गर्भारपण

गुप्त गर्भारपण – कारणे, लक्षणे आणि ते कसे शोधावे?

काही स्त्रियांना प्रसूती वेदना सुरु होईपर्यंत त्या गर्भवती असल्याचे माहिती नसते, ह्याबद्दल तुम्हाला काही माहिती आहे का? हे सगळे अविश्वसनीय वाटत असले तरी, ही स्थिती तुम्हाला वाटते तितकी असामान्य नाही. गुप्त गरोदरपण असलेल्या स्त्रियांमध्ये गरोदरपणाची लक्षणे अत्यंत सौम्य असतात. ही लक्षणे म्हणजे मॉर्निंग सिकनेस, वजन वाढणे आणि मासिक पाळी चुकणे इत्यादी होत. ह्या लेखामध्ये आपण गुप्त गर्भारपण, त्याची संभाव्य कारणे, गूढ लक्षणे आणि ते शोधण्यासाठी वापरल्या जाणार्‍या पद्धतींविषयी माहिती घेणार आहोत. गुप्त गर्भारपण दुर्मिळ असले तरी, ते मानवी अनुभवांच्या आश्चर्यकारक विविधतेवर प्रकाश टाकतात. गर्भारपणासारख्या महत्वाच्या घटना लपवण्याच्या मानवी शरीराच्या क्षमतेबद्दल ह्या लेखाद्वारे जाणून घेऊयात. चला तर मग गुप्त गर्भारपण म्हणजेच स्टेल्थ प्रेग्नन्सीबद्दल माहिती घेऊया.

गुप्त गर्भारपण (क्रिप्टीक प्रेग्नन्सी) म्हणजे काय?

जेव्हा एखाद्या स्त्रीला तिच्या गर्भारपणाबद्दल माहिती नसते तेव्हा अश्या प्रकारच्या गरोदरपणाला 'गुप्त गर्भारपण' किंवा 'स्टिल्थ प्रेगन्सी ' असे म्हणतात. बहुतेक वेळा, या स्त्रियांना मुले होणार नाहीत असे सांगितले जाते. गुप्त गरोदरपणामध्ये, एचसीजी पातळी कमी असल्याने, गर्भधारणा झालेली आढळून येत नाही.

हे किती सामान्य आहे?

गुप्त गर्भारपण ही काही सामान्य घटना नाही. संशोधनात असे दिसून आले आहे की प्रत्येक 475 गर्भधारणेपैकी अंदाजे 1 गर्भधारणा ही गरोदरपणाच्या 20-आठवड्यापर्यंत लक्षात येत नाही. तसेच आणखी एक दुर्मिळ घटना म्हणजे, प्रत्येक 2,500 गर्भधारणेपैकी अंदाजे 1 गर्भधारणा प्रसूतीची लक्षणे दिसेपर्यंत लक्षात येत नाही.

गुप्त गरोदरपणाची कारणे

गुप्त गर्भारपण का होते याची काही कारणे येथे आहेत:

1. पॉलीसिस्टिक ओव्हेरियन सिंड्रोम (पीसीओएस)

अंडाशयावरील लहान गळूंमुळे स्त्रियांमध्ये हार्मोनल असंतुलन होऊ शकते. पीसीओएस मुळे हार्मोनल असंतुलन आणि अनियमित मासिक पाळी ही परिस्थिती निर्माण होते.

2. प्रसूतीनंतरची गर्भधारणा

प्रसूतीनंतर स्त्री लगेच गर्भवती होण्याची शक्यता असते. अशा परिस्थितीत, मासिक पाळी चुकल्यास ते लक्षात येत नाही. एखादी स्त्री पुन्हा गर्भवती आहे हे समजू शकत नाही

3. रजोनिवृत्तीपूर्व कालावधी (पेरीमेनोपॉज)

पेरीमेनोपॉज ही एक अशी स्थिती आहे ज्यामध्ये स्त्रियांच्या शरीरात रजोनिवृत्तीची लक्षणे दिसतात. ही लक्षणे वजन वाढणे आणि हार्मोनल चढउतार इत्यादी होत. जेव्हा ह्या पेरीमेनोपॉजच्या लक्षणांमुळे स्त्रियांना गर्भधारणा झालेली आहे हे लक्षात येत नाही, तेव्हा त्यास गुप्त गर्भारपण म्हणतात.

