Firstcry Parenting
Search
Parenting Firstcry
Home गर्भारपण प्रसुतीपूर्व काळजी गरोदरपणातील चाचण्या: आरएच घटक आणि प्रतिपिंड तपासणी

गरोदरपणातील चाचण्या: आरएच घटक आणि प्रतिपिंड तपासणी

गरोदरपणातील चाचण्या: आरएच घटक आणि प्रतिपिंड तपासणी

तुम्ही गरोदर असताना काही गोष्टींची माहिती तुम्हाला असणे आवश्यक आहे. विशेषत: ज्या गोष्टी तुमच्याकडून बाळाकडे जाणार आहेत त्या सर्व बाबींविषयी तुम्ही जागरूक असले पाहिजे. तुमच्याकडून तुमच्या बाळाला फक्त तुमचा रक्तगटच नाही तर रीसस फॅक्टर (आरएच फॅक्टर) चा सुद्धा वारसा मिळतो. हा आरएच फॅक्टर बाळाच्या आरोग्याशी सुद्धा जवळून जोडलेला असतो. तुमचे बाळ आरएच पॉझिटिव्ह आहे की निगेटिव्ह आहे हे माहिती होण्यासाठी, तुम्हाला सर्वात आधी काही मूलभूत गोष्टी जाणून घेणे आवश्यक आहे.

रक्तातील आरएच फॅक्टर म्हणजे काय?

रक्तातील आरएच फॅक्टर म्हणजे काय?

आरबीसी (लाल रक्तपेशी) च्या पृष्ठभागावर आढळणाऱ्या आनुवंशिक प्रथिनांना आर एच किंवा रेसस घटक म्हणतात. सामान्यपणे सांगायचे तर, जर हे प्रथिन तुमच्या रक्तात असेल तर तुम्ही आरएच पॉझिटिव्ह आहात आणि जर ते नसेल तर आरएच निगेटिव्ह आहात. वैद्यकीय आणीबाणीच्या काळात रक्तसंक्रमण करताना आणि बाळाच्या जन्मादरम्यानची गुंतागुंत टाळण्यासाठी एखाद्याचा आरएच घटक जाणून घेणे आवश्यक आहे.

आरएच घटक चांगल्या प्रकारे समजून घेण्यासाठी, तुम्हाला अँटिजेन्स बद्दल देखील माहिती असणे आवश्यक आहे. मुळात, अँटिजेन्स जेव्हा तुमच्या शरीरात प्रवेश करतात, तेव्हा तुमच्या रोगप्रतिकारक प्रणालीला ऍन्टीबॉडीज तयार करण्यासाठी उत्तेजित करतात. ह्या अँटीबॉडीज संक्रमणाविरूद्ध लढण्यास मदत करतात. आर एच रक्तगट आणि आर एच फॅक्टर मधील फरक लक्षात ठेवण्यासारखा आहे, कारण दोन्ही सारखेच आहेत म्हणून अनेकदा गोंधळ होतो. आरएच रक्तगट ५० अँटिजेन्सच्या संचाला संदर्भित करतो, तर आरएच घटक केवळ डी अँटिजेन्सशी संबंधित असतो. तुम्ही आरएच पॉझिटिव्ह किंवा निगेटिव्ह आहात का हे ठरवण्यासाठी तो जबाबदार असतो.

आरएच पॉझिटिव्ह

जर तुमच्या रक्तात आरएच फॅक्टर असेल तर तुम्हाला आरएच पॉझिटिव्ह असे संबोधले जाते. जगातील ८५ लोकसंख्या आरएच पॉझिटिव्ह आहे.

आरएच निगेटिव्ह

गरोदरपणात आरएच निगेटिव्ह रक्तगट असल्‍याने तुमच्‍या तब्येतीवर कोणताही परिणाम होत नाही किंवा तुम्हाला कुठला आजार असल्याचे त्यामुळे सूचित होत नाही. जेव्हा तुम्ही आरएच नेगेटिव्ह असता तेव्हा तुमच्या लाल रक्त पेशींच्या पृष्ठभागावर आरएच हे अनुवांशिक प्रोटीन नसते.

आरएच स्थिती आणि गर्भधारणा गुंतागुंत

डॉक्टरांच्या पहिल्या भेटीच्या वेळी प्रत्येक गर्भवती स्त्रीची आरएच घटकांसाठीची चांचणी झालेली असणे आवश्यक आहे. ही चाचणी सहसा हातातील रक्तवाहिनीतील काढलेल्या रक्ताच्या नमुन्यातून केली जाते. जर तुम्ही आरएच पॉझिटिव्ह असाल तर तुमच्या आणि तुमच्या बाळामध्ये असलेली आरएच विसंगतता जास्त चिंतेची बाब नाही, पण जर तुम्ही आर एच निगेटिव्ह आई असाल, तर तुमच्या गरोदरपणात आणि प्रसूतीच्या काळात तुमचे डॉक्टर तुम्हाला सावध राहण्यास सांगू शकतात.

