In this Article
- २२ आठवड्यांच्या बाळाचा विकास
- २२ आठवड्यांच्या बाळाचे विकासाचे टप्पे
- २२ आठवड्यांच्या बाळाच्या आहाराविषयी आढावा
- २२ आठवड्यांच्या बाळाच्या झोपेविषयीचा आढावा
- २२ आठवड्यांच्या बाळाची काळजी घेण्यासाठी काही टिप्स
- २२ आठवड्यांच्या बाळासाठी चाचण्या आणि लसीकरण
- २२ आठवड्यांच्या बाळासाठी खेळ आणि क्रियाकलाप
- डॉक्टरांचा सल्ला कधी घ्यावा?
बाळंतपणानंतरच्या प्रत्येक आठवड्यानंतर एक नवीन कथा उलगडते. बाळ वाढीची चिन्हे दर्शवेल आणि प्रत्येकाचे मन जिंकेल. एका विशिष्ट टप्प्यावर, आपले बाळ हालचाल करण्यास सक्षम असेल, आणि त्याच्या सभोवतालच्या जगाविषयी देखील त्याला चांगले समजू लागेल. तथापि, हे लक्षात ठेवा की विकासात्मक टप्पे मार्गदर्शक असतात आणि बाळाच्या वाढीसाठी त्या विशिष्ट योजना नसतात. विकासात्मक टप्पे थोडे लवकर किंवा थोडे उशीरा येऊ शकतात, परंतु ते निश्चितपणे येतात. या लेखात, आम्ही २२ आठवड्यांच्या बाळाच्या सर्व विकासाच्या महत्त्वाच्या टप्प्यांविषयी बोलणार आहोत. अधिक जाणून घेण्यासाठी वाचा.
२२ आठवड्यांच्या बाळाचा विकास
आतापर्यंत, तुमच्या २२ आठवड्यांच्या बाळाची नक्कीच वाढ झालेली असेल. पाच महिन्यांपूर्वी घरी आलेले बाळ आता खूप वेगळे असेल. या काळात, बहुतेक बाळे आजूबाजूला फिरण्याचा प्रयत्न करतात आणि अधिक सक्रिय राहतात. ह्यामध्ये पोटावर पालथे पडणे, जमिनीवर रांगणे इत्यादींचा समावेश होतो. जर तुमचे बाळ रांगत असेल तर आपण जमिनीवरच्या वस्तूंबाबत सावधगिरी बाळगणे आवश्यक आहे कारण त्या वस्तू थेट तोंडात घालण्याची बाळांची प्रवृत्ती असते आणि त्यामुळे बाळांना हानी पोहचू शकते.
शारीरिक वाढीच्या बाबतीत, २२ व्या आठवड्यात तुमच्या बाळाचे वजन जन्माच्या वेळच्या वजनापेक्षा जास्त असेल. तुमचे बाळ कदाचित बोटांनी वस्तू हलवू शकेल आणि दुधाच्या बाटलीसारख्या वस्तू धरू शकेल. बाळाच्या मेंदूचा विकास झपाट्याने होऊ लागेल आणि सभोवतालच्या वातावरणाविषयी बाळ अधिक जागरूक होईल. सजीव आणि निर्जीव गोष्टींमध्ये अस्पष्टपणे फरक करण्याची त्याला समज येईल. ह्या काळात आपले घर बेबी प्रूफ करण्याची ही एक चांगली वेळ आहे. तुमच्या बाळाला मूड सविंग्स सुद्धा येऊ लागतील. एक क्षणात रडणारे बाळ पुढचा क्षणाला हसू लागेल.
२२ आठवड्यांच्या बाळाचे विकासाचे टप्पे पाहूयात.
२२ आठवड्यांच्या बाळाचे विकासाचे टप्पे
२२ आठवड्यांचे बाळ अधिक सक्रिय आणि उत्साही आहे. या काळातील त्याचे विकासाचे टप्पे खालीलप्रमाणे आहेत –
- या कालावधीत, तुमचे बाळ त्याच्या पुढे असलेल्या वस्तू बोटाने पुढे ढकलण्यास सक्षम असले पाहिजे
- वस्तू घेणे हे सुद्धा बाळासाठी सामान्य बनते परंतु बाळ स्वतःचे स्वतः खाऊ शकत नाही
- जर तुम्ही तुमच्या बाळास आईच्या दुधाशिवाय काही वेगळ्या पदार्थांचा परिचय दिला असेल तर तो कदाचित त्यातील एक छोटासा तुकडा घेईल आणि तो खाण्यासाठी स्वतःच्या तोंडाजवळ आणू शकेल
- बाळ जास्त हालचाल करेल आणि नेहमीच सक्रिय राहील
- तुमच्या बाळास वेगवेगळे आवाज काढायला आवडतील. बाळ त्याच्या हातात येईल त्या वस्तू फेकेल, हलवून पाहिल किंवा त्यावर थाप मारून बघेल जेणेकरून त्याला वेगवेगळे आवाज ऐकू येतील.
