Firstcry Parenting
Search
Parenting Firstcry
Home बाळ दर महिन्याला होणारा बाळाचा विकास १ महिन्याच्या बाळाची वाढ आणि विकास

१ महिन्याच्या बाळाची वाढ आणि विकास

१ महिन्याच्या बाळाची वाढ आणि विकास

जर तुम्ही नुकतेच पालक झाला असाल तर तुमच्या बाळाची काळजी घेणे म्हणजे तुम्हाला अवघड गोष्ट वाटू शकेल. तुमच्या बाळाची वाढ नीट होत आहे ना ह्या विचाराने तुमची झोप उडेल. पहिल्या महिन्यात दररोज बाळाचा विकास होत असतो. विशिष्ट कालावधीत विकासाचे कुठले टप्पे पार झाले पाहिजेत हे माहित असल्यास तुमचा ताण कमी होऊ शकतो.

बाळाची वाढ

जन्मतः तुमच्या बाळाच्या शरीरात जास्त पाणी असते आणि जन्मानंतरच्या पहिल्या महिन्यात ते कमी होते आणि त्यामुळे बाळाचे वजन १०% कमी होण्याची शक्यता असते. त्यामुळे पहिल्या काही दिवसांमध्ये जर तुमच्या बाळाचे वजन कमी झाले तर काळजी करण्याचे काहीही कारण नाही. पुढील दोन आठवड्यांमध्ये बाळाचे वजन वाढेल आणि नंतरच्या कालावधीत बाळाच्या वजनात झपाट्याने वाढ होईल. पहिल्या महिन्यात बाळाचे वजन १४ ते १८ ग्रॅम दिवसाला वाढेल.

जर बाळाचे वजन पुरेसे वाढले नाही तर कारण जाणून घेण्यासाठी बालरोगतज्ञांशी संपर्क साधा.

बाळाचा विकास

तुम्ही बाळाची वाढ जाणून घेण्यासाठी प्रत्येक आठवड्याला त्याच्या विकासाची नोंद ठेऊ शकता. तुमचे डॉक्टर बाळाचे वजन, उंची आणि डोक्याचा परीघ मोजतील आणि बाळाच्या वाढीची प्रगती तपासतील. बाळाची दृष्टी, ऐकण्याची क्षमता आणि भाषिक कौशल्ये सुद्धा तुम्ही तपासून बघू शकता.

बाळाचा विकास

आठवड्याच्या बाळाचा विकास

आठवड्यांचे बाळ वेगवेगळे आवाज काढून तुमच्याशी संवाद साधण्याचा प्रयत्न करेल. त्यामुळे अशावेळी तुम्ही बाळाशी बोलत राहिले पाहिजे आणि संवाद तसाच सुरु ठेवला पाहिजे. तुमच्या बाळाची भाषिक कौशल्ये विकसित होण्यासाठी हा उत्तम मार्ग आहे. बाळाची ऐकण्याची क्षमता आणि दृष्टी विकसित होत असल्याने बाळ विविध आवाज, आणि चेहरे ओळखण्यास सुरुवात करू लागते

बाळ थोडा वेळ पोटावर झोपण्यास तयार असते त्यामुळे बाळ काही क्षणांपुरते मान आणि डोके उंचावते. बाळाला पोटावर झोपवताना बाळाकडे संपूर्ण लक्ष असले पाहिजे. बाळाला पोटावर झोपवलेले असताना दुर्लक्ष करू नका. तुमचे बाळाची उंची आठवड्यांमध्ये इंचाने वाढेल आणि एका आठवड्यात बाळाचे वजन १४० ते २०० ग्रॅम्स इतके वाढेल.

आठवड्यांच्या बाळाचा विकास

व्या आठवड्यात बाळाला पोटावर झोपवल्यावर थोडा जास्त वेळ बाळ मान वर करू शकेल कारण बाळाच्या मानेचे स्नायू बळकट होतील.

ह्या आठवड्यात बाळ एक महत्वाचा टप्पा पार करेल आणि तो म्हणजे हसणे. बाळ आता रात्रीचे जास्त वेळ झोपू लागेल आणि मध्ये उठता ते तास सलग झोपू लागेल.

बाळाच्या वाढीचा वेग ते आठवडे ह्या कालावधीत झपाट्याने वाढू लागेल आणि बाळाचे वजन व्या आठवड्यात २०० ग्रॅम्सने वाढू शकेल.