जर तुम्ही आरएच निगेटिव्ह असाल आणि तुमचा नवरा आरएच पॉझिटिव्ह असेल, तर तुमचे बाळ आरएच पॉझिटिव्ह असण्याची दाट शक्यता असते. तसेच, तुमचा रक्तगट तुमच्या बाळाच्या रक्तगटाशी विसंगत असेल. तुमचे बाळ जगात येईपर्यंत हे कळणार नाही, पण तसे गृहीत धरणे आणि त्यानुसार खबरदारीचे उपाय करणे चांगले असते.

विसंगत आरएच

तुमच्या शरीराची, शरीरात प्रवेश करणार्‍या कोणत्याही परकीय घटकांशी लढण्याची प्रवृत्ती असते आणि त्यासाठी शरीर अँटीबॉडीज तयार करतात. हे लहान सैनिकांसारखे असतात. जर तुम्ही आरएच निगेटिव्ह आई असाल आणि आरएच पॉझिटिव्ह बाळाला जन्म देत असाल, तर बाळाच्या रक्ताच्या संपर्कात आल्यावर तुमच्या शरीरात आरएच अँटीबॉडीज म्हणून ओळखले जाणारी प्रथिने तयार होण्याची शक्यता असते. ह्या विसंगतीमुळे सध्याच्या आरएच निगेटिव्ह गरोदरपणात (ती तुमची पहिलीच आहे असे गृहीत धरून) कोणतीही चिंता उद्भवत नाही, परंतु तुमची पुढील गर्भधारणा ही चिंताजनक असू शकते. तुमच्या गरोदरपणात तुम्हाला जेवढे पॉझिटिव्ह अँटीबॉडीज वापरता येतील तेवढे घेण्याचा प्रयत्न करा. तुमचे डॉक्टर तुमच्या स्थितीच्या आधारावर तुम्हाला मार्गदर्शन करण्यासाठी सक्षम असतील.

पालक आणि बाळाचा आरएच तक्ता

तुमचे बाळ आरएच पॉझिटिव्ह किंवा निगेटिव्ह असण्याच्या विविध शक्यता समजून घेण्यासाठी, तुमच्या पतीच्या आणि तुमच्या रक्तातील आरएच फॅक्टरच्या प्रकाराचे विश्लेषण करणे महत्त्वाचे आहे.

गर्भधारणेदरम्यान रक्ताची सुसंगतता

आईचा आरएच फॅक्टर

वडिलांचा आरएच फॅक्टर बाळाचा आरएच फॅक्टर खबरदारी
आरएच पॉझिटिव्ह आरएच पॉझिटिव्ह जर पालक होमोझायगोट्स असतील तर १००% पॉझिटिव्ह

जर एक पालक होमोझायगोट असेल आणि दुसरा हेटेरोझायगोट असेल ७५ % पॉसिटीव्ह

काहीही नाही
आरएच निगेटिव्ह आरएच निगेटिव्ह १००% प्रकरणांमध्ये मुलाचे रक्त आरएचनिगेटिव्ह असेल. काहीही नाही
आरएच पॉझिटिव्ह आरएच निगेटिव्ह जर आरएच पॉझिटिव्ह पार्टनर किंवा आरएचसाठी होमोझिगोट्सचा पार्टनर ५०% पॉझिटिव्ह काहीही नाही
आरएच निगेटिव्ह आरएच पॉझिटिव्ह आरएच इम्यून ग्लोब्युलिन इंजेक्शन असण्याची समान शक्यता आर एच इम्म्युनोग्लोबीन इंजेक्शन्स

आरएच सेन्सिटायझेशन

आरएच विसंगत असल्यामुळे तुमच्या सध्याच्या गरोदरपणात मच्या बाळाला हानी पोहोचणार नाही (जर ती तुमची पहिली असेल). परंतु, जेव्हा बाळाचे रक्त तुमच्या रक्तामध्ये मिसळते (गरोदरपणात आणि बाळाच्या जन्मादरम्यानची एक शक्यता), तेव्हा तुमची रोगप्रतिकारक प्रणाली ह्या आरएच पॉझिटिव्ह रक्तापासून स्वतःचे संरक्षण करण्यासाठी अँटीबॉडीज तयार करण्यास सुरवात करते. ह्यास आरएच सेन्सिटायझेशन असे म्हणतात आणि त्यानंतरच्या गरोदरपणात जर तुम्ही आरएच पॉझिटिव्ह बाळासह गरोदर राहिल्यास, तर गरोदरपणातील हे पॉझिटिव्ह प्रतिपिंड बाळाच्या रक्तावर हल्ला करतील.

मी आरएच निगेटिव्ह असल्यास काय?

