In this Article
तुमचा ८ महिन्याचं बाळ म्हणजे अगदी वाढीच्या सुंदर टप्प्यावर असते. नुकत्याच लुकलुकणाऱ्या एक दोन दातांचं हे बाळ लवकरच पाऊल टाकायला लागणार असतं. ८ महिन्यांच्या वयाच्या बाळाला आता मऊ अन्न गिळण्याची कला अवगत झालेली असते. आणि घन पदार्थ खाण्यास सुद्धा सुरुवात झालेली असते.
जे पोषक अन्न बाळाला नीट चावता येईल ते अन्न ८ महिन्यांच्या बाळाची पोषणाची गरज भागवण्यास पुरेसे असते.
८ महिन्यांच्या बाळासाठी उत्तम अन्नपदार्थ
कर्बोदके, प्रथिने, व्हिटॅमिन्स, आणि खनिजे ह्या सगळ्यांचा समावेश असलेला आहार म्हणजे ८ महिन्यांच्या बाळासाठी योग्य आहार असतो. असे अनेक नैसर्गिक अन्नपदार्थ आहेत ज्यामध्ये वरील सर्व पोषणमूल्यांचा योग्य समावेश असतो. साधारणतः ८ महिन्यांच्या बाळामध्ये खालील एक किंवा दोन पोषणमूल्यांचा समावेश असतो.
१. फळे
फळे व्हिटॅमिन्स, खनिजे आणि इतर पोषणमूल्यांचा उत्तम स्रोत आहे. नेहमीच्या फळांव्यतिरिक्त जसे की केळं, पपई, चिकू वगैरे. तुम्ही किवी, स्ट्रॉबेरी, डाळिंब अशा फळांचा सुद्धा समावेश करू शकता. फळं चौकोनाच्या आकारात कापून दिल्यास ते बाळासाठी उत्तम फिंगर फूड होईल.
२. भाज्या
८ व्या महिन्यात तुमच्या बाळाने कुस्करलेला बटाटा गिळण्यापासून ते उकडलेल्या भाज्यांचे तुकडे चावून खाण्याइतपत प्रवास केलेला असतो. वेगवेगळ्या भाज्यांचा समावेश बाळाच्या आहारात केला जाऊ शकतो. कधी खिचडीत घालून किंवा कधी त्या नुसत्या उकडून दिल्या जाऊ शकतात. फ्लॉवर, ब्रोकोली, मटार , भोपळा ह्या भाज्यांचा हळूहळू आहारात समावेश करू शकता.
३. मासे
मासे म्हणजे एक पोषक अन्न आहे, आणि ८ महिन्यांच्या बाळाला तुम्ही ते देऊ शकता. बाळाच्या मेंदू च्या विकासासाठी ओमेगा ३ फॅटी ऍसिड्स असलेले मासे जसे की टुना, साल्मोन, रोहू तुम्ही बाळाला देऊ शकता. माशाचे सूप किंवा प्युरी करून तुम्ही बाळाला देऊ शकता.
४. टोफू/ पनीर
टोफू किंवा पनीर हे सोया दूध किंवा गायीच्या दुधापासून बनवलेलं असते. त्यामध्ये भरपूर प्रमाणात प्रथिने असतात आणि ह्या वाढीच्या वयाच्या बाळांसाठी ते चांगले असते. ज्या बाळांना लॅक्टोस इंटॉलरन्स मुळे पनीर ची ऍलर्जी असते अशा बाळांना त्याऐवजी टोफू देऊ शकता.
५. चिकन
चिकन हे बाळासाठी एक पोषक आहार आहे. साधारणपणे ७ महिने आणि त्यापेक्षा जास्त वयाच्या बाळांना तुम्ही सूप किंवा प्युरी च्या स्वरूपात चिकन देऊ शकता. चिकन शिजवलेलं पाणी सुद्धा बाळांसाठी खूप पोषक असते.
६. चीझ
पाश्चरायझेशन केलेल्या दुधापासून बनवलेले चीझ वाढत्या बाळांसाठी कॅल्शिअम चा एक उत्तम स्रोत आहे. प्रक्रिया केलेले चीझ जे बाजारात मिळते ते बाळासाठी एक उत्तम स्नॅक आहे.
