Firstcry Parenting
Search
Parenting Firstcry
Home गर्भधारणा होताना प्रजननक्षमता गर्भधारणा होण्यासाठी तुम्हाला मदत करू शकतील अशी 9 प्रजनन पूरक औषधे

गर्भधारणा होण्यासाठी तुम्हाला मदत करू शकतील अशी 9 प्रजनन पूरक औषधे

गर्भधारणा होण्यासाठी तुम्हाला मदत करू शकतील अशी 9 प्रजनन पूरक औषधे

गर्भधारणा होणे वाटते तितके सोपे नाही. काही स्त्रिया पहिल्याच प्रयत्नात गर्भवती होऊ शकतात, परंतु काहींना गोड बातमीसाठी काही वर्षे लागू शकतात. आपल्या जीवनशैलीमुळे सहज आणि नैसर्गिकरित्या गर्भधारणा होणे अधिक आव्हानात्मक झाले आहे. वंध्यत्व ही एक सामान्य समस्या आहे आणि त्यावर उपचार करणे कठीण आहे. काही वैद्यकीय प्रक्रिया लोकांना बाळ होण्यास मदत करू शकतात, परंतु बहुतेक जोडपी नैसर्गिक पद्धतीने गर्भधारणा होण्यास प्राधान्य देतात. जर तुम्हाला लवकर गरोदर व्हायचे असेल तर तुम्ही प्रजनन पूरक आहार घेण्याचा विचार करावा. प्रजनन पूरक आहार घेतल्याने स्त्रीचे आरोग्य चांगले राहते आणि तिच्या प्रजनन व्यवस्थेची ताकद वाढू शकते. जर तुम्हाला फर्टिलिटी सप्लिमेंट्स घ्यायची असतील तर तुम्हाला त्याबद्दल योग्य माहिती असायला हवी.

प्रजनन पूरक औषधे (फर्टिलिटी सप्लिमेंट्स) म्हणजे काय?

प्रजनन पूरक औषधे ही विशिष्ट औषधी उत्पादने किंवा पदार्थ आहेत. त्यांचे सेवन केल्यावर, पुरुष आणि स्त्रियांमध्ये प्रजनन क्षमता वाढण्यास मदत होते. ह्या उत्पादनांमध्ये सामान्यतः खनिजे, औषधी वनस्पती, जीवनसत्त्वे किंवा इतर अमीनो ऍसिड असतात. आणि त्यांचा प्रजनन प्रणालीवर परिणाम होतो. ही औषधे इतर औषधोपचारांपासून वेगळी आहेत कारण या सप्लिमेंट्समधील सर्व घटक नैसर्गिक आहेत आणि त्यांना डॉक्टरांच्या प्रिस्क्रिप्शनची आवश्यकता नसते. ह्यापैकी काही औषधे सामान्यतः पौष्टिक पूरक घटक म्हणून वापरली जातात तर इतर काही औषधांमध्ये व्यक्तीची प्रजननक्षमता वाढवण्यासाठी डिझाइन केलेले सूत्र असते. प्रजनन पूरक औषधे केवळ स्त्रियांसाठीच नाहीत तर पुरुषांसाठीही उपलब्ध आहेत. पुरुषांनी फर्टिलिटी सप्लिमेंट्स घेतल्यास शुक्राणूंचे आरोग्य आणि गतिशीलता सुधारण्यास मदत होते, आणि त्यामुळे गर्भाधान होऊन ते अंड्यापर्यंत पोहोचण्याची शक्यता वाढते.

प्रजनन क्षमता वाढवण्यासाठी पूरक आहार घेणे सुरक्षित आहे का?

पुरुष आणि स्त्रिया दोघांसाठीही अनेक ओव्हर-द-काउंटर हर्बल फर्टिलिटी सप्लिमेंट्स उपलब्ध असल्याने, ही सप्लिमेंट्स प्रभावी आहेत की नाही याबद्दल प्रश्न उपस्थित होणे सामान्य आहे. ही सप्लिमेंट्स नैसर्गिक उत्पादने वापरून तयार केली जात असल्याने आणि त्यांना प्रिस्क्रिप्शनची आवश्यकता नसते त्यामुळे लोकांना ती सुरक्षित आहेत असे वाटते. परंतु दुर्दैवाने, तसे होत नाही.

