मोठी मुले (५-८ वर्षे)

लहान मुलांसाठी सुधा मूर्तींच्या सर्वोत्तम 7 कथा

सध्या मुलांना उन्हाळ्याच्या सुट्ट्या लागलेल्या आहेत - तुमची मुले आनंदी, मुक्त असतील आणि भरपूर दंगा मस्ती करत असतील! बाहेर कडक ऊन असल्यामुळे तुमचे मूल दिवसातील बराच वेळ टी. व्ही. पुढे घालवत असेल आणि त्याची तुम्हाला काळजी वाटत असेल. तुमच्या मुलाला वाचनाची सवय लावण्यासाठी उन्हाळा हा सर्वोत्तम काळ आहे. वाचनामुळे मुलांच्या मेंदूचा एकापेक्षा जास्त मार्गांनी विकास होऊ शकतो. वाचनाने मुलांची कल्पनाशक्ती वाढते तसेच शब्दसंग्रह वाढतो आणि व्याकरण देखील चांगले  होते. मुलांनी वाचन करणे हे तुमच्यासाठी आणि त्यांच्यासाठी चांगले आहे.

एप्रिल महिन्याच्या लेखिका - सुधा मूर्ती

या महिन्यासाठी आम्ही निवडलेल्या लेखिका दुसऱ्या तिसऱ्या कोणी नसून सुधा मूर्ती आहेत. सुधा मूर्ती ह्या एक अभियंता, शिक्षिका असून कन्नड आणि इंग्रजी साहित्यातील पुरस्कार विजेत्या लेखिका आहेत. त्या सध्या इन्फोसिस फाउंडेशनच्या अध्यक्षा आहेत आणि गेट्स फाऊंडेशनच्या सार्वजनिक आरोग्य सेवा उपक्रमांच्या सदस्या आहेत. इन्फोसिसचे अध्यक्ष नारायण मूर्ती यांच्या पत्नी सुधा मूर्ती त्यांच्या सामाजिक कार्यासाठी आणि साहित्यासाठी ओळखल्या जातात. पद्मश्री आणि साहित्यासाठीचा असलेला आर. के. नारायण पुरस्कार विजेत्या सुधा मूर्ती यांचे कार्य खूप मोलाचे आहे.

प्रत्येक मुलाने वाचल्याच पाहिजेत  अशा  सुधा मूर्तीच्या 7 कथा

सुधा मूर्ती यांनी गेल्या काही वर्षांत अनेक पुस्तके लिहिली आहेत. ही पुस्तके ६ वर्षे  आणि त्याहून अधिक वयाच्या मुलांसाठी वाचनीय आहेत. मूर्तींच्या कथा काल्पनिक आणि तर काही गैर-काल्पनिक आहेत. त्यामुळे मुलांच्या कल्पनेला उत्तेजन मिळू शकते. खाली तुमच्यासाठी सुधा मूर्ती यांच्या पुस्तकांची यादी आहे. ही पुस्तके तुमच्या मुलासाठी अगदी योग्य आहेत.

1. द मॅजिक ऑफ द लॉस्ट टेम्पल

छोटी नूनी त्यांच्या गावात तिच्या आजी आजोबांसोबत काही वेळ घालवायला निघाली आहे, आणि तिला तिथे अनेक आकर्षक गोष्टी करायला मिळतात – पापड खाणे, सहल आयोजित करणे आणि सायकल कशी चालवायची ते शिकणे इत्यादी. जेव्हा तिला जंगलाच्या मध्यभागी एक प्राचीन विहीर सापडते तेव्हा तिची सहल मनोरंजक बनते. जेव्हा ह्या विहिरीची रहस्ये तिच्या मित्रांकडून उलगडली जातात तेव्हा ती रोमांचित होते. हे पुस्तक तुमच्या लहानग्याला सुरुवातीपासून शेवटपर्यंत खिळवून ठेवेल याची खात्री आहे! तुमच्या मुलाने हे पुस्तक का वाचावे?

2. द मॅन फ्रॉम द एग: अनयुज्वल टेल्स अबाउट ट्रिनिटी

तुमच्या मुलाला हिंदू पौराणिक कथांमध्ये रस निर्माण करण्याचा यापेक्षा चांगला मार्ग कोणता? ह्या पुस्तकात मूर्ती यांनी हिंदू देवांच्या पवित्र त्रिमूर्तीच्या संकल्पना मजेदार, मनोरंजक आणि समजण्यास सोप्या पद्धतीने स्पष्ट केल्या आहेत. या देवांच्या काही कथा आपल्यापैकी बहुतेकांना माहिती नाहीत आणि तुमचे मूल (आणि तुम्ही!) माहिती आणि मनोरंजनासाठी हे पुस्तक वाचू शकता. तुमच्या मुलाने हे पुस्तक का वाचावे?