बाळाच्या दृष्टीचा चांगला विकास होत असल्या कारणाने बाळ एका विशिष्ठ वस्तूवर लक्ष केंद्रित करू लागेल. काही रंगामधील फरक बाळ ओळखू शकेल.

आठवड्यांच्या बाळाचा विकास

व्या आठवड्यात बाळाची ऐकण्याची क्षमता पूर्णतः विकसित होते आणि बाळ आवाजाच्या दिशेने लक्ष केंद्रित करू लागते, बाळ संगीत ऐकू लागते आणि बाळाला ते आवडायला सुद्धा लागते. तुम्हाला बाळाच्या हावभावांमध्ये बदल जाणवतील तसेच कधी कधी बाळ एक भुवई उंचावेल किंवा ओठ दुमडून घेईल.

पहिला वाढीचा टप्पा आतापर्यंत जरी पार पडला असला तरी तुम्ही १४० ते २०० ग्रॅम्स इतक्या वजनाच्या वाढीची अपेक्षा करू शकता.

आठवड्यांच्या बाळाचा विकास

तुमच्या लक्षात येईल की आठवड्यापर्यंत बाळाची कमीत कमी इंच वाढ झालेली आहे. सर्वात महत्वाचे म्हणजे, बाळाच्या मेंदूची सुद्धा वाढ होत आहे. बाळाला वेगवेगळ्या गोष्टी शिकवण्यात दंग ठेवण्यासाठी हा काळ सर्वात महत्वाचा आहे. चांगली दृष्टी आणि ती केंद्रित करण्याची क्षमता ह्यामुळे बाळ ६० सेमी इतक्या अंतरावरच्या गोष्टींवर लक्ष केंद्रित करू शकेल. हलणाऱ्या गोष्टींचा मागोवा सुद्धा बाळ आता घेऊ शकेल.

बाळाशी खूप बोलून त्यास संवादात मग्न ठेवण्यासाठी हा काळ उत्तम असतो. बाळाला संगीत ऐकवा किंवा चित्रे दाखवा त्यामुळे बाळाची संज्ञानात्मक कौशल्ये विकसित होण्यास मदत होईल.

व्या आठवड्यात बाळ हाताने वस्तू घेऊ शकेल. तुमच्या लक्षात येईल की छोट्या छोट्या गोष्टी घेण्यासाठी बाळ प्रयत्न करेल. कुठलीही टोकदार वस्तू ह्या काळात बाळाच्या जवळ ठेऊ नका.

बाळाचे आरोग्य

बाळ सारखे रडत असेल तर बऱ्याच पालकांना त्याविषयी चिंता वाटते. जर तुमच्या लक्षात आले की बाळ सारखे रडत आहे आणि बाळाचे पोट दुखत असल्यास तुम्ही लक्षणे तपासून बघू शकता. बाळाचे पोट दुखत असल्यास बाळ मुठी आवळून घेते आणि पाय पोटाशी घेते, डोळे घट्ट मिटून घेते किंवा डोळे मोठे ठेऊन रडते. तसेच थोड्या कालावधीसाठी बाळ श्वास रोखून धरते. बाळाला पोटशूळ झाले आहे का हे जाणून घेण्यासाठी ‘ Rule of three’ अतिशय महत्वाचा आहे. तीन आठवडे, आठवड्यातून दिवस दररोज तास जर बाळ रडत असेल तर बाळाला पोटशूळ (Colic) झाला आहे असे समजावे.

परंतु जर बाळ खूप रडत असेल तर बाळाला दरवेळी पोटशुळच झाला आहे असे म्हणता येणार नाही. बाळाचे रडणे म्हणजे संवादाचे ते एक माध्यम आहे आणि बाळ निरोगी असल्याचे सुद्धा ते लक्षण आहे. जर तुमचे बाळ रडत नसेल तर बाळाच्या डॉक्टरांशी संपर्क साधा.

बाळाची नॅपी बदलण्याची वेळ झाली आहे का किंवा बाळाला भूक लागली आहे का हे सुद्धा तुम्ही तपासून पाहू शकता.

पहिल्या महिन्यात तुमच्या बाळाची लसीकरणाची वेळ झालेली असते आणि त्यासाठी तुम्हाला डॉक्टर शोधून ठेवले पाहिजेत. तुमच्या बाळाला जिवाणूंचा संसर्ग होऊ नये म्हणून चांगली स्वच्छता राखा. तसेच बाळाला संसर्ग होऊ नये म्हणून आजारी व्यक्तींपासून बाळाला दूर ठेवा. बाळाला घेण्याआधी हात स्वच्छ धुवा.

