Firstcry Parenting
Search
Parenting Firstcry
Home बाळ आरोग्य बाळांच्या सर्दी खोकल्यावर घरगुती उपाय

बाळांच्या सर्दी खोकल्यावर घरगुती उपाय

बाळांच्या सर्दी खोकल्यावर घरगुती उपाय

सर्दी खोकला हे शाळा बुडवण्याचे अगदी नेहमीचे कारण आहे. सर्दी खोकल्याचा संसर्ग वर्षभर होत असतो. सतत होणाऱ्या सर्दीवर तसा काही उपाय नाही. त्यावर काही प्रतिजैविके, सिरप किंवा गोळ्या नाहीत. तथापि त्यापासून आराम मिळावा म्हणून काही उपाय आहेत. औषधांपेक्षा आपल्या मुलांसाठी घरगुती उपाय करणे चांगले आहे. असे बरेच घरगुती उपाय आहेत जे आपण करून पाहू शकता. आणि बरेचसे आपल्या घरात उपलब्ध असतील.

बाळांमधील सर्दी खोकल्यावर २० घरगुती उपाय

सर्दी-खोकल्याचे २ प्रकार आहेत :

१. ओला

२. कोरडा

ओल्या खोकल्यामध्ये घशामध्ये कफ असतो आणि कोरड्या खोकल्यामध्ये कफ आढळत नाही. दोन्हीसाठी काही वेळा उपाय वेगवेगळे असू शकतात. उपाय करण्याआधी सर्दी-पडशाचे नीट निदान होणे आवश्यक आहे.

सर्दी-पडशाचा संसर्ग अन्नातून होत नाही, तर तो हवेतून आणि संसर्ग झालेल्या व्यक्तीच्या स्पर्शातून होतो. थंड हवामानामुळे बाळांना संसर्ग होत नाही तथापि प्रजननासाठी ते चांगले वातावरण असते. तर, प्रथम आणि सर्वात महत्वाचे म्हणजे नेहमी स्वच्छता राखा आणि वेळोवेळी हात स्वच्छ धुवा. आणि जर आपल्या बाळाला सर्दी खोकला झाला असेल तर, ह्या बाळांसाठीच्या नैसर्गिक उपचार पद्धती जरूर वापरून पहा.

महत्वाचे : जसजशी मुलांची वाढ होते, तसतशी त्यांची प्रतिकारशक्ती, पचनसंस्था आणि श्वसनप्रक्रिया सुद्धा विकसित होत असते. अर्भकांसाठीचे उपाय एक वर्ष वयाच्या बाळाला लागू होणार नाहीत. तथापि, काही उपाय नवजात शिशु पासून मोठ्या माणसांपर्यंत सगळ्यांना लागू होतात.

नवजात शिशु साठी काही उपाय खालीलप्रमाणे :

१. स्तनपान

ह्या नैसर्गिक अन्नाव्यतिरिक्त कुठलाही उपाय किंवा उपचारपद्धती मोठी नाही. सहा महिन्यांच्या आतील बाळासाठी कोणत्याही संसर्गासाठी ते उपाय म्हणून कार्य करते. वारंवार स्तनपान केल्यास, ते संसर्गावर उपाय म्हणून काम करते. सतत किरकिर करणाऱ्या बाळांना वारंवार स्तनपान केल्याने, आईच्या स्पर्शाने आराम मिळतो.

२. नाकातील थेंब

ज्या बाळांना नाकपुड्या बंद होण्याची समस्या असते, त्यांच्यासाठी नाकातील थेंब हा उपाय चांगला आहे. तुमचे बालरोगतज्ञ तुम्हाला जवळच्या औषधांच्या दुकानात उपलब्ध असलेले नाकातील थेंब (nasal drops) लिहून देतील.

परंतु आणीबाणीच्या काळात तुम्ही ते घरीदेखील तयार करू शकता.

