गर्भारपण

गरोदरपणात उलट्या होणे

गरोदरपणात तुम्हाला मळमळ, उलट्या आणि मॉर्निंग सिकनेसचा अनुभव येणे हे अगदी सामान्य आहे. विशेषत: पहिल्या तिमाहीत बर्‍याच स्त्रिया यातून जात असतात. प्रत्येक स्त्रीला ह्याचा अनुभव येत नाही. पण तुम्हाला अनुभव आला असेल तर ते अगदी सामान्य आहे. गर्भवती स्त्रीला उलट्या आणि मळमळ होण्याची अनेक कारणे आहेत. त्याचे कारण शोधून काढल्यास तुम्हाला मॉर्निंग सिकनेस टाळण्यासाठी किंवा त्याचा परिणाम कमी करण्यासाठी मदत होऊ शकते.

गरोदरपणातील मॉर्निंग सिकनेस

मॉर्निंग सिकनेस हे गरोदरपणाच्या सुरुवातीच्या लक्षणांपैकी एक असू शकते आणि गरोदरपणाच्या 6 व्या आठवड्याच्या आसपास मॉर्निंग सिकनेसची सुरुवात होते. 8व्या आणि 9व्या आठवड्यांच्या दरम्यान मॉर्निंग सिकनेस वाढतो. मॉर्निंग सिकनेस साधारणपणे 12 व्या आठवड्यात कमी होतो आणि 14 व्या आठवड्यात पूर्णपणे नाहीसा होऊ शकतो. दिवसाच्या कोणत्याही वेळी उलट्या होऊ शकतात, कारण अनेक स्त्रिया सांगतात की गरोदरपणात सकाळच्या वेळी, मॉर्निंग सिकनेसचा त्रास खूप जास्त होतो तर काही स्त्रियांना  दिवसभर त्याचा अनुभव येतो. मॉर्निंग सिकनेसची तीव्रता प्रत्येक स्त्रीनुसार बदलू शकते. लक्षणे न दाखवता उलटीची भावना येऊ शकते. मॉर्निंग सिकनेसचा  किंवा अगदी सौम्य मळमळ ह्यामुळे तुम्हाला थकल्यासारखे. गर्भवती स्त्रिया मॉर्निंग सिकनेसच्या विचाराने दुःखी होतात आणि दिवसाच्या सुरुवातीलाच उलट्या होण्याच्या भीतीने अंथरुण सोडत नाहीत.

गरोदरपणात उलट्या होणे सामान्य आहे का?

मॉर्निंग सिकनेस हा फार आनंददायी अनुभव नसला तरी, गरोदरपणात मॉर्निंग सिकनेस होणे हे सामान्य आहे. बहुतेक गरोदर स्त्रियांना मॉर्निंग सिकनेसचा त्रास होतो. काही वेळानंतर लक्षणे कमी होतात. परंतु, उलटीची तीव्रता आणि वारंवारता वाढल्यास आपण ताबडतोब आपल्या डॉक्टरांशी संपर्क साधावा. जर एखाद्या स्त्रीला दिवसभर सतत उलट्या होत असतील आणि वजन कमी होत असेल तर तिला डिहायड्रेशनचा धोका असतो. तसेच, या स्थितीकडे दुर्लक्ष केल्यास किंवा उपचार न केल्यास, बाळाच्या आणि आईच्या आरोग्याला धोका निर्माण होऊ शकतो.

गरोदरपणात उलट्या आणि मळमळ होण्याची कारणे काय आहेत?

गरोदरपणात उलट्या आणि मळमळ होण्यामागे कोणतेही एक कारण नसते. तरी, त्यामागे काही सामान्य आहेत आणि बहुतेक गर्भवती स्त्रियांवर परिणाम करतात. गरोदरपणात उलट्या होण्याचे एक सामान्य कारण म्हणजे एचसीजी ह्या संप्रेरकाची वाढलेली पातळी होय. तसेच, शरीरातील इस्ट्रोजेन आणि प्रोजेस्टेरॉनच्या वाढलेल्या पातळीमुळे पचनमार्गाचे स्नायू शिथिल होतात आणि पचनक्रियेची कार्यक्षमता कमी होते. गरोदरपणामुळे वासाची भावना देखील वाढते. गर्भवती स्त्रियांची कुठल्याही वसाप्रती संवेदनशीलता वाढते. अशा वेळी, तुम्हाला जेवण्याची इच्छा होत नाही.  यामुळे मळमळ होते आणि पोट रिकामे असल्याचे जाणवू लागते. गरोदरपणात मळमळ आणि उलट्या होण्याची काही संभाव्य कारणे तपशीलवार पाहू या:

1. एचसीजी पातळी वाढणे

मानवी कोरिओनिक गोनाडोट्रॉपिन (एचसीजी) संप्रेरक गरोदरपणाच्या सुरुवातीच्या काळात लवकर वाढते. एचसीजीच्या वाढीचा संबंध मळमळ आणि उलट्याशी असू शकतो कारण दोन्ही घटनांची वेळ अगदी जवळ आहे, विशेषत: एचसीजीची पातळी वाढलेली असते तेव्हा मळमळ खूप वाढते.