कोणत्याही बाह्य पदार्थांप्रमाणे शरीराच्या जैविक प्रक्रियांशी, ह्या पूरक घटकांची सुद्धा रिऍक्शन होते आणि परिणामी दुष्परिणाम होऊ शकतात. त्यामुळे ऍलर्जिक प्रतिक्रिया सुद्धा वाढतात आणि ह्या पूरक औषधांच्या घटकांची चालू असलेल्या औषधांशी वेगळ्या पद्धतीने रिऍक्शन होऊ शकते.

जरी ह्या पूरक औषधांमध्ये तुमच्या आरोग्यासाठी आवश्यक असलेली पोषक तत्व असली तरी सुद्धा, तुम्ही ही औषधे जास्त प्रमाणात घेतली तर त्याचा तुमच्या आरोग्यावर नकारात्मक परिणाम होऊ शकतो. विशिष्ट जीवनसत्त्वे किंवा खनिजांची पातळी सामान्यापेक्षा जास्त वाढवणे देखील शरीरासाठी हानिकारक असू शकते. काही वेळा, एकापेक्षा जास्त सप्लिमेंट्स घेतल्याने त्यांच्यामध्ये बंध निर्माण होऊन शरीराला हानी पोहोचवणारी रसायने तयार होतात.

प्रजनन पूरक औषधांमध्ये कोणते घटक आढळतात?

प्रजनन पूरक औषधांमध्ये वेगवेगळ्या घटकांचे मिश्रण असते. सामान्यतः प्रजनन पूरक आहारांमध्ये अनेक घटक आढळतात, त्यांचे वर्णन खाली केलेले आहे.

1. एन-एसिटाइल सिस्टीन

एन-एसिटाइल सिस्टीन

याला एनएसी किंवा एनऍसीटील-एल सिस्टीन ​​असेही संबोधले जाते, हा घटक प्रत्यक्षात एल सिस्टीन स्ट्रेनमधील नेहमीच्या अमीनो आम्लाचा एक प्रकार आहे. तो विविध प्रजनन पूरक आहारांचा भाग बनतो. ह्यामागचे महत्त्वाचे कारण म्हणजे एनएसी अँटिऑक्सिडंट म्हणून कार्य करते. शरीराच्या अंतर्गत प्रणालींना योग्य प्रकारे कार्यरत ठेवण्यासाठी, पेशी लवकर नष्ट होऊ नयेत ह्यासाठी आणि इन्सुलिनबद्दल संवेदनशीलता निर्माण करण्यात ते महत्त्वपूर्ण भूमिका बजावते. विशेषतः ज्यांना पीसीओएस आहे अश्या स्त्रियांमध्ये एनएसी, ओव्हुलेशन सायकलमध्ये लक्षणीय सुधारणा करू शकते, .

2. मायोइनोसिटॉल

मायो-इनोसिटॉल हा घटक नैसर्गिकरित्या मानवी शरीरात देखील आढळतो. हा घटक फळे, बीन्स, कॉर्न इत्यादी विविध खाद्यपदार्थांमध्ये देखील असतो. शरीरात इन्सुलिनची पातळी नियंत्रित करण्यासाठी आणि शरीर निरोगी राहण्यासाठी शरीरात इनॉसिटॉल तयार होते. इन्सुलिनचा प्रतिकार ही शरीराच्या इन्सुलिनला प्रतिसाद देण्याच्या क्षमतेची समस्या आहे. पीसीओएस असलेल्या स्त्रियांमध्ये प्रजनन क्षमता कमी होण्याचे एक कारण म्हणजे इन्सुलिन प्रतिरोध हे आहे. इनॉसिटॉलच्या सेवनाने अशा महिलांची प्रजनन क्षमता सुधारण्यास मदत होते. मायोइनोसिटॉल हे स्त्रीमध्ये मासिक पाळी सुव्यवस्थित आणि नियमित करतेआणि शेवटी ओव्हुलेशन पॅटर्न सामान्य करते.

