गर्भारपण

गरोदरपणात झोपण्याच्या सर्वोत्तम स्थिती

गरोदर स्त्रियांना शांत झोप हवी असते, परंतु ती मिळणे अनेकदा कठीण असते. गरोदरपणात झोपेचा त्रास होणे अगदी सामान्य आहे. जवळजवळ सर्व गर्भवती स्त्रियांना ह्या झोपेच्या समस्यांना तोंड द्यावे लागते. विशेषत: पहिल्या तिमाहीत गर्भधारणा होत असताना हा त्रास जास्त होतो. गरोदरपणात संप्रेरकांमधील चढ उतार, चिंता आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे शरीरात होणारे बदल इत्यादींमुळे रात्रीची झोप लागणे नेहमीपेक्षा कठीण होते. तुमच्या पोटाचा वाढणारा आकार, पाठ दुखणे, पायांना सूज येणे आणि सतत लघवीला लागणे इत्यादी बदलांमुळे तुम्हाला नेहमीसारखे पाठीवर झोपता येत नाही. जसजसे गरोदरपणाची दुसरी तिमाही सुरु होते तसे तुम्हाला आरामात झोपणे कठीण होऊ शकते. अशा वेळी, काळजी वाटणे स्वाभाविक आहे आणि गरोदरपणात चांगली झोप लागण्यासाठी कसे झोपावे आणि आपण गरोदर असताना पाठीवर झोपणे सुरक्षित आहे की नाही असे प्रश्न तुम्हाला पडणे खूप साहजिक आहे. गरोदर स्त्रियांना चांगली झोप आवश्यक असते. तज्ञांच्या मते गरोदरपणात डाव्या कुशीवर झोपणे सर्वात चांगले असते. गरोदरपणात डाव्या कुशीवर झोपणे तुमच्यासाठी तसेच तुमच्या बाळासाठीही योग्य आहे. डाव्या कुशीवर झोपल्यास रक्तप्रवाह चांगला होतो आणि तुमच्या बाळाला पोषक तत्वांचा पुरवठा चांगला होतो.  कुशीवर झोपल्याने मूत्रपिंडाचे कार्य देखील वाढते  आणि शरीरातील नको असलेले घटक बाहेर टाकण्यास मदत होते. आपले पाय,घोटे आणि हातांची सूज कमी होण्यास मदत होते.

व्हिडिओ: गरोदरपणातील सर्वोत्तम आणि सर्वात वाईट झोपण्याची स्थिती

https://youtu.be/I6_Y1TtPGsI

गरोदरपणात नेहमीच्या स्थितीत झोपल्यावर अस्वस्थ का वाटते?

गरदोरपणाच्या दुसऱ्या किंवा तिसऱ्या तिमाहीमध्ये नेहमीसारखे पोटावर किंवा पाठीवर झोपणे कठीण होईल. पोटाचा वाढता आकार, पाठदुखी, धाप लागणे, छातीत जळजळ इत्यादींमुळे अस्वस्थ वाटू शकते.

झोपण्याची योग्य स्थिती कोणती  आहे?

गरोदरपणात कुशीवर झोपणे सर्वात चांगले आणि ह्यात काहीच शंका नाही. कारण हृदयाला रक्तपुरवठा करणारी रक्तवाहिनी उजव्या बाजूला असते. त्यामुळे डाव्या कुशीवर झोपण्याची शिफारस केली जाते. डाव्या कुशीवर झोपून, गुडघे वाकवून दोन्ही पायांच्या मध्ये उशी ठेवून झोपणे ही सर्वात आदर्श स्थिती आहे.
तुमच्या पाठीमागे आणि पोटाखाली उशी ठेवल्यास तुम्हाला कमी ताणतणावांसह चांगली झोप मिळेल असा तज्ञांचा सल्ला आहे. झोपताना कॉटनचे सैल आणि आरामदायक कपडे घालणे चांगले.

गरोदरपणात झोपण्याची कोणती स्थिती टाळली पाहिजे?

गरोदरपणात तुमच्या पाठीवर किंवा पोटावर झोपणे टाळले पाहिजे कारण त्यामुळे अनेक आरोग्यविषयक समस्या उद्भवू शकतात. खाली अधिक स्पष्ट केले आहे:

झोपताना आरामदायी राहण्यासाठी टिप्स

गरोदरपणात सुरक्षित आणि आरामदायी झोपेसाठी काही इतर टिप्स खाली दिलेल्या आहेत
रात्रभर एकाच स्थितीत राहणे योग्य नाही, त्यामुळे डाव्या कुशीवर झोपणे हा चांगल्या झोपेसाठी सर्वोत्तम उपाय आहे. जर तुम्हाला मध्यरात्री जाग आली आणि तुम्ही तुमच्या पाठीवर किंवा पोटावर झोपलेले आहात असे आढळल्यास कुशीवर वळून झोपून जा. घाबरून जाऊ नका. गर्भवती स्त्रियांनी सुरक्षित गर्भारपणासाठी सावधगिरी बाळगणे गरजेचे आहे.  तसेच त्यांनी जीवनशैलीत आवश्यक बदल करणे गरजेचे आहे. या नवीन स्लीपिंग पोझिशन्स वापरून पाहणे हा त्या बदलांचा फक्त एक भाग आहे. काही आठवडे रात्रीचे झोपताना अस्वस्थ वाटणे सामान्य आहे कारण शरीराला नेहमीच्या  झोपण्याच्या स्थितीची सवय आहे. गरोदरपणाचा काळ जसा पुढे सरकेल तसे सगळे सोपे होईल. तुमच्या मनाला आणि शरीराला थोडा वेळ द्या आणि तुम्ही लवकरच झोपण्याच्या नवीन स्थितीशी जुळवून घेऊ शकाल. आणखी वाचा: गरोदरपणात चांगली झोप लागण्यासाठी १० परिणामकारक टिप्स गरोदरपणाच्या तिसऱ्या तिमाहीमध्ये कसे झोपावे – झोपेच्या स्थिती आणि सुरक्षिततेसाठी टिप्स
Published by
मंजिरी एन्डाईत
Last Updated On

Recent Posts

All Rights Reserved