In this Article
बाळाच्या पौष्टिक गरजा पूर्ण करण्यासाठी आईचे दूध सर्वोत्तम आहे. सामान्यतः बाळ एक वर्षाचे होईपर्यंत बाळाला सोया दूध देऊ नका असे डॉक्टर सांगतात. परंतु, जेव्हा तुम्हाला बाळाचे स्तनपान सोडवायचे असेल आणि तुम्ही आईच्या दुधासाठी पर्याय शोधत असाल किंवा जर तुमचे बाळ लैक्टोज असहिष्णु असेल तर, सोया दूध हा सर्वात चांगला पर्याय असू शकतो.
तसेच, सोया दूध आणि सोया–आधारित फॉर्म्युलामधील फरक जाणून घेणे महत्त्वाचे आहे. बाळाच्या निरोगी विकासासाठी आवश्यक पोषक तत्वांचा समावेश करण्यासाठी सोया–आधारित फॉर्मुला विशेषतः तयार केला जाऊ शकतो. तर सामान्य सोया दुधामध्ये पौष्टिक मूल्यांची कमतरता असू शकते. कोणत्याही परिस्थितीत, आपल्या बाळाला सोया दूध कमी प्रमाणात देण्याचा सल्ला दिला जातो, कारण बाळाला सोया दुधाची ऍलर्जी होण्याची शक्यता असते.
सोया दूध म्हणजे काय?
सोया दूध हे सोयाबीनपासून बनवलेले उच्च प्रथिनेयुक्त पेय आहे. हे दूध तयार करण्यासाठी सोयाबीन आधी भिजवले जातात,. त्यानंतर उकडून बारीक करून फिल्टर केले जातात. हा फिल्टर केलेला पांढरा द्रव गाईच्या दुधासारखा दिसतो. पण गाईच्या दुधापेक्षा तो वेगळा असतो. सोया दुधामध्ये थायमिन, फोलेट, रिबोफ्लेविन आणि व्हिटॅमिन डी, ई आणि के सारखी जीवनसत्त्वे असतात. सोया दूध कमी चरबीयुक्त असते. त्यामध्ये कोलेस्ट्रॉल आणि सोडियम कमी असते. तसेच त्यामध्ये लॅकटोज देखील नसते.
लहान मुलांसाठी सोया दुधाचे आरोग्य विषयक फायदे
दुग्धशर्करा असहिष्णु असलेल्या किंवा संपूर्ण गाईच्या दुधाची ऍलर्जी असलेल्या, एक वर्षापेक्षा जास्त वयाच्या मुलांसाठी सोया दूध हा एक चांगला पर्याय असू शकतो. सोया दुधात असलेली प्रथिने, लोह आणि विविध जीवनसत्त्वे हे लहान मुलांच्या निरोगी विकासासाठी महत्त्वपूर्ण असतात. सोया दुधात फॅटचे प्रमाण कमी असते. लहान मुलांच्या शरीराचे वजन निरोगी राखण्यास मदत करू शकते. लहान मुलांमध्ये हृदयाच्या समस्या आणि लठ्ठपणाचा धोका आणखी कमी करू शकते. सोया दुधात उच्च फायबर सामग्री असल्यामुळे, सोया दूध वापरणाऱ्या बाळांना आतड्यांसंबंधी त्रास आणि अतिसाराचा त्रास कमी होऊ शकतो.
जर एखाद्या बाळाचा जन्म गॅलॅक्टोसेमिया (शरीर दुधात असलेल्या साखरेचे विघटन करू शकत नाही) सह झाला असेल तर, सोया दूध दिले जाऊ शकते. शिवाय, फोर्टिफाइड सोया दूध प्यायल्याने कॅल्शियमचे पुरेसे सेवन सुनिश्चित होते कारण फोर्टिफाइड सोया दुधात व्हिटॅमिन डी असते आणि त्यामुळे कॅल्शियम शोषण वाढते. ज्या बाळांना साध्या सोया दुधाची चव आवडत नाही त्यांना वेगवेगळ्या फ्लेवर्समध्ये उपलब्ध असलेले सोया दूध दिले जाऊ शकते.