तुमच्या प्रसूतीपूर्व तपासणीसाठी तुमच्या पहिल्या डॉक्टरांच्या भेटीदरम्यान, तुमची आरएच घटक तपासण्यासाठी चाचणी केली जाईल. तुम्ही आरएच निगेटिव्ह आढळल्यास, परिणाम तपासण्यासाठी बाळाच्या वडिलांची चाचणी केली जाईल. जर तुमचे पती देखील आरएच निगेटिव्ह असतील, तर तुमचे मूल आरएच निगेटिव्ह असेल (कारण दोन निगेटिव्ह पॉझिटिव्ह बनवू शकत नाहीत), त्यामुळे तुमचे शरीर त्याला स्वतःचे वाटू शकेल.

बाळाचे जैविक वडील आरएच पॉझिटिव्ह असल्यास तुमच्या गर्भात आरएच पॉझिटिव्ह घटक असण्याची दाट शक्यता असते. तुमच्या बाळाला (पहिल्या गरोदरपणात) कोणतीही हानी होणार नाही, कारण तुमच्या शरीरात बाळाच्या आरएच घटकासाठी अँटीबॉडीज अद्याप तयार करण्यात आलेल्या नाहीत. परंतु तुमचे दुसरे गरोदरपण उच्च जोखमीचे असू शकते. पहिल्या गरोदरपणात आईचे शरीर ह्या पॉझिटिव्ह आर एच घटकाविरूद्ध प्रतिपिंड तयार करते आणि ते आयुष्यभर तिच्या प्रणालीमध्ये राहतात.

जर तुम्ही आरएच निगेटिव्ह असाल आणि तुमच्या दुसऱ्या गरोदरपणात, आरएच पॉझिटिव्ह बाळाची अपेक्षा करत असाल, तर तुमच्या शरीराने तयार केलेली ही प्रतिपिंडे बाळाच्या आरबीसीवर हल्ला करतील. ह्या परिणाम म्हणून, तुमचे बाळ अशक्त होऊ शकते आणि ते प्राणघातक ठरू शकते. बाळाला कावीळचा त्रास होऊ शकतो, आरबीसी चे खंडन झाल्यानंतर जे बिलिरुबिन तयार होते त्यावर प्रक्रिया करण्यात यकृत अयशस्वी होते.

बाळाचे रक्त आईच्या रक्तात कसे मिसळते?

जोपर्यंत अम्नीओसेन्टेसिस सारखी प्रक्रिया केली जात नाही तोपर्यंत गरोदरपणात आईचे रक्त तिच्या बाळाच्या रक्तामध्ये मिसळत नाही, . योनीतून रक्तस्त्राव, किंवा कार अपघात, पडणे किंवा जन्म होतानाची कठीण प्रक्रिया ह्यासारख्या अत्यंत क्लेशकारक घटनांसारखे इतर घटकांमुळे बाळाचे रक्त त्याच्या आईच्या रक्तामध्ये मिसळू शकते. तसेच, प्रसूतीदरम्यान, बाळाच्या रक्तपेशी आईच्या रक्तपेशींमध्ये मिसळण्याची शक्यता असते.

आरएच स्थिती आणि अँटीबॉडी स्क्रीनसाठी रक्त चाचणी

आरएच स्थिती आणि अँटीबॉडी स्क्रीनसाठी रक्त चाचणी

तुमच्या शरीरात विशिष्ट अँटीबॉडीजची उपस्थिती निश्चित करण्यासाठी गरोदरपणात अँटीबॉडी तपासणीसाठी चाचण्या केल्या जातात. ही चाचणी विशेषतः महत्वाची असते. कारण ही प्रतिपिंडे लाल रक्तपेशींवर हल्ला करू शकतात त्यामुळे नंतरची कमतरता येते. डॉक्टरांनी शिफारस केलेल्या रक्ताच्या काही चाचण्या खालीलप्रमाणे आहेत.

कुम्ब्ज टेस्ट (प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष)

कुम्ब्ज टेस्ट (प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष) ही एक प्रभावी अँटीबॉडी स्क्रीनिंग चाचणी आह. हि चाचणी गरोदरपणात आईच्या शरीरातील लाल रक्तपेशींवर हल्ला करणाऱ्या अँटीबॉडीज ओळखण्यासाठी केली जाऊ शकते.

डायरेक्ट कुम्ब्ज टेस्ट

ही चाचणी ज्या लाल रक्तपेशींना अँटीबॉडीज असतात त्या रक्तपेशी ओळखण्यासाठी प्रभावी ठरते. ह्या चाचणीसाठी आईच्या शरीरातून रक्तपेशींचे नमुने घेतले जातात. आईच्या शरीरात तयार केलेले प्रतिपिंड नाळेतून बाळामध्ये गेले आहेत की नाही हे शोधण्यासाठी नवजात बाळाची सुद्धा हि चाचणी केली जाते.

