गर्भारपण

गरोदरपणात योनिकडील भागाला सूज येणे

तुमचे गरोदरपणाचे दिवस भरत आल्यावर तुम्हाला बाळाच्या आगमनाची आतुरता असते. परंतु काही वेळा आरोग्याच्या समस्यांमुळे तुम्हाला तो आनंद घेता येत नाही. गरोदरपणात मॉर्निंग सिकनेस, मळमळ आणि पाठदुखी होणे हे खूप सामान्य आहे. गरोदरपणात योनिमार्गाला सूज देखील येऊ शकते. ही समस्या तुम्हाला अत्यंत अस्वस्थ करू शकते. ह्या लेखात, आपण गरोदरपणातील योनिमार्गाची सूज, त्याची कारणे, लक्षणे आणि त्यावर उपचार करण्याच्या विविध पद्धतींबद्दल चर्चा करणार आहोत.

योनिमार्गाची सूज म्हणजे काय?

योनिमार्गाकडील भागात, वल्व्हा आणि योनिमार्गाच्या ओठांना (लॅबिया) सूज आल्यास त्यास योनिमार्गाची सूज असे म्हणतात. हा त्रास गरोदर स्त्रियांना सुद्धा होतो. त्यामागची काही कारणे पाहू.

गरोदरपणात योनिमार्गाला सूज येणे सामान्य आहे का?

जसजसे तुमच्या पोटाचा आकार वाढत जातो, तसतसे तुमच्या शरीरात बदल देखील होतात. गरोदरपणात योनिमार्गाला सूज येणे हे सामान्य आहे. काळजी करू नका, ह्यामध्ये काळजी करण्यासारखे काहीच नाही. खरं तर, रक्त प्रवाह वाढणे, संप्रेरकांमध्ये बदल होणे आणि ओटीपोटाकडील भागावर दाब वाढणे ह्यासारख्या कारणांमुळे, गरोदरपणात अनेक स्त्रियांच्या योनिमार्गाला काही प्रमाणात सूज येते. हे अगदी त्रासदायक वाटू शकते. परंतु मातृत्वाच्या प्रवासाचा तो एक सामान्य भाग आहे. अर्थात, जर तुम्हाला अत्यंत अस्वस्थता, वेदना किंवा इतर असामान्य लक्षणे जाणवत असतील, तर तुमच्या डॉक्टरांशी लगेच संपर्क साधा.  बहुतेक वेळा, शरीरात एक जीव वाढवताना होणारा तो एक बदल असतो. तुम्ही गरोदरपणात जसे तुमचे वाढलेले पोट, चमकणारी त्वचा स्वीकारता, तसेच ही सूज देखील स्वीकारा. तुम्ही एक चमत्कार घडवत आहात आणि गरोदरपणाचा अनुभव खूप सुंदर आहे.

गरोदरपणात योनीला सूज येण्याची कारणे

गरोदरपणात योनीमार्गाला सूज येण्याची काही कारणे येथे दिलेली आहेत:

1. रक्तप्रवाह वाढणे

गरोदरपणात, वाढत्या गर्भासाठी ओटीपोटाकडील भागात रक्त प्रवाह वाढतो. रक्त प्रवाह वाढल्याने योनिमार्गाला सूज येऊ शकते.

2. स्वच्छता नीट न राखणे

योग्य प्रकारे स्वच्छता न राखल्यामुळे योनीमार्गाला सूज येऊ शकते. जर तुम्ही तुमच्या योनीकडील भागाच्या स्वच्छतेकडे दुर्लक्ष करत असाल, तर ते सूक्ष्मजंतूंचे प्रजनन केंद्र बनू शकते आणि परिणामी सूज येऊन जळजळ होऊ शकते.

3. संप्रेरकांमध्ये होणारे बदल

गरोदरपणात तुमच्या शरीरात विविध बदल होत असतात. संप्रेरकांमध्ये होणारा बदल हा त्यापैकी एक आहे. ह्या संप्रेरकांचा योनीकडील भागावर परिणाम होतो. विविध प्रकारचे जिवाणू आणि विषाणू वाढतात आणि परिणामी सूज येते.

4. ठराविक उत्पादनांचा वापर

काही उत्पादनांच्या वापरामुळे योनिमार्गावर सूज येऊ शकते. ही उत्पादने तुमच्या योनिमार्गात ऍलर्जीची प्रतिक्रिया निर्माण करू शकतात, त्यामुळे जळजळ होते आणि लालसरपणा होतो.

5. लैंगिक संभोग

कधीकधी, लैंगिक संभोगादरम्यान स्नेहन नसणे किंवा दीर्घ संभोगामुळे योनिमार्गावर सूज येऊ शकते.

