गर्भारपण

गर्भसंस्कार पद्धती

तुम्ही जेव्हा स्वतःला गरोदरपणासाठी तयार करता तेव्हा तुम्ही हळूहळू तुमची आंतरिक शक्ती - तुमचा संयम, शांतता आणि ऊर्जा पुन्हा शोधू लागता. ह्या जगातील ताण आणि दबावाला सामोरे जाण्यासाठी तुमच्या पोटातील बाळ निरोगी आणि सक्षम जन्माला येणे आवश्यक आहे त्यासाठी तुम्हाला स्वतःची काळजी घेणे जरुरीचे आहे हे तुम्हाला जाणवू लागते. ह्या परिस्थितीवर आयुर्वेदिक उपायाने हळूहळू गती प्राप्त झाली आहे - आणि ती प्रक्रिया म्हणजे गर्भ संस्कार नावाची प्रक्रिया.

गर्भसंस्कार म्हणजे काय?

प्रत्येक पालकाला आपल्या मुलासाठी सर्वोत्तम हवे असते. गरोदरपण निरोगी असल्यास केवळ गर्भातच नाही तर जन्मानंतर सुद्धा बाळाचे आरोग्य सुनिश्चित करते. गर्भसंस्काराचा सराव बाळाच्या मानसिक आणि शारीरिक विकासासाठी एक सक्षमकर्ता म्हणून लोकप्रिय झाला आहे.

गर्भसंस्काराचे ज्ञान प्राचीन धर्मग्रंथांपासून आहे आणि ते आयुर्वेदात समाविष्ट आहे. संस्कृतमधील गर्भ हा शब्द म्हणजे पोटातील बाळ आणि संस्कार म्हणजे मनाचे शिक्षण. तर, थोडक्यात सांगायचे झाले तर गर्भसंस्कार म्हणजे न जन्मलेल्या बाळाच्या मनाला शिक्षित करण्याची प्रक्रिया होय.

पारंपारिकपणे असे मानले जाते की बाळाचा मानसिक आणि वर्तनात्मक विकास गर्भातच सुरू होतो आणि गरोदरपणात आईच्या भावनिक स्थितीवर त्याचा प्रभाव पडतो. ही प्रथा अनादी काळापासून हिंदू परंपरेचा एक भाग आहे - गर्भसंस्काराचा अभिमन्यू आणि प्रल्हाद यांसारख्या पौराणिक पात्रांवर किती सकारात्मक परिणाम झाला, हे या कथांवरून दिसून येते. त्यांना त्यांच्या आईच्या पोटात ज्ञान मिळाले होते.

स्त्रीला गर्भधारणा होताच आई आणि बाळाचे नाते सुरू होते. हे थोडेसे वेगळे वाटेल, परंतु कोणतीही आई तुम्हाला सांगेल की ती नकळत तिच्या पोटातील बाळाशी बोलू लागते. अनेक गर्भवती स्त्रियांना तुम्ही पोटातील बाळाशी बोलताना किंवा चांगले विचार करण्याचा प्रयत्न करताना किंवा बाळाला शांत करणाऱ्या गोष्टी करताना पाहिलेले असेल. बहुतेक गरोदर स्त्रिया हे चांगले वाटते म्हणून करत असतात परंतु त्याचे खूप खोलवर रुजलेले फायदे सुद्धा आहेत.

गर्भसंस्काराशी संबंधित पद्धती आणि पोटातील बाळावर त्याचे होणारे चांगले परिणाम ह्याचे समर्थन करणारे वैज्ञानिक पुरावे आता वाढत आहेत. आधुनिक अभ्यासांनी हे सिद्ध केले आहे की गर्भ बाह्य उत्तेजनांना प्रतिसाद देऊ शकतो. खरं तर, आईच्या विचारांमुळे सक्रिय होणारे हार्मोनल स्राव तिच्या गर्भातील बाळावरही परिणाम करू शकतात!