3. डिहाइड्रोएपियान्ड्रोस्टेरॉन

हे नाव उच्चारायला थोडे कठीण वाटू शकते आणि कदाचित म्हणूनच डीएचइए असा त्याचा शॉर्ट फॉर्म केलेला आहे. हे संप्रेरक मानवी शरीराद्वारे तयार केले जाते आणि त्याचा स्त्राव अधिवृक्क ग्रंथींद्वारे केला जातो. महिलांसाठी डीएचइए च्या परिणामकारकतेवर विरोधी मते आहेत. कारण जेव्हा एखाद्या स्त्रीमध्ये हे जास्त होते तेव्हा फायद्यापेक्षा नुकसानच जास्त होते. अतिरिक्त डीएचइए सप्लिमेंटेशनमुळे चेहऱ्यावरील केसांची वाढ होणे, मासिक पाळीत व्यत्यय येणे, इत्यादीसारखे दुष्परिणाम होऊ शकतात. परंतु, ज्या स्त्रियांमध्ये  कमी आहेत त्यांच्यासाठी, विशेषत: आयव्हीएफ साठी जाताना डीएचइए सप्लिमेंटेशन खूप फायदेशीर आहे, .

4. कोएन्झाइम Q10

हे CoQ10 म्हणूनही ओळखले जाते. हे एक एन्झाइम आहे आणि त्यामुळे प्रजनन क्षमता वाढू शकते. परंतु त्याचा मानवांवर होणाऱ्या परिणामांचा कोणताही विशिष्ट अभ्यास किंवा संशोधन झालेले दिसत नाही. तरीसुद्धा, प्राण्यांवर चाचण्या घेण्यात आल्या आहेत आणि CoQ10 मुळे त्या प्राण्यांच्या अंड्यांचा दर्जा सुधारला आहे. CoQ10 पुरुषांमधील शुक्राणूंची संख्या देखील सुधारते. शुक्राणू चांगल्या आकाराचे असतात आणि त्यांची गतिशीलताही जास्त असते.

5. विटेक्स ऍग्नस-कास्टस

विटेक्स ऍग्नस-कास्टस

एक लोकप्रिय हर्बल सप्लिमेंट  आहे. विटेक्स ऍग्नस-कास्टस ह्यास सामान्य माणसाच्या भाषेत चेस्टबेरी असे संबोधले जाते. विटेक्स हे एक सुप्रसिद्ध प्रजनन पूरक आहे आणि ते महिलांचे पुनरुत्पादक आरोग्य सुधारते. मासिक पाळीच्या प्रारंभी अनुभवल्या जाणार्‍या सामान्य अस्वस्थतेपासून आराम देण्यासाठी हे ज्ञात आहे. हे मासिक पाळी सुरळीत करते, त्यामुळे ओव्हुलेशन सुधारते आणि गर्भधारणेची शक्यता वाढते.

6. अमीनो ऍसिडस्

मानवी शरीराचे कार्य योग्य रित्या होण्यासाठी आणि निरोगी राहण्यासाठी आवश्यक असलेल्या मुख्य घटकांपैकी एक म्हणजे अमीनो ऍसिड होय. यापैकी बहुतेक ऍसिड शरीरातच तयार होतात, तर काही इतर ऍसिड्स बाह्य स्त्रोतांकडून मिळतात. त्या संदर्भात दोन आवश्यक अमिनो ऍसिड्स म्हणजे एल-कार्निटाइन आणि एल-आर्जिनाइन होय. हे दोन्ही अमिनो ऍसिडस् पुरुष आणि स्त्रिया दोघांमध्ये निरोगी प्रजनन प्रणालीला समर्थन देण्यासाठी आवश्यक आहेत. पुरुषांमध्ये एल-कार्निटाइनमुळे शुक्राणूंची गतिशीलता वाढते आणि त्यांचा आकार सुधारतो. दुसरीकडे, एल-आर्जिनिन, अंडाशयाजवळील भागात आणि गर्भाशयात रक्त प्रवाह वाढवते. परंतु, काहीवेळा, खूप जास्त एल-आर्जिनिन असल्यास ते आयव्हीएफ दरम्यान भ्रूण किंवा अंडी यशस्वीरित्या पुनर्प्राप्त करण्यात अडथळा आणू शकतात.