6. सिस्ट

योनिमार्गातील सिस्टमुळे योनिमार्गावर सूज येऊ शकते. काहीवेळा, ही सिस्ट कर्करोगाची देखील असू शकते.

7. योनिकडील भागात जळजळ

कधीकधी, योनिमार्गाकडील रक्तवाहिन्यांना सूज येऊ शकते. एडेमामुळे द्रव साठून योनीला सूज येऊ शकते.

8. खाण्याच्या सवयी

आश्चर्य वाटेल पण हे खरे आहे. तुमच्या खाण्याच्या सवयी तुमच्या योनीच्या आरोग्यावर परिणाम करू शकतात. जर तुम्ही खूप जंक फूड खाल्ले किंवा अस्वास्थ्यकर अन्न पदार्थांची निवड केली तर त्यामुळे योनिमार्गात संक्रमण होऊन सूज येऊ शकते.

9. बॅक्टेरियल व्हजायनोसिस

बॅक्टेरियल योनिओसिस (BV) मुळे देखील योनिमार्गाला सूज येऊ शकते. ही समस्या आपोआप बरी होऊ शकते. पटकन बरे होण्यासाठी डॊक्टर तुम्हाला प्रतिजैविकांची शिफारस करू शकतात.

10. यीस्ट संसर्ग

योनिमार्गात कॅन्डिडा बुरशीजन्य जिवाणू वाढल्यास, योनिमार्गावर सूज येऊ शकते. जळजळ, लालसरपणा, संभोग आणि लघवी करताना वेदना, त्वचेची जळजळ आणि योनीतून घट्ट स्त्राव ही लक्षणे दिसतात.

चिन्हे आणि लक्षणे

गर्भधारणेदरम्यान योनिमार्गात सूज येण्याची काही लक्षणे आहेत:

योनीला सूज आल्यास त्याचा बाळावर परिणाम होऊ शकतो का?

योनिमार्गाला सूज आल्यास त्याचा गर्भाशयात असलेल्या बाळाला त्रास होत नाही. परंतु, जर तुम्हाला ग्रुप बी स्ट्रेप असलेल्या जिबीएस संसर्गामुळे योनीमार्गात   सूज आली असेल, तर ती तुमच्या बाळापर्यंत पसरू शकते. तुमची चाचणी जीबीएस साठी पॉझिटिव्ह आढळल्यास, तुमचे डॉक्टर संसर्ग बरा करण्यासाठी प्रतिजैविकांचा कोर्स करण्यास सांगतील. परंतु जर तुमच्या बाळाला हा संसर्ग झाला तर बाळाला जन्मानंतर स्तनपान घेण्यास अडचण येऊ शकते.

आपण गर्भवती असताना योनिमार्गाला सूज आल्यास उपचार कसे करावे?

गरोदरपणातील योनी किंवा लेबियल सूज ह्यासाठी इथे काही प्रभावी उपाय दिलेले आहेत.

1. खाजवू नका

तुम्हाला खाज सुटून अस्वस्थ वाटू शकते परंतु तुमच्या योनिमार्गातील कोणतेही फोड किंवा जखम खाजवणे टाळा. खाजवल्यामुळे संसर्ग पसरू शकतो आणि अधिक गुंतागुंत होऊ शकते.

2. स्वच्छता राखा

योनीमार्गाचे संक्रमण वाढू नये म्हणून स्वच्छता राखणे महत्त्वाचे आहे. परंतु, योनीकडील भाग खूप जास्त घासून स्वच्छ करू नका. तिची स्वतःची स्वच्छता यंत्रणा आहे!

3. स्वत: औषधोपचार करू नका

योनिमार्गात सूज येण्‍याची लक्षणे दिसू लागताच तुम्ही वैद्यकीय मदत घ्या. स्वत: च्या मनाने औषधोपचार करू नका. असे केल्यास तुमच्या गरोदरपणात गुंतागुंत निर्माण होऊ शकते. शारीरिक तपासणी केल्यानंतर, तुमचे डॉक्टर प्रतिजैविक लिहून देऊ शकतात.

योनीला सूज आल्यास त्यावर प्रभावी घरगुती उपाय

गरोदरपणात योनीमार्गात खाज सुटणे आणि सूज बरी करण्यासाठी तुम्ही घरगुती उपाय देखील करून पाहू शकता:

1. पाणी प्या

पाणी प्यायल्याने जळजळ कमी होण्यास मदत होते. कारण तुम्ही जितक्या जास्त वेळा बाथरूमला जाता तितके जास्त बॅक्टेरिया तुमच्या शरीरातून बाहेर काढले जातील.

2. कोल्ड पॅक

योनिमार्गाची सूज आणि जळजळ कमी करण्यासाठी तुम्ही कोल्ड पॅक वापरू शकता. तसेच, तुम्ही थंड पाण्याने आंघोळ करू शकता.

