In this Article
तुमचे बाळ आता ६ महिन्यांचे झाले आहे आणि हा क्षण साजरा करण्याची वेळ आली आहे. तुमच्या मनात बरेच प्रश्न असू शकतात जसे की तुमचे बाळ डावखुरे आहे की सामान्य? तुमचे बाळ घन पदार्थांसाठी तयार आहे की नाही? तुमचे बाळ पालथे पडण्यास केव्हा सक्षम असेल? येथे सर्व उत्तरे आहेत:
२४ आठवड्यांच्या बाळाचा विकास

२४ आठवड्यांच्या बाळाचे वजन आणि आकार त्याच्या वाढीवर आणि विकासावर अवलंबून असते. यासोबतच, तुमचे बाळ आता संपूर्णतः स्वतःचे स्वतः बसू शकत आहे, तसेच ते खेळण्यांसोबत खेळते आणि ती खेळणी इतरांकडे पास करू शकते. बाळ आधीपासूनच रांगत आहे किंवा आता त्यास सुरुवात करण्यास तयार आहे! आईच्या दुधाशिवाय आणि फॉर्म्युलाशिवाय बाळ इतर पचनास हलक्या पदार्थांसाठीसुद्धा तयार आहे. तुमचे बाळ डावखुरे आहे की सामान्य असा तुम्ही कदाचित विचार करीत असाल. परंतु या टप्प्यावर हे सांगणे कठीण आहे. ते समजण्यासाठी बाळ किमान २ किंवा ३ वर्षांचे असले पाहिजे.
२४ आठवड्यांच्या बाळाच्या विकासाचे टप्पे
- शारीरिकदृष्ट्या बाळ आता त्याच्या जन्माचे वजन आणि आकारापेक्षा जवळजवळ दुप्पट होईल बाळाच्या जन्माच्या काळाच्या तुलनेत बाळाची त्वचा आणि रंग आता अधिक स्पष्ट होईल
- बाळाचा मानसिक विकासही होत आहे. तुम्ही आता पाहू शकता की बाळ तुमचा स्पर्श, आवाज आणि भावना ओळखते. बाळ मजेदार हावभाव करण्यास सुरवात करेल, कधीकधी आनंदी आणि उत्साहित होईल, संभ्रमित होईल आणि रागावेल सुद्धा. बाळ आपल्या आजूबाजूच्या लोकांना ओळखण्यास सुरवात करेल, खासकरून संयुक्त कुटुंबातील आणि सोबत राहणाऱ्या लोकांना बाळ ओळखू लागेल
- बाळाची हाडे आणि स्नायू मजबूत झाल्यामुळे, बाळ आता स्वतःचे स्वतः बसू शकेल, पालथे पडू लागेल. काही बाळे इकडे तिकडे रांगायला लागतात. जर तुमच्या बाळाची रांगायला सुरुवात झाली नसेल तर काळजी करू नका
- बाळाचा मानसिक आणि शारीरिक विकास होत असल्याने बाळ रात्रीचे मध्ये मध्ये उठत असल्याचे तुमच्या लक्षात येईल
- तुम्ही बाळाला दूध पाजून पुन्हा झोपवणे आवश्यक आहे. २४ व्या आठवड्यात बाळाला दात येण्यास सुरुवात होऊ शकते त्यामुळे बाळाचे रात्रीचे सारखे उठणे आणखी वाढू शकते
- बाळाची मज्जासंस्था आणि मेंदू विकसित होत असताना बाळ त्याचे पाय तोंडाजवळ आणत असल्याचे तुमच्या लक्षात येईल. तुम्ही धीर धरा आणि बाळाला ह्या अनुभवाचा आनंद घेऊ द्या. कारण शरीराच्या खालच्या भागातील हालचालींवर नियंत्रण मिळवण्यास बाळाने सुरुवात केलेली आहे.
बाळाचा आहार
बाळाचे शरीर हे मोठ्या बदलांमधून जात आहे. आता स्तनपान आणि फॉर्मुल्या सोबतच बाळाला पचनास सोपा आहार देण्याची वेळ आलेली आहे. त्याचे काही पर्याय म्हणजे तांदळाच्या लाह्यांसारखे फिंगर फूड, काटे नसलेले मासे, सफरचंद, केळी किंवा आंबा इत्यादी काही चांगले पर्याय आहेत. तसेच लक्षात ठेवा की काही पदार्थ आपले बाळ योग्य वयात येईपर्यंत पूर्णपणे टाळले पाहिजेत. बाळ ६ महिन्यांचे झाल्यावर घन पदार्थांकडे संक्रमण करण्याची शिफारस केली जाते.
जेव्हा तुम्ही तुमच्या बाळास नवीन खाद्यपदार्थाचा परिचय द्याल तेव्हा त्याच्या चेहऱ्यावर मिलियन डॉलर्स हावभाव बघण्यास तयार रहा.घनपदार्थ खाताना बाळाला आपली जीभ, ओठ आणि हिरड्या वेगवेगळ्या प्रकारे वापरण्यास मदत होईल. सुरुवातीच्या टप्प्यात जरासा गोंधळ होऊ शकतो म्हणून धीर धरा, कारण बाळाने प्रथमच तोंडातील अन्न चावणे आणि गिळणे सुरू केले आहे. बाळाच्या सुंदर ड्रेसला डाग पडू नयेत म्हणून तुम्ही मोठा आकार असलेली बिब वापरू शकता ज्यामुळे बाळाची मान आणि हात देखील झाकले जातील. खाली प्लास्टिकची चटई असलेली एक उच्च खुर्ची वापरा, त्यामुळे बाळाला भरवल्यावर स्वच्छता करणे सोपे होईल. जर तुम्ही दही, सूप इत्यादी पदार्थ देत असाल तर बाजारात सहज उपलब्ध असलेले मऊ चमचे वापरा.