2. एकाधिक गर्भधारणा

जुळे किंवा तिळे असेल एचसीजीची पातळी वाढते, आणि त्यामुळे मळमळ होते.

3. ओइस्ट्रोजेन

इतर संप्रेरकांप्रमाणे, इस्ट्रोजेनची पातळी देखील वाढते, विशेषत: गरोदरपणाच्या सुरुवातीच्या काळात ही पातळी वाढलेली आढळते आणि हे मॉर्निंग सिकनेसचे संभाव्य कारण आहे.

4. वास आणि दुर्गंधीबद्दल वाढणारी संवेदनशीलता

गरोदर स्त्रियांना बर्‍याचदा दुरूनच गोष्टींचा वास येऊ लागतो. काही विशिष्ट सुगंधांनी ह्या स्त्रिया सहजपणे भारावून जातात, आणि त्यामुळे रिफ्लेक्स एका क्षणात ट्रिगर होऊ शकतात. संशोधनात असे दिसून आले आहे की हे इस्ट्रोजेन पातळी वाढल्याचे हे परिणाम असू शकतात.

5. नाजूक पचनसंस्था

विशेषत: जेव्हा पचनसंस्था सर्व प्रकारचे अन्नपदार्थ आणि त्यांच्या चवीबद्दल संवेदनशील होते तेव्हा काही स्त्रिया गरोदरपणाच्या सुरुवातीच्या टप्प्यातील बदल हाताळू शकतात. तसेच, पोटात हेलिकोबॅक्टर पायलोरी ह्या जिवाणूंमुळे मळमळ होऊन उलट्या होतात.

6. तणाव

उलट्या आणि मळमळ हे देखील तणावाचे परिणाम असू शकतात किंवा तणावाला प्रतिसाद असू शकतात. ज्या स्त्रियांना मानसिकदृष्ट्या मॉर्निंग सिकनेसचा त्रास असतो अशा स्त्रियांना इतरांपेक्षा ह्याचा अनुभव जास्त असतो.

7. आईकडून आलेले आनुवंशिक घटक

ज्या स्त्रियांच्या आईला मॉर्निंग सिकनेसचा त्रास झालेला असतो  त्यांना हा अनुभव येण्याची शक्यता जास्त असते.

8. मोशन सिकनेसचा इतिहास

ज्या महिलांना मळमळ आणि मायग्रेनचा त्रास होतो त्यांना मॉर्निंग सिकनेस होण्याची शक्यता असते.

9. चरबीचे जास्त सेवन

ज्या स्त्रियांनी गर्भधारणेपूर्वी जास्त प्रमाणात असंतृप्त चरबीचे सेवन केलेले असते अश्या स्त्रियांना मळमळ आणि मॉर्निंग सिकनेसचा त्रास होण्याची शक्यता असते.

याचा तुमच्या बाळावर परिणाम होईल का?

आईला होणारी मळमळ आणि उलट्यांचा त्रास बाळाला होईल का अशी चिंता आईला वाटत राहते, परंतु सामान्यत: सौम्य प्रमाणात उलट्या झाल्यास वाढत्या गर्भाला इजा होत नाही. परंतु, गर्भाची वाढ आणि विकास ह्यास अडथळा निर्माण होऊ नये म्हणून हा त्रास  कायम राहिल्यास डॉक्टरांचा सल्ला घेणे चांगले. हायपरमेसिस ग्रॅव्हिडारम नावाची स्थिती किंवा गंभीर प्रकारचा मॉर्निंग सिकनेस ह्यामुळे वजन कमी होऊ शकते आणि भरपूर उलट्या झाल्यामुळे इलेक्ट्रोलाइट संतुलन बिघडू शकते. परंतु जेव्हा असे होते तेव्हा डॉक्टरांचा सल्ला घेणे चांगले असते, कारण त्यावर उपचार न झाल्यास बाळाला हानी पोहचू शकते.

गरोदरपणात होणाऱ्या उलट्या आणि मळमळ होणे कसे थांबवावे?