१) निर्जंतुक केलेल्या एका वाटीत ८ टेबल स्पून, निर्जंतुक केलेले पाणी गाळून घ्या. निर्जंतुक केलेल्या चमच्याने त्यात १/२ चमचा मीठ घाला.

सूचना: निर्धारित केलेले थेंब नाकात घालताना, बाळाचे डोके तिरपे ठेवा. नाकात घातलेले सलाईनचे थेंब बाहेर ओघळू नये म्हणून असे केले जाते. तसेच फक्त आणीबाणीच्या काळातच, घरी तयार केलेले सलाईनचे थेंब वापरा कारण जीवाणूंचा संसर्ग होण्याचा धोका असतो.

३. नेझल ऍस्पिरेटर : (Nasal Aspirator)

नेझल-ऍस्पिरेटर

जर तुमच्या बाळाचे नाक वारंवार बंद होत असेल, तर बाळाला सर्दीची लागण झाली आहे असे समजा. अशावेळी नेझल ऍस्पिरेटर घेऊन ठेवलेले चांगले. बाळ खूपच छोटे असल्यामुळे त्यास सावधपणे शिंकता येत नाही, अशा वेळी नेझल ऍस्पिरेटर, नाकातील चिकट पदार्थ, बाळाला काही इजा न करता शोषून घेते .

४. हळद

शतकानुशतके हळद औषध म्हणून वापरले जाते. आजही भारतीय पदार्थांमधील हा महत्वाचा घटक आहे. थोडीशी हळद गरम पाण्यात मिसळून त्याची पेस्ट तयार करा, आणि बाळाच्या छाती, पोट आणि तळपायावर लावा. काही वेळानंतर धुवून टाका. हळद उष्ण असल्याने, हळदीची उष्णता, नाकातील चिकट पदार्थ पातळ करून, तो नाकातून बाहेर पडण्यास मदत होते.

५. मोहरीच्या कोमट तेलाचा मसाज

एक कप कोमट मोहरीच्या तेलात, २ लसूण पाकळ्या आणि काळे तीळ टाका. आणि त्याने बाळाचे हातापायांचे तळवे, छाती आणि पाठीला मसाज करा. जास्तीचे तेल मऊ कापडाने पुसून घ्या.

सरासरी ९ महिन्यांच्या बाळांसाठी उपाय

६. गूळ, जीरं आणि काळे मिरे ह्यांचा काढा

ह्या काढ्यामुळे सर्दी-पडसे आणि घसादुखीला आराम पडतो.

  • गूळ : १ किंवा २ टी स्पून
  • काळे मिरे : १ किंवा २
  • जिरे: एक चिमूटभर
  • पाणी : एक कप

हे सगळे घटक एकत्र करून पाण्यामध्ये उकळा. नंतर हे मिश्रण बाळाला पाजण्याआधी गाळून थंड करा. २ टीस्पून पेक्षा जास्त हा काढा बाळाला देऊ नका. कारण गूळ आणि मिरे उष्ण असल्याने, थोड्या प्रमाणात दिल्यास बाळासाठी ते परिणामकारक ठरते.

७. नारळाच्या तेलाची मालिश

तुम्हाला लागणारे साहित्य:

  • अर्धी वाटी नारळाचे तेल
  • एक छोटा पांढरा कांदा
  • तुळशीची २-३ पाने
  • विड्याची काडी

वरील सर्व घटक घालून नारळाचे तेल गरम करा. मिश्रण गरम झाल्यानंतर गॅस बंद करा, थंड झाल्यानंतर कोमट तेलाने बाळाच्या छाती, पाठ आणि हातापायांच्या तळव्याना मालिश करा.

सूचना : जरी तेलात चिमूटभर कापूर सर्रास घातला जात असला तरी, दोन वर्षांखालील मुलांसाठी कापूर वापरण्याची शिफारस केलेली नाही. संशोधन म्हणते की कापूर खूप उग्र आणि अधिक श्लेष्मा (mucus) तयार करेल. हा शरीराचा, स्वतःचे उग्र वासंपासून रक्षण करण्याचा मार्ग आहे.