अशाप्रकारे, गर्भसंस्कारामुळे बाळाला फायदा होतो असे मानले जाते. परंतु हा फायदा फक्त बाळांनाच होतो असे नाही. या पद्धतींमुळे आई देखील निरोगी राहते तसेच तिची मानसिक स्थिती सुद्धा सकारात्मक राहते. गर्भसंस्काराच्या सरावाद्वारे गर्भवती स्त्रियांना आहार आणि जीवनशैलीतील बदल यासारख्या क्रियाकलापांची शिफारस केली जाते.

गरोदर असताना गर्भसंस्कार कधी सुरू करावे?

गर्भसंस्कार म्हणजे फक्त गरोदरपणात काळजी घेणे नव्हे तर गरोदरपणाच्या किमान एक वर्ष आधीपासून तयारी सुरू करणे होय. गर्भसंस्कारामध्ये पूर्व-गर्भसंस्कार, गर्भधारणा तसेच स्तनपानाचा टप्पा समाविष्ट होतो, मूल सुमारे २ वर्षांचे होईपर्यंत पालकांना गर्भसंस्काराद्वारे मार्गदर्शन केले जाते.

जन्मपूर्व शिक्षणाच्या विविध पद्धती

गर्भसंस्काराचे संदर्भ प्राचीन हिंदू पुराण आणि वेदांमध्ये आढळतात. पण तुम्हाला हे जाणून आश्चर्य वाटेल की ही प्रथा केवळ भारतापुरती मर्यादित नाही! जगभरातील विविध संस्कृती आई आणि वाढणारे बाळ यांच्यातील बंधनाचे पालनपोषण करण्यास प्रोत्साहन देतात. आणि ते 'गर्भाशयात शिक्षण' या संकल्पनेसारखेच आहे. पाश्चात्य देशांतील माता त्यांचे बाळ हुशार होण्यासाठी अनेकदा मोझार्ट सारख्या उस्तादांचे शास्त्रीय संगीत ऐकतात.

गर्भसंस्काराच्या ज्ञानाचा अंदाज यावरून लावला जाऊ शकतो की अनेक आधुनिक प्रसवपूर्व प्रथा त्यातून निर्माण झाल्या आहेत. यामध्ये खालील गोष्टींचा समावेश होतो:

गर्भवती महिलांसाठी गर्भसंस्कार उपक्रमांची यादी

आयुर्वेदानुसार, गर्भसंस्कार हा निरोगी बाळाला जन्म देण्याचा एक उत्तम मार्ग आहे. आईने केवळ मानसिकच नव्हे तर शारीरिक, भावनिक आणि आध्यात्मिक रीत्या सुद्धा मनःस्थिती सुदृढ ठेवली आहे. गर्भसंस्कारामध्ये काही मार्गदर्शक तत्वे असतात. ही तत्वे गर्भवती स्त्रिया आणि बाळांसाठी उपयोगी ठरू शकतात. ह्यामध्ये खालील गोष्टींचा समावेश होतो -

. पौष्टिक खाण्याच्या सवयी

चांगली आहार व्यवस्था ही गर्भधारणेची अत्यावश्यक बाब आहे, कारण गर्भाची वाढ ही आईच्या आरोग्यावर आणि पोषणावर अवलंबून असते. आयुर्वेदानुसार आईच्या आहारातून मिळणाऱ्या पोषणास आहार रस असे म्हणतात. त्यामुळे आईचे स्वतःचे पोषण होते तसेच बाळाची वाढ आणि आईच्या दुधाची तयारी करण्यासाठी देखील मदत होते. त्यामुळे आईला जीवनसत्वे आणि खनिजांनी परिपूर्ण असा संतुलित आहार घेण्याची शिफारस केली जाते. गरोदरपणात आईच्या आहारात (गर्भसंस्कार आहार) कॅल्शियम, फॉलिक अॅसिड आणि लोह यांचे प्रमाण संतुलित असावे.