उलट्या कशा थांबवायच्या हा प्रश्न बऱ्याच गरोदर स्त्रियांना त्रास देतो. उलट्यांमुळे येणाऱ्या अस्वस्थतेपासून मुक्त होण्यासाठी बऱ्याच स्त्रिया वाट पाहात असतात. उलट्या थांबवण्यासाठी काही नैसर्गिक तर काही घरगुती उपचार असतात. ह्या दोन्ही प्रकारच्या उपचार पद्धतींचे स्वतःचे असे फायदे आहेत. मॉर्निंग सिकनेसचा त्रास कमी होण्यासाठी आणि आयुष्य अधिक सुसह्य होण्यासाठी खालील उपाय करून पहा.

गरोदरपणात होणाऱ्या उलट्या आणि मळमळ ह्यासाठी घरगुती उपचार

1. आरामदायी दिनचर्येचे पालन करा गरोदर स्त्रियांना आधीच खूप त्रास असतो . दिवसभरात खूप कामे करू नका आणि थोड्या थोड्या अंतराने तुमची कामे पूर्ण करा. तणाव आणि थकवा ह्यामुळे तुम्हाला आणखी अस्वस्थ वाटेल, म्हणून विश्रांती घेण्यासाठी कामातून वेळ काढल्यास त्याची तुम्हाला मदत होईल. 2. स्वयंपाकघरात जाणे टाळा तुमच्या दिवसाची सुरुवात काही कोरडी बिस्किटे चघळून करा. तुमचा नित्यक्रम सुरू होण्यापूर्वी थोडा वेळ अंथरुणावर विश्रांती घ्या. स्वयंपाकघरात जाणे टाळण्यासाठी ताजे टोस्ट किंवा बिस्किटांचा साठा आपल्या बेडजवळ ठेवा. गर्भवती असो वा नसो, स्वयंपाकघरातून बाहेर राहणे स्त्रियांसाठी कठीण असते.  परंतु स्वयंपाकघर आणि अन्नपदार्थांच्या वासामुळे त्यांना मळमळ होत असेल, तर मदत घ्या (स्वयंपाकासाठी मदतनीस ठेवणे हा एक चांगला पर्याय असू शकतो). 3. तुमच्या सोयीनुसार खा जोपर्यंत तुम्ही पौष्टिक अन्न खात आहात तोपर्यंत तुमचे बाळ सुरक्षित आणि संरक्षित आहे. मसालेदार, तेलकट आणि चरबीयुक्त पदार्थ टाळा कारण त्यामुळे तुमची समस्या आणखी वाढू शकते. थोडे थोडे आणि  वारंवार खा. तुम्हाला कुठले अन्नपदार्थ चालतात आणि कुठले नाही हे तुम्हाला लवकरच कळेल. तपकिरी तांदूळ, रताळे, केळी, कॉर्न, चिकन (जर तुम्ही मांसाहारी असाल तर) आणि अक्रोड यांसारखे व्हिटॅमिन बी 6 समृध्द पदार्थ खाण्यास सांगितले जाते. हे अन्नपदार्थ पूरक आहारांपेक्षा चांगले आहेत. 4. हायड्रेटेड रहा आपले शरीर हायड्रेटेड ठेवण्यासाठी नियमित अंतराने पाणी प्या. पाणी प्यायल्याने मॉर्निंग सिकनेसची लक्षणे तसेच अपचन, छातीत जळजळ आणि ऍसिडिटी सारख्या समस्यांपासून मुक्त होण्यासाठी मदत होते. पाण्यात ताज्या लिंबाचा रस टाकून प्यायल्याने उलटीची भावना टाळण्यास मदत होते. एरेटेड पेये, कॉफी आणि चहा, जास्त प्रमाणात घेऊ नका कारण ह्या सगळ्या पेयांमुळे लघवीचे प्रमाण वाढते.
5. योग करून पहा योग निद्रा आणि शवासन (यासारख्या सोप्या विश्रांती तंत्रांच्या सरावासाठी मदत करण्यासाठी प्रशिक्षित प्रसवपूर्व योग प्रशिक्षकाशी संपर्क साधा. तुम्ही तुमच्या गरोदरपणात योगाभ्यास करू शकता. योगाभ्यास केल्याने तुम्हाला तुमचे मन आणि शरीर शांत ठेवण्यासाठी आणि तणावाची पातळी कमी करण्यासाठी मदत होईल. 6. ताजा सुगंध घ्या काही विशिष्ट वासामुळे तुम्हाला मळमळ होईल आणि तुम्हाला वॉशरूमकडे जावे लागेल. त्यामुळे ताजेपणा मिळवण्यासाठी तुमच्या बॅगमध्ये ताज्या लिंबाच्या अर्काची बाटली ठेवा. जेव्हा तुम्ही गर्दीच्या ठिकाणी असता तेव्हा हे विशेषतः उपयुक्त आहे. 7. आले - सुपरफूड पूर्वीपासूनच आले पोटासाठी चांगले असल्याचे समजले जाते. मॉर्निंग सिकनेस आणि उलट्या कमी करण्यासाठी आले आदर्श आहे. गरोदरपणात मळमळ कमी करण्यासाठी घरगुती उपचारांच्या यादीत आले सर्वात वर आहे. तुम्ही गरम पाण्यात किंवा तुमच्या रोजच्या चहाच्या कपमध्ये आल्याचा पातळ तुकडा घालू शकता. आले कँडी, जिंजरब्रेड किंवा सूपमध्ये अद्रक घालणे यासारख्या विविध प्रकारांनी तुम्ही तुमच्या आहारात आल्याचा समावेश करू शकता. परंतु, जर तुमच्या डॉक्टरांनी रक्ताच्या गुठळ्यांसाठी अँटीकोआगुलंट औषधे लिहून दिली असतील तर अद्रकाचा समावेश तुमच्या आहारात करू नका. 8. आंबट अन्न खाऊन पहा बर्‍याच स्त्रियांना लिंबू, चिंच, आवळा आणि पुदिना ह्यासारखे आंबट अन्न पदार्थ सुखदायक आणि मळमळ दूर ठेवण्यासाठी उपयुक्त वाटतात. साधे लिंबू पाणी तुमच्या पचनासाठी खूप उपयुक्त आहे. तसेच चिंचेचे पाणी आणि चटणी हा देखील एक लोकप्रिय पर्याय आहे. पुदिन्याच्या पानांमुळे तुम्हाला ताजेतवाने वाटू शकते, म्हणून पुदिन्याची काही पाने रेफ्रिजरेटरमध्ये ठेवा. 9. अंथरुणात पडून रहा मॉर्निंग सिकनेस कमी करण्यासाठी आणि उलट्या करून दिवसाची सुरुवात होणे टाळण्याचा एक सोपा उपाय म्हणजे अंथरुणावर पडून राहणे. जेव्हा मळमळ होते तेव्हा डॉक्टर  विश्रांती घेण्यास सांगतात. तुम्हाला आवडत असल्यास सूर्यप्रकाश येऊ नये म्हणून गडद रंगाचे आणिजाड पडदे लावा. विश्रांती घेतल्याने तुम्हाला बरे वाटते आणि जास्त प्रयत्न न करता समस्येचे निराकरण करण्यात मदत होऊ शकते. 10. अरोमाथेरपीचा प्रयोग लिंबू, संत्रा आणि पुदीना यासारखे सुगंध मळमळ होण्याची भावना दूर करण्यासाठी उत्तम आहेत. इसेन्शिअल ऑईलचे काही थेंब डिफ्यूझरमध्ये घाला आणि थोडा वेळ श्वास घ्या. तुम्ही बाहेर जाताना तुमच्या रुमालावर काही थेंब देखील तुम्ही शिंपडू शकता.