सोया दूध कसे निवडावे?
आपल्या बाळासाठी संपूर्ण चरबीयुक्त सोया दुधाची निवड करणे इष्ट आहे कारण त्याच्या योग्य वाढीसाठी आणि विकासासाठी चरबी आवश्यक आहे. परंतु जर तुमचे मूल लठ्ठपणा किंवा हृदय व रक्तवाहिन्यासंबंधी आजारांना बळी पडत असेल तर कमी चरबीयुक्त सोयामिल्कची निवड करणे योग्य आहे.
तसेच, उत्पादन खरेदी करण्यापूर्वी पोषण घटक असलेले लेबल आणि त्यावरील घटकांची यादी तपासणे महत्त्वाचे आहे. तुम्हाला तुमच्या बाळाच्या निरोगी वाढीसाठी आवश्यक असलेली सर्व आवश्यक पोषकमूल्ये, खनिजे आणि जीवनसत्त्वे असलेले सोया मिल्क इन्फंट फॉर्म्युला आवडेल. काही शंका असल्यास, आपल्या डॉक्टरांचा सल्ला जरूर घ्यावा.
सोया दूध की गायीचे दूध
गाईच्या दुधापेक्षा सोया दुधाचे काही फायदे आहेत. गायीच्या दुधाच्या तुलनेत सोया दुधात चरबी आणि साखरेचे प्रमाण नगण्य असते. तसेच, सोया दूध कोलेस्ट्रॉल मुक्त आहे. सोया दूध हे गाईच्या दुधाच्या तुलनेत लोह आणि फायबरचा समृद्ध स्रोत आहे.
परंतु गाईच्या दुधात व्हिटॅमिन ए आणि बी १२ सारखे आवश्यक पोषक घटक असतात. हे घटक सोया दुधात नसतात. जरी दोन्ही पेयांमध्ये कॅल्शियमचे प्रमाण समान असले तरी, सोया दुधात फायटेट्स असतात. फायटेट्स एक नैसर्गिक संयुग आहे आणि ते शरीराद्वारे कॅल्शियमचे शोषण कमी करू शकते. पण गाईच्या दुधात असलेले कॅल्शियम अधिक सहजपणे शोषले जाते.
गाईच्या दुधात बाळाच्या योग्य वाढीसाठी आवश्यक असलेले सर्व ‘चांगले‘ फॅट्स असतात. गाईच्या दुधामध्ये सोया दुधापेक्षा किंचित जास्त प्रथिने देखील असतात. परंतु, सोया दूध देखील प्रथिनांचा एक चांगला स्त्रोत आहे, म्हणून ते गायीच्या दुधाला पर्याय म्हणून वापरले जाऊ शकते. तुम्ही तुमच्या बाळाला सोया दूध देत असाल तर तुमच्या बाळाच्या आहारात इतर कॅल्शियमयुक्त पदार्थांचा समावेश असल्याची खात्री करा कारण सोया दुधात कॅल्शियम कमी असते.
सोया दुधाचे लहान मुलांवर काही हानिकारक परिणाम होतात का?
सोया दूध लहान मुलांसाठी सुरक्षित आहे की नाही? हे स्तनपान करणाऱ्या मातांना जाणून घ्यायचे असते. ह्याचे साधे उत्तर म्हणजे सोया दूध तुमच्या बाळासाठी पोषणाचा एकमात्र स्रोत म्हणून योग्य नाही. कारण सोया दुधामध्ये बाळाच्या निरोगी वाढीसाठी आवश्यक असलेले सर्व पौष्टिक घटक नसतात. एक वर्षापेक्षा कमी वयाच्या बाळांना सोया दूध देणे पूर्णपणे टाळले पाहिजे. सोया दुधाचे लहान मुलांवर होणारे काही हानिकारक परिणाम खाली दिलेले आहेत.