4. शरीरातील चरबीचे प्रमाण कमी असणे

रबीची पातळी कमी असलेल्या स्त्रियांच्या शरीरामधील संप्रेरकांच्या पातळीमध्ये चढ-उतार होऊ शकतात आणि त्यामुळे मासिक पाळी चुकते. म्हणून गर्भधारणा झाली आहे हे ओळखणे देखील कठीण होते.

5. जन्म नियंत्रण गोळ्या

ज्या स्त्रिया गर्भनिरोधक गोळ्या घेतात आणि आययुडी वापरतात त्यांना आपल्याला गर्भधारणा होणार नाही ह्याची खात्री असते. परंतु, ह्या गर्भनिरोधक पद्धती 100% यशस्वी असतील ह्याची खात्री देता येत नाही आणि त्याचा परिणाम म्हणून गर्भधारणा होऊ शकतो.

6. ताण

आजकाल आपल्याला कामामुळे किंवा कौटुंबिक समस्यांमुळे खूप तणावाचा सामना करावा लागतो. विशेषत: स्त्रियांमध्ये हार्मोन्सच्या पातळीत चढ-उतार होण्यामागे तणाव हा एक प्रमुख घटक आहे.

गुप्त गर्भारपणाची सामान्य लक्षणे

गुप्त गर्भारपणाची देखील लक्षणे असतात परंतु ती लक्षात येत नाहीत.

ते किती काळ टिकते?

बहुसंख्य स्त्रियांना गरोदरपणाच्या 20 व्या आठवड्याच्या आसपास त्यांच्या गर्भारपणाची जाणीव होते. तरीसुद्धा, संपूर्ण 40 आठवडे होऊन सुद्धा गर्भधारणा झाली आहे हे लक्षात येत नाही. आणि मग प्रसूती कळा सुरु झालेल्या स्त्रियांना आपत्कालीन परिस्थितीत वैद्यकीय मदत घ्यावी लागते.

गुप्त गर्भारपणामुळे गर्भाच्या विकासावर परिणाम होतो का?

बहुतेकवेळा गुप्त गर्भारपण नियमित गर्भारपणाच्या कालावधीपेक्षा जास्त काळ टिकते. त्यामुळे गर्भाच्या विकासावर परिणाम होतो. परंतु हे सत्य नाही. विकासाची गती जरी कमी असली तरी गर्भाचा विकास चांगला होतो. जास्त धूम्रपान आणि मद्यपान यासारख्या सवयींमुळे गर्भाच्या आरोग्यावर अनवधानाने परिणाम होऊ  शकतो.

गुप्त गरोदरपणादरम्यान रक्तस्त्राव होणे किंवा पसिक पाळी येणे

गुप्त गर्भारपणात स्त्रियांना मासिक पाळी येते. परंतु, रक्तस्त्राव कमी कालावधीसाठी होतो. हा रक्तस्त्राव अनियमित आणि अचानक होतो. काही वेळा नुसते हलके डाग पडतात किंवा खूप जास्त रक्तस्त्राव होतो. हा रक्तस्त्राव गुलाबी, लाल, काळा, तपकिरी किंवा अगदी जांभळा असू शकतो. ह्या रक्तस्रावाचे कारण म्हणजे गर्भाशयातील अस्तर काढून टाकले जाते.

गुप्त गर्भारपणात वजन कमी होणे/वाढणे

गुप्त गर्भारपणामध्ये वजन कमी होणे किंवा वाढणे हळूहळू होते. सामान्य गर्भधारणा होत असलेल्या स्त्रीच्या तुलनेत वजन वाढ हळूहळू होते. गर्भावस्थेच्या सुरुवातीच्या काळात नीट जेवण जात नाही त्यामुळे वजन कमी होऊ शकते. एखाद्या स्त्रीला ती गर्भवती आहे हे माहित नसल्यामुळे, ती पौष्टिक आहार घेत नाही.

अल्ट्रासाऊंडमध्ये गुप्त गर्भधारणा आढळून येते का?

