गर्भारपण

गरोदरपणानंतरची मासिक पाळी

गरोदरपणाचा फायदा म्हणजे नऊ महिने मासिक पाळी येत नाही!, गर्भवती स्त्रीची मासिक पाळीच्या त्रासापासून सुटका होते. परंतु बाळाचा जन्म झाल्यानंतर पुन्हा मासिक पाळीला सुरुवात होते. जर तुम्ही नुकत्याच एखाद्या गोंडस बाळाला जन्म दिलेला असेल, तर तुम्ही त्याच्यासोबत खूप छान वेळ घालवत असाल यात शंका नाही आणि या काळात तुमची मासिक पाळी आली नाही तर तुम्ही आनंदी व्हाल. परंतु, तुमच्या प्रसूतीच्या काही आठवड्यांनंतर तुम्हाला मासिक पाळी येऊ शकते. प्रसूतीनंतर तुम्हाला मासिक पाळी कधी येऊ शकते हे जाणून घेण्यासाठी हा लेख वाचा. बाळाच्या जन्मानंतरच्या मासिक पाळीबद्दल तुम्हाला माहित असणे आवश्यक आहे त्याबद्दल आपण ह्या लेखात चर्चा करणार आहोत.

प्रसूतीनंतर तुम्हाला पहिल्यांदा मासिक पाळी येणे केव्हा अपेक्षित आहे?

तुम्ही तुमच्या बाळाला स्तनपान देत नसल्यास, बाळाच्या जन्मानंतर ६-८ आठवड्यांच्या आत तुम्हाला मासिक पाळी येऊ शकते. परंतु जर तुम्ही तुमच्या बाळाला फक्त स्तनपान देत असाल, तर तुम्ही स्तनपान थांबवल्याशिवाय तुमच्या मासिक पाळीला सुरुवात होणार नाही. काही स्त्रियांना मात्र, बाळंतपणानंतर दोन महिन्यांमध्येच मासिक पाळी येते. अश्या स्त्रिया स्तनपान करीत असल्या किंवा नसल्या तरी त्यांना बाळंतपणानंतर दोन महिन्यांनी लगेच पाळी येते.

प्रसूतीनंतर पहिल्यांदा पाळी आल्यावर काय होते?

प्रसूतीनंतरची पहिली पाळी वेगवेगळ्या स्त्रियांसाठी वेगळी असते. काहींना खूप जास्त प्रमाणात बदल जाणवतो, काहींना कमी तर काहींना अजिबात बदल जाणवत नाही. आपण कोणत्याही गोष्टीसाठी तयार असले पाहिजे. तुमचा मासिक पाळीचा कालावधी जास्त किंवा कमी असू शकतो आणि रक्तस्त्राव सुद्धा जास्त किंवा कमी असू शकतो. तुम्हाला प्रसूतीनंतर सुद्धा रक्तस्त्राव होऊ शकतो, कारण प्रसूतीनंतर तसे होणे खूप सामान्य आहे. तुमची प्रसूती सामान्य किंवा सिझेरिअन असली तरीसुद्धा, तुम्हाला योनीतुन रक्तस्त्राव झालेला जाणवेल. गरोदरपणात तुमच्या बाह्य गर्भाशयाचे अस्तर आणि रक्त गळून पडल्यामुळे असे होते. सुरुवातीच्या टप्प्यात, तुम्हाला जास्त रक्तस्त्राव आणि गुठळ्या होऊ शकतात. बाळाला जन्म दिल्यानंतर ४२ दिवसांपर्यंत जो रक्तस्त्राव होतो त्यास इंग्रजीमध्ये लोचिया असे म्हणतात आणि त्या ४२ दिवसांत त्याचा रंग गडद लाल ते पांढरा असतो. तुम्हाला हा स्त्राव सहा आठवड्यांपर्यंत होऊ शकतो आणि जर तुम्ही तुमच्या बाळाला स्तनपान देत असाल, तर जन्मानंतर तुमची पहिली मासिक पाळी या काळात येण्याची शक्यता आहे.

स्तनपान करणाऱ्या मातांना मासिक पाळी लवकर का येत नाही?

हार्मोनल बदलांमुळे स्तनपान करताना बहुतेक स्त्रियांना प्रसूतीनंतर मासिक पाळी येत नाही. स्तनपान करणाऱ्या मातांमध्ये प्रोलॅक्टिन हे संप्रेरक असते, हे संप्रेरक आईच्या दुधाच्या निर्मितीसाठी आवश्यक असते. ह्या संप्रेरकांमुळे पुनरुत्पादक संप्रेरके दाबली जातात. म्हणून, पुनरुत्पादक संप्रेरकांच्या कमतरतेमध्ये, गर्भाधानासाठी अंडी सोडली जात नाहीत. अंड्याशिवाय मासिक पाळी येत नाही. त्यामुळे स्तनपान करणाऱ्या मातांना मासिक पाळी लवकर येत नाही.

