गर्भारपण

गरोदरपणानंतर वजन कमी करण्यासाठी आहार योजना

डाएट करणे ही अवघड गोष्ट आहे. योग्य प्रकारे त्याचे पालन केल्यास, तुमचे वजन कमी होऊन तुम्ही निरोगी रहाल हे नक्की परंतु जर तुम्ही त्यांचे योग्य प्रकारे पालन केले नाही तर तुमच्या आरोग्यावर परिणाम होऊ शकतो . तुम्ही विशिष्ट आहाराची निवड करण्यापूर्वी, त्यामागील तर्क, पौष्टिक मूल्य आणि त्यामुळे होणारे फायदे किंवा हानी समजून घेणे आवश्यक आहे. जर तुम्ही गरोदरपणानंतर डाएटचा विचार करत असाल, तर त्या अनुषंगाने अनेक बाबींचा विचार केला पाहिजे. गरोदरपणानंतर वजन कमी करण्याबद्दल अधिक जाणून घेण्यासाठी हा लेख वाचा.

व्हिडिओ: प्रसूतीनंतर वजन कमी करण्यासाठी काय खावे (गर्भधारणेनंतर वजन कमी करण्याचा आहार)

https://youtu.be/WpLJfNBDOIU

गरोदरपणानंतर तुम्ही किती लवकर डाएट सुरू करू शकता?

वजन कमी करण्यासाठी प्रसूतीनंतर डाएट सुरू करण्यापूर्वी (सर्व महत्त्वाच्या पोषक तत्वांसह निरोगी संतुलित आहार) विचारात घेण्याच्या सर्वात महत्त्वाच्या गोष्टींपैकी एक म्हणजे तुमच्या शरीराला प्रसूतीनंतर बरे होण्यासाठी निश्चित वेळ मिळावा लागतो. कोणत्याही प्रकारचा आहार सुरू करण्यापूर्वी तुम्ही नेहमी तुमच्या शरीराच्या गरजांचा विचार केला पाहिजे. तुम्हाला आणि तुमच्या बाळाला आधार देण्यासाठी तुमच्या शरीराला पुरेसे पोषण मिळत असल्याची खात्री तुम्ही केली पाहिजे. म्हणून, तुम्ही योग्य प्रमाणात संतुलित आहार घ्यावा. ह्यामध्ये सर्व आवश्यक पोषक तत्वांचा समावेश असावा.

लक्षात ठेवा, या टप्प्यावर दोन लोकांच्या पोषणाची जबाबदारी तुमच्या वर आहे. खूप लवकर डाएट सुरु करणे आणि दोघांपैकी एकाला पुरेसे पोषणमूल्य न मिळणे ह्यामुळे तुमच्या बाळाच्या आरोग्यावर परिणाम होऊ शकतो. नव्यानेच आई झालेल्या स्त्रीने तिचे पोस्टपर्टम चेकअप (सहा आठवड्यांनंतर) होईपर्यंत डाएट सुरू करण्याचा विचारही करू नये. नवीन आई झालेली स्त्री योग्य प्रमाणात सर्व महत्वाच्या पोषक तत्वांसह सामान्य, संतुलित आहार घेण्यास सुरुवात करू शकते कारण तिला स्वतःचे आणि बाळ दोघांचेही पोषण चालू ठेवावे लागेल. साखर आणि तळलेले पदार्थ देखील टाळले पाहिजेत.

बहुतेक लोक म्हणतात की नव्यानेच आई झालेल्या स्त्रीने आहारात कोणतेही बदल करण्यासाठी प्रसूतीनंतर किमान दोन महिने प्रतीक्षा करावी. परंतु, आपल्या शरीराला काय आवश्यक आहे हे अधिक चांगल्या प्रकारे समजून घेण्यासाठी आपण आपल्या डॉक्टरांचा आणि आहारतज्ञांचा सल्ला घ्यावा. तुमच्या आणि बाळाच्या आरोग्यास लाभदायक ठरणाऱ्या योजनेचे तुम्ही अनुसरण करा. बाळाला चांगले पोषण मिळण्यासाठी आणि प्रसूतीनंतर बरे होण्यासाठी स्त्रियांना त्यांच्या एकूण जीवनावश्यकतेपेक्षा किमान ५०० किलो कॅलरीची गरज जास्त असते.

