In this Article
बाळ चार महिन्यांचे झाल्याबद्दल तुम्हाला शुभेच्छा! तुमचे लहान बाळ आता १६ आठवड्यांचे झाले आहे आणि तुमचे बाळ छान छान आवाज बाळ काढत असेल कदाचित तुम्ही ते ऐकले असतील. सुरुवातीला, आपल्या लहान बाळाची काळजी घेणे आणि त्याला हातात घेणे देखील तुम्हाला खरोखर एक कठीण काम वाटले असेल, परंतु आम्हाला माहित आहे की तुम्ही सगळे नीट पार पाडत आहात!. आतापासून, तुमचे बाळ विकासाचे विविध टप्पे गाठण्यास सुरुवात करेल. या टप्प्यावर त्याची शारीरिक आणि मानसिक वाढ वेगाने होईल आणि इतर गोष्टींबरोबरच त्याचा संवाद (म्हणजेच वेगवेगळे आवाज काढणे) सर्वात जास्त विकसित झालेला असेल. आपण त्याच्या वाढीच्या प्रत्येक टप्प्यातील छोटेसे विजय साजरे केले पाहिजेत. इतर महत्त्वपूर्ण विकास आणि वाढीचे महत्वाचे टप्पे जसे की बोलणे, शारीरिक वाढ इत्यादींचा मागोवा घेण्याची ही वेळ आहे.
तुमच्या १६ आठवड्याच्या बाळाचा विकास
तुमच्या १६ आठवड्यांच्या बाळाच्या वाढीची चिन्हे पूर्वीपेक्षा अधिक स्पष्ट असतील कारण हा आठवडा शारीरिक आणि मानसिक विकासाची वेगवान चिन्हे दर्शवितो. तुमच्या बाळामध्ये विकासाची लक्षणे लक्षात येतील ती म्हणजे त्याच्या हालचाली करण्याची क्षमता आणि हातापायांवरील नियंत्रण. शरीर पुढे वाकवून खेळणी घेणे आणि दोन्ही हातांनी खेळणी धरून ठेवणे किंवा खेळण्यांभोवती फिरणे ही तुम्हाला लक्षात येऊ शकतील अशी विकासाची काही चिन्हे आहेत. ह्या वयात, आपल्या लहान बाळाने त्याचे हात कसे वापरायचे हे समजून घेतले पाहिजे.
बाळाने मान धरण्याबाबतची तुमची सर्व भीती कमी होईल कारण बाळ आता आपली मान योग्य प्रकारे धरु शकेल. आपल्या देखरेखीखाली पोटावर झोपण्याच्या वेळेचा आनंद घेत असताना, तो मान वर काढण्याचा प्रयत्न करेल आणि पुढे पाहील. यामुळे त्याला पुढे जाण्यासाठी आणि रांगण्यासाठी हात व पाय पुढे ढकलण्याची प्रेरणा मिळू शकते.
काही बाळांना लवकर दात येण्यास सुरुवात होते. जर तुमचा बाळ त्यापैकी एक असेल तर तुम्हाला त्याचा पहिला दात हळूहळू हिरडीच्या पृष्ठभागावर वाढत असल्याची काही चिन्हे दिसतील. बाळ सर्व काही त्याच्या तोंडात घालण्याचा प्रयत्न करेल आणि ते चावण्याचा प्रयत्न करेल.
बाळाला स्तनपान द्यायला उठावे लागत असल्यामुळे तुमची रात्रीची झोप होत नाही. परंतु बाळ आता जवळजवळ ८ तास शांत झोपू लागल्यामुळे तुम्हाला विश्रांतीसाठी पुरेसा वेळ मिळेल आणि दिवसाचा उत्साह वाढेल.
जेव्हा बाळाला दूध देण्याची वेळ येते, ती वेळ बाळाला समजण्यास सुरुवात होईल. तेव्हा किंवा दिवसाच्या एखाद्या विशिष्ट वेळी बाळ आपल्याकडे पाहील. स्वत: च्या सोयीसाठी बाटली त्याच्या हातात धरायची इच्छा बाळाला होईल किंवा एखाद्या विशिष्ट पद्धतीने बाळ तुमचे स्तन धरेल.
