Firstcry Parenting
Search
Parenting Firstcry
Home गर्भारपण प्रसुतीपूर्व काळजी गरोदरपणाच्या तिसऱ्या तिमाहीमध्ये तुम्ही कुठल्या गोष्टी कराव्यात आणि टाळाव्यात?

गरोदरपणाच्या तिसऱ्या तिमाहीमध्ये तुम्ही कुठल्या गोष्टी कराव्यात आणि टाळाव्यात?

गरोदरपणाच्या तिसऱ्या तिमाहीमध्ये तुम्ही कुठल्या गोष्टी कराव्यात आणि टाळाव्यात?

जर तुम्ही सात महिन्यांच्या गरोदर असाल तर तुम्ही गरोदरपणाच्या तिसऱ्या आणि शेवटच्या तिमाहीत प्रवेश केला आहे. तुमच्या वाढलेल्या पोटाचा आकार आता सहज लक्षात येईल, तुम्हाला तुमच्या पोटाचा आकार खूप मोठा वाटत असला तरीसुद्धा तुमच्या बाळाची अजून खूप वाढ होणे बाकी आहे म्हणजे तुमचा सुद्धा आकार आणखी वाढणार आहे! शेवटच्या तीन महिन्यांमध्ये तुमच्या बाळाची हाडे, त्वचा, केस, दात आणि नखे, पचनसंस्था, मेंदू आणि पंचेंद्रिये पूर्ण विकसित होतात. साधारण साडेआठ महिन्यांचे झाल्यावर, बाळ स्थिती बदलते म्हणजेच डोके खाली पाय वर अश्या स्थितीमध्ये येते.

व्हिडिओ: गरोदरपणाच्या तिसर्‍या तिमाहीत काय करावे आणि टाळावे?

तुमच्या आत इतके सगळे बदल होत असताना त्याचा तुमच्या शरीरावर परिणाम होणे साहजिक आहे. तुमचे मूत्राशय सतत भरलेले राहील. त्यामुळे तुम्हाला ओटीपोटाकडील भागात जास्त अस्वस्थता येईल, थकवा जाणवेल, छातीत जळजळ होऊन पाठदुखीचा त्रास होईल. तुमच्या बाळाची काळजी घेण्याचा एक मार्ग म्हणून तुमचे शरीर गरम होण्यास सुरुवात होईल. तुमच्या स्तनांमधून केव्हाही द्रवपदार्थ गळती सुरु होईल. परंतु एक आई म्हणून तुम्ही तुमच्या डॉक्टरांचा सल्ला घ्या आणि शेवटपर्यंत काळजी घ्या.

तिसऱ्या तिमाहीतील चेकलिस्ट

तिसऱ्या तिमाहीतील चेकलिस्ट

नोकरी करणार्‍या मातांनी त्यांची प्रसूती रजा सुरू करण्यासाठी पूर्णपणे तयार असले पाहिजे, परंतु तुम्हाला सुट्टी मिळेल ह्याची खात्री नाही. तुम्हाला विश्रांतीची गरज असली तरी, तुमच्या बाळाला ह्या जगात आणण्यासाठी तुम्ही काही वेळ दिला पाहिजे. तिसऱ्या तिमाहीमध्ये काय केले पाहिजे हे नवीन मातांना कदाचित माहिती नसेल. ह्या थकव्यामुळे आणि कळांमुळे तुमच्या स्मरणशक्तीवर परिणाम होऊ शकतो आणि म्हणूनच आम्ही तिसऱ्या तिमाहीतील कामांची यादी इथे केलेली आहे.

1. निरोगी खा: तुमच्या शरीरात खूप बदल होत आहेत. तुमच्या बाळाला आवश्यक असलेली सर्व पोषकतत्वे त्याला तुमच्याकडून मिळतील, त्यामुळे तुमच्या बाळाला आवश्यक असलेले सर्व पोषण मिळण्यासाठी निरोगी आणि संतुलित आहार घ्या.

2. मोठ्या निर्णयांबद्दल विचार करा: कोणतीही आई आपल्या बाळाला स्वतःपासून लांब ठेऊ इच्छित नसते, परंतु प्रसूती रजा मर्यादित असते. ह्या टप्प्यावर, तुम्ही आणि तुमच्या पतीने बसून चर्चा करणे आवश्यक आहे. तुम्ही तुमच्या बाळासोबत घरी राहणे हा तुमच्या कुटुंबासाठी सर्वोत्तम पर्याय आहे का ह्याविषयी तुम्ही विचार केला पाहिजे. अर्धवेळ नोकरी करणे हा पर्याय देखील उपलब्ध आहे. तुमच्या धार्मिक पार्श्वभूमीशी संबंधित इतर निर्णय देखील घ्यावे लागतील. मुलांसाठी, सुंता करण्याविषयी चर्चा करणे देखील जरुरीचे आहे.

3. तुमच्या गरोदरपणातील डॉक्टरांच्या भेटी ठरवा: तुम्ही तुमच्या काही नियमित शारीरिक चाचण्या आणि प्रसुतीपूर्व चाचण्या करून घेऊ शकता त्यामुळे बाळाच्या जन्मासाठी तुमची आणि बाळाची तब्येत चांगली असल्याची खात्री होते.

4. प्रसूती वर्गांचा विचार करा: प्रत्येकाला बाळाच्या जन्माच्या वर्गांबद्दल माहिती असते आणि त्यात सामील होणे चांगले आहे. परंतु, जर तुम्ही नुकत्याच आई झालेल्या असाल तर स्तनपान आणि बाळांचे सीपीआर वर्ग देखील तुमच्यासाठी अत्यंत फायदेशीर ठरतील.