3. हाऊ आय टॉट माय ग्रँड मदर टू रीड अँड आदर स्टोरीज

तुमच्या काही सांसारिक वास्तविक जीवनातील घटना संस्मरणीय कथांमध्ये बदलल्या तर? सुधा मूर्तीचे हे पुस्तक वास्तविक जीवनातील घटनांचा एक संच आहे. ह्या कथांमध्ये बरेच ट्विस्ट आणि टर्न आहेत. शिक्षकांच्या मोजणीतील चुकांमुळे जास्तीचे गुण मिळवण्यासाठी किंवा तुमच्या आजीला वाचण्यासाठी तुमची मदत मागण्यासाठी किंवा राष्ट्रपतींसोबत रेल्वे प्रवास करण्यास तयार रहा! तुमच्या मुलाने हे पुस्तक का वाचावे?

4. द बर्ड विथ गोल्डन विंग्स: स्टोरीज ऑफ विट अँड मॅजिक

कथांचा हा संग्रह जादुई आहे  – प्रत्येक कथा तुमच्या मुलाचे लक्ष वेधून घेईल! हा अविश्वसनीय अश्या नैतिक कथांचा संग्रह आहे आणि त्याचा तुमच्या मुलाला नक्कीच फायदा होईल. तुमच्या मुलाने हे पुस्तक का वाचावे?

5. द मॅजिक ड्रम आणि आदर फेव्हरेट स्टोरीज

सुधा मूर्तीच्या आजी-आजोबांनी त्यांना सांगितलेल्या कथांचा हा संग्रह आहे, तुमचे मूल हे मनमोहक पुस्तक पूर्ण वाचल्याशिवाय खाली ठेवू शकणार नाही. मग ती स्वतःसाठी वर शोधणाऱ्या हुशार राजकुमारीची कथा असो किंवा जादूच्या ड्रमने वाचवलेल्या जोडप्याची कथा असो, या छोट्या कथा तुमच्या मुलाची कल्पनाशक्ती वाढवतील! तुमच्या मुलाने हे पुस्तक का वाचावे?

6. द अपसाइड डाउन किंग: टेल्स अबाऊट राम अँड कृष्ण

सुधा मूर्तीच्या नवीन पुस्तकात राम आणि कृष्णाच्या कथा आहेत. ही दोन सर्वात प्रसिद्ध पौराणिक पात्रे आहेत. जर तुम्हाला तुमच्या लहान मुलाला हिंदू पौराणिक कथांच्या विशाल जगाची ओळख करून द्यायची असेल, तर हे पुस्तक त्यांना नक्की द्या. तुमच्या मुलाने हे पुस्तक का वाचावे?

7. द सर्पेंट्स रिव्हेंज: टेल्स फ्रॉम द महाभारत

ज्यांना महाभारत माहीत नाही असे लोक फार कमी असतील! तुम्ही या महाकाव्याच्या महान कथा ऐकत मोठे झाल्यामुळे, तुम्ही तुमच्या मुलाला अशाच पुस्तकांची भेट देऊ शकता! लहान मुलांना समजेल अशा सोप्या, स्पष्ट भाषेत या भव्य कथा लिहिल्या आहेत. तुमच्या मुलाने हे पुस्तक का वाचावे?
तर, लेखिका सुधा मूर्ती यांची ही आमची 7 आवडती पुस्तके होती. सुधा मूर्तींच्या कथा सहज समजण्याजोग्या आणि वाचनीय असतात. त्यामुळे तुमच्या मुलाला त्याची सर्जनशीलता, व्याकरण आणि  शब्दसंग्रह सुधारण्यास नक्कीच मदत होईल. तुमच्या मुलांना ही पुस्तके वाचायला द्या आणि त्यांना त्यांच्या उन्हाळ्याच्या सुट्ट्या चांगल्या घालवताना पहा! आणखी वाचा:  मुलांसाठी उत्तम नैतिक लघुकथा लहान मुलांना नैतिकतेचे धडे देणाऱ्या छोट्या प्रेरणादायी भारतीय पौराणिक कथा
Published by
मंजिरी एन्डाईत
Last Updated On

Recent Posts

All Rights Reserved