ह्या वयात बाळाची संवाद साधण्याची कला आणि समज देखील मोठ्या प्रमाणात वाढते. हलणाऱ्या वस्तूंचा मागोवा घेणे तुमच्या लहान बाळाला आता सोपे जाईल. बाळ कोणत्या प्रकारे रडल्यावर त्याच्याकडे त्वरित पोहोचले पाहिजे आणि त्याला काय हवे आहे हे तुम्हाला समजू लागेल. तुमचे बाळही हुशार असेल,. म्हणूनच कदाचित काही तरी हवे म्हणून तुम्हाला बोलावण्यासाठी ते सतत रडत राहील आणि अचानक दुसऱ्याशी संवाद साधताना लगेच हसण्यास सुरुवात करेल.
पालथे पडणे त्याच्यासाठी नवीन शोध बनेल – हा क्रियाकलाप त्याला समजू लागेल आणि ते करण्यासाठी त्याच्याकडे ताकद असेल. त्यामुळे जेव्हा बाळ तुमच्या पलंगावर किंवा कोणत्याही उंचावरील पृष्ठभागावर असेल तेव्हा आपल्या बाळावर लक्ष ठेवले पाहिजे. त्यावर सर्वात उत्तम उपाय म्हणजे चटईवर मऊ कापड पसरवून तुमच्या बाळाला जमिनीवर फिरत राहू देणे सर्वात उत्तम आहे.
तुमच्या १६ आठवड्यांच्या बाळाचे विकासाचे टप्पे
आपल्या बाळामध्ये आपण शोधले पाहिजे असे काही टप्पे येथे आहेत.
- या वयात, आपल्या लहान बाळाने सरळ बसून व्यवस्थितपणे मान धरायला हवी. हे सर्व जवळ्जवळ १० मिनिटे टिकले पाहिजे
- बाळाचे नुसते गालातल्या गालात हसणे आता मोठ्याने हसण्यात रूपांतरित होईल कारण तो भावनांचा आनंद घेऊ लागेल
- तुम्ही घरामध्ये फिरत असताना, बाळ आपल्या हालचालींचे अनुसरण करण्यास सुरवात करेल
- सर्वात महत्त्वाचे म्हणजे तुमचे बाळ रात्री खूप वेळ झोपत असल्यामुळे तुम्हाला आवश्यक ती इच्छित रात्रीची झोप मिळेल
- बाळ अंघोळीच्या वेळेला जेव्हा पाणी उडवते तेव्हा हलणाऱ्या वस्तूंचा मागोवा घेणे तसेच हातांचा समन्वय वाढलेला तुम्हाला दिसेल
- बाटल्या किंवा स्तनाग्रांद्वारे दूध प्यायल्यानंतर बाळ चमच्याने देखील दूध घेऊ शकेल
- जेव्हा तुम्ही त्याचे पाय वाकवून त्याला सायकल चालवण्याचा व्यायाम करण्यास मदत करता तेव्हा आपले पाय गुडघ्यांपर्यंत कसे वाकले ह्या नवीन शोधामध्ये बाळ स्वत: ला गुंतवून ठेवेल
- जेव्हा आपण बागेत किंवा उद्यानात फिरता तेव्हा त्याचे डोळे आणि कान बरेच तीक्ष्ण असतील आणि प्रतिसाद देतील
- आपले लहान बाळ आता वस्तू घट्टपणे धरून ठेवण्यासाठी त्याच्या मुठीचा वापर करेल किंवा दोन्ही हात एकत्र ठेवण्यासाठी आणि वस्तू दाबण्यासाठी त्याचा वापर करेल
बाळाला दूध देणे
नवीन माता पुन्हा त्यांच्या ऑफिसला जाण्यास सुरुवात करू शकतात, म्हणजेच जर त्या प्रसूतीच्या रजेवर असतील तर त्या ऑफिसला जाण्यास प्रारंभ करू शकतात. तुम्हाला बाळासाठी दुधाचा किंवा फॉर्मुल्याचा पुरेसा पुरवठा करावा लागेल. सामान्यतः बहुतेक स्त्रियांना बाळांना घनपदार्थांची ओळख करून देण्याचा सल्ला दिला जातो. तथापि, संशोधनाने हे निश्चितपणे सिद्ध केले