Firstcry Parenting
Search
Parenting Firstcry
Home अन्य स्वातंत्र्यदिन २०२२ च्या शुभेच्छा देण्यासाठी कोट्स आणि मेसेजेस

स्वातंत्र्यदिन २०२२ च्या शुभेच्छा देण्यासाठी कोट्स आणि मेसेजेस

स्वातंत्र्यदिन २०२२ च्या शुभेच्छा देण्यासाठी कोट्स आणि मेसेजेस

ब्रिटिश साम्राज्यापासून भारताला स्वातंत्र्य मिळले, त्या स्मरणार्थ १५ ऑगस्ट हा ऐतिहासिक दिवस स्वातंत्र्य दिन म्हणून साजरा केला जातो. अनेक शतकांच्या ब्रिटिश साम्राज्याच्या गुलामगिरीनंतर आणि दीर्घ व कठोर संघर्षानंतर आपल्या देशाला स्वातंत्र्य मिळाले. दरवर्षी १५ ऑगस्ट हा दिवस आपल्या देशात मोठ्या थाटामाटात साजरा केला जातो. अनेक ठिकाणी ध्वजारोहण समारंभ आयोजित केले जातात आणि लोक देशप्रेम व्यक्त करण्यासाठी राष्ट्रगीत गातात.

१५ ऑगस्ट २०२२ रोजी, स्वातंत्र्याची ७५ वर्षे पूर्ण होणार आहेत आणि या निमित्ताने देशभर आनंद साजरा केला जात आहे. त्या अंतर्गत हर घर तिरंगाही एक मोहीम आहे, ह्या मोहिमेअंतर्गत लोकांना तिरंगा घरी आणण्यासाठी आणि भारताच्या स्वातंत्र्याच्या ७५ व्या वर्षाच्या निमित्ताने तो फडकावण्यासाठी प्रोत्साहित केले जात आहे.

ह्या खास प्रसंगी आपल्या मित्रांना आणि कुटुंबातील सदस्यांना तुम्ही घरी बसून शुभेच्छा देऊ शकता.

स्वातंत्र्यदिन साजरा करण्यासाठी शुभेच्छा

1. गे मायभू तुझे मी फेडीन पांग सारे आणीन आरतीला हे सूर्य, चंद्र,तारेस्वातंत्र्यदिनाच्या हार्दिक शुभेच्छा

2. विविधतेमध्ये एकता असलेल्या भारत देशाला सलाम स्वातंत्र्यदिनाच्या खूप शुभेच्छा

3. आमच्या भारत देशाची महान संस्कृती आमच्या हृदयात वसते स्वातंत्र्यदिनाच्या खूप खूप शुभेच्छा

4. अनेक धर्म, जाती, वेश असले तर आम्ही सारे भारतीय एक आहोत स्वातंत्र्यदिनाच्या शुभेच्छा

5. भारतासारख्या समृद्ध देशात जन्म झाला ह्याचा अभिमान बाळगूया, स्वच्छ आणि भ्रष्टाचारमुक्त भारताकडे वाटचाल करूया स्वातंत्र्यदिनाच्या खूप शुभेच्छा

6. हे राष्ट्र देवतांचे, हे राष्ट्र प्रेषितांचे स्वातंत्र्यदिनाच्या खूप शुभेच्छा

7. ह्या भारतात बंधू भाव नित्य वसुदे ह्या मनोकामनेसह तुम्हाला स्वातंत्र्य दिनाच्या खूप शुभेच्छा

8. आभाळी तीन रंगांचे इंद्रधनू ते झळकले, देशासाठी बलिदान दिले त्यांनी मी नतमस्तक झाले स्वातंत्र्यदिनाच्या शुभेच्छा

9. देश हा देव असे माझा स्वातंत्र्यदिनाच्या हार्दिक शुभेच्छा

10. देशभक्तीचे सूर चहूकडे निनादले, शूर वीरांच्या बलिदानाने मन भरून आले स्वातंत्र्यदिनाच्या खूप शुभेच्छा

11. लिहिली स्वातंत्र्याची गाथा ज्यांनी, ठेवितो माथा त्यांच्या चरणी स्वातंत्र्यदिनाच्या खूप खूप शुभेच्छा

12. रंग रूप वेश भाषा अनेक, तरीही सर्व भारतीय एक स्वातंत्र्यदिनाच्या खूप शुभेच्छा

स्वातंत्र्यदिन साजरा करण्यासाठी कोट्स

स्वातंत्र्यदिन साजरा करण्यासाठी कोट्स आणि मेसेजेस

1. स्वतः जगणं व राष्ट्र जगविणं हे आपलं कर्तव्य आहे त्याकरता हिंसा करावी लागली तरी ती पुण्यकारकच होय. – विनायक दामोदर सावरकर

2. एक देव एक देश एक आशा, एक जाती एक जीव एक आशा विनायक दामोदर सावरकर

3. उदात्त ध्येयासाठी केलेलं कोणतेही बलिदान वाया जात नाही. – विनायक दामोदर सावरकर

4. स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध अधिकार आहे आणि मी तो मिळवणारच लोकमान्य टिळक

5. जय जवान जय किसान लाल बहादूर शास्त्री

6. जय हिंद सुभाष चंद्र बोस

7. सत्यमेव जयते मदन मोहन मालवीय

8. तुम मुझे खून दो मैं तुम्ही आजादी सुभाष चंद्र बोस

9. दुश्मनों की गोलियों का हम सामना करेंगे, आजाद है आजादही रहेंगे चंद्रशेखर आजाद

10. सरफरोशी की तमन्ना अब हमारे दिल मैं है रामप्रसाद बिस्मिल

11. ते मला मारू शकतात माझ्या विचारांना नाही भगतसिँग

12. एखाद्या देशाची संस्कृती लोकांच्या अंतःकरणात आणि आत्म्यात असते. – महात्मा गांधी

13. महान कार्ये कधीही सोपे नसतात आणि सहज होणारे कार्ये महान नसतात लोकमान्य टिळक

14. मनाचे स्वातंत्र्य हेच खरे स्वातंत्र्य आहे श्री. बाबासाहेब आंबेडकर

स्वातंत्र्य दिन हा आपल्या भारतासाठी खूप महत्वाचा दिवस आहे. देशभक्तीची भावना खोलवर व्यक्त करण्यासाठी आणि भारतीयांसाठीचा हा विशेष दिवस साजरा करण्यासाठी, आपल्या प्रियजनांना शुभेच्छा संदेश आणि कोट्स पाठवा!

आणखी वाचा:

मुलांसाठी स्वातंत्र्यदिनाच्या भाषणाच्या तयारीसाठी काही टिप्स
तुमच्या मुलांसाठी भारतीय स्वातंत्र्यदिनाविषयी मनोरंजक माहिती

RELATED ARTICLES
MORE FROM AUTHOR
संपादकांची पसंती
Please Wait Updating Your Article