Firstcry Parenting
Search
Parenting Firstcry
Home गर्भधारणा होताना योजना आणि तयारी संतती नियमनाच्या शस्त्रक्रियेनंतर (ट्युबल लिगेशन) गर्भधारणा – हे शक्य आहे का?

संतती नियमनाच्या शस्त्रक्रियेनंतर (ट्युबल लिगेशन) गर्भधारणा – हे शक्य आहे का?

संतती नियमनाच्या शस्त्रक्रियेनंतर (ट्युबल लिगेशन) गर्भधारणा – हे शक्य आहे का?

संतती नियमनाची शस्त्रक्रिया (ट्युबल लिगेशन) ही गर्भधारणा रोखण्यासाठी परिणामकारक पद्धती आहे आणि संतती नियमनाची ही पद्धती कायमसाठी आहे. ह्या प्रक्रियेत बीजवाहिन्या कापून बांधल्या जातात त्यामुळे स्त्रीबीज गर्भाशयात पोहोचत नाही. जरी ही पद्धत कायमसाठी आणि परिणामकारक असली तरीसुद्धा स्त्रीला गर्भधारणा होण्याची शक्यता असते.

संतती नियमनाच्या शस्त्रकिरयेनंतर (ट्युबल लिगेशन) गर्भधारणा होण्याची किती शक्यता असते?

गर्भधारणेस प्रतिबंध घालण्यासाठी संतती नियमनाची शस्त्रक्रिया म्हणजेच ट्युबल लिगेशन ही पद्धती केल्यानंतर अगदी निर्धास्त राहता येऊ शकते. ट्युबल लिगेशनची शस्त्रक्रिया करताना सर्जन बीजवाहिन्या कापून त्या एकमेकांना बांधतात. काही वेळा जर शस्त्रक्रिया चुकीच्या पद्धतीने झाली तर गर्भधारणा राहू शकते. पाच वर्षांनंतर, गर्भवती होण्याची शक्यता वाढते. स्त्रियांमधील संततिनियमनाच्या शस्त्रक्रियेनंतर गर्भधारणा होण्याची शक्यता स्त्रीच्या वयावर अवलंबून असते. जर स्त्रीचे वय २८ वर्षांपेक्षा कमी असेल तर गर्भवती राहण्याची शक्यता ५% असते, तर दुसरीकडे जास्त वयाच्या स्त्रीमध्ये गर्भधारणा होण्याची शक्यता १% इतकी असते. तसेच, जर संततिनियमनाच्या शस्त्रक्रियेनंतर स्त्रीला गर्भधारणा झाली तर एकटोपीक प्रेग्नन्सीचा धोका असतो. एकटोपीक प्रेग्नन्सी म्हणजे आपत्कालीन वैद्यकीय स्थिती असते ज्यामध्ये बीजवाहिनी फुटून खूप जास्त रक्तस्त्राव होण्याची शक्यता असते.

संतती नियमनाची शस्त्रक्रिया (ट्युबल लिगेशन) अयशस्वी होण्याची कारणे

ट्युबल लिगेशन शस्त्रक्रिया अयशस्वी होण्याची कारणे खालीलप्रमाणे आहेत

  • शस्त्रक्रिया करताना तांत्रिक चुका होणे
  • जर बीजवाहिन्या नीट बंद झाल्या नाहीत तर ही शस्त्रक्रिया परिणामकारक होणार नाही
  • पुनर्वापर: बीजवाहिन्या नीट बंद झाल्या नाहीत तर त्या पुन्हा पाहिल्यासारख्या होतात
  • ल्यूटल फेज प्रेग्नन्सी म्हणजेच शस्त्रक्रियेच्या वेळी गर्भधारणा राहिली असेल तर लक्षात येत नाही
  • बीजवाहिन्या शस्त्रक्रियेनंतर नीट भरून आल्या नाहीत तर ट्युबोपेरीटोनिअल फिश्चुला होऊ शकतो

संतती नियमनाची शस्त्रक्रिया (ट्युबल लिगेशन) अयशस्वी होण्याची कारणे

संतती नियमन शस्त्रक्रियेमुळे निर्माण होणारा धोका

बऱ्याचदा ज्या स्त्रीला ही शस्त्रक्रिया करून घ्यायची असते तिची परवानगी असलेला फॉर्म सर्जन भरून घेतात. त्यामध्ये ह्या शस्त्रक्रियेचे धोके दिलेले असतात. ह्या शस्त्रक्रियेनंतर खालील समस्या येऊ शकतात.