तुम्ही तुमचे वजन कमी करण्यासाठी जेव्हा आहार योजना तयार करण्‍यासाठी तज्ञांशी सल्लामसलत करता, तेव्हा तुम्‍हाला तुमच्‍या प्रकृतीला धोका नाही याची खात्री करण्‍यासाठी काही गोष्‍टी माहित असणे आवश्‍यक आहे. कॅलरीज आणि इतर पोषक तत्वे योग्य प्रमाणात घेतल्यास वजन कमी करता येते. कॅलरीज मोजल्या जातात आणि आहारतज्ञांच्या मदतीने तुम्हाला अनुकूल प्रमाणात दिल्या जाऊ शकतात. खाली दिलेले नियम आणि मार्गदर्शक तत्त्वे वापरून तुमचे आहार तज्ञ तुमच्यासाठी एक चार्ट तयार करतील तेव्हा तुम्हाला तुमच्या आहार व्यवस्थापित करण्यात आणि समजून घेण्यात मदत होईल.

वजन कमी करण्याचा आहार सुरू करताना आपण पालन केले पाहिजेत असे नियम

गरोदरपणानंतर तुम्ही काळजीपूर्वक वजन कमी केले पाहिजे. बहुतेक स्त्रिया बाळाच्या जन्मानंतर सहा आठवड्यांपर्यंत त्यांचे वाढलेले वजन निम्म्याने कमी करतात. उर्वरित स्त्रियांना वजन कमी होण्यासाठी बहुतेकदा पुढील काही महिने लागू शकतात. दैनंदिन व्यायामासह निरोगी आहार घेतल्यास तुम्हाला वजन कमी करण्यासाठी त्याची मदत होऊ शकता. स्तनपान केल्याने प्रसूतीनंतरचे वजन कमी होण्यास मदत होते. तुमच्या प्रसूतीनंतर आहारतज्ञांच्या मदतीने आहार सुरू करताना तुम्ही आणखी काही मुद्दे लक्षात ठेवावेत.

तुम्हाला गर्भधारणेनंतर निरोगी वजन साध्य करण्यात आणि राखण्यात मदत करण्यासाठी मार्गदर्शक तत्त्वे

वजन कमी करताना आरोग्य चांगले राहून वजन कमी कसे होईल हे समजून घेण्यासाठी मार्गदर्शक तत्त्वे असणे महत्त्वाचे आहे. विशेषत: जेव्हा एखादी महिला प्रसूतीनंतर वजन कमी करण्याचा प्रयत्न करत असते तेव्हा ही मार्गदर्शक तत्वे जास्त महत्वाची आहेत जेणेकरून तुम्हाला निरोगी आणि सुरक्षित राहण्यास मदत होईल.

प्रसूतीनंतर योग्य प्रकारे वजन कमी करण्यासाठी तुम्ही आणखी काय करू शकता?

केवळ आहार वजन कमी करण्यास मदत करत नाही. आहाराचे पालन करण्याव्यतिरिक्त वजन कमी करण्यासाठी खालील गोष्टी तुम्ही केल्या पाहिजेत.

योग्य आणि निरोगी पद्धतीने वजन कमी करण्यासाठी तुम्ही अंमलात आणू शकता अशा दिनचर्येबद्दल अधिक सल्ल्यासाठी तुमच्या डॉक्टरांशी बोला.

स्तनपान करत असताना तुम्ही तुमचे वजन कसे कमी करू शकता?

बाळाला स्तनपान करणाऱ्या स्त्रियांचे वजन लवकर कमी होते हे सर्वज्ञात आहे. ह्याचे कारण म्हणजे स्तनपान करवण्याच्या प्रक्रियेत भरपूर कॅलरी बर्न होतात. स्तनपान करणाऱ्या स्त्रियांसाठी वजन कमी करणारा डाएट तयार करताना हे लक्षात ठेवले पाहिजेत आणि स्तनपान करताना दुधाचा योग्य पुरवठा करण्यासाठी अतिरिक्त कॅलरीज घेतल्या पाहिजेत.

आधी सांगितल्याप्रमाणे, स्तनपान करणा-या स्त्रियांना स्तनपानासाठी ऊर्जा आवश्यक असते. त्यांना इतर स्त्रियांपेक्षा कमीतकमी ५०० कॅलरी जास्त वापरण्याची शिफारस केली जाते. स्तनपान करताना कोणत्याही आहाराकडे अगदी काटेकोरपणे न बघणे चांगले असते कारण स्तनपान करताना खर्च होणारी ऊर्जा तुमचे बाळ किती वापरते यावर ते अवलंबून असते. नियमित अंतराने खा आणि तुमच्या उर्जेच्या पातळीनुसार आहारात बदल करण्याचा प्रयत्न करा.