मूल जसजसे वाढत जाते तसतसे त्याच्या आहार आणि झोपेच्या सवयी देखील बदलतात. आपण ह्या वर खालील प्रमाणे चर्चा करू
२२ आठवड्यांच्या बाळाच्या आहाराविषयी आढावा
जर तुमच्या बाळाला कदाचित जास्त भूक लागत असेल तर तुम्हाला त्याला घन पदार्थ देण्याचा मोह होऊ शकेल, तरीही स्तनपानास प्रथम प्राधान्य देणे महत्वाचे आहे. स्तनपानामध्ये मेंदू आणि स्नायूंच्या विकासासाठी बाळाला आवश्यक असलेल्या पोषक तत्वांचे योग्य संतुलन असते. घन पदार्थ पचवू शकेल इतकी बाळाची पचनसंस्था मजबूत नसते. आईच्या दुधात लेप्टिन, अडीपोनेक्टिन आणि कोलेसिस्टोकिनिन सारखे हार्मोन्स असतात जे चयापचय आणि भूक नियंत्रित करण्यास मदत करतात आणि पचन सहजतेने होण्यास मदत करतात. हार्मोन्स देखील बाळास चांगली झोप येण्यास मदत करतात.
२२ आठवड्यांच्या बाळाच्या झोपेविषयीचा आढावा
आपले बाळ आता रांगण्याचा पूर्व अवस्थेत आहे. तथापि, कदाचित तो एका महिन्यापूर्वीच रांगायला लागला असेल. कोणत्याही परिस्थितीत, याचा अर्थ असा आहे की आता तुमचे बाळ झोपेतून जागे होण्याची अधिक शक्यता असते, म्हणूनच तुमच्या झोपेत खूप जास्त व्यत्यय येतील. तथापि, तुमच्या २२ आठवड्यांच्या बाळाच्या झोपेचे तास अजूनही समानच आहेत. या कालावधीत, रांगण्यासाठी बाळाचे स्नायू तयार आणि मजबूत होत आहेत. त्यासाठी तयारी म्हणून त्या क्रियांचा सराव समाविष्ट आहे आणि यापैकी बहुतेक सराव जेव्हा बाळ झोपतो तेव्हाच केला जातो. म्हणूनच, जेव्हा बाळाचे पालक जागे होतात तेव्हा बाळ पूर्णपणे भिन्न स्थितीत स्थितीत झोपलेला दिसतो आणि ते सामान्य आहे. तुमचे बाळ कदाचित मधेच जागे होईल आणि पुन्हा झोपी जाण्यासाठी त्याला आधाराची गरज भासू शकेल.
हालचालीच्या (रांगणे, बसणे, उभे राहणे) प्रत्येक मोठ्या विकासाच्या टप्प्याआधी झोपेचा व्यत्यय उद्भवतो. त्यामुळे, पुढील काही महिने पालकांना रात्रीची झोप नीट न मिळणे हे नक्की. काही पालक या काळात बाळासह झोपायचा प्रयत्न करतात जेणेकरून व्यत्यय कमी होईल आणि प्रत्येकाला चांगली झोप मिळेल.
जेव्हा बाळे २२ आठवड्यांची होतात तेव्हा पालकांनी काळजी घेतली पाहिजे अशा गोष्टी खाली सविस्तरपणे दिलेल्या आहेत.
२२ आठवड्यांच्या बाळाची काळजी घेण्यासाठी काही टिप्स
आपण वापरू शकता अशा काही बाळांची काळजी घेण्याविषयी सूचना येथे दिलेल्या आहेत जेणेकरून तुमच्यासाठी आणि तुमच्या बाळासाठी हा कालावधी सोपा होईल.