आहे की आईचे दूध बाळासाठी खूप पौष्टिक आणि महत्वाचा आहार आहे आणि तो कमीत कमी एक वर्षभर बाळाला दिला पाहिजे. तुम्ही चमच्याने बाळाला थोडे दूध किंवा फॉर्म्युला देण्याचा प्रयत्न करू शकता. हे त्याच्या तोंडाच्या स्नायूंचा व्यायाम करण्यात मदत करेल आणि त्याला भिन्न खाद्य शैलीची सवय लावेल. तो कदाचित अधीर होऊ शकेल कारण त्याला तुमच्या स्तनातून किंवा बाटलीतून विपुल प्रमाणात दूध पिण्याची सवय असेल. विशिष्ट प्रकरणांमध्ये, डॉक्टर कदाचित घन पदार्थ देण्याची शिफारस करतात. परंतु हा पूर्णपणे तुमचा निर्णय आहे तुम्हाला तसे करायचे असल्यास तुम्ही ते करू शकता. जरी आपण प्रारंभ केला असला तरी, घन पदार्थांच्या आहार थांबविण्यामुळे बाळावर प्रतिकूल परिणाम होणार नाही.
झोप
तुमच्या १६–आठवड्यांच्या बाळाचे झोपेचे वेळापत्रक तुमच्या वेळापत्रकानुसार होईल आणि कदाचित बाळ पूर्णवेळ झोपण्यास सुरुवात करेल, आणि ते आपल्यासाठी आरामदायक ठरेल. या टप्प्यात मेंदू आणि शारीरिक विकास सर्वात वेगाने होत असतो आणि बाळाची बहुतेक वाढ जेव्हा बाळ गाढ झोपेत असते तेव्हा होते. जर दिवसा आपल्या बाळाला योग्य प्रकारे आहार मिळाला नसेल तर, रात्री दूध पिण्यासाठी बाळ पटकन जागे होण्याची शक्यता जास्त असते. भूक लागलेली नसताना सुद्धा बऱ्याच लहान बाळांची रात्री उठण्याची प्रवृत्ती असते. अशा परिस्थितीत, आपल्या बाळाला आपल्या शेजारी झोपविणे फायद्याचे आहे. काही वेळा, कदाचित तुमचे बाळ झोपेतून उठून थोडे वेगवेगळे आवाज करून पुन्हा स्वतःचे स्वतः झोपू शकते. जर बाळाचा आवाज तसाच सुरु राहिला तर आपण त्याला त्वरीत स्तन देऊ शकता. तो झोपेपर्यंत दूध पिणे सुरु ठेवेल.
तुमच्या १६ आठवड्यांच्या बाळाची काळजी घेण्यासाठी काही टिप्स
तुमच्या १६ आठवड्यांच्या बाळाची काळजी घेताना तुम्ही अनुसरण करायला पाहिजे अशा काही टिप्स येथे आहेत.
- बहुतेक माता या वयात आपल्या बाळाला घनपदार्थांची ओळख करून देतात. तुम्हाला तसे वाटत असल्यास तुम्ही देखील ते करू शकता, परंतु बाळाला स्तनपान करणे थांबवू नका. आईचे दूध बाळासाठी खूप पौष्टिक असते, म्हणून आपल्या बाळाला स्तनपान देत रहा
- कधीकधी बाळाला दात येत असल्याने त्याला थोडा त्रास होऊ शकतो आणि त्याला सतत काहीतरी चघळावेसे वाटू शकते. त्यासाठी त्याच्याकडे एक निर्जंतुक केलेले चावता येण्याजोगे खेळणे ठेवा
- तुमच्या बाळाला नियमितपणे जास्त कालावधीसाठी बसू द्या. यामुळे बाळाच्या पाठीमध्ये शक्ती येईल आणि त्याची पाठ आणि पाठीचा कणा मजबूत होईल
चाचण्या आणि लसीकरण
या आधीच्या आठवड्यात मोठ्या प्रमाणात लसीकरण केले जाते. जर त्या सर्वांचे वेळापत्रक पाळले गेले असेल तर या आठवड्यासाठी कोणतेही अतिरिक्त लसीकरण केले जाणार नाही.