प्रसूतीनंतर तुमचे गर्भधारणेपूर्वीचे वजन कधी पूर्ववत होईल?

तुमच्या बाळाला जन्म दिल्यानंतर तुमचे वजन गर्भधारणा होण्यापूर्वी इतके होण्यासाठी लागणारा वेळ हा तुमच्या गरोदरपणापूर्वीच्या आणि नंतरच्या खाण्याच्या सवयी आणि तुमच्या शरीरातील चयापचय यावर अवलंबून असते. काही स्त्रियांसाठी, गरोदरपणापुर्वीसारखा आकार होण्यासाठी अगदी थोडा काळ लागू शकतो , तर इतरांसाठी, एक किंवा दोन वर्षे लागू शकतात. धीर धरा आणि खंबीर रहा, नित्यक्रमाला चिकटून राहा आणि लक्षात ठेवा वजन कमी करणे ही एक प्रक्रिया आहे.

वजन कमी करण्याच्या प्रक्रियेवर नकारात्मक परिणाम करणारे घटक

तुमच्या वजन कमी करण्याच्या प्रक्रियेवर नकारात्मक परिणाम करणारे काही घटक खाली नमूद केले आहेत:

तुम्ही जी दिनचर्या किंवा आहाराचे पालन करत आहात त्याबद्दल तुम्हाला काही समस्या असू शकतात त्याबद्दल तुमचे डॉक्टर आणि प्रशिक्षकांशी बोला. गरोदरपणानंतर वजन कमी करणाऱ्या इतर घटकांबद्दल अधिक माहितीसाठी त्यांचा सल्ला घेणे देखील फायदेशीर ठरू शकते.

गरोदरपणानंतर वजन कमी करण्याची आहार योजना

गरोदरपणानंतरचे वजन कमी करण्यासाठी जास्त विचार करणे आवश्यक आहे. जर तुम्ही प्रसूतीनंतर वजन कमी करण्याचा विचार करत असाल, तर तुमच्या आहार आणि आरोग्याबाबत तज्ञांशी बोलायचे लक्षात ठेवा. तसेच, तुमच्या बाळाची आणि स्वतःची नियमित तपासणी करा. येथे गरोदरपणानंतरचे वजन कमी करण्याची आहार योजना दिलेली आहे त्यापासून तुम्ही सुरुवात करू शकता, परंतु त्याआधी आपल्या डॉक्टरांचा सल्ला घेण्यास विसरू नका.