अनेक वेळा अल्ट्रासाऊंडमध्येही गुप्त गर्भधारणा आढळून येत नाही. याची काही कारणे खालीलप्रमाणे:

1. गर्भाशय पूर्ववत होणे

ह्या स्थितीमध्ये गर्भाशय एकतर बाजूला किंवा मागे झुकते. त्यामुळे गर्भधारणेच्या सुरुवातीच्या काळात अल्ट्रासाऊंडद्वारे गर्भधारणा झालेली आहे हे ओळखणे कठीण आहे.

2. बायकोर्न्युएट गर्भाशय

बायकोर्न्युएट गर्भाशय ही एक जन्मजात स्थिती आहे. ह्या स्थितीमध्ये गर्भाशय हृदयाच्या आकारासारखे असते. गर्भाशयाला दोन शिंगांसारख्या उतीसुद्धा असतात. ह्या ऊतींच्या भिंतीद्वारे गर्भाशय अंशतः किंवा पूर्णतः विभागलेले असते. यामुळे स्त्रीला गर्भधारणा होणे कठीण होते तसेच गुप्त गर्भधारणेची शक्यता वाढते.

3. स्कार टिश्यू

स्कार टिश्यू मुळे अल्ट्रासाऊंडमध्ये ओटीपोटाकडील भागाचे स्पष्ट चित्र मिळत नाही, कारण ते चाचणीच्या लाटा अवरोधित करते. पोटाच्या शस्त्रक्रियेमुळे किंवा भूतकाळातील अपूर्ण गर्भपातामुळे असामान्य डाग निर्माण होऊ शकतात.

मूत्र आणि रक्त चाचण्या नकारात्मक परिणाम का दर्शवतात?

सामान्य गरोदरपणात,  रक्तातील एचसीजीच्या प्रमाणाच्या आधारावर परिणाम निर्धारित केले जातात. एचसीजी हे गरोदरपणात प्लेसेंटाद्वारे तयार केले गेलेले संप्रेरक आहे. तथापि, गुप्त गर्भधारणेच्या बाबतीत, गर्भाशयाचे अस्तर नियमितपणे शरीरातून काढून टाकले जाते, एचसीजी पातळी वाढू दिली जात नाही. म्हणून, लघवी आणि रक्त चाचण्यांद्वारे गर्भधारणा झाली आहे की नाही हे ओळखले जात नाही.

गुप्त गर्भारपणामध्ये प्रसूती कशी असते?

एकदा बाळ पूर्णपणे विकसित झाले आणि ह्या जगात प्रवेश करण्यास तयार झाले की, गुप्त गर्भारपणातून जात असलेल्या स्त्रीला तीव्र पेटके येतात. बाळाला जन्म कालव्यातून बाहेर ढकलण्यासाठी तिचे गर्भाशयाचे मुख उघडते. जरी गुप्त गर्भधारणेतील प्रसूतीची चिन्हे सामान्य गर्भधारणेसारखीच असली तरी यामुळे मानसिक त्रास देखील होऊ शकतो.

गुप्त गर्भारपणामध्ये प्रसूतीची लक्षणे काय आहेत?

गुप्त गर्भधारणेशी संबंधित काही प्रसूती लक्षणे खालीलप्रमाणे आहेत:

जर एखाद्या स्त्रीची मासिक पाळी चुकली तर तिला गर्भधारणेचा संशय कसा येऊ शकत नाही?

स्त्रियांना मासिक पाळी न येण्याची आणि गर्भधारणेचा संशय न येण्याची अनेक कारणे आहेत. ताणतणाव, पीसीओएस, रजोनिवृत्ती ही पाळी न येण्याची कारणे असू शकतात. तसेच, गुप्त गर्भधारणेमध्ये हलके डाग  किंवा सौम्य रक्त प्रवाह झाल्यास ती मासिक पाळी असल्याचा चुकीचा समज होऊ शकतो.

गुप्त गर्भारपणामध्ये गर्भधारणा चाचणीचे परिणाम नकारात्मक येतात हे कसे शक्य आहे?