7. अँटिऑक्सिडंट्स

प्रजनन पूरक औषधांमध्ये अँटिऑक्सिडंट्स असतातच. जर अमीनो ऍसिड मानवी शरीराचे बिल्डिंग ब्लॉक्स असतील, तर अँटिऑक्सिडंट हे देखभाल करणारे कर्मचारी आहेत. बहुतेक पूरक औषधांमध्ये व्हिटॅमिन सी चा प्रमुख अँटिऑक्सिडंट म्हणून समावेश होतो, तर काही औषधांमध्ये सामान्यतः मेलाटोनिन, ग्रीन टी किंवा युबिक्विनॉल असते. युबिक्विनॉल शुक्राणूंची गतिशीलता वाढवते. ते पुरुषांमधील शुक्राणूंच्या आकारावर आणि स्त्रियांच्या अंड्यांवर देखील परिणाम करते. ते दोन्ही मिळून प्रजनन क्षमता वाढवण्याचे काम करतात

8. जीवनसत्त्वे

जीवनसत्त्वे आपल्या शरीरासाठी आवश्यक आहेत; म्हणून, सर्व पूरक औषधांमध्ये जीवनसत्त्वे असतात. बी-कॉम्प्लेक्स पासून ते व्हिटॅमिन सी आणि ई पर्यंतची असंख्य जीवनसत्त्वे आणि फोलेट, झिंक, मॅग्नेशियम इत्यादी खनिजे केवळ प्रजननासाठीच नव्हे तर गर्भाच्या विकासासाठीही आवश्यक आहेत.

तुम्हाला गर्भधारणा होण्यासाठी मदत करू शकतात अशी प्रजनन पूरक औषधे

तुम्ही गर्भधारणेसाठी प्रयत्न करत असताना नैसर्गिक प्रजनन पूरकआहार घेतल्यास गर्भधारणा होण्याची शक्यता वाढू शकते. तसेच त्यामुळे स्त्री आणि पुरुषांमधील पुनरुत्पादक प्रणाली ठीक होण्यासाठी सुद्धा मदत होऊ शकते.

1. एल-कार्निटाइन

एल-कार्निटाइन

हे प्रजनन प्रणालीच्या वाढीस समर्थन देणारे एक आवश्यक अमीनो ऍसिड आहे. एल-कार्निटाइन हे पुरुषांसाठी आवश्यक असा पूरक घटक आहे.

2. एल-आर्जिनिन

एल-आर्जिनिन, हे आणखी एक अमिनो आम्ल आहे. आणि ते  सहसा एल- केराटिनिन सोबत जोडले जाते. ते विविध खाद्यपदार्थांमध्ये असते. परंतु ते शुक्राणूंमध्ये लक्षणीय प्रमाणात आढळते. एल-आर्जिनिन हे शुक्राणूंची ताकद वाढवण्यासाठी तसेच त्यांची संख्या वाढवण्यासाठी एक प्रमुख पूरक घटक आहे. परंतु हर्पिस किंवा कोल्ड सोर्स ह्यासारखे एसटीडी असलेल्यांनी एल-आर्जिनिन घेणे टाळावे. ह्या अमीनो ऍसिडमुळे विषाणू पुन्हा सक्रिय होऊन असे रोग वाढू शकतात.

3. बीटा-कॅरोटीन

बीटा-कॅरोटीन विविध भाज्यांमध्ये मोठ्या प्रमाणावर असते आणि ते नंतर शक्तिशाली व्हिटॅमिन ए मध्ये विकसित होते. गरोदरपणात बीटा-कॅरोटीनचे सेवन करणे चांगले असते, परंतु तो एक प्रजनन पूरक घटक म्हणून देखील वापरला जातो. बीटा-कॅरोटीनचे अँटिऑक्सिडंट गुणधर्म शरीरातील कोणत्याही मुक्त रॅडिकल्सची काळजी घेऊन शुक्राणू तसेच अंड्याचे आरोग्य राखण्यास मदत करतात आणि तयार होणार्‍या डीएनएचे नुकसान टाळले जाते. सहसा, मल्टीविटामिन सप्लिमेंट्समध्ये बीटा-कॅरोटीन चांगल्या प्रमाणात असते.

4. व्हिटॅमिन सी

व्हिटॅमिन सी हे नैसर्गिक अँटिऑक्सिडेंट तर आहेच परंतु, त्यामुळे शुक्राणूंमध्ये असलेल्या डीएनए ची गुणवत्ता आणि आकार सुधारते. आणि त्याचे संपूर्ण संरक्षण करते. विविध विकार असलेल्या गर्भाची निर्मिती टाळण्यासाठी तसेच गर्भपात होऊ नये म्हणून, शुक्राणूमधील डीएनए अत्यंत महत्वाचा आहे. शिवाय, व्हिटॅमिन सी शुक्राणूंना एकत्र बांधण्याऐवजी पसरण्यास प्रोत्साहित करते. त्यामुळे ते अंड्याकडे वेगाने पोहोचतात.