एक वर्षावरील बाळांसाठी उपाय

८. मध संयोजन (Honey Combination)

मध-संयोजन

एक वर्षाखालील बाळांसाठी मध टाळा : एक वर्षाखालील बाळांना मध देऊ शकत नाही कारण ते बाळांसाठी हानिकारक ठरेल. कच्च्या मधाचे कण पचविण्याची क्षमता त्यांच्या पचनसंस्थेची नसते. तथापि जेंव्हा त्यांचे वय एक वर्षांपेक्षा जास्त होते, त्यांची मध पचवण्याची क्षमता वाढते. सर्दी-पडशाचा सामना करण्यासाठी मध हा एक उत्तम स्त्रोत आहे. मध, मिरपूड, सुके अद्रक आणि लिंबाचा रस यांसोबत पण दिले जाते.

मध आणि मिरपूड : चिमूटभर मिरपूड मधात घालून, थोड्या थोड्या वेळाने बाळाला देत राहा. सर्दी-पडशासाठी हे चांगले असते.

मध आणि सुके आले : चिमूटभर आल्याची पावडर मधात घालून बाळास द्या. खोकल्यावर हा चांगला उपाय आहे.

मध आणि लिंबू : एका ग्लासभर पाण्यात लिंबू पिळा आणि त्यात मध घाला. हा एक चविष्ठ उपाय आहे आणि सहसा आनंदाने उपभोगला जातो. हे खोकला आणि सर्दी दोन्हीला देखील आराम देण्याचे काम करते.

सकाळ, संध्याकाळी आणि रात्री बाळाला एक एक चमचा देत राहा. आपल्याला लवकरच मोकळं झालेलं नाक आणि कमी झालेला खोकला दिसेल.

९. हळदीचे दूध

सगळ्यांनी हळदीच्या दुधाविषयी ऐकलेच असेल. कोरड्या खोकल्यासाठी हळदीचे दूध हे अत्यंत गरजेचे आहे. तुमच्या बाळाला चिमूटभर हळद घालून ग्लासभर दूध द्या . गोडीसाठी आपण गूळ सुद्धा घालू शकता. आणि महत्वाचे म्हणजे, दूध आणि हळद मिळून पोषक भरलेला निरोगी नाश्ता बनतो.

१०. खिचडी आणि सूप

बाळांना घनपदार्थ आणि गरम सूप देणे कठीण पडते. खिचडी मुलांना एक पोषक आहार देईल. हे सर्व प्रकारच्या सर्दी आणि खोकला कमी होण्यासाठी, सांत्वनदायक आणि आरामदायी आहे.

११. व्हिटॅमिन सी रस

बाळाला मोसंबी, आवळा आणि लिंबू ह्यांचा व्हिटॅमिन सी युक्त रस नियमितपणे द्या. व्हिटॅमिन सी सर्दीच्या जंतूंचा सामना करते. तथापि तुमचे मूल घसादुखीने त्रस्त असेल तर व्हिटॅमिन सी युक्त रस बाळास देण्याचे टाळा.

१२. ” चुक्का कापी ” किंवा सुक्या आल्याची कॉफी

नाही ह्यात कॉफी नाही ! हो, मोठ्यांसाठी तुम्ही खाली दिलेल्या घटकांमध्ये कॉफी घालू शकता पण लहान मुलांसाठी नाही.

केरळमध्ये हे एक पारंपारिक पेय आहे. यात सर्व घटकांचा समावेश आहे जे सर्दी आणि खोकला नष्ट करते.

चुक्का कापी/सुक्या आल्याची कापी ह्याची पाककृती इथे पहा.

