Firstcry Parenting
Search
Parenting Firstcry
Home गर्भारपण प्रसुतीपूर्व काळजी गरोदरपणात वेदनादायक फोडांवर कसे उपचार करावेत?

गरोदरपणात वेदनादायक फोडांवर कसे उपचार करावेत?

गरोदरपणात वेदनादायक फोडांवर कसे उपचार करावेत?

तुमच्या शरीरात बरेच बदल होतात. कधी कधी हे बदल म्हणजे मॉर्निंग सिकनेस आणि पाठदुखी यांसारख्या सामान्य गोष्टी असतात. तर कधी कधी शरीरावर फोड येण्याच्या स्वरूपात देखील हे फोड दिसू शकतात.  होय,  त्वचेवर वेदनादायक, लाल, सुजलेले फोड आल्यामुळे खूप अस्वस्थता येऊ शकते. विशेषतः जर हे फोड गरोदरपणात आले तर ही अस्वस्थता फार वाढते. गरोदरपणात सुरुवातीच्या काळात संप्रेरकांचे असंतुलन अनेक कारणांमुळे होते. गरोदरपणात हे फोड येणे सामान्य असले आणि त्यापासून कुठलाही धोका नसला तरीसुद्धा गरोदरपणात बाळ सुरक्षित राहील ना हा विचार मनात सतत येत असतो. गरोदरपणात हे फोड पोटातल्या न जन्मलेल्या बाळावर परिणाम करू शकतात का? हा प्रश्न जर तुम्हाला पडत असेल तर गरोदरपणात फोड येण्याची कारणे, चिन्हे आणि उपचार ह्या बद्दल अधिक जाणून घेऊया.

फोडांविषयी माहिती?

त्वचेखाली येणारे हे लाल, सुजलेले आणि वेदनादायक फोड असतात. हे फोड परजीवी जिवाणूंमुळे आणि त्वचेच्या संसर्गामुळे होतात. हे जीवाणू केसांचे कूप किंवा घामाच्या ग्रंथींद्वारे त्वचेमध्ये प्रवेश करतात आणि त्यामुळे पू होतो. तसेच ह्या फोडांमुळे खूप अस्वस्थता येते. परंतु, हे फोड फक्त काही आठवडे टिकतात आणि स्वच्छता राखून टाळले जाऊ शकतात.

फोडांचे प्रकार कोणते आहेत?

गरोदरपणात असणाऱ्या फोडांच्या सर्वात सामान्य प्रकारांमध्ये पुढील गोष्टींचा समावेश होतो-

1. पायलोनिडल सिस्ट

पायलोनिडल सिस्ट हा एक प्रकारचा गळू आहे आणि तो नितंबाच्या खालच्या बाजूस येतो. जर तुम्हाला पायलोनिडल सिस्टचा त्रास होत असेल तर वैद्यकीय मदत घेणे गरजेचे असते.

2. गळू

गळू येण्याआधी लाल फोड येतो. पू तयार झाला की त्याचे गळू होते. गळू स्टॅफिलोकोकल संसर्गामुळे होतो. कार्बंकल्समुळे काळे डाग पडू शकतात. फुरुंकल्स आणि कार्बंकल्स हे गळूचे दोन्ही प्रकार चेहरा, मान, बगल, मांड्या आणि नितंबांवर होऊ शकतात.

3. हायड्राडेनाइटिस सपूराटिवा

हायड्राडेनाइटिस सपूराटिवा (एचएस) खूप दुर्मिळ आहे. बगलांकडील भाग, स्तनांचा खालचा भाग आणि मांड्या ह्यावर त्याचा परिणाम होतो. ही एक दुर्मिळ स्थिती आहे आणि कधीही गंभीर बनू शकते. ह्यामुळे गरोदरपणात समस्या निर्माण होऊ शकतात आणि त्यासाठी शस्त्रक्रियेची आवश्यकता भासू शकते.