5. व्हिटॅमिन ई

व्हिटॅमिन ई हे आणखी एक अँटिऑक्सिडंट आहे आणि ते पुरुष आणि स्त्रिया दोघांमध्ये प्रजनन क्षमता वाढवण्यात महत्त्वाची भूमिका बजावते. आयव्हीएफ उपचार घेत असलेल्या जोडप्यांसाठी हे खूप महत्वाचे आहे. व्हिटॅमिन ईचे सेवन केल्याने गर्भधारणेची शक्यता सुमारे 10% वाढू शकते.

6. ओमेगा -3 ऍसिडस्

ओमेगा-३ फॅटी ऍसिडस् सप्लिमेंट्स महत्त्वपूर्ण आहेत कारण त्यामुळे गर्भाशयातील रक्तप्रवाह वाढतो तसेच ते ओवॅरियन फोलिकल्सना अंडी सोडण्यास मदत करतात. ओमेगा-3 फॅटी ऍसिडस् गर्भधारणेमध्ये अडथळा निर्माण करणारा  दाह कमी करतात. तसेच ते वीर्याला आवश्यक फॅटी ऍसिडस् पुरवतात त्यामुळे प्रजनन क्षमता सुधारण्यास मदत होते. ओमेगा-३ फॅटी ऍसिडमुळे प्रोस्टॅग्लॅंडिन पातळी सुधारते आणि शुक्राणूंचे आरोग्य देखील वाढते.

7. सेलेनियम

पुरुषांमध्ये, सेलेनियम अत्यंत महत्वाचे आहे. सेलेनियम पातळी योग्य असल्यास शुक्राणूंची संख्या वाढते. स्त्रियांमध्ये, गर्भपात किंवा इतर कोणत्याही दोषांपासून नवजात गर्भाचे संरक्षण करण्यासाठी सेलेनियम महत्त्वपूर्ण भूमिका बजावते. सेलेनियममधील अँटिऑक्सिडंट गुणधर्म गुणसूत्रांची रचना नीट ठेवतात.

8. फॉलिक ऍसिड

गर्भधारणेपूर्वी तसेच संपूर्ण गरोदरपणात फॉलिक ऍसिड घेण्यास सांगितले जाते. कारण त्यामुळे गर्भाचे आरोग्य सुधारते. फॉलिक ऍसिड मुळे चांगले डीएनए आणि आरएनए ची निर्मिती होते तसेच बाळाच्या आनुवंशिक कोडचे संरक्षण देखीलहोते. बी-कॉम्प्लेक्स जीवनसत्वांसोबत फॉलिक ऍसिड घेणे ही एक  नितांत गरज आहे. फॉलिक ऍसिड आणि झिंक यांचे मिश्रण देखील पुरुषांमधील शुक्राणूंची गुणवत्ता सुधारू शकते.

9. जस्त

जस्त

गुणसूत्रांच्या चांगल्या जोड्या राखण्यासाठी झिंक महत्त्वाची भूमिका बजावते. ते इस्ट्रोजेन आणि प्रोजेस्टेरॉन याना एकत्र ठेवते. त्यामुळे गर्भधारणेला फायदा होतो. शुक्राणूंमध्ये, शेपटी आणि बाह्य आवरण जस्तापासूनच बनलेले असते. त्यामुळे पुरुषाच्या आहारात झिंकचा समावेश करणे अत्यंत आवश्यक होते. हा घटक शुक्राणूंची गतिशीलता सुधारू शकतो आणि शुक्राणूंची गुणवत्ता सुधारू शकतो. स्त्रियांसाठी हे महत्त्वाचे आहे कारण झिंकच्या कमतरतेमुळे (किंवा कमी पातळी) गर्भपात होऊ शकतो.