गरोदरपणातील गर्भसंस्कार अन्नामध्ये सात्विक अन्नाचा समावेश होतो. हे अन्न ताजे तयार केलेले, पौष्टिकतेने समृद्ध अन्न असते. त्यामध्ये गोड, खारट, तिखट, कडू आणि आंबट अशा पाचही चवी असतात. आयुर्वेदामध्ये पंचामृताचे सेवन करण्यास सांगितले जाते. तुमचे सामर्थ्य आणि प्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी फायदेशीर आहे. एक चमचा दही, मध, साखर आणि दोन चमचे तूप किंवा आठ चमचे दुधात मिक्स करून बनवले जाते. त्याच वेळी, व्यसनाधीन पदार्थांपासून दूर राहण्याचा सल्ला दिला जातो.

. सकारात्मक विचार

गर्भधारणा तुम्हाला मूडी, चिडचिड, उदास आणि चिंताग्रस्त बनवू शकते, कारण तुमच्या शरीरात अनेक हार्मोन्स तयार होतात! गर्भ संस्कार तुम्हाला तुमच्या भावना व्यवस्थापित करण्यात आणि त्यांना स्थिर स्थितीत आणण्यास मदत करते आणि ते आई आणि बाळ दोघांसाठीही चांगले असते. तुम्ही एक नवीन छंद जोपासू शकता. छंद जोपासल्यामुळे तुम्हाला आनंदी व छान वाटते किंवा तुम्ही तुम्हाला आनंद देणार्‍या गोष्टी करू शकता.

. योगासने किंवा हलका व्यायाम करणे

गर्भसंस्कार शिफारस करतो की गर्भवती महिलांनी आई आणि बाळ दोघांच्याही शारीरिक आरोग्यासाठी काही हलका व्यायाम किंवा योग करावा. अशा व्यायामाचे फायदे येथे दिलेले आहेत:

. ध्यान

ध्यान हा गर्भसंस्काराचा एक महत्त्वाचा पैलू आहे. हे शरीरासाठी फायदेशीर आहे, कारण ते मनावरचा ताण कमी करते. यामध्ये शून्य मनःस्थितीमध्ये जाणे समाविष्ट असते. ध्यान केल्याने शांतता आणि एकाग्रता वाढण्यास मदत होऊ शकते. तुम्ही ध्यान करत असताना बाळाबद्दल चांगल्या गोष्टींची कल्पना करणे हा देखील एक चांगला मार्ग आहे ज्यामुळे तुम्हाला आणि बाळाला मदत होऊ शकते.

. प्रार्थना

प्रार्थना हा गर्भसंस्काराचा एक महत्त्वाचा भाग आहे आणि बाळाच्या आध्यात्मिक विकासासाठी ते चांगले आहे असे मानले जाते. प्राचीन शास्त्रांमध्ये मंत्र आणि श्लोक आहेत. पोटातील बाळासाठी त्यांचा चांगला फायदा होतो. तुमच्या प्रार्थनेमुळे बाळाला चांगले आरोग्य आणि नैतिक मूल्ये मिळतात आणि ती आध्यात्मिक श्रद्धेचा एक आवश्यक भाग आहे.

. मनाच्या शांतीसाठी संगीत ऐकणे

गर्भसंस्कारानुसार आईच्या पोटातील बाळ संगीताला प्रतिसाद देऊ शकते. खरं तर, प्राचीन साहित्य सांगते की गरोदरपणाच्या सातव्या महिन्यापासून बाळ ऐकू लागते आणि त्याच्या सभोवतालच्या परिस्थितीला प्रतिसाद देते. म्हणूनच आईने मधुर संगीत ऐकले पाहिजे. ह्या संगीताचा तिच्यावर शांत आणि सुखदायक परिणाम होतो. मृदू, आध्यात्मिक गाणी, मंत्र आणि श्लोक गाणे, पाठ करणे किंवा ऐकणे हे आई आणि बाळ दोघांसाठी फायदेशीर आहे.