  • सुके आले (चुक्कू) १ इंच तुकडा
  • तुळशीची पाने – ६ ते ७
  • मिरे – २
  • गूळ – १ टेबल स्पून ( किंवा जास्त , जर तुम्हाला गोड़ हवे असेल तर )
  • पाणी – १ कप

सुके आले आणि मिरपूड एकत्र बारीक करा. गूळ घालून पाणी उकळा. त्यात सुके आले, मिरपूड आणि तुळशीची पाने घाला. थोडा वेळ उकळू द्या आणि गॅस बंद करा. हे मिश्रण गाळून घ्या आणि बाळाला कोमट चुक्का कापी देत राहा.

१३. गुळण्या करणे

साधे गरम पाणी किंवा मीठ घालून गरम पाण्याच्या गुळण्या दिवसातून २-३ वेळा केल्याने बाळाला खोकला आणि घसादुखीपासून आराम मिळतो. असे नियमित केल्याने त्वरित परिणाम दिसेल.

सर्व वयोगटातील बाळांसाठी सामान्य उपचार

१४. वाफ

बाळांचे बंद नाक उघडण्यासाठी आणि बाळांना शांत करण्यासाठी, हा एक नैसर्गिक उपाय आहे. गरम पाण्याचा शॉवर किंवा नळ, न्हाणीघरात सोडून ठेवा आणि न्हाणीघर वाफेने भरेल असे पहा. आता नळ बंद करून बाळाला आत घ्या. ही वाफ तुमच्यासाठी जरी मृदू असली तरी बाळांसाठी अगदी योग्य आहे. मोठ्या बाळांसाठी आणि मुलांसाठी स्टीम इनहिलर वापरता येऊ शकतो. काचेच्या भांड्यातले उकळते पाणी टाळा. कारण ते अपघात प्रवण आणि धोकादायक आहे. स्टीम इनहेलरमध्ये गुंतवणूक करा.

१५. बाळाचे डोके थोडे उंचावर ठेवणे

बाळाचे डोके उंचीवर ठेवल्याने, श्वासोच्छवास सुरळीत सुरु राहतो. त्यामुळे नाक मोकळे होण्यास मदत होते.

१६. विक्स वेपोर

२ वर्षांखालील बाळांसाठी विक्स न वापरणे हे महत्वाचे आहे. सामान्य विक्स मधील घटक खूप तीव्र असून, त्यापासून बचाव करण्यासाठी शरीर बाळाला जास्त शेलष्मा तयार करण्यास उत्तेजन देते. तथापि २ वर्षावरील मुलांसाठी, विक्स वेपोर वापरू शकतो. बेबी विक्स हे उत्पादन २ वर्षाखालील बाळांसाठी वापरू शकतो कारण ते कमी तीव्रतेच्या घटकांपासून बनवलेले आहे. बाळाच्या पाठीवर, छातीवर आणि पायाच्या तळव्याना हे बेबी विक्स लावा, विक्स चे प्रमाण खूप जास्तही नको. विक्स बाळाला गाढ झोपलागण्यास मदत करते. तथापि २ वर्षांवरील सगळ्यांसाठी तुम्ही रेग्युलर विक्स वापरू शकता .

१७. हर्बल पाणी

जर तुमचे बाळ सहा महिन्यांपेक्षा मोठे असेल आणि पाणी पीत असेल तर तुमच्या बाळाला ओवा, जिरे आणि तुळशीची पाने घालून उकळून गार केलेले पाणी थोड्या थोड्या वेळेच्या अंतराने द्या. ह्यासाठी गाळलेले पाणी घेऊन त्यात एक चमचा ओवा, जिरे आणि तुळशीची पाने घालून उकळा. हे पाणी गाळून थोडे गार झाल्यावर बाळाला देण्यासाठी बाटलीत भरा.

१८. योग्य कपडे

आधी सांगितल्याप्रमाणे, वातावरण सर्दी-पडशासाठी प्रजननाचे ठिकाण बनते. जर बाळाला फक्त सर्दी-पडसे असेल तर त्यांना उबदार कपड्यात ठेवले पाहिजे. जर बाळाला जास्त ताप असेल, तर ताप वाढेल अशा गोष्टी टाळा. सैलसर आणि पातळ कपडे ताप कमी करण्यास मदत करतील.