  • एकटोपीक प्रेग्नन्सी, ह्यामध्ये स्त्रीबीजाचे फलन गर्भाशयाच्या बाहेर होते
  • रक्तस्त्राव
  • संसर्ग
  • इतर अवयवांना नुकसान पोहचू शकते
  • भूल दिल्यामुळे निर्माण होणारा धोका

ट्युबल लिगेशन शस्त्रक्रियेनंतर गर्भधारणा राहिल्यास त्याची चिन्हे आणि लक्षणे

जर संतती नियमनाच्या शस्त्रक्रियेनंतर बीजवाहिन्यांची पुनर्प्राप्ती झाली तर स्त्रीला गर्भधारणा राहून तिला पूर्ण दिवसांचे गर्भारपण येऊ शकते. शस्त्रक्रियेनंतर जर गर्भधारणा झाली तर त्याचाशी संबंधित लक्षणे खालीलप्रमाणे

  • सतत लघवी होणे
  • पाळी चुकणे
  • स्तन हळुवार किंवा दुखरे होणे
  • थकवा
  • एखादा विशिष्ट पदार्थ खावासा वाटणे
  • मळमळ
  • एखादा पदार्थाचा विचार केला किंवा तो नुसता पहिला तरी मळमळ होणे

ट्युबल लिगेशन शस्त्रक्रियेनंतर गर्भधारणा राहिल्यास त्याची चिन्हे आणि लक्षणे

एकटोपीक प्रेग्नन्सी

नॉर्मल गर्भधारणेमध्ये, फलित झालेले स्त्रीबीज बीजवाहिन्यांमधून गर्भाशयात येते आणि तिथे त्याचे रोपण होते. जर स्त्रीबीजाचे फलन गर्भाशयाच्या बाहेर झाले बऱ्याच वेळा ते बीजवाहिनी मध्ये होते तर त्यास एकटोपीक प्रेग्नंसी म्हणतात. जरी अशी गर्भधारण दुर्मिळ असली तर त्यावर प्राधान्याने उपचार झाले पाहिजे नाहीतर त्यातून आणखी गुंतागुंत निर्माण होते. अशा प्रकारच्या गर्भधारणेला ट्युबल प्रेग्नन्सी असे सुद्धा म्हणतात. स्त्रीची संततिनियमनाची शस्त्रक्रिया झाल्यावर एकटोपीक प्रेग्नन्सी होणे सामान्य आहे.

एकटोपीक प्रेग्नन्सी लक्षणे

नॉर्मल प्रेग्नन्सी व्यतिरिक्त, एकटोपीक प्रेग्नन्सी लक्षणे खालीलप्रमाणे दिसू शकतात

  • योनीमार्गातून हलका रक्तस्त्राव
  • पोटात दुखणे
  • शौचास करताना ओटीपोटावर दाब येणे
  • ओटीपोटात दुखणे
  • खांदे दुखणे
  • डोके हलके होणे
  • योनीमार्गातून खूप जास्त स्त्राव

गुंतागुंत

एकटोपीक प्रेग्नन्सीमुळे खालील गुंतागुंत निर्माण होऊ शकते

  • बीजवाहिन्या फुटणे
  • अंतर्गत रक्तस्त्राव
  • संसर्ग
  • खूप जास्त रक्तस्त्राव
  • जर उपचार वेळेवर मिळाले नाही तर मृत्यू

एकटोपीक गर्भधारणेचा धोका कुणाला जास्त असतो?

जर स्त्रीची आधी संततिनियमनाची शस्त्रक्रिया म्हणजे ट्युबल लिगेशन झाले असेल तरीसुद्धा तिला गर्भधारणा राहू शकते. खालील प्रकरणांमध्ये तिला एकटोपीक गर्भधारणा राहू शकते.