७. अंडे
अंडे हे एक परिपूर्ण अन्न आहे ज्यामध्ये चांगली चरबी आणि आरोग्यपूर्ण प्रथिने असतात. नाश्त्याच्या वेळेला बाळाला उकडलेले अंड्याचे एका घासात मावतील असे छोटे छोटे तुकडे करून देऊ शकता. काही बाळांना अंड्याची ऍलर्जी असते आणि त्यामुळे तुम्ही त्याबद्दलच्या लक्षणांवर बारीक लक्ष ठेवलं पाहिजे.
८. दही
गायीच्या दुधापासून बनवलेले घट्ट दही विशेषतः उन्हाळ्यात बाळाला देऊ शकता. बाजारात सध्या फळांचा स्वाद असलेलं दही मिळते, जे तुम्ही नाश्त्याच्या वेळेला बाळाला देऊ शकता. दह्यामुळे पोटाला चांगले जिवाणू मिळतात तसेच ते व्हिटॅमिन्स आणि खनिजांचा उत्तम स्रोत आहे.
वयाच्या ह्या टप्प्यावर बाळाने किती खाल्ले पाहिजे?
८ महिन्यांची बाळे सामान्यतः व्यवस्थित खातात पण हालचाल वाढल्यामुळे खाण्यापासून थोडे विचलीत होतात. काही बाळे नुकतीच रांगायला शिकलेली असतात आणि मग आजूबाजूच्या गोष्टी बघता बघता रांगात असतानाच त्यांना खायला आवडते. ८ महिन्याचे बाळ सामान्यपणे दिवसातून ३ वेळा घन पदार्थ, २ वेळा स्नॅक्स आणि कमीत कमी दोन वेळा स्तनपान किंवा फॉर्मुला दूध घेतात.
अन्नाचे वेळापत्रक
इथे ८ महिन्याच्या बाळाच्या अन्नाचे वेळापत्रक देत आहोत
- सकाळी – बाळ उठल्यावर काही मिनिटांसाठी बाळाला स्तनपान द्या (२०० मिली )
- न्याहारी – १ कप प्युरी किंवा कुठलीही न्याहारी
- सकाळचा नाश्ता – अर्धा कप फळ / दही / उकडलेल्या भाज्या
- दुपारचे जेवण – १ कप सीरिअल
- दुपारची झोप
- संध्याकाळचा नाश्ता – स्तनपान किंवा फॉर्मुला दूध ( साधारणतः २०० मिली )
- रात्रीचे जेवण – १ कप लापशी / प्युरी / सिरिअल
- रात्री – झोपताना स्तनपान
८ महिन्यांच्या बाळासाठी आहारतक्ता
इथे एक तक्ता दिला आहे जो तुम्ही तुमच्या ८ महिन्यांच्या बाळाच्या आहाराविषयी मार्गदर्शक म्हणून वापरू शकता
वार | सकाळी उठल्यावर | नाश्ता | सकाळचे मधल्या वेळचे खाणे | दुपारचे जेवण | दुपारची झोप | संध्याकाळचे खाणे | रात्रीचे जेवण | रात्री झोपण्यापूर्वी |
सोमवार | नाश्ता किंवा
फॉर्मुला दूध |
तांदळाची खीर | गाजर प्युरी | वरण भात | चीझ | तांदळाची लापशी | झोपण्यापूर्वी स्तनपान किंवा फॉर्मुला दूध | |
मंगळवार | खिचडी | उकडलेले अंडे | पोळी भाजी | दही | डोसा किंवा पोळी भाजी | |||
बुधवार | चिकन प्युरी | सफरचंद प्युरी | दही भात | मसूर डाळीचे सूप | धान्याची लापशी | |||
गुरुवार | दलिया खिचडी | केळं | डाळ इडली | उकडलेले सफरचंद | पोळी भाजी | |||
शुक्रवार | मासे प्युरी | भाज्यांचे सूप | खिचडी | उकडलेल्या भाज्या | दही भात |
८ महिन्यांच्या बाळासाठी पदार्थांच्या कृती
नेहमीच्या प्युरी व्यतिरिक्त तुम्ही खालील काही पदार्थ करून बघू शकता त्यामुळे बाळाच्या तोंडाला चव येईल. ८ महिन्यांच्या बाळासाठी इथे काही मजेदार भारतीय घरी करता येण्याजोग्या पाककृती आहेत.