सामान्य गर्भारपणात, खूप आधी गर्भधारणा चाचणी घेणे किंवा सूचनांचे पालन न करणे हे नकारात्मक परिणामांचे कारण असू शकते. परंतु, गुप्त गर्भारपणात, नकारात्मक परिणाम एचसीजी (मानवी कोरिओनिक गोनाडोट्रॉपिन) च्या किमान उपस्थितीला कारणीभूत आहे. सामान्यतः, प्लेसेंटा एचसीजी सोडते, जे गर्भाशयाच्या अस्तरातून जाते, जमा होते आणि मूत्र आणि रक्त दोन्ही चाचण्यांमध्ये शोधण्यायोग्य बनते. गुप्त गर्भारपणात, गर्भाशयाचे अस्तर अधूनमधून गळते, त्यामुळे चाचणीचे सकारात्मक परिणाम मिळण्याएवढे एचसीजी तयार होण्यास प्रतिबंध होतो. शिवाय, ज्या व्यक्ती गर्भधारणेची अपेक्षा करत नाहीत त्यांनी गर्भधारणा चाचणी घेण्याची शक्यता नसते. त्यामुळे गुप्त गर्भधारणा ओळखणे कठीण जाते. अपेक्षेचा अभाव अशा परिस्थितीला कारणीभूत ठरतो जेथे अधिक स्पष्ट लक्षणे किंवा वैद्यकीय आणीबाणी सारखी स्थिती लक्षात येईपर्यंत गर्भधारणा झालेली आढळून येत नाही.

गुंतागुंत

गुप्त गर्भधारणेच्या काही समस्या खालीलप्रमाणे:

त्याचा उपचार कसा केला जातो?

स्त्रीला गर्भधारणा झाली आहे हे जेव्हा समजते त्यानुसार गुप्त गर्भारपणाचे व्यवस्थापन केले जाते.  प्रसूती तारीख दूर असल्यास, डॉक्टर चुकवलेल्या प्रसूतीपूर्व काळजीची भरपाई करण्याचा प्रयत्न करतील. ह्यामध्ये विविध घटकांचा समावेश असू शकतो, जसे की:

आपण गुप्त गर्भधारणा कशी रोखू शकता?

तुम्ही विवाहित आणि लैंगिकदृष्ट्या सक्रिय असल्यास, गुप्त गर्भधारणेच्या लक्षणांकडे लक्ष द्या. तुम्हाला तुमच्या ओटीपोटाकडील भागात वेदना होत असल्यास किंवा बदल जाणवत असल्यास, डॉक्टरांचा सल्ला घ्या. जर तुम्हाला तुमची मासिक पाळी नियमितपणे येत नसेल, तर तुमच्या स्त्रीरोगतज्ञाना या स्थितीबद्दल कळवा आणि स्वतःची तपासणी करा.

वारंवार विचारले जाणारे प्रश्न

1. गुप्त गरोदरपणात बाळाची हालचाल कशी होते?

गुप्त गरोदरपणात गर्भाच्या हालचाली साधारणपणे नियमित गरोदरपणात असतात तशाच असतात. परंतु, अशीही काही उदाहरणे आहेत जेव्हा गर्भाचा विकास हळू होत असल्याने हालचाली जाणवत नाहीत. बर्‍याचदा, स्त्रिया या गर्भाच्या हालचालींचा चुकीचा अर्थ लावू शकतात जसे की गॅस झाला आहे किंवा स्नायूंना पेटके येत आहेत इत्यादी.

2. गुप्त गरोदरपणाचे कोणतेही भावनिक आणि मानसिक परिणाम आहेत का?

गुप्त गरोदरपणाचा स्त्रीच्या भावनिक आणि मानसिक आरोग्यावर लक्षणीय परिणाम होऊ शकतो, मुख्यत्वेकरून अनेकदा बाळंतपणापर्यंत गर्भधारणा झाली आहे हे पूर्णपणे नाकारली जाते. त्यामुळे गरोदरपणात नीट काळजी घेतली जात नाही, आणि ते गरोदरपणाच्या दुर्दैवी नुकसानास कारणीभूत ठरू शकते. त्यामुळे तणाव आणि चिंतेची भावना तीव्र होते. गुप्त गर्भारपण शोधणे आणि स्त्रियांना शारीरिक आणि मानसिकदृष्ट्या प्रभावित करणे कठीण आहे. गुप्त गरोदरपणाबद्दल सर्व काही जाणून घेणे आणि तुमच्या प्रजनन आरोग्याविषयी तुमच्या स्त्रीरोगतज्ञांशी बोलणे ही गुप्त गरोदरपण रोखण्याची गुरुकिल्ली आहे.
Published by
मंजिरी एन्डाईत
Last Updated On

Recent Posts

All Rights Reserved