3. प्रोबायोटिक्सचे सेवन वाढवा

प्रोबायोटिकचे सेवन वाढवल्याने तुमच्या शरीरातील खराब बॅक्टेरिया आणि यीस्टची वाढ संतुलित होण्यास मदत होऊ शकते. तुम्ही तुमच्या आहारात ताक आणि दही इत्यादींचा समावेश करू शकता.

4. ऍपल सायडर व्हिनेगर

ऍपल सायडर व्हिनेगरमध्ये बॅक्टेरियाच्या वाढीस प्रतिबंध करणारा पदार्थ असतो. योनीची सूज कमी होऊन तुम्हाला बरे वाटण्यासाठी मदत होऊ शकते. तुम्ही बाथटबमध्ये थोडे ऍपल सायडर व्हिनेगर टाकू शकता आणि त्यात 10 ते 15 मिनिटे बसू शकता.

मी डॉक्टरकडे कधी जावे?

खाली दिलेली लक्षणे दिसल्यास तुम्ही डॉक्टरांकडे जावे:

योनिमार्गाची सूज कशी टाळता येईल?

गरोदरपणात योनिमार्गाची सूज टाळण्यासाठी येथे काही टिप्स आहेत:

वारंवार विचारले जाणारे प्रश्न

1. माझ्या योनीला सूज येऊन दुखत असेल तर मी काय करावे?

जर तुमच्या योनीला सूज येऊन वेदना होत असतील तर, उपचार करणे गरजेचे आहे. तुम्ही खालील उपचार करून बघू शकता: लक्षात ठेवा, गरोदरपणात शरीरात खूप बदल होत असतात त्यामुळे अस्वस्थता येऊ शकते. पण तुम्हाला त्रास होत असेल तर मदत घेण्यास संकोच करू नका. काळजी घ्या. तुमचे शरीर (आणि तुमचे बाळ) ह्यासाठी नक्कीच तुमचे आभार मानेल!

2. मी गर्भवती असताना योनीमार्गाला सूज आल्यास तपासणी करणे आवश्यक आहे का?

उशीर होण्यापेक्षा आधीच उपाय केलेले केव्हाही चांगले! गरोदरपणात योनिमार्गाला सूज येणे काही प्रमाणात सामान्य असू शकते. तरीही शरीरात बदल होत असल्यास तुम्ही त्यावर लक्ष ठेवणे गरजेचे आहे आणि तुम्हाला चिंता वाटत असल्यास तुमच्या डॉक्टरांशी बोला. तुमचे डॉक्टर सूज येण्याचे कारण आणि त्यासाठी आवश्यक औषोधोपचारांसाठी तुम्हाला मदत करू शकतील. काही वेळा, योनिमार्गाला सूज येणे हे एखाद्या संसर्गाचे किंवा इतर समस्येचे लक्षण असू शकते. त्यासाठी वैद्यकीय मदत घेणे आवश्यक आहे. गरोदरपणात योनिमार्गाला सूज आल्यामुळे कधीकधी लैंगिक संबंधादरम्यान अस्वस्थता निर्माण होऊन वेदना होतात. म्हणून तपासणी करून घ्या. ह्यामुळे तुम्हाला लैंगिक संबंधादरम्यान आनंद घेता येईल. सारांश सांगायचा तर - गरोदरपणात योनीमार्गाला सूज येणे सामान्य असू शकते, परंतु आपल्या डॉक्टरांशी  कोणत्याही समस्यांबद्दल चर्चा करणे चांगले असते. त्यामुळे गरोदरपणात योनीमार्गाला सूज आल्यास कोणतेही उपचार किंवा पाठपुरावा आवश्यक आहे का हे ठरवण्यासाठी मदत होऊ शकेल. आणि या रोमांचक (परंतु कधीकधी अस्वस्थ!) काळात तुम्हाला अधिक बरे वाटेल. गरोदरपणात योनीमार्गाला सूज आल्यास तो खूप वेदनादायक अनुभव असू शकतो आणि त्यामुळे तुम्हाला अस्वस्थ वाटू शकते. तिसऱ्या त्रैमासिकात योनीमार्गाला सूज आल्यास किंवा खाज सुटत असल्यास सावध राहणे गरजेचे आहे. योग्य काळजी घेऊन वेळेवर वैद्यकीय उपचार घेतल्यास ही स्थिती व्यवस्थापित केली जाऊ शकते आणि टाळता सुद्धा येते! आणखी वाचा: गरोदरपणात योनीला येणारा दुर्गंध: कारणे आणि उपचार प्रेगनेंसी च्या वेळी हलके डाग किंवा योनीमार्गातून रक्तस्त्राव
Published by
मंजिरी एन्डाईत
Last Updated On

Recent Posts

All Rights Reserved