बाळाच्या विकासाचे टप्पे ला महिना

तुमच्या बाळाच्या विकासाचे टप्पे बाळाचा विकास होत आहे हे दर्शवतात. हे विकासाचे टप्पे समजून घेतल्यास बाळाची चांगली वाढ होण्यास मदत होते. पहिल्या महिन्यात प्रामुख्याने आढळणाऱ्या विकासाच्या टप्प्यांमध्ये खालील गोष्टींचा समावेश होतो.

  • शारीरिक विकास: तुमचे बाळ आता हात हलवू शकते आणि बऱ्याचदा तोंडापाशी नेते. बाळाला पोटावर झोपवल्यार बाळ मान उंचावते. बाळ हाताची मूठ वळवून बंद करू शकते. ह्याच काळात बाळ हसू लागते.
  • स्पर्श आणि वासाची संवेदना: एक महिन्याचे झाल्यावर तुमचे बाळ स्तनपानाचा वास ओळखू लागते. बाळाला कडू किंवा आम्लयुक्त वास ओळखू येतो आणि बाळ तो वास टाळू लागते. बाळाला कसेही घेतलेले चालत नाही आणि चांगले वास त्याला आवडू लागतात.
  • दृष्टी आणि ऐकण्याचा विकास: बाळ साधारणपणे १२ इंचांपर्यंत लक्ष केंद्रित करते. बाळाला आवाज ओळखू येतात आणि त्या दिशेने ते मान वळवतात कारण त्यांची ऐकण्याची क्षमता चांगली विकसित झालेली असते. बाळ हलणाऱ्या वस्तूंचा सुद्धा डोळ्यांनी मागोवा घेऊ लागते.

अकाली जन्मलेली बाळे हे विकासाचे टप्पे वेळेत पार करतीलच असे नाही. त्यांचा विकास हळू हळू होऊन ती बाळंसुद्धा हे विकासाचे टप्पे पार करतात.

वर्तणूक

पहिल्या महिन्यात बाळ प्रतिसाद म्हणून हसण्यास सुरुवात करेल. परंतु व्या आठवड्याच्या आसपास बाळ तुमचा चेहरा ओळखू लागेल आणि तुम्हाला प्रतिसाद म्हणून ते हसायला सुरुवात करेल. ह्याच कालावधीत बाळांना प्रतिशूल (colic) चा त्रास होतो. तेव्हा बाळे कुठल्याही कारणास्तव रडू लागतात. बाळाला कॉलिकचा त्रास झाल्यामुळेच बाळ रडत असते आणि जसजशी बाळाची वाढ होते तसा हा त्रास कमी होतो. बाळाला आराम पडावा म्हणून तुम्ही बाळासाठी गाणी लावा, किंवा बाळाचे लक्ष दुसरीकडे वेधले जाईल असे पहा. तुम्हाला ह्या कालावधीत थोडी सहनशक्ती वाढवली पाहिजे, विशेषकरून सगळं करूनसुद्धा तुमचे बाळ रडत असेल तर वेगवेगळया गोष्टी करून बघून तुमच्या बाळासाठी काय योग्य आहे हे बघितले पाहिजे.

महिन्यांच्या बाळासाठी वेगवेगळे क्रियाकलाप

महिन्यांच्या बाळासाठी इथे काही साधे सोपे क्रियाकलाप दिले आहेत त्यामुळे बाळाच्या विकासास मदत होते.

  1. तुमच्या बाळाच्या मानेचे स्नायू अजूनही विकसित होत आहेत त्यामुळे तुम्ही बाळाला घेताना नीट आधार दिला पाहिजे. बाळ नीट मान धरू लागेपर्यंत आणि बाळाच्या मानेचे स्नायू मजबूत होईपर्यंत तुम्ही बाळाच्या मानेखाली हात ठेवला पाहिजे.
  2. बाळाला पुरेसा वेळ पोटावर झोपवा त्यामुळे बाळ मान धरू लागेल. तसेच मानेचे स्नायू विकसित होण्यासाठी मदत होईल. बाळाला पोटावर झोपवल्यानंतर SIDS चा धोका वाढतो.
  3. बाळाची नॅपी बदलताना किंवा त्याच्याशी खेळताना बाळाशी बोलत रहा. बाळाला तुमचा आवाज आणि हालचाली कळू द्या
  4. तुमच्या बाळाला तुमचे बोट धरू द्या. त्यामुळे बाळाची पकड घट्ट होईल आणि बाळाची हालचाल कौशल्ये विकसित होतील.

