In this Article
- गर्भारपणाच्या २७व्या आठवड्यातील तुमचे बाळ
- बाळाचा आकार केवढा असतो?
- सामान्यपणे आढळणारे शारीरिक बदल
- २७व्या आठवड्यात आढळणारी गर्भारपणाची लक्षणे
- गर्भधारणेच्या २७व्या आठवड्यात पोटाचा आकार
- गर्भधारणेच्या २७व्या आठवड्यातील सोनोग्राफी
- आहार कसा असावा?
- काय काळजी घ्याल आणि त्यासाठी काही टिप्स
- कुठल्या गोष्टींची खरेदी कराल?
- निष्कर्ष
गर्भारपणाचा २७ वा आठवडा म्हणजे दुसऱ्या तिमाहीचा शेवट. आता बाळाचे डोके लेट्युस इतके मोठे झाले आहे आणि आनंदाची बातमी म्हणजे तुमची अकाली प्रसूती जरी झाली तरी बाळाच्या जगण्याची शक्यता ८५% इतकी जास्त असते आणि त्यासाठी बाळाच्या जन्मानंतर वैद्यकीय मदतीची गरज भासते.
गर्भारपणाच्या २७व्या आठवड्यातील तुमचे बाळ
गर्भारपणाच्या २७ व्या आठवड्यात बाळाचा खाली दिल्याप्रमाणे विकास होतो:
- बाळ डोळे उघडू लागते आणि पापण्यांचा विकास झालेला असतो.
- बाळ जरी गर्भजल पिशवीत असले तरी श्वसनाचा सराव करू लागेल.
- बाळाच्या शरीरात आता १५ % चरबी असेल आणि जन्मापर्यंत ती ३०% होईल.
- बाळाच्या हृदयाचे ठोके आणखी स्पष्ट होतील आणि पोटाला कान लावल्यास ऐकू येतील.
ह्या टप्प्यावर बाळाची प्रत्येक हालचाल काही सेकंदांसाठी असेल आणि तुम्हाला त्याचा आनंद घेऊन ताणविरहित राहता येईल.
बाळाचा आकार केवढा असतो?
२७ व्या आठवड्यात बाळाचा आकार ३६ सेंमी इतका असतो आणि बाळाचे वजन ८७५ ग्रॅम्स इतके असते. बाळाला रात्र आणि दिवस ह्यातला फरक कळू शकेल आणि बाळाचा मेंदू विकासाच्या अंतिम टप्पात असेल. ह्या कालावधीत तुम्हाला लक्षात येईल की बाळाच्या झोपण्याच्या वेळा नियमीत झाल्या असून हे खूप सामान्य आहे की तुमच्या आणि बाळाच्या झोपेच्या वेळा एकच असतील.
सामान्यपणे आढळणारे शारीरिक बदल
गर्भारपणाच्या तिसऱ्या तिमाहीत शारीरिक बदल प्रसूती आणि बाळाच्या जन्माच्या दृष्टीने होतात.
- श्वसनास त्रास: गर्भाशयाच्या वाढीमुळे तुमच्या छातीवर दाब पडतो आणि त्यामुळे श्वसनास त्रास होतो. (धाप लागते)
- सूज: ह्या कालावधीत, तुमचा पोटाचा घेर वाढण्याव्यतिरिक्त तुम्हाला तुमच्या पायाच्या घोट्यांमध्ये, पावलांवर आणि हातांना सूज आलेली जाणवेल. ह्या स्थितीला इंग्रजीमध्ये oedema असे म्हणतात आणि ही स्थिती शरीराच्या पाणी धारण प्रवृत्तीमुळे निर्माण होते. त्यामागे वाढलेले रक्ताभिसरण आणि गर्भाशयावरील दाब ही कारणे आहेत. जास्त प्रमाणात सूज आल्यास तुम्ही तुमच्या डॉक्टरांशी संपर्क साधा. सूज येण्यामागे preeclampsia हे सुद्धा कारण असू शकते. सूज कमी होण्यासाठी तुम्ही खूप वेळ उभे राहणे आणि एकाच जागी जास्त वेळ बसणे टाळले पाहिजे. तुम्ही योग किंवा पोहणे हे व्यायाम सुद्धा केले पाहिजेत. हे स्थिती फक्त थोड्या कालावधी साठी आहे आणि बाळाच्या जन्मानंतर ही सूज पूर्णपणे जाणार आहे.
- खाज सुटणे: तुमची त्वचा ताणली गेल्यामुळे खाज सुटेल.
- कोरडी त्वचा: तुम्ही गरम पाण्याने अंघोळ करणे टाळले पाहिजे कारण त्यामुळे तुमची त्वचा कोरडी पडण्याची शक्यता आहे.
- थकवा: तुम्हाला थकल्यासारखे वाटेल तथापि, तुम्ही झोपण्याचा प्रयत्न केल्यास तुम्हाला ते अवघड जाईल म्हणून तुम्ही झोप येण्यासाठी काही क्रिया करा.