4. पुरळ

जेव्हा हानिकारक जीवाणू त्वचेत खोलवर जातात तेव्हा ते सिस्टिक ऍक्ने मध्ये रूपांतरित होतात. हे पुरळ लाल, मऊ असतात आणि त्यामध्ये पू भरलेला असू शकतो. जर हे गळू फुटून पू बाहेर पडत असेल, तर त्यामुळे जास्त फोड येऊ शकतात. अशा प्रकारचे पुरळ सामान्यतः चेहरा, छाती, पाठ, हाताचा वरचा भाग आणि खांद्यावर दिसतात.

5. बार्थोलिन सिस्ट

बार्थोलिनचे सिस्ट हे सर्वात प्रचलित गळूंपैकी एक आहे आणि ते स्त्रियांना त्यांच्या व्हल्व्हावर येतात. योनीमार्गाच्या प्रत्येक बाजूला असलेल्या बार्थोलिन ग्रंथी योनीला वंगण घालण्यात महत्त्वाची भूमिका बजावतात. परंतु ह्या ग्रंथींना संसर्ग झाल्यास, त्यामुळे बार्थोलिनचे गळू तयार होऊ शकतात. सामान्यतः हे  गळू लहान आणि वेदनारहित फोड असतात, परंतु संसर्ग झाल्यास त्यांना सूज येऊन अस्वस्थता येऊ शकते. तुम्हाला बार्थोलिन सिस्टचा संसर्ग झाल्याची शंका असल्यास, शक्य तितक्या लवकर तुमच्या डॉक्टरांचा सल्ला घ्या.

गरोदरपणात फोड येण्याची कारणे काय आहेत?

जेव्हा स्त्रियांना गरोदरपणात फोड येतात, तेव्हा त्यांच्यापैकी अनेक जणांना गरोदरपणात मला फोड का येत आहेत असा प्रश्न पडतो.

गरोदरपणात फोड येण्याच्या सामान्य कारणांमध्ये खालील गोष्टींचा समावेश होतो

  • घाम ग्रंथींच्या तेल नलिका अवरोधित होतात
  • जिवाणू संसर्ग
  • वाढलेले केस
  • त्वचेमध्ये बाहेरील वस्तू किंवा स्प्लिंटर अडकणे

गरोदरपणात फोड येण्याची शक्यता वाढवणारे घटक खाली नमूद केले आहेत –

  • लठ्ठपणा
  • एक कमकुवत रोगप्रतिकार प्रणाली
  • स्वच्छतेचा अभाव आणि आहार
  • मधुमेह
  • इसब
  • कठोर रसायनांचा संपर्क
  • हार्मोनल असंतुलन

लवकर किंवा उशीरा गर्भधारणेमुळे फोड येऊ शकत नाहीत. चार प्रमुख कारणांमुळे फोड येतात –  स्वच्छता नीट न राखणे, आरोग्यास पौष्टिक असे अन्न सेवन न करणे, हार्मोनल असंतुलन आणि कमी रोगप्रतिकारक शक्ती.

गर्भधारणेदरम्यान उकळणे

फोडांचे निदान कसे केले जाते?

फोडांचे निदान खालील प्रकारे केले जाते:

  • शारीरिक चाचणी
  • जिवाणू संवर्धन (ही अशी प्रक्रिया आहे ज्यामध्ये पू गोळा केला जातो आणि तो कोणते जीवाणू संसर्गास कारणीभूत आहेत हे ओळखण्यासाठी प्रयोगशाळेत पाठवले जातो
  • लक्षणांचे मूल्यांकन आणि तुमचा वैद्यकीय इतिहास

गरोदरपणात फोडांवर उपचार

फोडांवर उपचार करण्याचे काही मार्ग येथे आहेत:

  • फक्त तुमच्या डॉक्टरांनी लिहून दिलेली अँटीबायोटिक्स घेणे
  • सर्जिकल उपचार
  • विषारी द्रव्य काढून टाकणारा आहार घेणे
  • घरगुती उपचार जसे की उबदार कॉम्प्रेस
  • घाम येऊ शकेल असे क्रियाकलाप टाळणे
  • कोणत्याही जखमा किंवा कट ड्रेसिंगने झाकणे
  • ह्या लाल फोडांमध्ये जिवाणूंची वाढ होऊ नये म्हणून अँटीबॅक्टेरिअल साबणाने क्षेत्र स्वच्छ करा
  • डॉक्टरांनी सांगितल्यानुसार वेदना कमी करणारी औषधे घ्या.