. शांत किंवा आध्यात्मिक पुस्तके वाचणे

गर्भसंस्कारांमध्ये अध्यात्मिक पुस्तके वाचण्यास सांगितले जाते. त्यामुळे समाधान मिळते. शिवाय, शैक्षणिक पुस्तके वाचल्याने गर्भातील बालकाचे व्यक्तिमत्त्व घडते असे सुद्धा गर्भसंस्कारात मानले जाते. ! तुम्ही गरोदर असताना मोठ्याने वाचन केल्याने तुमच्या न जन्मलेल्या बाळाला हुशार करण्यास मदत होते. नैतिक मूल्ये किंवा पौराणिक कथा असलेल्या पुस्तकांची शिफारस केली जाते, परंतु तुम्हाला वाचायला आवडणारे कोणतेही पुस्तक तुम्ही निवडू शकता!

. मन शांत आणि आनंदी ठेवणे

गर्भसंस्काराच्या मार्गदर्शक पद्धतींनुसार, आईने तिच्यावर ताण पडेल अशा कृती किंवा सरावांमध्ये गुंतू नये. गरोदरपणात अवाजवी ताण घेणे किंवा तुम्हाला घाबरवणाऱ्या किंवा काळजी करणाऱ्या गोष्टी पाहणे किंवा वाचणे हे योग्य नाही असे गर्भसंस्कारात सांगितले जाते, कारण हार्मोन्सच्या उत्सर्जनाला ते चालना देऊ शकतात आणि त्याचा गर्भावर विपरीत परिणाम होऊ शकतो. आपल्या बाळाच्या फायद्यासाठी, त्या नऊ महिन्यांत शारीरिक, मानसिक, भावनिक आणि आध्यात्मिकरित्या समाधानी राहण्याचा प्रयत्न करा!

. गरोदरपणात हर्बल तूप सेवन करणे

गरोदरपणाच्या चौथ्या, पाचव्या, सातव्या, ८ व्या आणि ९ व्या महिन्यात आपल्या आहारात गाईच्या दुधापासून बनवलेल्या औषधी तुपाचा समावेश करण्यास सांगितले जाते. हे तूप बाळाच्या मानसिक आणि शारीरिक विकासासाठी फायदेशीर असल्याचे म्हटले जाते आणि गर्भातील जन्मजात विकृती टाळण्यास त्यामुळे मदत होऊ शकते. आयुर्वेदानुसार, औषधीयुक्त तूप देखील आईला पूर्ण मुदतीची सामान्य प्रसूती होण्यास मदत करू शकते. परंतु तुम्ही तुमच्या आहारात काय समाविष्ट करू शकता आणि काय करू शकत नाही याबद्दल आपल्या डॉक्टरांचा सल्ला घ्या, कारण प्रत्येक गरोदरपण सारखे नसते.

१०. सर्जनशीलता

तुमच्या गरोदरपणात सर्जनशील असण्याने तुमचे मन केवळ व्यस्त राहात नाही तर गर्भसंस्कारानुसार तुम्ही तुमची सर्जनशीलता तुमच्या बाळाला देऊ शकता! विणकाम, चित्रकला, बागकाम किंवा अगदी मातीची भांडी यांसारखे छंद ताणतणाव दूर करण्यात आणि तुम्हाला आनंदी ठेवण्यास मदत करू शकतात. तुमच्या मुलाचा जन्म एका अद्भुत सृजनशीलतेसह होण्याची खात्री सुद्धा होते!

गरोदरपणातील गर्भसंस्काराचे फायदे

बाळाला आकार देणे हे आईवर अवलंबून असते. सकारात्मक विचार आणि सकारात्मक दृष्टीकोन आईचे मानसिक आणि शारीरिक आरोग्य चांगले राखण्यास मदत करते. आईचे आरोग्य तिच्या पोटातील बाळाच्या आरोग्याशी सुद्धा निगडीत आहे. गर्भसंस्कार आई आणि तिच्या न जन्मलेल्या बाळामध्ये शाश्वत बंध निर्माण करण्यास मदत करतात.

