वाहणारे नाक ही लहान मुलांमध्ये आढळणारी एक सामान्य समस्या आहे. बाळांची रोगप्रतिकारक शक्ती पुरेशी परिपक्व नसल्यामुळे बाळांच्या आरोग्यावर परिणाम होतो. नवनवीन गोष्टींना हात लावून बघण्याची किंवा तोंडात घालण्याची बाळाला सतत इच्छा होत असते. त्यामुळे बाळाला संसर्ग होण्याची जास्त शक्यता असते. मोठी लोकं औषधे गोळ्या घेऊन सर्दी किंवा फ्लूचा सामना करू शकतात, परंतु लहान मुलांच्या बाबतीत तसे होत नाही. औषधांच्या दुष्परिणामांमुळे औषधे घेणे तुमच्या बाळासाठी चांगली नाहीत. जर तुम्ही तुमच्या बाळासाठी वाहत्या नाकासाठी काही प्रभावी घरगुती उपाय शोधत असाल, तर ही तुमच्यासाठी योग्य पोस्ट आहे!
व्हिडिओ: बाळे आणि लहान मुलांच्या सर्दीवर सर्वोत्तम घरगुती उपचार
https://youtu.be/5e48egY0e4A
लहान मुलांचे नाक का वाहते?
बाळांना वर्षभरात किमान ६ ते ८ वेळा सर्दी किंवा फ्लू होत असतो. वर चर्चा केल्याप्रमाणे, बाळाची रोगप्रतिकारक शक्ती कमकुवत असेल तर हा त्रास होतो. परंतु, जेव्हा तुमचे बाळ मोठे होऊन चांगला आहार घेऊ लागते तेव्हा त्याची रोगप्रतिकारक शक्ती मजबूत होऊ लागते. लहान मुलांमध्ये नाक वाहण्याची काही सामान्य कारणे येथे दिलेली आहेत.
- जर तुमच्या बाळाला सर्दी होत असेल तर बाळाच्या छातीत कफ साठणे, ताप, खोकला, शिंका येणे आणि नाक वाहणे यासारखी लक्षणे दिसू शकतात.
- जर तुमच्या बाळाला फ्लूचा त्रास होत असेल, तर त्याला भूक न लागणे, खोकला आणि तीव्र सर्दी होऊ शकते.
- जर तुमच्या बाळाला काही प्रकारच्या ऍलर्जीचा त्रास होत असेल, तर त्याला त्वचेवर खाज सुटणे, अंगावर पुरळ येणे, डोळे पाणवणे आणि नाक वाहणे अशा समस्या उद्भवू शकतात.
लहान मुलांमध्ये नाक वाहण्याची ही काही सामान्य कारणे आहेत. परंतु, वर नमूद केलेले कोणतेही कारण तुमच्या बाळाला लागू होत नाही असे तुम्हाला वाटत असल्यास, पुढील मदतीसाठी तुमच्या डॉक्टरांकडे जा.
लहान मुलांचे नाक वाहत असल्यास काय करावे?
लहान मुले जेव्हाही अस्वस्थ असतात तेव्हा त्यांना खूप चिडचिड होते आणि बाळे अस्वस्थ होतात. वाहणारे नाक म्हणजे तुमच्या बाळाला खूप अस्वस्थ वाटू शकते. लहान मुलांमध्ये वाहणारे नाक थांबवण्याचे काही प्रभावी मार्ग येथे दिलेले आहेत.
1. तुमच्या बाळाचे द्रवपदार्थांचे सेवन वाढवा
नाक वाहत असलेल्या बाळाचे तोंडातून श्वास घेणे सुरू होऊ शकते. तोंडातून श्वास घेतल्याने लहान मुलांमध्ये श्वासोच्छवासाचे निर्जलीकरण होते. म्हणून, आपल्या बाळाचे स्तनपान किंवा फॉर्म्युला दुधाचे सेवन वाढवणे महत्वाचे आहे. तुमचे बाळ सहा महिन्यांपेक्षा जास्त वयाचे असल्यास, तुम्ही त्याला पाणी आणि इतर द्रवपदार्थ देखील देऊ शकता. तुम्ही तुमच्या बाळाला कोणते द्रव देऊ शकता ह्याविषयी तुमच्या बाळाच्या बालरोगतज्ञांशी चर्चा करा.
2. सक्शन बल्ब आणि स्राव
वाहणाऱ्या नाकामुळे तुमच्या बाळाच्या नाकात भरपूर श्लेष्मल होऊ शकतो. त्यामुळे त्याच्या श्वासोच्छवासात अडथळा येऊ शकतो. बाळाच्या नाकातून श्लेष्मल काढण्यासाठी सक्शन बल्ब वापरला जाऊ शकतो. त्यामुळे त्याला चांगला श्वास घेता येईल. हा बल्ब कोणत्याही मेडिकल स्टोअरमध्ये सहज उपलब्ध आहे आणि डॉक्टरांच्या प्रिस्क्रिप्शनशिवाय देखील तुम्ही तो खरेदी करू शकता. प्रत्येक वेळेला वापरण्यापूर्वी हा ब्लब स्वच्छ करून घ्या.