फोडांमुळे बाळाच्या आरोग्यास धोका निर्माण होतो का?

फोडांमुळे गर्भाची विकृती किंवा गर्भपात होत नाही. परंतु, तुम्ही फोडांसाठी प्रतिजैविक घेतल्यास, ते गर्भासाठी सुरक्षित आहेत आणि त्यामुळे कोणतेही नुकसान होणार नाही याची खात्री करणे आवश्यक आहे.

प्रतिबंधात्मक टिप्स

तुम्हाला माहिती आहेच की, उपायांपेक्षा प्रतिबंध करणे चांगले आहे. फोड आल्यावर ते हाताळण्यापेक्षा त्यांना रोखणे चांगले असते. जर तुम्ही गरोदर असाल आणि तुमच्या गरोदरपणाच्या सुरुवातीच्या टप्प्यात असाल, तर या टिप्स फॉलो करा जेणेकरुन तुम्हाला आधी फोड येऊ नयेत –

  • घट्ट कपडे घालणे टाळा
  • स्वच्छता राखा
  • किरकोळ जखमांवर त्वरित उपचार करा
  • जर तुम्हाला मधुमेह किंवा एक्जिमाचा त्रास असेल तर वैद्यकीय मदत घ्या
  • शरीरावर जिवाणूंची पैदास होण्यापासून रोखण्यासाठी दररोज आंघोळ करा
  • आपले शरीर आणि चेहरा पुसण्यासाठी स्वच्छ कपडे आणि टॉवेल वापरा
  • आठवड्यातून एकदा उच्च तापमानात स्वच्छ बेडशीट आणि बेडिंग धुवून वापरा

गरोदरपणात फोड येत असताना टाळण्याच्या गोष्टी

गरोदरपणात फोड येत असतील तर इथे काही गोष्टी आहेत ज्याची तुम्ही काळजी घेतली पाहिजे:

  • सर्वात आधी, फोड फोडू नका किंवा किंवा पिळून काढू नका
  • तुमच्या वैयक्तिक वस्तू जसे की लिपस्टिक किंवा टॉवेल इतर कोणाशीही शेअर करू नका, कारण त्यामुळे संसर्ग पसरण्याची शक्यता आहे
  • पोहायला जाऊ नका कारण यामुळे संसर्ग देखील पसरू शकतो

तुम्ही डॉक्टरांचा सल्ला केव्हा घेणे गरजेचे आहे?

फोडांवर कोणताही उपचार करण्यापूर्वी, डॉक्टरांचा सल्ला घेणे आवश्यक आहे. परंतु, तुम्ही खालील केसेस मध्ये आपल्या डॉक्टरांशी देखील बोलले पाहिजे –

  • फोड मोठा होऊन वेदना असह्य झाल्यास
  • ताप आल्यास
  • जर फोड दोन महिन्यांत सुकला नाही तर
  • जर तुम्हाला जांघेकडील भागात किंवा चेहऱ्यावर फोड आले तर
  • जर तुम्ही मधुमेही असाल तर
  • जर तुम्हाला तुमच्या मणक्याच्या किंवा गुदद्वाराच्या भागात फोड आले असतील
  • जर फोडाभोवती गाठ निर्माण झाल्यास

गरोदरपणात फोडांमुळे कोणतीही मोठी गुंतागुंत होत नाही. परंतु,  जर 2-3 आठवड्यांच्या आत फोडे सुकले नाहीत तर तुम्ही लवकरात लवकर वैद्यकीय मदत घ्या.

आणखी वाचा:

RELATED ARTICLES
MORE FROM AUTHOR
संपादकांची पसंती
Please Wait Updating Your Article