२७व्या आठवड्यात आढळणारी गर्भारपणाची लक्षणे
२७ व्या आठवड्यात, तुमच्या बाळाची हालचाल जाणवण्याइतपत ते मोठे झालेले आहे. गर्भारपणात सामान्यपणे आढळणारी लक्षणे खालीलप्रमाणे:
- थकवा: शरीरातील बदलांमुळे तुम्हाला मानसिक आणि शारीरिक थकवा जाणवेल.
- ओटीपोटावर दाब आणि कंबरदुखी: गर्भाशयातील बाळाचे वजन वाढल्या मुले तुम्हाला ओटीपोटात टुखेल.
- योनीमार्गातून स्त्राव: योगनिमार्गातील स्त्राव वाढेल किंवा त्यामध्ये बदल होईल, म्हणजे तो पाण्यासारखा असेल किंवा रक्तमिश्रित असेल.
- खूप पोट दुखणे: तुमचे वाढलेले पोटात आता वेदना आणि घट्टपणा जाणवू शकतो.
- लघवीला वेदना आणि जळजळ होणे: पुरेसे पाणी न प्यायल्यामुळे लघवीला जळजळ आणि वेदना होतात.
- सराव कळा :(Braxton Hicks Contractions) ह्या कळा प्रसूती सुलभ व्हावी म्हणून पोटाचे स्नायू तयार करतात.
- अंधुक दिसणे आणि डोकेदुखी
- चेहरा, पायांचे घोटे, पावले यांना सूज येते आणि वजनात वाढ होते – ही सगळी लक्षणे oedema ची आहेत आणि ह्या स्थितीत शरीरात पाणी धरून ठेवले जाते.
- हृदयाच्या ठोके वेगाने पडणे आणि चक्कर येणे – रक्तामध्ये वाढ होते, आणि त्यामुळे हृदयावर ताण येतो आणि त्यामुळे चक्कर येते आणि ठोके वेगाने पडू लागतात.
- श्वसनास त्रास आणि खोकल्यातून रक्त पडणे: कमी जागेमुळे फुप्फुसांवर ताण आल्यामुळे आणि ऑक्सिजनची जास्त गरज भासल्यामुळे श्वसनास त्रास होऊ शकतो.
- बद्धकोष्ठता आणि जुलाब: पचनसंस्थेतील अवयवांवर ताण आल्यामुळे पचनसंस्थेची कार्यक्षमता कमी होते.
- शरीरास खाज सुटणे: त्वचा ताणली गेल्यामुळे असे होते.
- पायांमध्ये पेटके येतात: गर्भाशयाच्या वाढलेल्या वजनामुळे रक्ताभिसरणात अडथळा येतो आणि त्यामुळे पायांमध्ये पेटके येतात.
गर्भधारणेच्या २७व्या आठवड्यात पोटाचा आकार
ह्या कालावधीत ६-१२ किलो वजन वाढणे ठीक आहे, परंतु जर तुमचे वजन अचानक खूप वाढले असेल तर थोडे लक्ष दिले पाहिजे. तुम्हाला हे माहित असायला हवे की दिवसाला ३००-५०० इतक्या कॅलरीजची गरज असते.
आता बाळाची बऱ्यापैकी वाढ झाल्यामुळे गर्भारपणाच्या २७व्या आठवड्यात तुम्ही बाळाचे पाय मारणे आणि उचक्या देणे अनुभवू शकता.
गर्भधारणेच्या २७व्या आठवड्यातील सोनोग्राफी
जर तुमच्या गर्भारपणात काही गुंतागुंत नसेल तर तुम्हाला २७व्या आठवड्यात सोनोग्राफी करण्याची गरज नाही.
तुमच्या बाळाने आता श्वास घेण्यास केली आहे आणि बाळाचा मेंदू सुद्धा आता कार्यरत आहे.
आहार कसा असावा?
तुम्ही पोषक आहार घेणे सुरु ठेवले पाहिजे आणि बाळाला योग्य पोषण मिळते आहे ना ह्याची खात्री करून घेतली पाहिजे. २७व्या आठड्यात तुमच्यासाठी कुठले अन्नपदार्थ चांगले आहेत ते इथे दिले आहेत.
- तुम्ही दररोज १२ ग्लास द्रवपदार्थ घेतले पाहिजे, त्यामुळे मूत्रमार्गाचा संसर्ग होण्यापासून बचाव होईल आणि गर्भधारणेदरम्यान सामन्यपणे आढळणाऱ्या बद्धकोष्ठतेपासून सुटका होईल.