१. ब्रोकोली सूप कृती
साहित्य
- बटर – १ टेबलस्पून
- निवडलेली ब्रोकोली – १ कप
- मिरपूड – १ चिमूटभर
- मीठ – १ चिमूटभर
कृती
- एका भांड्यात बटर घालून ते थोडे वितळू द्या
- आता त्यामध्ये ब्रोकोली घालून काही मिनिटांसाठी परतून घ्या
- भांड्यावर झाकण ठेऊन थोडा वेळ शिजू द्या
- थंड झाल्यावर मिक्सर मध्ये मऊ करून घ्या
- दुसऱ्या एका भांड्यात थोडे बटर घालून त्यामध्ये मिश्रण घाला. थोडा वेळ शिजवा, मीठ आणि मिरपूड घाला. थंड झाल्यावर बाळाला भरवा.
२. माशाची प्युरी
साहित्य
- स्वच्छ केलेले मासे
- पाणी – १ कप
कृती
- एका भांड्यात पाणी घेऊन ते गॅस वर ठेवा.
- एका दुसऱ्या छोट्या भांड्यात स्वच्छ केलेले आणि बारीक तुकडे केलेले मासे घ्या. आता हे भांडे वरील मोठ्या भांड्यात ठेवा.
- थोडा वेळ शिजू द्या. संपूर्णपणे शिजल्यावर माशांचा रंग पांढरा होतो, आता हे शिजलेले मासे मिक्सर मधून फिरवून घ्या, तयार झालेल्या प्युरी मध्ये चवीसाठी मीठ आणि जिरे पावडर घालून बाळाला द्या.
३. नाचणीची सफरचंद घालून केलेली लापशी
साहित्य
- किसलेले सफरचंद – १ कप
- नाचणी पीठ – १ टेबल स्पून
- तूप – १/२ टेबले स्पून
- पाणी – १.५ कप
कृती
- एक कप पाण्यामध्ये नाचणीचे पीठ घालून चांगले मिक्स करून घ्या. मिश्रणात गुठळ्या राहणार नाहीत असे छान मिक्स करा.
- गॅस चालू करून भांडे ठेवा.
- मिश्रण चांगले उकळेपर्यंत ढवळत रहा.
- आता त्यात किसलेले सफरचंद घाला.
- सफरचंद आणि नाचणी चांगली शिजू द्या. जर लापशी घट्ट झाली तर पाणी घालून तुम्हाला हवी तशी करून घ्या.
- एकदा शिजल्यावर गॅस बंद करा, बाळाला भरवण्याआधी थोडे तूप घाला.
४. रव्याचा उपमा कृती
साहित्य
- उपमा – १/२ कंप
- बारीक चिरलेल्या भाज्या – १ कप
- कढीपत्ता – ५-६
- तूप – १ टेबले स्पून
- मोहरी – १/२ टेबल स्पून
- पाणी – २ कप
- मीठ – १/४ टेबल स्पून
कृती
- एक चमचा तुपावर रवा खरपूस भाजून घ्या व बाजूला ठेवा.
- पुन्हा एका भांड्यात तूप घालून त्यात मोहरी घालून चांगली तडतडू द्या.
- आता त्यात एक कप चिरलेल्या भाज्या घालून चांगल्या शिजू द्या.
- भाज्या चांगल्या शिजल्यावर त्यात मीठ आणि पाणी घाला.
- पाणी उकळल्यावर त्यामध्ये भाजलेला रवा घालून चांगलं हलवत रहा त्यामुळे गाठी होणार नाहीत.
- थोडा वेळ झाकण ठेऊन शिजू द्या. वरून एक चमचा तूप सोडा . थंड झाल्यावर बाळाला भरवा.