  • जर तिचा प्रेरीत गर्भपात झाला असेल तर
  • जर ती प्रजनसाठी औषधे किंवा उपचार घेत असेल
  • जर तिचे वय ३५ ते ४४ दरम्यान असेल तर
  • जर तिची पूर्वी पोटाची किंवा ओटीपोटाचे शस्त्रक्रिया झाली असेल तर
  • जर तिला पेल्विक इन्फ्लमेटरी डिसीज झाला असेल तर
  • जर तिला एन्डोमेट्रिओसिस असेल तर
  • जर ती धूम्रपान करत असेल तर

संतती नियमनाची शस्त्रक्रिया झाल्यावर गर्भधारणेसाठी काय पर्याय आहेत?

संतती नियमनाची शस्त्रक्रिया केल्यानंतर पुन्हा गर्भधारणा होण्यासाठी खालील पर्याय आहेत ज्याची मदत होऊ शकते

. ट्युबल लिगेशन रिव्हर्सल

ज्या प्रक्रियेद्वारे स्त्रीला तिच्या प्रजनन क्षमतेची पुनर्प्राप्ती होते त्या प्रक्रियेस ट्युबल लिगेशन रिव्हर्सल म्हणतात. ह्या प्रक्रियेदरम्यान, बीजवाहिन्या पुन्हा आधीसारख्या जोडल्या जातात. असे केल्याने स्त्रीबीज बीजवाहिन्यांमधून पुढे सरकते आणि त्यांचा शुक्रजंतूंशी संयोग होतो. जेव्हा बीजवाहिन्यांना कमीत कमी हानी पोहोचलेली असते तेव्हा यशाचा दर जास्त असतो.

. आय. व्ही. एफ.

जर तुमची पूर्वी संतती नियमनाची शस्त्रक्रिया झालेली असेल आणि आता तुम्हाला मूल हवे असेल तर तुम्ही इन व्हिट्रो फर्टिलायझेशनचा विचार करू शकता. इन व्हिट्रो फर्टिलायझेशन मुळे जरी तुमची संतती नियमनाची शस्त्रक्रिया (ट्युबल लिगेशन) झालेली असली तरी सुद्धा तुम्हाला गर्भधारणा होण्यास मदत होते. वैद्यकीय क्षेत्रातील प्रगतीमुळे बऱ्याच स्त्रियांसाठी हा एक सुरक्षित पर्याय आहे.

आय. व्ही. एफ.

. सरोगसी

संतती नियमनाची शस्त्रक्रिया झाल्यानंतर जर एखाद्या स्त्रीला आई व्हायचे असेल तर गॅस्टेशनल सरोगसी केली जाते. अशावेळी, सरोगेट मदर बाळ पोटात वाढवते. ह्या प्रक्रियेत दात्याचे किंवा स्त्रीच्या स्त्रीबीजाचे, वडिलांच्या शुक्रजंतूंशी फलन केले जाते आणि आय. व्ही. एफ. प्रक्रिया करून त्याचे रोपण केले जाते. जर एखाद्या स्त्रीची ट्युबल लिगेशन ची शस्त्रक्रिया झाली असेल तर ती अशा पद्धतीने गॅस्टेशनल सरोगेट होऊ शकते.

जरी संतती नियमनाची शस्त्रक्रिया (ट्युबल लिगेशन) ही गर्भधारणेस प्रतिबंध घालण्यासाठी परिणामकारक पद्धती असली तरी त्यामध्ये धोका असतो आणि ती केल्याने गर्भधारणा होण्यापासून १००% संरक्षण मिळेलच असे नाही. तसेच लैंगिक संबंधांपासून पसणाऱ्या आजारांपासून सुद्धा तुम्हाला संरक्षण मिळत नसल्याने, कॉन्डोम वापरण्याचा सल्ला दिला जातो. जर तुम्हाला ट्युबल लिगेशन विषयी आणि ह्या प्रक्रियेच्या परिणामकतेविषयी काही शंका असतील तर तुमच्या डॉक्टरांशी चर्चा करून खात्री करून घ्या.

आणखी वाचा:

लवकर आणि सहज गर्भधारणेसाठी काय कराल?
गर्भधारणा होण्यासाठी किती कालावधी लागतो?

RELATED ARTICLES
MORE FROM AUTHOR
संपादकांची पसंती
Please Wait Updating Your Article