- बाळ व्यस्त राहू शकेल असे काहीतरी सतत तयार ठेवा. एखादे चावता येणारे खेळणे किंवा बाऊन्सी सीटचा वापर तुम्ही ह्यासाठी करू शकता. ह्यामुळे तुम्हाला जेव्हा गरज असेल तेव्हा बाळाची काळजी घेण्यापासून थोडा ब्रेक मिळण्यास मदत होऊ शकेल
- तुमच्यामध्ये आणि बाळामध्ये बंध निर्माण होणे चांगले आहे, पण तुम्ही सतत बाळाच्या जवळ असले पाहिजे हि बाळाची अपेक्षा योग्य नाही. जेव्हा बाळ थकलेले आहे असे तुम्हाला वाटत असेल तर त्याला झोपवा
- आपले घर शक्य तितक्या लवकर बेबी–प्रूफ करा आणि त्यासाठी बाळाच्या पाळण्याच्या किंवा क्रिबच्या जवळ असलेल्या गोष्टींपासून सुरुवात करा
- तुमच्या २२ आठवड्यांच्या बाळाचे लसीकरण व चाचण्या करा. आम्ही खाली काही लसीकरण तपशील सामायिक केले आहेत
- जरी बाळाच्या झोपेच्या वेळा थोड्या विस्कळीत झालेल्या असल्या तरी बाळाला पुरेशी झोप मिळेल असे रुटीन तयार करा
- बाळाला घराबाहेर फिरायला नेणे टाळू नका कारण सर्वसाधारणपणे त्याच्या दृष्टी आणि आरोग्यासाठी हे आवश्यक आहे
- आपल्या बाळाला मोटर कौशल्यांचा अभ्यास करण्यास शिकवणे आणि त्याला स्वावलंबी बनवण्याचा हा एक उत्कृष्ट मार्ग म्हणजे बाळाला फिंगर फूड देणे होय
२२ आठवड्यांच्या बाळासाठी चाचण्या आणि लसीकरण
तुमच्या बालरोगतज्ज्ञांनी तुमच्या बाळासाठी ६ महिन्यांचे चेकअप शेड्यूल केले आहे, जे आणखी दोन आठवड्यात होईल. यावेळेस हेपेटायटीस बी, डिप्थीरिया, टिटॅनस आणि डांग्या खोकला इत्यादींच्या लसी दिल्या जातील. पीसीव्ही बाळाला मेंदूत येणारा दाह, कानाचे संक्रमण आणि न्यूमोनियापासून संरक्षण देते. स्टमक फ्लूसाठी, तोंडी रोटाव्हायरस लस दिली जाते. एचआयबी लस हीमोफिलस इन्फ्लूएंझा प्रकारच्या बी बॅक्टेरियांचा मुकाबला करण्यासाठी असते, ह्या जिवाणूंमुळे मुलांना एपिग्लोटायटीस किंवा न्यूमोनिया होऊ शकतो. ह्या पैकी कुठलीही लस द्यायची राहिल्यास ती पूर्ण केल्याची खात्री करा यावेळी आपण आपल्या डॉक्टरांशी फ्लूच्या लसीकरणाबद्दल देखील चर्चा करू शकता.
लसींच्या संभाव्य दुष्परिणामांमध्ये फक्त पुरळ आणि ताप यांचा समावेश आहे, म्हणून लसी न घेण्याचा धोका या लहान, बिनमहत्त्वाच्या लक्षणांपेक्षा जास्त आहे. अधिक प्रश्नांसाठी, बालरोग तज्ञांचा सल्ला घ्या.
संपूर्ण वाढीसाठी, तुमच्या २२ आठवड्यांच्या बाळाला बर्याच प्रमाणात क्रियाकलापांची आवश्यकता असेल. तुमचे बाळ शारीरिक आणि मानसिक दृष्ट्या तंदुरुस्त होण्यासाठी आणि विकासाच्या पुढच्या टप्प्यांसाठी तयार होण्यासाठी खाली दिलेले गेम्स आणि क्रियाकलापांचा समावेश करा.
२२ आठवड्यांच्या बाळासाठी खेळ आणि क्रियाकलाप
तुमच्या बाळाचे मोटर आणि संज्ञानात्मक कौशल्ये सुधारण्यासाठी या आठवड्यात तुम्ही काही खेळांची निवड करू शकता.
१. माझा टेडी कुठे आहे?
या खेळातून बाळाला त्याच्या आवडत्या टेडी बियरचा वापर करून त्याच्या आजूबाजूच्या जगाविषयी समजण्याची भावना सुधारते. टेडीच्या भोवती तुम्हाला कपड्यांचे किमान पाच थर किंवा पिशव्या हळूवारपणे गुंडाळणे आवश्यक आहे. मग, प्रत्येक थर बाजूला करून टेडी कुठे आहे ते विचारा आणि शेवटी सर्वात आतील पिशवीमध्ये टेडी सापडल्यावर बाळाला आनंद झाल्याचे पहा.