५. गाजराचे काप कृती
साहित्य
- गाजराचे तुकडे – १ कप
- मीठ – चिमूटभर
- मिरपूड – चिमूटभर
- तूप – १ टी स्पून
कृती
- गाजराचे तुकडे करून ठेवा.
- एका भांड्यात पाणी उकळून घ्या आणि त्यात हे गाजराचे तुकडे घाला.
- चावता येईल इतपत चांगले शिजवून घ्या.
- एका भांड्यात तूप घालून चांगले परतून घ्या.
- चवीपुरते मीठ आणि मिरपूड घालून घ्या.
- थंड झाल्यावर बाळाला द्या.
बाळाला भरवतानाच्या काही टिप्स
- स्तनपान किंवा फॉर्मुला दूध हे ८ महिन्यांच्या बाळासाठी सुद्धा प्राथमिक अन्न आहे. घन पदार्थांव्यतिरिक्त बाळ एक वर्षांचे होईपर्यंत डॉक्टर्स दिवसातून २-३ वेळा बाळाला स्तनपान देण्यास सांगतात.
- बाळ एक वर्षांचे होईपर्यंत बाळाला गाईचे दूध देण्याचे टाळा.
- जर कुठल्याही पदार्थाची आपल्या कुटुंबात ऍलर्जी असेल तर विशेषतः दुग्धजन्य पदार्थ, अंडी, सुकामेवा वगैरे. धोक्याच्या लक्षणांवर लक्ष ठेवा. तसेच तुमच्या बाळामध्ये ह्या ऍलर्जी आल्या आहेत का ह्याची तुमच्या डॉक्टरांशी चर्चा करा.
- तळलेले पदार्थ टाळा आणि उकडलेल्या भाज्या आणि फळे यांचा समावेश करा.
- बाळाला भरवण्याची जागा एकच ठेवा. त्यांच्या मनामध्ये अन्न आणि त्या जागेविषयी बंध निर्माण होतात.
- अन्न खूपच जास्त मऊ करू नका थोडे सरसरीत राहूद्या. त्यामुळे तुमच्या ८ महिन्यांच्या बाळाला मऊ अन्न खाण्यापासून जेवणापर्यंतचे संक्रमण सोपे जाईल.
- १ वर्षांपर्यंतच्या बाळांना मीठ आणि साखरेच्या व्यसनापासून दूर ठेवा. बरेच डॉक्टर्स ह्या दोन्ही गोष्टींपासून बाळास दूर ठेवण्याचा सल्ला देतात. तसेच थोड्या अंतराने बाळाला थोडे थोडे भरवत रहा.
- फिंगर फूड बाळाच्या घशात अडकण्याची शक्यता असते. कधी कधी बाळ मोठा तुकडा तोंडात घालते. त्यामुळे घन पदार्थांची सुरुवात केल्यावर बाळ तोंडात काय घालते ह्यावर लक्ष ठेवणे अतिशय महत्वाचे आहे.
- तयार केलेले बाळाचे अन्नपदार्थ स्टील किंवा काचेच्या भांड्यात काढून ठेवा. प्लॅस्टिक ची भांडी वापरणे टाळा कारण त्यामध्ये हानिकारक पदार्थ असू शकतात आणि ते अन्नामध्ये मिसळण्याची शक्यता असते.
८ महिन्याच्या वयात बाळाची हालचाल वाढते आणि त्यामुळे बाळाला खूप ऊर्जा लागते. त्यामुळे त्यांच्या वाढलेल्या शारीरिक आणि मानसिक क्रियांसाठी आरोग्यपूर्ण आहार महत्वाचा आहे. त्यामुळे बाळाच्या आहाराचा तक्ता आधीच तयार करून ठेवल्यास तसेच ताज्या भाज्या आणि फळे यांचा त्यात समावेश केल्यास आपण त्याना चांगले पोषण देऊ शकतो.
आणखी वाचा:
७ महिन्यांच्या बाळासाठी अन्नपदार्थांचे विविध पर्याय
९ महिन्याच्या बाळासाठी अन्नपदार्थांचे विविध पर्याय