झोप
२४ आठवड्यांच्या बाळाची झोप विविध घटकांवर अवलंबून असते त्यामध्ये खालील घटकांचा समावेश होतो.
- या जादुई आठवड्यांमध्ये, तुमच्या बाळाला सर्व नवीन आव्हानांची ओळख करून दिली जाईल त्यातील एक आव्हान म्हणजे घन पदार्थ खाणे. तुमच्या २४ आठवड्यांच्या बाळाला खायला घालण्याच्या या बदलांमुळे कदाचित रात्री झोपेत व्यत्यय आला असेल
- घन पदार्थांसह, मेंदूचा विकास, रांगणे आणि दात येणे हे सर्व बदल देखील ह्या काळात होतील. या सर्व कारणांमुळे तुमचे २४ आठवड्यांचे बाळ रात्री वारंवार उठेल. या कालावधीत तुम्ही बाळाला खायला घालून झोपवावे.
- जेव्हा जसे जसे काही महिने जातील आणि बाळ ८–१० महिन्यांचे होईल तेव्हा बाळ वारंवार रात्रीचे आक्रोश करेल कारण ह्या काळात बाळ खूप सक्रिय असेल आणि आजूबाजूला रांगू शकेल. तुम्ही बाळाला वारंवार जागे होण्यापासून रोखू शकत नाही म्हणून तुम्ही बाळाची अस्वस्थता कमी करू शकता आणि पुन्हा झोपवू शकता.
२४ आठवड्यांच्या बाळाची काळजी
- आपल्या बाळाची काळजी घेण्याची प्रक्रिया खरोखर थकवणारी असू शकते आणि ही प्रक्रिया तुम्हाला पूर्णपणे शोषून घेईल, म्हणून वेळ घ्या आणि आपल्या वाढत्या बाळासह त्या क्षणाचा आनंद घेण्याचा प्रयत्न करा. जेव्हा बाळ २४ आठवड्यांचे असते, तेव्हा आपल्या बाळाला प्रॅममध्ये सुरक्षित ठेवून फिरण्यासाठी किंवा भेटीसाठी योग्य वेळ असते
- खूप जास्त प्रोटेक्टिव्ह नसण्याचा प्रयत्न करा आणि बाळाला फिरायला नेण्याचे विशिष्ट ठिकाण किंवा क्षेत्र मर्यादित करा. बाळाला आजूबाजूच्या गोष्टींचा शोध घेऊ द्या आणि तिच्या जिज्ञासेस सकारात्मकपणे सामोरे जा
- आपण आपल्या बाळाला खायला घालण्यासाठी काय निवडता याबद्दल फार सावधगिरी बाळगा, आहारतज्ञांशी बोला आणि बाळाच्या वाढीच्या प्रत्येक टप्प्यासाठी संतुलित आहार योजना तयार करा
- अजूनही तुमच्या बाळाला दिवसातून १–३ तासाच्या ३ झोपेची आवश्यकता आहे. त्यामुळे बाळ झोपायला फारसा उत्सुक नसला तरीही बाळाला झोपेच्या वेळी गोष्टी सांगून झोपवा
- आपल्या बाळाभोवती स्वच्छतेबद्दल जास्त कट्टर न ठरण्याचा राहण्याचा प्रयत्न करा आणि बाळाला प्रत्येक खेळणे किंवा इतर वस्तूंचा शोध घेण्यापासून रोखू नका. बाळाला जोपर्यंत काही हानी किंवा धोका नसतो तोपर्यंत बाळाला शोध घेऊ द्या
चाचण्या आणि लसीकरण
तुमच्या २४ आठवड्यांच्या बाळाला लसीकरण करण्यासाठी तारखांची तपासणी करणे आवश्यक आहे. जेव्हा तुमचे बाळ ६ महिन्यांचे होते तेव्हा खालील लसी घेणे आवश्यक आहे.
- इन्फ्लुएंझा फ्लूची लस ६ महिने किंवा त्यापेक्षा जास्त वयाच्या मुलांसाठी सुचविली जाते
- रोटाव्हायरस लसीचा तिसरा डोस (याला आरव्ही देखील म्हणतात)
- न्यूमोकोकल कॉंजुएट लस (सामान्यत: पीसीव्ही म्हणून ओळखली जाते)
- हेमोफिलस इन्फ्लूएन्झा प्रकार बी लस (तिसरा एचआयबी देखील म्हणतात) लसीकरणाचा तिसरा डोस करावयाचा आहे
खेळ आणि क्रियाकलाप