जेवण सोमवार मंगळवार बुधवार गुरुवार शुक्रवार शनिवार रविवार
पहाटे १ कप कमी चरबीचे किंवा स्किम दूध/ साखर न घालता ताज्या सफरचंदाचा रस १ ग्लास ताज्या गाजराचा रस लिंबू आणि थोडे मध घालून / १ कप स्किम मिल्क १ कप स्किम मिल्क/ १ ग्लास ताजा, गोड न केलेला संत्र्याचा रस १ ग्लास स्किम मिल्क पासून बनवलेली ड्राय फ्रूट्स स्मूदी कमी चरबीच्या दुधापासून बनवलेली १ ग्लास केळी-स्ट्रॉबेरी स्मूदी ताजे टरबूज किंवा कस्तुरी खरबूजाचा रस/ कप स्किम मिल्क फ्रेश लिंबाचा रस/ स्कीम मिल्क पासून बनवलेली १ ग्लास बदामाची स्मूदी
नाश्ता नारळाच्या चटणीसोबत २ नाचणी-कांदा डोसे संपूर्ण गव्हाच्या ब्रेडचे २ स्लाईस अॅव्होकॅडो बटरसोबत आणि एक उकडलेले अंडे भाज्या घालून केलेला ओट्सचा उपमा टोमॅटो चटणीसह संपूर्ण गव्हाच्या ब्रेडचा १ तुकडा ऑम्लेटसह गव्हाचा उपमा भाज्या घालून केलेला एक सर्विंग २ रवा इडल्या आणि भाज्या घालून केलेले सांबार पालक किंवा मेथी पराठे साध्या दह्यासोबत
मध्यान्ह सकाळी १ ग्लास ताक हिंग, जिरे पूड आणि चिमूटभर मीठ घालून आणि २ -४ ओट्स क्रॅकर्स स्लिम चीजसोबत १ ग्लास जल जिरा पाणी. १ कप स्प्राउट्स सॅलड किंवा स्प्राउट्स भेळ १ ग्लास जिंजर लेमोनेड थोडे मध घालून गोड करा. कप स्वीट कॉर्न भेळ किंवा सॅलड १ ग्लास नारळाचे पाणी,१ कप टोमॅटो, काकडी, गाजर आणि कांद्याची कोशिंबीर १ ग्लास उसाचा रस/ टरबूजाचा रस. स्लिम चीज असलेले २-४ लो-फॅट क्रॅकर्स १ ग्लास लस्सी १ टीस्पून साखर. काही बाजरी आणि मेथी क्रॅकर्स १ ग्लास ताक / लस्सी / फळे घातलेले दही. एक कप काकडी आणि टोमॅटोच्या कापांसह भाजलेले मखाना
दुपारचे जेवण १ कप भात अंडी करी किंवा ५६ ग्रॅम ग्रील्ड चिकन १ कप भात सांबर आणि बीटरूट करी किंवा ५६ ग्रॅम ग्रील्ड फिश ५६ ग्रॅम चिकन /डाळ १ कप भात आणि भेंडीची भाजी ५६ ग्रॅम भाजलेले चिकन मिक्स्ड व्हेजिटेबल करीसह आणि १ कप भात १ कप भात रसम आणि औबर्गीन करी १ कप भाजी/चिकन/मटण पुलाव काकडी, टोमॅटो, कांदा आणि गाजर रायता १ कप बीटरूट किंवा गाजर भात सोया किंवा चिकन करी सोबत
चहा ताज्या फळांचे तुकडे आणि ग्रीन टी स्किम दुधासह हलका मसाला चहा १ टीस्पून साखर घालून आणि कमी चरबीयुक्त बिस्किटांसह ब्लॅक मिंट- लिंबू चहा खमन ढोकळ्यासोबत स्किम मिल्कसह मसाला चहा आणि १ टीस्पून साखर. रागी-ओट्स क्रॅकर्स ग्रीन टी चना डाळ आणि कोबी टिक्की सोबत मसाला चहा, पनीर आणि कॉर्न सँडविच ब्राउन ब्रेड वापरून केलेले पुदिना आणि लेमन टी बेसन चिला सोबत
रात्रीचे जेवण -३ फुलके मटर पनीर सोबत -३ फुलके वांग्याच्या भारतासोबत -३ फुलके चिकन/अंडी/सोया करी सोबत -३ फुलके पालक पनीर सोबत -३ फुलके आलू गोबी मसाला सोबत -३ फुलके मासे किंवा भाज्यांच्या करीसोबत -३ फुलके सोबत स्प्राउट्स करी आणि अननस रायता
झोपताना १ कप स्किम मिल्क १ कप स्किम मिल्क १ कप स्किम मिल्क १ कप स्किम मिल्क १ कप स्किम मिल्क १ कप स्किम मिल्क १ कप स्किम मिल्क

बाळाला जन्म दिल्यानंतर वजन कमी करणे हे एक आव्हान आहे. वजन कमी करणे सोपे नाही ती एक थकवणारी प्रक्रिया आहे. निरोगी राहण्याचे लक्षात ठेवा आणि डाएटचे पालन करा. जर तुम्हाला एक दोन दिवस डाएट पाळता आले नाही तर स्वतःसोबत जास्त कठोर होऊ नका आणि खूप जास्त तडजोड सुद्धा करू नका. फक्त आपले वेळापत्रक पुन्हा पाळण्यास सुरुवात करा. इतर माता किंवा तुमच्या पतीसोबत डाएट पाळण्यास सुरुवात केल्यास वजन कमी करण्याची प्रक्रिया कमी त्रासदायक होऊ शकते. वजन कमी करण्यासाठी तुमच्या आजूबाजूला कुणी वजन कमी करण्यावर काम करत आहे का ते पहा आणि लक्षात ठेवा, तुम्ही केलेल्या कामाचे परिणाम कालांतराने दिसून येतील तोपर्यंत स्वतःला वेळ द्या.

आणखी वाचा: प्रसूतीनंतर होणारी सांधेदुखी प्रसूतीनंतर घ्यावयाची काळजी
Published by
मंजिरी एन्डाईत
Last Updated On

Recent Posts

All Rights Reserved