१९. सजलीकरण

खूप सारं कोमट पाणी, स्तनपान आणि द्रव्ये देऊन बाळाचे सजलन करा. संसर्ग झालेल्या काळात बाळ घन पदार्थ स्वीकारण्याची शक्यता कमी असते. पोषक घटकांसहित असलेली द्रव्ये रोगप्रतिकारक यंत्रणा वाढविण्यास मदत करतील.

२०. बाळाला ताणविरहित ठेवा

तुमच्या बाळाला कुठलाही ताण देऊ नका. हो ! पालक म्हणून आपण बऱ्याचवेळा असे करतो. जर बाळाला एखादी गोष्ट करायची नसेल तर, बाळाला आवडेल असं दुसरं काही तरी करून पहा. तसेच घनपदार्थाची जबरदस्ती करू नका, त्याऐवजी खिचडी, फळे, सूप्स देऊन पहा. उद्देश पुरेशा कॅलरीज मिळणं हा आहे. कारण असे आहे की जर बाळ तणावाखाली असेल तर बाळाला बरे होण्यास जास्त कालावधी लागेल.

हे करा आणि हे करू नका

  • बाळाचे वय पाहून उपचारपद्धती ठरवा .
  • सर्दी-पडशाकडे दुर्लक्ष करू नका, त्याचे रूपांतर निमोनिया मध्ये होऊ शकते.
  • जेंव्हा बाळ रडायचे थांबत नसेल तेंव्हा घाबरून जाऊ नका किंवा अस्वस्थ होऊ नका.
  • रात्रीच्या वेळी, हाताच्या अंतरावर औषधे ठेवण्याचा प्रयत्न करा.
  • हिरव्या श्लेष्मा सारखे काही असामान्य दिसल्यास, ताबडतोब बालरोगतज्ञांचा सल्ला घ्या.
  • खूप ताप असेल तर दुर्लक्ष करू नका, लगेच वैद्यांचा सल्ला घ्या.
  • बाळाला ज्या घटकांची ऍलर्जी नसेल असेच घटक वापरा .
  • तसेच सामान्य तापमानापेक्षा जास्त थंड द्रव पदार्थ देण्याचे टाळा .

सातत्य ही यशाची चावी आहे. आपण वापरत असलेली पद्धती कशा परिणामकारक होत आहेत, यासाठी दक्ष रहा आणि जर एखाद्याने बाळाला आराम दिला तर त्यासह पुढे जा. जर कुठला उपाय अधिक श्लेष्मा तयार होण्यास कारणीभूत असेल तर तो टाळा.

जर सर्दी किंवा खोकला एका आठवड्यांपेक्षा जास्त काळ टिकत असेल तर, ती सामान्य सर्दीच असल्याचे सुनिश्चित करण्यासाठी बालरोगतज्ञांकडे जा आणि इतर कशाचाही लक्षण नाही ह्याची खात्री करा.

सर्वसाधारणपणे लक्षात ठेवा की, रोगप्रतिकारक यंत्रणा आणि श्वसन यंत्रणेचा पूर्ण विकास न झाल्याने, मुले सर्दी खोकल्याला बळी पडण्याची शक्यता जास्त असते. त्यांची वाढ होत आहे. त्यांना वर्षातून ६-१२ वेळा सर्दी-पडसे होऊ शकते. त्यामुळे हा नियमित न आवडणारा पाहुणा आहे. त्यामुळे औषधी वनस्पती, स्टीमर  आणि नवजात शिशुंसाठी प्राथमिक चिकित्सा पेटी तयार ठेवल्यास मदत होईल.

RELATED ARTICLES
MORE FROM AUTHOR
संपादकांची पसंती
Please Wait Updating Your Article