आपल्या बाळाला व्यस्त ठेवण्यासाठी खेळ आणि क्रियाकलाप
जर तुमचे बाळ मान धरत असेल आणि स्वतःचे स्वतः दिर्घकाळ बसू शकत असेल तर तुम्ही बाळाला बऱ्याच खेळांमध्ये सामील करून घेऊ शकता. बाळ आजूबाजूला बघू शकते त्यामुळे तुम्ही त्याच्यासाठी साबणाचे फुगे बनवण्यास सुरुवात करू शकता. हे खेळ हॉलमध्ये किंवा बाथरूममध्ये देखील खेळले जाऊ शकतात कारण ह्या खेळामध्ये थोडेसे साबण आणि पाणी असेल. खात्री करा की तुमचे लहान बाळ सीटवर किंवा बेडवर सर्व बाजूंनी व्यवस्थित सुरक्षितपणे बसलेले आहे. मग फुगे फुंकणे सुरू करा आणि ते सर्वत्र तरंगू द्या. तरंगणारे फुगे पाहिल्यामुळे बाळ उत्साही होईल. आपल्या बोटांनी फुगे फोडा किंवा आपल्या हातावर स्थिर होऊ द्या. फुग्यांना स्पर्श केला तरी चालते हे बाळाला समजेल. एकदा असे झाले की, फुग्यांना पकडण्याचा प्रयत्न करण्यापासून बाळाला थांबवण्याची गरज नाही.
आपले बाळ संगीत आणि गाणी ऐकण्याचा सुद्धा आनंद घेईल. या वयात, त्याला काही आवाज देखील आठवतील. म्हणून स्वतःचे गाणे तयार करण्याचा प्रयत्न करा, ज्यामध्ये तुम्ही बाळाचे स्वतःकडे लक्ष वेधण्यास प्रारंभ करा आणि “आई” म्हणा, वडिलांकडे लक्ष वेधून घ्या आणि “बाबा” आहेत असे सांगा. ह्या सोप्या शब्दांमुळे त्याला निरनिराळे लोक समजण्यास मदत होईल.
डॉक्टरांचा सल्ला कधी घ्यावा?
ह्या आठवड्यात बहुतेक बाळांचे वजन वाढते आणि ते अपेक्षित निकषांप्रमाणे असते. तुमच्या बाळाचे वयानुसार वजन वाढत नसल्यास, बाळाच्या बालरोगतज्ञांचा सल्ला घ्या.
त्याशिवाय, जर तुमच्या १६ आठवड्यांच्या बाळाची चिडचिड वाढत राहिली आणि तो आवश्यकतेनुसार झोपत नसेल आणि नीट खात नसेल किंवा आवाजांना प्रतिसाद देत नसेल तर तुम्ही लवकरात लवकर डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.
एकदा तुमच्या बाळाचे वय चार महिन्याचे झाल्यावर, तो जगाचा शोध घेण्यासाठी आणि स्वतःहून नवीन गोष्टी शिकण्यासाठी आणखी उत्कटतेने स्वतःचे पाऊल उचलू शकेल. यामुळे तुम्हाला जितका आनंद होईल तितकीच सावधगिरी तुम्ही बाळगणे महत्वाचे आहे जेणेकरून बाळाला इजा किंवा त्रास होणार नाही. घराच्या सभोवताली काही ठराविक ठिकाणी बेबी प्रूफिंग सुरू करा त्यामुळे बाळाला इजा न होता बाळाची योग्य वाढ होईल.
मागील आठवडा: तुमचे १५ आठवड्यांचे बाळ – विकास, वाढीचे टप्पे आणि काळजी
पुढील आठवडा: तुमचे १७ आठवड्यांचे बाळ – विकास, वाढीचे टप्पे आणि काळजी