गरोदरपणानंतर तुमच्या मासिक पाळीमध्ये बदल होईल का?

गरोदरपणानंतर मासिक पाळीमध्ये झालेल्या बदलांसाठी तयार रहा  कारण प्रसूतीनंतर तुमचे शरीर मासिक पाळीशी जुळवून घेण्याच्या प्रक्रियेत असेल. तुम्ही खालीलपैकी काही अनुभव घेऊ शकता: प्रसूतीनंतरच्या मासिक पाळी दरम्यान जास्त रक्तस्त्राव होण्याचे मुख्य कारण म्हणजे गर्भाशयाचे अस्तर गळून पडणे होय. त्यामागचे कारण काही वेळेला एडेनोमायोसिस किंवा थायरॉईड हे असू शकते. ह्या व्याधी आधीपासून असतील तर बाळाच्या जन्मानंतर जास्त प्रमाणात रक्तस्त्राव होऊ शकतो. दुसरीकडे, गर्भधारणेपूर्वी एंडोमेट्रिओसिस असलेल्या स्त्रियांना बाळंतपणानंतर कमी किंवा हलका रक्तप्रवाह जाणवू शकतो. अशेरमन्स सिंड्रोम किंवा शीहान सिंड्रोम ह्या मुळे देखील हलका रक्तस्त्राव होऊ शकतो. परंतु ही कारणे अत्यंत दुर्मिळ आहेत.

बाळाच्या जन्मानंतरच्या मासिक पाळीचा कालावधी किती दिवसांचा असतो?

तुमची पहिली पाळी प्रसूतीनंतर पाच ते सात दिवस टिकू शकते, आणि तुम्हाला तशीच सवय असते. परंतु, काही स्त्रियांना बाळाला जन्म दिल्यानंतर दोन ते तीन आठवडे योनीतून रक्तस्त्राव होऊ शकतो. तुम्हाला दहा दिवसांपेक्षा जास्त काळ योनीतून रक्तस्त्राव होत असल्यास, अधिक उशीर न करता तुम्ही वैद्यकीय सल्ला घ्यावा अशी शिफारस केली जाते.

गरोदरपणानंतरच्या मासिक पाळीमध्ये काहीतरी चुकीचे आहे हे तुम्हाला कसे कळेल?

बाळाच्या जन्मानंतरच्या मासिक पाळी दरम्यान तुम्हाला खालील लक्षणे दिसल्यास, तुमच्या मासिक पाळीमध्ये काहीतरी चुकीचे असू शकते  आणि तुम्ही त्यासाठी लवकरात लवकर वैद्यकीय मदत घ्यावी. वर नमूद केलेली सर्व काही वैद्यकीय गुंतागुंतीची लक्षणे असू शकतात. उदा: संसर्ग किंवा नाळ तशीच राहणे. म्हणून लवकरात लवकर डॉक्टरांचा सल्ला घ्यावा!

बाळाच्या जन्मानंतरच्या कालावधीबद्दल गैरसमज

बाळंतपणानंतर मासिक पाळी परत सुरु होण्याशी  संबंधित अनेक गैरसमज आहेत. यातील काही गैरसमज पुढीलप्रमाणे आहेत. गरोदरपणात आणि प्रसूतीनंतर स्त्रीच्या शरीरात बरेच बदल होतात. जर तुम्ही बाळाला नुकताच जन्म दिलेला असेल, तर तुमच्या शरीराला मासिक पाळीच्या वेळापत्रकही जुळवून घेण्यास थोडा वेळ लागेल. तुमची मासिक पाळी लवकरच परत सुरु होईल. त्यामुळे तुम्हाला काही आठवडे उशीर झाल्यास घाबरू नका. तुम्ही गर्भनिरोधक वापरत असल्याची खात्री करा जेव्हा प्रसूतीनंतर तुमची पहिली मासिक पाळी सुरु होते तेव्हा एक तर खूप जास्त किंवा खूप कमी रक्तस्त्राव होऊ शकतो – काळजी करू नका, हे सामान्य आहे. परंतु तुम्हाला तुमच्या मासिक पाळीदरम्यान काही असामान्य आढळले तर वैद्यकीय मदत घेण्यास अजिबात संकोच करू नका. वैद्यकीय सल्ला घेणे आणि गुंतागुंत टाळणे चांगले. आणखी वाचा: प्रसूतीनंतर होणारा मूळव्याध गरोदरपणानंतर वजन कमी करण्यासाठी आहार योजना
Published by
SEO Internal Link
Last Updated On

Recent Posts

All Rights Reserved