२. ट्रेझर हंट
हा खेळ खूप सोपा आहे आणि यामुळे मुलाची उत्तम मोटर कौशल्ये विकसित करण्यात मदत होते. जेव्हा तुम्ही घराबाहेर किंवा विशेष ठिकाणी जाता तेव्हा तुमच्या सोबत एक लहान टोपली घेऊन जा. जेव्हा तुम्ही एखादे सुंदर फुल पाहता ते बाळाला दाखवा. मग, त्याच्या समोर ते बास्केटमध्ये ठेवा. खूपच लवकरच,बाळ त्याला पाहिजे असलेल्या वस्तूंकडे बोट दाखवण्यास सुरवात करेल. त्या वस्तू संकलित करण्याचा प्रयत्न करा. कोणत्याही विषारी किंवा घशात अडकतील अशा काही गोष्टीपासून दूर राहण्याचे लक्षात ठेवा ज्यामुळे बाळाला त्रास होऊ शकेल. एकदा घरी आल्यावर तुमच्या बाळाला या वस्तूंबरोबर खेळू द्या आणि त्याच्या आवडीच्या वस्तू रेफ्रिजरेटरवर लावा.
३. ड्रॉप आणि पीक
आपल्या २२ आठवड्यांच्या मुलाची उत्सुकता आणि मोटर कौशल्याना ह्या खेळामुळे चालना मिळू शकते. आपल्या बाळाची दोन खेळणी घ्या आणि त्याच्या खेळण्याच्या जागेत जमिनीवर ठेवा. त्यानंतर, त्याला खेळणी निवडण्यास व टाकण्यास प्रोत्साहित करा आणि त्यांना पुन्हा उचलून घ्या. या क्रियेतून, तो खेळणी टाकताना किंवा किंचित फेकताना त्याचे डोळे, पकड आणि मनगट यांना व्यायाम मिळेल. बाळाला वेगळे वाटण्यासाठी तुम्ही बाळाला उंच खुर्चीवर बसू शकता
४. खेळणी पकडा
तुमचे मूल पोटावर पालथे पडू शकते किंवा काही प्रयत्नानंतर रांगू सुद्धा शकते. तुम्ही तुमच्या बाळाला जमिनीवर पोटावर पालथे झोपवून त्याचे आवडते खेळणे काही इंच अंतरावर ठेवू शकता. मग, त्यास त्या खेळण्याकडे जाण्यासाठी उद्युक्त करा परंतु तो असे करत नसेल तर काळजी करू नका. त्याला पोटावर झोपण्याच्या वेळेचा आनंद घेऊ द्या. आपले छोटे बाळ जो पर्यंत खेळण्यापर्यंत पोचत नाही तोपर्यंत दररोज क्रियाकलापांची पुनरावृत्ती करत रहा.
बहुतेक पालकांचा असा दुसरा सामान्य प्रश्न असतो आणि तो म्हणजे डॉक्टरांना केव्हा भेटले पाहिजे? कारण बहुतेक वेळा मासिक भेटीचे वेळापत्रक असते आणि त्या वेळापत्रकाव्यतिरिक्त डॉक्टरांना भेटण्याची आवश्यकता नसते. तथापि, काही वेळा बाळाच्या आरोग्यासाठी डॉक्टरांना त्वरित भेट द्यावी लागते त्याबद्दल थोडेसे बोलूया.
डॉक्टरांचा सल्ला कधी घ्यावा?
पालक म्हणून, आपल्या अंतःप्रेरणेवर आपल्या लॉजिकपेक्षा जास्त विश्वास ठेवणे आवश्यक आहे. बाळाचे काहीतरी बिनसले आहे, बाळाच्या क्रियांमध्ये किंवा वर्तणुकीत बदल आहे असे जाणवले तर डॉक्टरांची भेट घेणे चांगले. जर लसीकरणाची कोणतीही लक्षणे बरीच काळ टिकली असतील किंवा बाळाने चुकीची गोष्ट गिळली असेल तर आपण लवकरात लवकर डॉक्टरकडे जावे.
पालकत्व ही एक अद्भुत गोष्ट आहे आणि आपल्या बाळाची देखभाल करणे ही एक कठीण परीक्षा असू शकते, परंतु आपल्याला दीर्घकाळापर्यंत जे समाधान मिळते ते अधिक महत्वाचे असते. या काळात त्यास
हालचाल करू द्या, परंतु बाळाविषयी जराही काही वेगळे वाटल्यास आपल्या डॉक्टरांना त्वरीत भेट द्या.
मागील आठवडा: तुमचे २१ आठवड्याचे बाळ: विकास, वाढीचे टप्पे आणि काळजीविषयक
पुढील आठवडा: तुमचे २३ आठवड्यांचे बाळ: विकास, वाढीचे टप्पे आणि काळजी