गरोदरपणातील उलट्यांसाठी वैद्यकीय उपचार

उलट्या आणि मळमळ होण्याची तीव्रता वाढल्यास, मळमळ कमी होण्यासाठी तुमचे डॉक्टर औषधे लिहून देऊ शकतात आणि तुम्ही खाल्लेले अन्न टिकवून ठेवण्यास मदत करतात. खालील औषधांचा ह्यामध्ये समावेश होतो: हे लक्षात ठेवा की ही औषधे डॉक्टरांच्या सल्ल्यानंतरच घ्यावीत.

तुम्ही डॉक्टरांना कधी फोन करावा?

तुम्हाला खालीलपैकी कोणतीही लक्षणे आढळल्यास तुम्ही तुमच्या डॉक्टरांना कॉल करावा तुमची स्थिती आणखी बिघडण्यापूर्वी तुमच्या डॉक्टरांशी संपर्क साधा. मॉर्निंग सिकनेस गंभीर असेल तर रुग्णालयात नेण्याची गरज भासू शकते.निर्जलीकरण दूर करण्यासाठी आय. व्ही. ने द्रवपदार्थ घेणे आवश्यक असू शकते. गरोदरपणात तुम्हाला मॉर्निंग सिकनेसचा त्रास असेल तर काळजी करू नका कारण गरोदरपणात मॉर्निंग सिकनेसच्या या लढाईत तुम्ही एकट्या नाही आहात. 70% पेक्षा जास्त स्त्रियांना त्यांच्या गरोदरपणात मळमळ आणि उलट्या होतात. आणखी वाचा: गरोदरपणातील अतिसार: कारणे, उपचार आणि प्रतिबंध गरोदरपणात पोटात वायू होणे आणि पोट फुगल्यासारखे वाटणे
Published by
मंजिरी एन्डाईत
Last Updated On

Recent Posts

All Rights Reserved