3. बाळाचे डोके उंच ठेवा
बाळाला बरे वाटण्यासाठी त्याचे डोके उंच ठेवणे हा सर्वात प्रभावी मार्ग आहे असे केल्याने श्लेष्मा घशात जात नाही. श्लेष्मा घशात गेल्यावर सहसा खोकला येऊ शकतो. एक किंवा दोन टॉवेल घ्या आणि तुमच्या बाळाचे डोके 18 इंच वर ठेवा. तुमच्या बाळाचे डोके ह्या पेक्षा जास्त उंच ठेवत नाही आहात ना ह्याची खात्री करा, कारण त्यामुळे बाळ अस्वस्थ होऊ शकते.
4. पेट्रोलियम जेली
नाकाचा खालचा भाग सतत ओलसर राहिल्याने तुमच्या बाळाचे नाक दुखू शकते आणि त्याच्या संवेदनशील त्वचेलाही त्रास होऊ शकतो. त्यामुळे बाळाच्या नाकाखाली पेट्रोलियम जेलीचा थर लावा. विक्स वेपोरब वापरणे टाळा कारण त्यामुळे लहान मुलांना श्वसनाचा त्रास होऊ शकतो.
लहान मुलांचे नाक वाहणे थांबवण्याचे खाली काही सोपे उपाय दिलेले आहेत
लहान मुले आणि मोठ्या मुलांमधील नाक वाहण्याच्या समस्येवर नैसर्गिक उपाय
लहान आणि मोठ्या मुलांच्या नाक वाहण्याच्या समस्येवर काही नैसर्गिक घरगुती उपाय येथे दिलेले आहेत.
- आले आणि मधाचे मिश्रण त्यासाठी अगदी उपयुक्त आहे. आल्याच्या तुकडा किसून त्याचा रस पिळून काढून घ्या. त्यात मध घालून हे मिश्रण दिवसातून दोन ते तीन वेळा आपल्या मुलाला द्या.
- लहान मुलांच्या सर्दीसाठी मोहरीचे तेल उत्तम आहे. मोहरीच्या तेलात थोडे हिंग, लसूण पाकळ्या आणि ओवा टाकून गरम करा. ह्या तेलाने तुमच्या मुलाच्या पाठीवर आणि छातीला मसाज करा. काही वेळ मसाज केल्यावर तुमच्या मुलाची सर्दीची लक्षणे सुधारताना तुम्ही पाहू शकता.
- लहान मुलांच्या सर्दीवर सर्वात प्रभावी भारतीय घरगुती उपायांपैकी एक म्हणजे खोबरेल तेल आणि कापूर. खोबरेल तेलात कापूर मिसळा आणि गरम करा. हे मिश्रण फक्त तुमच्या बाळाच्या छातीवर, पाठीवर आणि मानेवर हळूवारपणे लावा. सर्दीसाठी ह्याचा उपयोग होतोच परंतु त्याला शांतपणे झोप लागण्यास सुद्धा मदत होऊ शकते.
- सर्दीसाठी दुधात जायफळ मिसळणे हा एक उत्तम घरगुती उपाय आहे. काही चमचे दूध घेऊन त्यात चिमूटभर जायफळ घाला. ते चांगले उकळून घ्या आणि आपल्या मुलास देण्यापूर्वी थंड करून घ्या. आपल्या मुलास लवकर बरे वाटण्यासाठी हा एक चांगला मार्ग आहे.
वर सांगितलेल्या उपायांव्यतिरिक्त, हिवाळ्यात तुमच्या बाळाला पूर्ण आणि उबदार कपडे घातले आहेत ना ते पहा. तुमच्या बाळाच्या वाहत्या नाकाची समस्या कमी करण्याचा आणखी एक चांगला मार्ग म्हणजे वाफ घेणे. वर नमूद केलेल्या कोणत्याही घरगुती उपायांचा वापर करून तुमच्या बाळाला किंवा लहान मुलाला बरे वाटत नसल्यास, डॉक्टरांची मदत घेण्याची गरज भासू शकते. अशा वेळी तुम्ही तुमच्या डॉक्टरांची मदत घ्यावी.
आणखी वाचा:
बाळांना डास चावल्यास त्यावर १० नैसर्गिक उपाय
बाळे आणि छोट्या मुलांना होणाऱ्या सर्दी खोकल्यावर १४ घरगुती उपाय