In this Article
गर्भारपणात आहाराची काळजी घेतली पाहिजे. आहाराचा बाळाच्या आरोग्यावर परिणाम होतो, तसेच आईच्या मानसिक आणि शारीरिक आरोग्यावर सुद्धा त्याचा खूप दृष्टीने परिणाम होतो. वाढत्या बाळाच्या आरोग्यावर अन्नपदार्थांचा काय परिणाम होतो हे लक्षात घेऊन होणाऱ्या आईसाठीचा आहार खूप काळजीपूर्वक तयार केला पाहिजे.
गर्भारपणाच्या तिसऱ्या तिमाहीमधील आहारात कुठले अन्नपदार्थ टाळले पाहिजेत आणि कुठले अन्नपदार्थ तुम्ही सुरक्षितरित्या घेऊ शकता ते बघूयात.
गर्भधारणेच्या आठव्या महिन्यात काय अपेक्षित आहे
१. वजनात वाढ होणे
आठव्या महिन्यात बाळाचे आणि आईचे वजन खूप लवकर वाढते. जर आधीच्या काही महिन्यांमध्ये तुम्हाला वजनात वाढ दिसली नाही तर ह्या महिन्यात ती दिसेल.
२. वारंवार लघवीला होणे
जसजसे बाळ मोठे होऊ लागते, तसा मूत्राशयावर दाब पडतो आणि त्यामुळे वारंवार लघवीला लागते. ह्यामुळे बऱ्याच स्त्रिया कमी पाणी पितात कारण सारखे लघवीला जावे लागल्याने अस्वस्थता वाढते. तथापि, गर्भधारणेच्या काळात सजलीत राहणे हे अत्यावश्यक आहे. त्यामुळे शरीराला योग्य प्रमाणात पाणी मिळण्यासाठी स्मार्ट उपाय शोध उदा: फळे खाणे किंवा रात्रीचे कमी पाणी पिणे इत्यादी.
३. श्वास घेण्यास त्रास होणे
गर्भाशयाचा आकार जसजसा वाढत जातो त्यामुळे फुप्फुसांवर दाब पडतो आणि त्यामुळे श्वसनास त्रास होतो. आरामदायक वाटण्यासाठी सैलसर कपडे घालावेत.
४. जळजळ किंवा पित्त होणे
तिसऱ्या तिमाहीमध्ये पोटाचा आकार वाढल्याने, पोट आणि आतड्यांवर दाब पडतो, त्यामुळे ऍसिडिटी वाढण्याचा धोका वाढतो. मसालेदार नसलेले आणि पचनास हलके असलेले अन्नपदार्थ खाल्ल्याने समस्या दूर होऊ शकते.
गर्भारपणाच्या ८व्या महिन्यात खावेत असे अन्नपदार्थ
खाली काही अन्नपदार्थ आहेत जे तुम्ही ह्या कालावधीत खाऊ शकता
१. मासे
माश्यांमध्ये खूप जास्त प्रमाणात लोह असते, आणि ते गर्भारपणाच्या शेवटच्या काही महिन्यात महत्वाचे असते. लोहाच्या कमतरतेमुळे ऍनिमिया होतो, ज्यामुळे आईला थकवा जाणवतो. माशांमध्ये प्रथिने सुद्धा असतात, आणि ८ व्या महिन्याच्या आहार तक्त्यामध्ये त्यांचा चांगला समावेश होतो.
२. मांस
लाल मांसाचा सुद्धा आईच्या आहारात चांगला सहभाग असतो, कारण लाल मांस सुद्धा प्रथिने आणि लोहाचा उत्तम स्रोत आहे. ही दोन्ही खनिज द्रव्ये आईसाठी खूप गरजेची असतात, कारण त्यामुळे बाळाची वाढ खूप वेगाने होते. लाल मांसामुळे आईची तब्येत चांगली राहते, कारण त्यामध्ये खनिज द्रव्ये असल्यामुळे आईला गर्भारपणात थकल्यासारखे वाटत नाही तसेच आई आजारी पडत नाही.
३. केळी
हे सर्वात कमी लेखले जाणारे फळ आहे, परंतु केळं हे लागणाऱ्या जीवनसत्वांचे आणि खनिजद्रव्याचे उत्तम स्रोत आहे. केळी ही पोटॅशिअम, कॅल्शिअम आणि लोहाने समृद्ध असतात आणि त्यामुळे त्यांचा स्त्रीच्या आहारात समावेश असणे अत्यंत गरजेचे असते. तसेच, त्यामुळे पचनास सुद्धा मदत होते आणि बद्धकोष्ठतेपासून आराम मिळतो आणि त्यामुळे आई होऊ पाहणाऱ्या स्त्रीला आरामदायी वाटते.
