गर्भधारणेचे टप्पे

गर्भधारणेचा ८वा महिना: लक्षणे, आहार आणि शारीरिक बदल

जेव्हा गर्भधारणेचा ८वा महिना सुरु होतो तेव्हा तुम्ही प्रसूतीच्या अगदी जवळ असता! तुमचे गर्भारपणाचे दिवस भरत आले आहेत ही भावना तुम्हाला ह्या महिन्यात जाणवेल आणि तुम्ही जर बाळासाठी लागणाऱ्या गोष्टी खरेदी करण्याचा विचार करत असाल तर आश्चर्य वाटून घेऊ नका. तिसऱ्या तिमाहीच्या सुरुवातीला खूप आव्हाने येतात कारण तुमच्या बाळाचे वजन वाढत असते आणि बाळ बाहेरच्या जगात येण्यासाठी तयार असते. बाळाच्या वाढीविषयी, त्यासोबत येणारी आव्हाने आणि ह्या टप्प्यावर तुम्ही कुठल्या गोष्टी केल्या पाहिजेत ह्या विषयी जाणून घेण्यासाठी हा लेख वाचा.

गर्भारपणाच्या ८व्या महिन्यात सामान्यपणे आढळणारी लक्षणे

गर्भारपणाचा आठवा महिना म्हणजे आईच्या शरीरात लक्षणीय बदल होत असतात. तिसऱ्या तिमाहीच्या सुरुवातीला सामान्यपणे आढळणारी लक्षणे म्हणजे,

. श्वासोच्छवासास त्रास होणे

वाढणारे बाळ आणि त्यामुळे वाढणारा पोटाचा आकार ह्यामुळे काही किलो वजन वाढते. आतमध्ये, गर्भाशयाचा आकार वाढत असल्याने त्याचा दाब फुप्फुसांवर पडतो आणि ती दाबली जातात. शरीरातील ह्या बदलांमुळे श्वसनास त्रास होतो. ह्या महिन्यादरम्यान जेव्हा बाळाचे डोके गर्भाशयाच्या मुखाकडे होते (cephalic position) तेव्हा ही परिस्थिती सुधारते.

. सराव कळा

सराव कळा म्हणजेच Braxton Hicks Contractions ह्या साधारणपणे प्रसूती कळांसारख्याच असतात आणि त्या ह्या महिन्यात सुरु होतात. ह्या काही सेकंदांपुरत्याच असतात. गर्भाशयाचे स्नायू प्रसूतीसाठी तयार व्हावेत म्हणून शरीराचे हे नैसर्गिक पाऊल आहे. पाणी कमी प्यायल्यास ह्या सराव कळा आणखी जास्त वाढतात.

. बद्धकोष्ठता

गर्भाशयाच्या वाढणाऱ्या आकारामुळे श्रोणीच्या भागातील पचनसंस्था आणि इतर अवयवांसाठी जागा कमी पडते. त्यामुळे तुम्हाला ह्या महिन्यात शौचास त्रास होऊ शकतो. काहीवेळा जास्त दाब पडल्यामुळे शौचामध्ये रक्त सुद्धा आढळेल. ही परिस्थिती रेचक घेऊन सुधारता येऊ शकते, त्यामुळे तुम्हाला बद्धकोष्ठता झाल्यास तुम्ही डॉक्टरांशी संपर्क साधा.

. स्तनपानातून दूध गळणे

स्तनपानाची तयारी म्हणून आईचे शरीर कोलोस्ट्रम तयार करते. ह्या महिन्यादरम्यान तुम्हाला लक्षात येईल की कोलोस्ट्रम किंवा पिवळे दूध हे आईच्या स्तनांमधून गळते. असे जरी प्रत्येक स्त्रीच्या बाबतीत घडत नसले तरी ही समस्या ब्रेस्ट पॅड वापरून हाताळता येऊ शकते.

. पाठीचे दुखणे

बाळाच्या वाढत्या वजनामुळे आणि वाढलेल्या पोटाच्या आकारामुळे पाठीच्या कंबरेकडील भागावर दाब पडतो, त्यामुळे गुरुत्वाकर्षणाचा मध्य सुद्धा बदलतो आणि त्यामुळे उभे राहताना शरीर विचित्र अवस्थेत उभे राहते. तसेच बऱ्याच स्त्रियांना ह्या काळात पाठीचे दुखणे उद्भवते विशेष करून खूप जास्त वेळ बसले किंवा उभे राहिल्यास ते जाणवते. कठीण पृष्ठभागावर झोपून किंवा गर्भधारणेदरम्यान सुरक्षित व्यायाम करून तुम्ही शरीराचा पावित्रा योग्य ठेऊ शकता.

गर्भधारणेच्या व्या महिनात शरीरात होणारे बदल

आई आणि बाळावर परिणाम करणाऱ्या काही चिंतायोग्य गोष्टी

गर्भधारणेच्या प्रत्येक तिमाहीमध्ये वेगवेगळी आव्हाने असतात. गर्भधारणेच्या ८व्या महिन्यात आई आणि बाळाच्या तब्बेतीवर परिणाम करणाऱ्या काही समस्या खालीलप्रमाणे.