तज्ज्ञांनी आईच्या आरोग्यासाठी गर्भसंस्कार करण्‍यास प्रोत्‍साहन दिले असले तरी बाळासाठी दीर्घकालीन फायदे देखील आहेत आणि ते कदाचित लगेच ओळखले जाऊ शकत नाहीत. बाळाशी संवाद हा गर्भ संवादआहे आणि तो बाळाच्या मानसिक वाढीस हातभार लावतो आणि आईशी घट्ट नाते निर्माण करण्यास मदत करतो.

संगीत ऐकल्याने आणि वाचन केल्याने तुमच्या बाळाला चांगली झोप येण्यास मदत होते किंवा झोपेच्या चांगल्या सवयी लागतात. तुमचे बाळ अधिक सजग, जागरूक आणि आत्मविश्वासू बनू शकते, तसेच उत्तेजनांना चांगला प्रतिसाद देऊ शकते. तसेच बाळ अधिक सक्रिय आणि समाधानी होऊ शकते. आई आणि बाळामध्ये चांगला बंध तयार झाल्यास कदाचित तुमच्या बाळाला तुम्ही अधिक चांगल्या प्रकारे स्तनपान करू शकाल.

गर्भ संस्कार संगीत तुमच्या बाळाला कसे मदत करते?

गर्भसंस्कारानुसार, बाळ बाह्य उत्तेजनांना प्रतिसाद देऊ शकते. विशेषत: ७ व्या महिन्यापासून, संगीताचा उपचारात्मक प्रभाव बाळाच्या विकासात महत्त्वाची भूमिका बजावू शकतो, असे मानले जाते. बाळासाठी सर्वात जवळचा आवाज हा आईच्या हृदयाचा ठोका असतो आणि म्हणूनच असे मानले जाते की रडणाऱ्या बाळाला छातीजवळ धरून शांत केले जाऊ शकते. बाळाला ओळखीचे काहीतरी ऐकू येत असताना, बाळामध्ये शांततेची भावना येऊ शकते. हेच तर्क संगीताला लागू होते आणि धडधडणाऱ्या हृदयाच्या लाईप्रमाणेच संगीताच्या तालाचाही बाळावर शांत प्रभाव पडतो.

गर्भसंस्काराचा असा विश्वास आहे की वीणा, एक तंतुवाद्य आणि बासरी यांचा आवाज मनाला आणि आत्म्याला शांत करू शकतो. खरं तर, आजकाल, सीडी किंवा इंटरनेटवर गर्भसंस्कारांची अनेक गाणी उपलब्ध आहेत.

गर्भ संस्कार टिप्स

येथे काही सोप्या टिप्स आहेत. ह्या टिप्स आई आणि बाळामधील विशेष बंध जोपासण्यात मदत करू शकतात:

या पद्धती सुरुवातीला विचित्र वाटत असल्या तरी, त्याचा तुम्हाला नक्कीच फायदा होईल. तुमच्या बाळासोबतच्या तुमच्या नातेसंबंधावर सकारात्मक परिणाम होईल. गर्भसंस्काराची मुळे प्राचीन पद्धतींमध्ये आढळतात. ह्या पद्धती आईच्या कल्याणावर आणि बाळाच्या निरोगी विकासावर लक्ष केंद्रित करतात. पण याहूनही अधिक, गर्भसंस्कार आई आणि मूल यांच्यातील चिरंतन बंध जोपासण्यावर भर देतो. सकस आहार, सकारात्मक विचार, नियमित व्यायाम आणि प्रेमसंबंध हे गर्भसंस्काराचे घटक आहेत. गर्भ संस्काराच्या ह्या साध्या सिद्धांतांचा सराव करा आणि तुमच्या मुलाला मिळत असलेल्या शांतीचा अनुभव घ्या!

आणखी वाचा:

गरोदरपणात बाळाचे पाय मारणे गरोदरपणात चालणे: फायदे, सुरक्षा आणि धोके
Published by
मंजिरी एन्डाईत
Last Updated On

Recent Posts

All Rights Reserved