४. दुग्धजन्य पदार्थ
मुलांच्या वाढीच्या वयात दुधाचे महत्व का आहे त्याला कारण आहे. दूध आणि दुग्धजन्य पदार्थ हे व्हिटॅमिन्स आणि खनिजद्रव्ये ह्यांचे कधी न संपणारे स्त्रोत आहेत, ज्यामध्ये कॅल्शिअम,प्रथिने, पोटॅशिअम वगैरेंचा समावेश होतो. गर्भारपणाच्या शेवटच्या महिन्यात दुग्धजन्य पदार्थ घेतल्याने त्याचा बाळाच्या वाढीवर परिणाम होतो.
५. पालेभाज्या
गर्भारपणादरम्यान तंतुमय पदार्थ असलेले अन्न महत्वाचे आहे, कारण त्यामुळे बद्धकोष्ठतेची भावना होत नाही. तिसऱ्या तिमाहीतील संप्रेरकांच्या जास्तीच्या पातळीमुळे आणि जास्त वजनामुळे असे होते. पालेभाज्यांमध्ये गरजेपेक्षा जास्त तंतुमय पदार्थ असतात तसेच लोह, पोटॅशिअम आणि कॅल्शिअम सुद्धा जास्त प्रमाणात असतात. त्यांचा भारतीय मातेच्या आहारात समावेश असणे चांगले असते.
६. पी- नट बटर
शेवटच्या तिमाहीमध्ये चरबीची जास्त गरज असते. जरी खूप जास्त प्रमाणात चरबी चांगली नसली, तरी सुद्धा योग्य प्रमाणात लागणाऱ्या चरबीचा गर्भवती आईच्या आहारात समावेश असणे महत्वाचे आहे. ओमेगा ३ फॅटी ऍसिड हे जीवनावश्यक फॅटी ऍसिड चे उत्तम उदाहरण आहे आणि बाळाच्या मेंदूच्या विकासात त्याचा महत्वाचा सहभाग आहे.चांगल्या चरबीचे इतर स्रोत आहेत जसे की पी-नट बटर, अंडी आणि मासे.
७. मोसंबी
मोसंबी मध्ये जास्त प्रमाणात तंतुमय पदार्थ असतात तसेच मोसंबी मध्ये जास्त प्रमाणात व्हिटॅमिन सी असते जे शरीरासाठी महत्वाचे पोषणमूल्य असते. व्हिटॅमिन सी हे महत्वाचे आहे कारण ते लोह शोषून घेण्यास मदत करते आणि त्याच्या कमतरतेमुळे आईला ऍनिमिया आणि थकवा जाणवू शकतो. व्हिटॅमिन सी चे दुसरे स्रोत हे टोमॅटो, लिंबे आणि कोबी आहेत.
गर्भधारणेच्या आठव्या महिन्यातील आहारात समावेश करू नयेत असे अन्नपदार्थ
इथे काही पदार्थ दिले आहेत ज्यामुळे तुम्हाला आणि बाळाला हानी होऊ शकते:
१. पाश्चराईझ न केलेले दूध
बऱ्याच भारतीय घरांमध्ये, पाश्चराइझ न केलेले दूध म्हणजे गाय किंवा बकरीपासून न मिळालेले दूध. गर्भारपणाच्या तिसऱ्या तिमाहीमध्ये ह्यास अगदी आळा घातला पाहिजे, कारण दुधावर पिण्यायोग्य होण्यासाठी प्रक्रिया केली जाणार नाही. बकरीचे दूध टाळले पाहिजे कारण त्यामध्ये हानिकारक घटक असतात, ज्यांना टॉक्सओप्लास्मोसिस असे म्हणतात.
२. कॉफी
गर्भधारणेच्या शेवटच्या टप्प्यामध्ये कॅफिनेटेड पदार्थ टाळलेच पाहिजेत कारण त्यामुळे पिणाऱ्याला बद्धकोष्ठता होऊ शकते. तुम्ही त्याऐवजी जास्त प्रमाणात पाणी घेऊ शकता, जे इतर वेळेला सुद्धा गरजेचे आहे. होणाऱ्या आईने तिसऱया तिमाहीत टाळले पाहिजे असे पेय म्हणजे कॉफी,
३. अल्कोहोल आणि तंबाखू
दारू आणि तंबाखू हे गर्भधारणेच्या कुठल्याही टप्प्यावर टाळले पाहिजे, आणि विशेष करून तिसऱ्या तिमाहीत. प्रसूतीच्या वेळेला त्यामध्ये गुंतागुंत होऊ शकते तसेच आईच्या पोटातील त्याचा परिणाम होऊ शकतो.