प्रजनन पूरक औषधे घेण्याचे धोके

वर नमूद केल्याप्रमाणे, प्रजनन पूरक औषधे घेतल्यास त्यांची इतर औषधांशी प्रक्रिया होऊ शकते. खूप जास्त प्रमाणात आणि खूप काळ प्रजनन पूरक औषधे घेतल्यास तुमच्या पुनरुत्पादक आरोग्यावर तसेच एकूण आरोग्यावर नकारात्मक परिणाम होऊ शकतात. सप्लिमेंट्सच्या जास्त डोस घेतल्याने होणारे दुष्परिणाम खाली नमूद केले आहेत –

  1. डोकेदुखी
  2. अंधुक दृष्टी
  3. मळमळ आणि उलटी
  4. हृदयविकाराचा धोका वाढतो (फॉलिक ऍसिड जास्त प्रमाणात घेतल्यास असे होते)
  5. पुरळ

प्रजनन पूरक औषधांबाबत केव्हा जास्त सावध रहावे?

प्रजनन पूरक औषधे खरेदी करणे अवघड असू शकते, परंतु जर तुम्ही प्रजनन पूरक आहार घेण्याचा विचार करत असाल तर तुम्हाला सावध राहण्याची गरज आहे. खालील प्रकरणांमध्ये प्रजनन पूरक खरेदी करणे टाळा

  • कंपनीचे ऑनलाइन स्टोअर किंवा वेबसाइट काही वेळा संशयास्पदआहे. त्यात चुकीचे स्पेलिंग आणि प्रतिमा आहेत.
  • बॉक्समध्ये “संशोधन-सिद्ध” असा उल्लेख आहे परंतु संशोधन आणि ते केव्हा आणि कोठे केले गेले याचा उल्लेख नाही.
  • पूरक औषधांच्या बॉक्स मध्ये  “डॉक्टरांनी शिफारस केलेले” असे लिहिलेले आहे परंतु संस्थेचा कोणताही अधिकृत लोगो नाही.
  • ही पूरक औषधे वंध्यत्व बरे करण्याची हमी देते.

तुमच्या डॉक्टरांना काय विचाराल?

अनेक प्रजनन पूरक औषधे प्रजनन क्षमता सुधारण्यास मदत करतात. परंतु ते सगळ्यांनाच उपयोगी ठरू शकत नाहीत. ते प्रभावी आहेत परंतु त्याचे गंभीर दुष्परिणाम देखील होऊ शकतात. त्यामुळे कोणतेही पूरक औषध घेण्यापूर्वी डॉक्टरांचा सल्ला घेणे चांगले असते. म्हणून, एखाद्या विशिष्ट परिशिष्टाचे संभाव्य फायदे आणि जोखीम याबद्दल आपल्या डॉक्टरांशी बोला, त्यानंतरच पुढे जा. डॉक्टर तुम्हाला तुमच्या वैद्यकीय इतिहासाबद्दल आणि तुम्हाला आधीपासून असलेल्या वैद्यकीय समस्यांबद्दल विचारतील. तुम्ही काही औषधोपचार घेत असाल तर त्याविषयी सुद्धा डॉक्टर तुम्हाला करतील. त्याबाबतची योग्य माहिती डॉक्टरांना द्या. ते तुम्हाला सर्वोत्तम मार्गदर्शन करेल.

गर्भवती होण्यासाठी सर्वोत्तम प्रजनन पूरक आहार निवडणे वाटते तितके सोपे नाही. प्रजनन पूरक औषधे निवडताना काळजी घेणे आवश्यक आहे. शिवाय, फक्त पूरक आहार घेतल्याने तुमची प्रजनन क्षमता सुधारणार नाही. चांगला आहार घेणे, चांगली जीवनशैली जगणे आणि व्यायाम करणे ह्याची देखील तुम्हाला मदत होईल. कोणताही पूरक आहार सुरू करण्यापूर्वी डॉक्टरांचा सल्ला घ्या. डॉक्टर तुम्हाला सर्वोत्तम मार्गदर्शन करतील. शिवाय, प्रयत्न करत राहा – लवकरच, तुमचे बाळ तुमच्या हातात असेल.

आणखी वाचा:

गर्भधारणा होण्यासाठी किती कालावधी लागतो
गर्भधारणेचा प्रयन्त करत असताना टाळावेत असे अन्नपदार्थ

RELATED ARTICLES
MORE FROM AUTHOR
संपादकांची पसंती
Please Wait Updating Your Article