- अभ्यासानुसार असे निदर्शनास आलेले आहे कि सोया दुधामध्ये फायटोएस्ट्रोजेन असतात आणि ते लहान मुलांमध्ये एस्ट्रोजेन सारखे परिणाम घडवून आणू शकतात. त्यामुळे पुढील आयुष्यात बाळांना स्तनाचा कर्करोग किंवा प्रोस्टेट कर्करोगाचा धोका वाढू शकतो. तथापि, या क्षेत्रातील संशोधनावर अजून योग्य निर्णय झालेला नाही.
- काही बाळांना सोया दुधातील प्रथिनांची ऍलर्जी असू शकते.
- क्वचित प्रसंगी, सोया दुधाचे सेवन केल्याने थायरॉईड पातळीत असंतुलन होऊ शकते परिणामी गलगंड (थायरॉईड ग्रंथीची असामान्य वाढ) होऊ शकतो.
तुमच्या बाळाला सोया दूध देताना लक्षात ठेवल्या पाहिजे अश्या टिप्स
तुमच्या बाळाला सोया दूध देताना लक्षात ठेवण्यासाठी काही टिप्स इथे दिलेल्या आहेत, तुम्हाला त्यातील सर्वोत्तम पोषक द्रव्ये मिळतील याची खात्री करण्यासाठी.
१. कॅल्शियम स्रोत
मजबूत हाडे आणि दातांच्या विकासासाठी कॅल्शियम आवश्यक आहे. सोया दुधात कॅल्शियमचे प्रमाण कमी असल्याने, तुमच्या बाळाला दुसऱ्या कुठल्यातरी स्रोतातून कॅल्शियम मिळणे आवश्यक आहे. त्यामुळे बाळाला कुठलीही पोषक तत्वे कमी पडत नाहीत हे निश्चित होते
२. फक्त सोया दूध हा एकमेव पोषणाचा स्रोत ठेऊ नका
तुमच्या बाळाला फक्त सोया दूध देण्याऐवजी, ते आईच्या दुधासोबत किंवा गायीच्या दुधासोबत द्या. यामुळे तुमचे बाळ निरोगी असल्याची खात्री होते.
३. ऍलर्जी
तुमच्या बाळाला सोया दुधाची अॅलर्जी नाही याची खात्री करण्यासाठी, सुरुवातीला त्याला फक्त थोडे सोया दूध द्या आणि कोणतेही दुष्परिणाम तर नाहीत ना हे पहा जर तुम्हाला तुमच्या लहान बाळाला ऍलर्जी झाली आहे असे आढळले तर ताबडतोब डॉक्टरकडे जा.
तुमच्या बाळाला फक्त सोया दूध दिल्यास बाळामध्ये पोषणाची गंभीर कमतरता राहू शकते. स्तनपान किंवा गाईच्या दुधासोबत पूरक अन्न म्हणून बाळाला सोया दूध द्या. जर तुम्हाला अजूनही तुमच्या बाळाला सोया दूध द्यायचे असेल, तर बाळाच्या चांगल्या विकासासाठी त्याला इतर आहारातून योग्य पौष्टिक घटक मिळत आहे ना ते पहा. सोया दूध कमी प्रमाणात देणे योग्य आहे कारण त्यामुळे ऍलर्जिक प्रतिक्रिया निर्माण होऊ शकते. तुमच्या बाळावर सोया दुधाच्या होणाऱ्या परिणामांबाबत तुम्हाला काही चिंता असल्यास, प्रथम तुमच्या डॉक्टरांचा सल्ला घेणे चांगले.
आणखी वाचा:
बाळांसाठी शेळीचे दूध: फायदे आणि रेसिपी
बाळांसाठी फॉर्मुला दूध: आपल्या बाळाला किती आवश्यक आहे?