- दुग्धजन्य पदार्थ, हिरव्या पालेभाज्या, डाळी, तीळ, बदाम, अक्रोड, अंजीर हे कॅल्शिअम आणि प्रथिनांचे उत्तम स्रोत आहेत. बाळाच्या दातांच्या आणि हाडांच्या विकासासाठी कॅल्शिअम आणि प्रथिने जरुरीचे आहे.
काय काळजी घ्याल आणि त्यासाठी काही टिप्स
इथे काही टिप्स दिल्या आहेत ज्यांच्या मदतीने तुम्हाला ह्या काळात स्वतःची काळजी घेण्यास मदत होईल.
हे करा
- निरोगी राहा: गरोदरपणात तुम्ही तुमचे आरोग्य चांगले राखले पाहिजे, ह्याकरिता भरपूर पोषण मूल्ये असलेला आहार तुम्ही घेतला पाहिजे.
- तुमच्या आहारावर लक्ष ठेवा: बाळाची वाढ आणि विकास योग्य व्हावा म्हणून पोषक आहार घ्या.
- स्वच्छता: स्वतःची तसेच आपल्या आजूबाजूच्या परिसराची स्वछता राखणे हे संसर्ग टाळण्यासाठी अतिशय महत्वाचे आहे
- व्यायाम: गर्भारपणाच्या ह्या कालावधीत योग्य ठरतील असे व्यायाम केले पाहिजेत. त्यामुळे तुमचे वजन नियंत्रित राहण्यास मदत होईल तसेच तुमचा आत्मविश्वास सुद्धा वाढेल, तसेच तुम्हाला गर्भारपणात होणारा त्रास सुद्धा कमी होईल. (जसे की बद्धकोष्ठता, पाठदुखी). व्यायामामुळे प्रसूती सुद्धा सुलभ होते. तथापि व्यायाम करण्याआधी तुम्ही तुमच्या डॉक्टरांशी संपर्क साधला पाहिजे आणि ते प्रमाणित प्रशिक्षकाच्या देखरेखीखाली केले पाहिजेत.
- ताणविरहित राहा: तुम्ही ताण आणि चिंता ह्यापासून दूर राहिले पाहिजे कारण त्यामुळे तुमच्या शरीरावर त्याचा विपरीत परिणाम होतो.
हे करू नका
- जास्त साखर आणि मीठ खाणे टाळा: खूप जास्त प्रमाणात साखर खाल्ल्यास गर्भारपणत मधुमेह होऊ शकतो.
- कॅफेन टाळा: कॅफेनमुळे निर्जलीकरण (dehyadration ) होते, त्यामुळे तुम्ही ते टाळले पाहिजे आणि त्याऐवजी ग्रीन टी सारखा आरोग्यपूर्ण पर्याय निवडला पाहिजे कारण ग्रीन टी मध्ये अँटिऑक्सिडंट्स असतात.
- घाई आणि धावपळ टाळा: तुमची रोजची कामे जरा धावपळ न करता कमी वेगाने करा. तुमचे वाढते वजन आणि पोटातील बाळामुळे तुम्ही अस्थिर व्हाल आणि त्यामुळे पडण्याची आणि इजा होण्याची शक्यता वाढते.
कुठल्या गोष्टींची खरेदी कराल?
तुम्ही तुमच्या गर्भारपणाच्या अगदी शेवटच्या टप्प्यामध्ये आहेत त्यामुळे तुम्ही तुम्हाला लागणाऱ्या गोष्टींची खरेदी केली पाहिजे.
- बाळासाठी फर्निचर ची खरेदी करण्यास सुरुवात करा.
- तुम्हाला हॉस्पिटल मध्ये आणि घरी लागणाऱ्या गोष्टींची खरेदी करण्यास सुरुवात करा जसे की नर्सिग ब्रा ,झोपताना घालण्यासाठी कपडे, बाळासाठी कपडे, कार सीट, डायपर्स आणि वाईप्स इत्यादी.
जरी आता हे महत्वाचे नसले तरी बाळाच्या जन्मानंतर जन्मनियंत्रणाचा सुद्धा विचार तुम्ही करून ठेवला पाहिजे. हा निर्णय सुद्धा तुम्ही बाळाच्या जन्मधी घेऊन ठेवला पाहिजे.
निष्कर्ष
२७ वा आठवडा हा तुमच्यासाठी आणि बाळासाठी महत्वाचा आहे कारण ही गर्भारपणाच्या शेवटच्या टप्प्याची तयारी आहे. तुमच्यासाठी तसेच आजीआजोबांसाठी बाळाच्या आगमनाची जवळ येणारी तारीख हा खूप आनंद घेऊन येणारा आणि रोमांचकारी अनुभव असतो. हा बाळाच्या जन्माचा आनंद तुम्ही लुटा आणि त्यामार्गावरील अस्वस्थता हाताळण्यासाठी तयारीत राहा.
मागील आठवडा: गर्भधारणा: २६वा आठवडा
पुढील आठवडा:गर्भधारणा: २८वा आठवडा