इन्डायरेक्ट कुम्ब्ज टेस्ट

ही चाचणी सीरमचा (रक्ताचा द्रव भाग) नमुना घेऊन आणि गरोदरपणात रक्तप्रवाहात आधीच उपस्थित असलेल्या रक्तगटाच्या अँटीबॉडीजचा शोध घेऊन केली जाते. हे काही विशिष्ट रक्तपेशींशी बांधले जाण्याची शक्यता असते. आई आणि बाळाचे रक्त एकमेकांमध्ये मिसळल्यास आरोग्यविषयक गुंतागुंत निर्माण होते. दात्याच्या/प्राप्तकर्त्याच्या रक्तातील अँटीबॉडीज मोजण्यासाठी रक्तसंक्रमणापूर्वी देखील ही चाचणी केली जाते.

माझ्या बाळाने आणि मी अँटीबॉडीज विकसित केल्यास काय?

लहान बाळे देखील अँटीबॉडीज तयार करू शकतात, परंतु ही प्रक्रिया अतिशय हळू होते.ह्याचे कारण म्हणजे त्यांची रोगप्रतिकारक शक्ती बाळे ६ ते ८ महिन्यांची होईपर्यंत परिपक्व आणि कार्यक्षम नसते. बाळे रोग आणि आजारांना बळी पडतात. परंतु, रोगप्रतिकारक प्रतिक्रिया शाश्वत नसते. जिवाणू किंवा विषाणू एक महिन्यांचे होईपर्यंत ओळखले जात नाहीत.

ऍन्टीबॉडीजच्या विकासास प्रतिबंध करणे

आधी सांगितल्याप्रमाणे, अँटीबॉडीजही रक्तातील प्रथिने आहेत. ही प्रथिने मानवी शरीराद्वारे कोणत्याही अँटिजेन्स सोबत लढण्यासाठी विकसित केले जातात. ह्या ऍन्टीबॉडीज रक्तातील जिवाणू आणि विषाणूंसारख्या कोणत्याही परदेशी पदार्थांवर रासायनिक प्रतिक्रिया देतात. त्यांना इम्युनोग्लोबुलिन असेही म्हणतात.

आरएच विसंगतता विशेष रोगप्रतिकारक ग्लोब्युलिनच्या वापराद्वारे प्रतिबंधित आहे. त्यांना आर एच ओ जी ए एम देखील म्हणतात. जर बाळाचे वडील आरएच पॉझिटिव्ह किंवा अपुष्ट रक्तगटाचे असतील, तर आईला तिच्या दुसऱ्या तिमाहीत आरएचओजीएएम चे इंजेक्शन दिले जाते. बाळ आरएच पॉझिटिव्ह असल्यास प्रसूतीनंतर काही दिवसांत दुसरे इंजेक्शन दिले जाते.

इंजेक्शन्स आर एच पॉझिटिव्ह रक्ताविरूद्ध प्रतिपिंड विकास रोखण्यासाठी उपयुक्त आहेत. गरोदरपणात आरएच निगेटिव्ह रक्तगट असलेल्या महिलांना प्रत्येक गर्भधारणेनंतर, किंवा गर्भपात झाल्यानंतर/केल्यानंतर किंवा आईला अम्नीओसेन्टेसिस झाल्यास आरएचओजीएएम चे इंजेक्शन द्यावे.

आरएच विसंगतता उपचार

आरएच विसंगतता उपचार हे विसंगतेचा प्रभाव रोखण्यावर केंद्रित आहे. नवजात बाळावर खालील प्रकारे उपचार केले जातात.

  • रक्त संक्रमण
  • हायड्रेटिंग द्रव
  • चयापचय नियमन करण्यासाठी इलेक्ट्रोलाइट्स
  • फोटोथेरपी (रक्तात बिलीरुबिनची अतिरिक्त निर्मिती टाळण्यासाठी बाळाला फ्लोरोसेंट दिव्याच्या सानिध्यात ठेवणे)

पालकांचे आरएच घटक जाणून घेतल्याने आई आणि बाळ दोघांच्याही आरोग्यविषयीची जोखीम लक्षात येण्यास मदत होते. गरोदरपणाच्या नियमित चाचण्यांचा एक भाग म्हणून तुमची चाचणी झाली असल्याची खात्री करा. तुमच्या आणि तुमच्या पतीमध्ये अशी वैद्यकीय विसंगती असल्यास तुमच्या डॉक्टरांना कळवा.

आणखी वाचा:

गरोदर चाचणी केव्हा आणि कशी करावी?
सोप्या आणि विश्वसनीय घरगुती गर्भधारणा चाचण्या

RELATED ARTICLES
MORE FROM AUTHOR
संपादकांची पसंती
Please Wait Updating Your Article