४. तळलेले पदार्थ
गर्भधारणेच्या तिसऱ्या तिमाहीत तुम्ही तळलेले पदार्थ टाळले पाहिजेत कारण त्यापासून अगदी कमी प्रमाणात पोषणमूल्ये मिळतात. तळलेल्या पदार्थांपासून पचनाचा त्रास आणि जळजळ ह्या पोटाच्या समस्या निर्माण होऊ शकतात, ज्यामुळे तुमच्या पोटात जेव्हा बाळ असते तेव्हा अस्वस्थता येते.
५. शार्क, मर्लिन आणि सॉर्डफिश
गर्भधारणेदरम्यान हे मासे खाणे टाळले पाहिजेच कारण त्यामध्ये मिथिलमर्क्युरी नावाचा हानिकारक पदार्थ असतो. मिथिलमर्क्युरी मुळे भ्रूणाच्या मज्जासंस्था ह्यामध्ये गुंतागुंत निर्माण होते, त्यामुळे तुम्ही खूप चरबीयुक्त नसलेला मासा खाण्यासाठी निवडावा.
६. लिव्हर आणि मांस
लिव्हर आणि मांस हे फक्त तिसऱ्या तिमाहीत नव्हे तर संपूर्ण गर्भारपणाच्या काळात टाळले पाहिजेत. मांस म्हणजेच सलामी आणि हॅम मुळे न जन्मलेल्या बाळाला टोक्सओप्लास्मोसिस आणि लिटेरिओसिस होऊ शकतो. त्यामुळे गर्भधारणेदरम्यान होणाऱ्या आईने ते प्रकर्षाने टाळले पाहिजे
७. मऊ चीझ
जे चीझ मोल्ड वापरून पिकवलेले असते उदा: ब्री (Brie) गर्भारपणात टाळलेच पाहिजे. तसेच डॅनिश सारखे चीझ टाळले पाहिजे कारण त्यामध्ये बऱ्याचदा लिस्टेरिया नावाचे बॅक्टरीया असतात आणि ते गर्भधारणेदरम्यान बाळाच्या आरोग्यासाठी हानिकारक असतात. त्यामुळे जर आईला तिसऱ्या तिमाहीत चीझ खावेसे वाटत असेल तर शेडर (cheddar) सारख्या चीझ ची निवड करावी.
८ महिन्यांच्या गर्भवती स्त्री साठी आहार टिप्स
- ज्या पदार्थांमुळे तुमच्या आहाराचा पोषणमूल्यांक वाढतो फक्त तेच अन्नपदार्थ घ्या (चॉकलेट केक खाणे आता बंद!)
- भरपूर प्रमाणात पाणी प्या कारण त्यामुळे बद्धकोष्ठता होत नाही आणि रक्ताच्या पातळीत सुद्धा वाढ होते आणि त्यामुळे व्हिटॅमिन्स आणि खनिजद्रव्ये आई आणि बाळापर्यंत पोहोचतात. जेवण आणि नाश्त्याच्या मधल्या वेळेत भरपूर पाणी प्या. जेव्हा केव्हा तुम्ही पाण्याची बाटली बघाल तेव्हा ८ घोट पाणी प्या.
- जर तुम्ही समुद्री अन्नपदार्थ खात असाल तर ते एकदम बंद करू नका. गर्भधारणेदरम्यान सुरक्षित असलेले मासे खाण्यासाठी निवडा. माश्यांमध्ये ओमेगा ३ फॅटी ऍसिड्स असतात जे बाळाच्या वाढीसाठी अतिशय महत्वाचे असतात.
गर्भारपणाचा आहार तयार करणे तसे थोडे कठीण आहे कारण आईचे आरोग्य चांगले राखण्यात आणि बाळाच्या वाढीमध्ये त्याचा महत्वाचा सहभाग असतो. योग्य प्रमाणात लागणारे अन्नपदार्थ खाणे जरुरीचे आहे, तसेच हानिकारक पदार्थ जसे की अल्कोहोल, तंबाखू आणि अमली पदार्थ ह्यांच्या पासून दूर राहणे देखील बाळाच्या आरोग्यासाठी महत्वाचे असते.