. प्रीलॅम्पसिया

गर्भधारणेदरम्यान बऱ्याच स्त्रियांमध्ये रक्तदाब वाढलेला आढळतो. ह्यास इंग्रजीमध्ये gestational hypertension असे म्हणतात आणि ताण किंवा इतर काही आरोग्यविषयक समस्यांमुळे असे होऊ शकते. जर रक्तदाब वाढून लघवीमध्ये जास्त प्रथिने आढळली तर त्यास preeclampsia असे म्हणतात. जर ही परिस्थिती लक्षात आली नाही किंवा त्यावर वेळीच उपचार झाले नाहीत तर बाळाला हानी पोहचू शकते कारण ह्या स्थितीमध्ये बाळाला कमी रक्तपुरवठा होतो. ह्या समस्येवर लवकरात लवकर उपचार झाले पाहिजेत.

. बाळाचा अकाली जन्म होणे

लवकर प्रसूती होणे हा एक धोका असतो कारण काही बाळांचे डोके खाली सरकते आणि पूर्ण दिवस भारण्याआधीच प्रसूती होते. इतर आरोग्यविषयक समस्या उदा: Preeclampsia आणि इतर नाळेच्या समस्यांमुळे बाळाचा अकस्मात जन्म होऊ शकतो. ८व्या महिन्यात जन्मलेली बाळे जगण्याची शक्यता जास्त असते परंतु खूप दिवसांसाठी बाळाची खूप काळजी घ्यावी लागते.

८व्या महिन्यात बाळाचा विकास

तिसऱ्या तिमाहीस सुरुवात होताच बाळाचा विकास वेगाने होण्यास सुरुवात होते. आठव्या महिन्यात बाळामध्ये काही महत्वाचे बदल होतात.

कराव्यात आणि करू नयेत अशा गोष्टी

हे करा हे करू नका

आहार

गर्भधारणेच्या प्रत्येक महिन्याप्रमाणेच गर्भधारणेच्या ८व्या महिन्यात आहार आणि अन्नपदार्थ हे पोषक आणि संतुलित असले पाहिजेत. तसेच, खूप तंतुमय पदार्थ असलेला आहार घेतल्यास बद्धकोष्ठतेच्या समस्येवर ह्या महिन्यात मात करता येते. ओमेगा फॅटी ऍसिड्स किंवा पूरक औषधे घेतल्यास तुमच्या बाळाच्या मेंदूचा विकास चांगला होतो. कच्चे आणि कमी शिजलेले अन्नपदार्थ, कच्चे मासे, प्रक्रिया केलेले अन्नपदार्थ, कॉफी आणि पाश्चराईझ केलेले दुग्धजन्य पदार्थ ह्या टप्प्यावर टाळले पाहिजेत त्यामुळे फूड पॉयझनिंग किंवा ऍलर्जिक प्रतिक्रिया ना आळा बसतो.

होणाऱ्या बाबांसाठी काही टिप्स

पालकत्वाच्या प्रवासात बरोबर असणाऱ्या बाळाच्या बाबांचा सुद्धा बाळाच्या जन्माच्या आधी आणि नंतर खूप महत्वाचा सहभाग असतो. इथे काही गोष्टी दिल्या आहेत ज्या होणाऱ्या बाबांनी लक्षात घेतल्या पाहिजेत.

. आश्वासक रहाणे ही गुरुकिल्ली

गर्भधारणेच्या प्रवासात होणाऱ्या आईची आणि बाळाची तब्येत, आईचं दिसणं, तिचे भविष्य ह्या सगळ्यांच्या बाबतीत वेगवेगळे बदल होत असतात. पती म्हणून तुम्ही तुमच्या बायकोसाठी सकारात्मक रित्या आश्वासक राहिले पाहिजे. ह्या टप्प्यावर तिचे भावनिक आरोग्य चांगले राहणे सुद्धा महत्वाचे आहे.

. मदतीचा हात द्या

वाढलेले वजन तसेच शारीरिक बदलांमुळे घरातील कामे करण्यास खूप कष्ट पडतात आणि होणाऱ्या आईसाठी ते खूप कठीण जाते. तिला घरकामात मदत केल्यास तिला आराम मिळेल.

. तिचे लाड करा

तुमच्या बायकोच्या पायांना मालिश करून द्या किंवा तिच्यासाठी स्पा अपॉइंटमेंट घेऊन ठेवा आणि तिचे लाड करा. बाळाच्या आगमनानंतर तुम्हाला स्वतःची काळजी घेण्यासाठी वेळ मिळणार नाही. बाळाची जबाबदारी घेण्याआधी तुम्ही तिची काळजी घेतली पाहिजे, तिचे लाड केले पाहिजेत.

. तुमच्या आर्थिक योजना तयार करा

बाळाचा जन्म आणि त्यानंतर बाळाची काळजी घेणे ह्यासाठी खूप पैसे लागतात. हॉस्पिटल बिल्स साठी आधीच तरदूद करून ठेवा. तुमच्या इन्शुरन्स कंपनी सोबत बोलून त्या प्रक्रियेविषयी जाणून घ्या गर्भधारणेचा ८वा महिना हा गर्भधारणेचा आनंद घेण्याचा आणि तो साजरा करण्यासाठी उत्तम कालावधी आहे. तुम्ही तुमच्या आनंदाच्या दिवसाच्या जितके जवळ जात तितके जास्त तुमचे शरीर वाढणाऱ्या बाळाला सामावून घेण्यासाठी बदलत असते. स्वतःचे लाड करण्यासाठी वेळ काढा कारण तुमच्या बाळाशी तुमची भेट होण्यासाठी अगदी थोडे दिवस राहिले आहेत.
Published by
मंजिरी एन्डाईत
Last Updated On

Recent Posts

All Rights Reserved