातवा दिवस राखाडी रंगाचे कपडे परिधान करून रंगतदार केला जातो. राखाडी रंग हा समतोल भावनांचे प्रतीक आहे. तुम्ही राखाडी रंगाच्या फॅन्सी कपड्यांची निवड करू शकता. आणि त्यासोबत ऑक्सिडाइज्ड दागिने घालू शकता.
दिवस 8 – 22 ऑक्टोबर – जांभळा
अष्टमीच्या दिवशी, क्षमा आणि दयेचे प्रतीक म्हणून महागौरीची पूजा केली जाते. ह्या पूजेनंतर सर्व पापे नष्ट होतात असा समाज आहे. म्हणूनच, जांभळा रंग हा ह्या दिवसाचा रंग आहे. हा रंग सुसंवाद आणि प्रेम दर्शवतो.
दिवस 9 – 23 ऑक्टोबर – चिंतामणी
नवरात्रीच्या शेवटच्या दिवशी देवीच्या सिद्धिदात्री रूपाची पूजा केली जाते. या दिवशी कन्या पूजन केले जाते. चिंतामणी रंग हा इच्छा आणि करुणेच्या पूर्ततेचे प्रतीक आहे. उत्सवाच्या शेवटच्या दिवसासाठी हा एक सुंदर रंग असेल.
नवरात्रीदरम्यान विविध रंग भक्तांमध्ये आनंदाच्या भावना जागृत करतात. नवरात्रामध्ये प्रत्येकजण आपापल्या घरात दुर्गेचे स्वागत करण्यासाठी आणि एकमेकांसोबत हा सोहळा साजरा करण्यासाठी उत्सुक असतो. उत्साह वाढवण्यासाठी, नवरात्रीमध्ये विविध रंगांचे पारंपारिक आणि आधुनिक कपडे घाला. एकाच रंगाचे कपडे परिधान केल्याने एकीची भावना निर्माण होतो. आपण सर्व हे नऊ दिवस पवित्र मनाने आणि भक्तीने साजरे करूया आणि एकमेकांना अगदी शुद्ध आणि सकारात्मक अंतःकरणाने आशीर्वाद देऊ या.
आणखी वाचा:
नवरात्रीच्या उपवासासाठी तुम्ही करून बघू शकता अश्या चवदार पदार्थांच्या रेसिपी
तुमच्या प्रियजनांना नवरात्रीच्या शुभेच्छा देण्यासाठी सर्वोत्तम शुभेच्छासंदेश, कोट्स आणि स्टेट्स