तुमचे २४ आठवड्यांचे बाळ आता उर्जाने भरलेले आहे आणि खूप सक्रिय आहे. बाळाच्या आसपासच्या गोष्टींचा शोध घेण्यासाठी आणि शारीरिक विकासासाठी तसेच बाळाच्या शरीराच्या स्नायूंचा व्यायाम होण्यासाठी बाळाला जमिनीवरचा बराच वेळ आवश्यक आहे. बाळ त्याचे पाय तोंडाजवळ आणून ते चोखून चावू लागेल. काही आठवड्यांसाठी बाळासाठी हा एक मजेदार खेळ असेल आणि यामुळे बाळाचे पाय आणि कुल्ले रांगण्यासाठी तयार होतात. तसेच ह्यामुळे झोपलेले असताना बाळाला उठून बसण्यास मदत होईल
आपल्या राजकुमारीला गेम्स, बोलणे, गाणे आणि कोणत्याही प्रकारच्या ध्वनी समाविष्ट असलेले खेळ देखील आवडतील . तुम्ही प्राण्यांचे आवाज काढू शकता आणि त्याच वेळी तिला हसवण्यासाठी आणि शिकवण्यासाठी त्यांचे चित्रे दाखवू शकता. बाळ कदाचित या मजेदार खेळासोबत तुमची नक्कल करण्यास देखील सुरवात करेल
फिंगर पपेट्स हा आणखी एक चांगला पर्याय आहे. लहान मुले खरोखरच बोटांच्या कठपुतळीचा आनंद घेतात. बाळ ह्या खेळात सक्रिय सहभाग घेताना तुम्हाला दिसेल
विकासातील विलंब ओळखणे
प्रत्येक बाळ अद्वितीय आहे आणि ते त्याच्या स्वत: च्या वेगाने वाढते. बर्याच प्रकरणांमध्ये, बाळाची वाढ आणि विकास मंद असतो परंतु सामान्य असतो. तर तुमच्या २४ आठवड्यांच्या बाळाने सामान्य शारीरिक टप्पे साध्य न केल्यास तुम्हाला काळजी करण्याची आवश्यकता नाही.
जर तुमच्या बाळाचा जन्म गर्भधारणेच्या ३७ आठवड्यांपूर्वी म्हणजेच अकाली जन्म झाला असेल तर, इतर मुले करू शकत असलेल्या गोष्टी करण्यापूर्वी त्याला थोडा जास्त वेळ लागेल. अकाली जन्मलेल्या बाळांना दुहेरी तारखा दिल्या जातात, एक कालक्रमानुसार वय जे बाळाच्या जन्मदिनांकानुसार निश्चित केले जाते आणि दुसरे म्हणजे सुधारित वय जे बाळाच्या वास्तविक तारखेनुसार निश्चित केले जाते. म्हणूनच तुम्ही तुमच्या बाळाच्या विकासाचे टप्पे बाळाच्या वास्तविक वयापासून मोजणे आवश्यक आहे, त्याच्या जन्मतारखेनुसार नव्हे.
डॉक्टरांचा सल्ला कधी घ्यावा
अनियंत्रित रडणे, जास्त ताप येणे, खेळण्यात रस नसणे आणि पूर्वीसारखे सक्रिय नसणे असे काही असामान्य वर्तनात्मक बदल आढळल्यास डॉक्टरांचा सल्ला घ्या. आहारातील बदलांमुळे बाळाला अतिसाराचा त्रास होऊ शकतो, अशा वेळी डॉक्टरांचा सल्ला घेणे चांगले. ही चिन्हे दात येणे किंवा अगदी सामान्य असलेल्या गोष्टींशी संबंधित असू शकतात किंवा नसू शकतात, परंतु डॉक्टरांशी योग्य चर्चा करणे अधिक चांगले आहे.
आपल्या छोट्या राजकुमारीबरोबरचे बंध मजबूत होण्याची ही सर्वोत्तम वेळ आहे. म्हणून आपल्या कुटुंबासोबत फक्त ह्या खास क्षणांचा आनंद घ्या. हे अमूल्य क्षण जपून ठेवा. हेच क्षण येत्या काही वर्षांत खजिना म्हणून काम करतील. पालकत्वाच्या शुभेच्छा!!
मागील आठवडा: तुमचे २३ आठवड्यांचे बाळ: विकास, वाढीचे टप्पे आणि काळजी
पुढील आठवडा: तुमचे २५ आठवड्यांचे बाळ – विकास, वाढीचे टप्पे आणि काळजी
 
 


 
				    		 
				    		 
				    		 
				    		 
				    		 
				    		 
				    		 
				    		 
				    		 
				    		 
				    		 
				    		 
				    		 
				    		 
				    		 
				    		 
				    		 
				    		 
                                         
                                         
                                         
                                         
                                         
                                     
                                         
                                         
                                        