महिन्यांच्या बाळाची काळजी कशी घ्यावी?

तुमच्या महिन्यांच्या बाळाची काळजी घेणे हे त्यांच्या विकासाच्या दृष्टीने अतिशय महत्वाचे आहे. इथे महिन्यांच्या बाळाची काळजी घेण्याच्या काही पद्धती आहेत त्याची तुम्हाला बाळाची काळजी घेण्यासाठी नक्कीच मदत होईल.

  • बाळ भुकेले असेल तर त्याला स्तनपान द्या. बाळाची दुधाची वेळ टाळू नका. जर बाळ फॉर्मुला घेत असेल तर दिवसातून कमीत कमी वेळा आणि स्तनपान घेत असेल तर ते १२ वेळा दिले पाहिजे.
  • बाळाचे झोपेचा नमुना नियंत्रित झाला पाहिजे. बाळाच्या चांगल्या वाढीसाठी बाळाची झोप चांगली झाली पाहिजे.
  • बाळाशी बोलत रहा. बाळाशी बोलत राहिल्याने तसेच बाळाशी खेळल्याने बाळाचे संवादकौशल्य चांगल्या पद्धतीने विकसित होते.
  • बाळाला पाळण्यात ठेवण्याआधी तुम्ही काळजी घेत आहात ना हे लक्षात घ्या. खिडकीपासून बाळाचा पाळणा दूर ठेवा. बाळाला हानिकारक एखादे खेळणे असेल तर ते बाजूला काढा आणि बाळाच्या खोलीत चांगला प्रकाश आणि तापमान राहील ह्याची खात्री करा.
  • बाळ घेण्याआधी तुमचे हात स्वच्छ करा.
  • बाळाची नियमित वैद्यकीय तपासणी करा आणि वेळेवर बाळाचे लसीकरण करा, त्यामुळे बाळाचे संसर्गापासून आणि रोगांपासून संरक्षण होईल.

बाळाला दूध देणे

पहिल्या महिन्यात बाळाला कमीत कमी वेळा दूध दिले पाहिजे. स्तनपान घेणाऱ्या बाळाला दिवसातून १२ वेळा दूध दिले पाहिजे. बाळाला जितके हवे तितके दूध द्या. बाळाला जेव्हा भूक असेल तेव्हा दूध देण्याची ती सर्वोत्तम वेळ असते.

झोप

महिन्यांचे बाळ दिवसातून १४ ते १७ तास झोपते. ही झोप दिवसातून वेगवेगळ्या वेळेला असते. बाळाला दूध पाजल्यावर बाळ झोपी जाते. तुमच्या बाळाला पुरेशी झोप मिळणे महत्वाचे असते कारण झोपेत बाळाची वाढ होत असते.

पालकांसाठी काही टिप्स

पालकांसाठी काही टिप्स

बाळाची योग्य वाढ होत आहे ना हे जाणून घेण्यासाठी तुम्ही खालील टिप्स वापरू शकता

  • बाळाला पुरेसा स्पर्श करत राहा. आईचा स्पर्शाने बाळाला बरे वाटते. बाळाला कुशीत, मांडीवर किंवा नुसते हातावर झुलवल्यास त्यांना छान वाटते.
  • बाळाला मनोरंजनासाठी सुरक्षित खेळणी द्या.
  • बाळाची हालचाल कौशल्ये वाढवीत म्हणून बाळाचे पाय सायकल चालवतो तसे हलवत रहा. त्यामुळे बाळाचे स्नायू चालण्यासाठी आणि रंगण्यासाठी मजबूत होतील.
  • जर तुमचे बाळ खात नसेल किंवा झोपत नसेल तर तुमच्या डॉक्टरांशी संपर्क साधा. तसेच बाळ आवाजाला प्रतिसाद देत नसेल तर डॉक्टरांशी बोलून घ्या.

बाळाच्या विकासासाठी प्रत्येक टप्पा महत्वाचा आहे. आणि विकासास उशीर होतो आहे असे तुमच्या लक्षात आले तर तुम्ही डॉक्टरांशी त्वरित संपर्क साधा.

RELATED ARTICLES
MORE FROM AUTHOR
संपादकांची पसंती
Please Wait Updating Your Article