5. बाळाची काळजी कशी घ्यावी ह्याविषयी वाचन करा: जर तुम्ही अजून सुरुवात केली नसेल, तर गर्भधारणा झाल्यापासून बाळाची काळजी घेण्यापर्यंतची माहिती वाचण्याची हीच वेळ आहे. तुमच्या बाळाच्या जन्मानंतर पहिल्या काही आठवड्यांमध्ये तुम्हाला जास्त वेळ मिळणार नाही.

6. बाळाच्या हालचालींचा मागोवा ठेवा: तुमच्या बाळाच्या हालचालींचा मागोवा ठेवल्याने तुम्हाला काळजी करण्यासारखी काही लक्षणे असल्यास ती लगेच लक्षात येतील. तुमच्या बाळाच्या हालचाली कमी झाल्यास तुम्ही लगेच डॉक्टरांशी संपर्क साधावा.

7. बाळाला लागणाऱ्या गोष्टी खरेदी करून ठेवा: क्रिब्स, स्ट्रोलर्स, कार सीट या सर्व गोष्टी तुम्हाला सेट कराव्या लागतील. तुम्ही तुमचे घर बेबीप्रूफ करू शकता तसेच बाळासाठी बेबी मॉनिटर्स, मोबाईल आणि बॅटरी घेऊन ठेवण्याचा विचार करू शकता.

8. तुमच्या बाळाशी बोला: तुमचे बाळ आता तुमचा आवाज ऐकू शकते. तुमच्या बाळाशी बोलल्याने तुमची भाषा कौशल्ये विकसित होण्यास मदत होते. तुमच्या बाळाला तुमचा आवाज ऐकायला आवडेल. तुम्हाला काय बोलावे हे माहित नसल्यास, तुमच्या बाळासाठी फक्त एखादे पुस्तक मोठ्याने वाचा.

9. प्रसूती वेदनांशी सामना करण्याबद्दल जाणून घ्या: ज्या स्त्रियांची ही पहिली प्रसूती असते त्यांना प्रसूतीसाठी सरासरी १५ तास लागू शकतात, ह्यापेक्षा जास्त वेळ सुद्धा लागू शकतो. ज्यांची आधीची प्रसूती नॉर्मल झालेली आहे त्यांना प्रसूतीसाठी कमी वेळ लागतो. हा वेळ साधारणपणे ८ तास इतका असतो. जरी तुमच्यासाठी वेदना शामक औषधे उपलब्ध असली तरीसुद्धा काही स्त्रिया वेदनाशामक औषधे न घेण्याचा निर्णय घेतात. तुमच्या परिस्थितीचा विचार करा आणि उपलब्ध पर्याय निवडा.

10. प्रसूतीची तयारी करा: तुमचे डॉक्टर किंवा दाई यांच्यासोबत प्रसूतीची चर्चा करणे देखील महत्त्वाचे आहे. त्यांच्याशी कधी संपर्क साधावा तसेच हॉस्पिटलला कधी जावे हे तुम्हाला माहीत असले पाहिजे. प्रसूतीच्या टप्प्यांविषयी वाचण्यात थोडा वेळ खर्ची घाला घालवा म्हणजे तुम्ही गोंधळून जाणार नाही.

11. जन्म योजना तयार करा: प्रसूती कळा येऊ लागल्यानंतर तुमच्या योजना यशस्वी होतीलच असे नाही परंतु एखादा प्लॅन तुमच्याकडे असणे उत्तम आहे. त्यामुळे कामे कशी करायची ह्याची तुम्हाला कल्पना येईल. तुम्ही रुग्णालयात कुणाला घेऊन जाणार आहात? वेदनाशामक औषधें घेणार आहात की सामान्य प्रसूती हा पर्याय निवडणार आहात? प्रायव्हेट रूम कि शेअरिंग? घरीच प्रसूती की हॉस्पिटलमध्ये? ह्या सगळ्या प्रश्नांचा विचार करून ठेवा

12. तुमच्या बाळाचे कपडे आणि अंथरूण धुवा: बाळाचे कपडे आणि बिछाना धुण्यासाठी सौम्य डिटर्जंट्स वापरा कारण त्यांच्यामध्ये असलेले घटक तुमच्या बाळाच्या त्वचेला त्रासदायक ठरू शकतात.

13. मदतनीस ठेवा: नवीन मातांनी भारावून जाणे साहजिक आहे आणि घरातील कामे करणे तुमच्यासाठी आता सोपे राहणार नाही. तुम्‍हाला कुठल्या गोष्टींसाठी मदतीची आवश्‍यकता आहे आणि कोण तुम्‍हाला मदत करू शकेल अशा गोष्टींची यादी तयार केली तर त्याची तुम्हाला खूप मदत होईल. उदाहरणार्थ, जे लोक तुम्हाला मदत करू इच्छितात त्यांची यादी करा आणि नंतर त्याप्रमाणे वेळापत्रक तयार करा जेणेकरून प्रत्येक व्यक्तीला एक विशिष्ट काम मिळेल आणि ते करण्यासाठी त्यांना तारीख नेमून दिली जाईल. यामध्ये तुमच्या मुलांच्या किंवा तुमच्या घरातील पाळीव प्राण्यांच्या गरजा पूर्ण करण्यासाठी किराणा सामान खरेदी करणे इत्यादी कामांचा समावेश असू शकतो.

14. हॉस्पिटल किंवा बर्थ सेंटर निवडा: शेवटच्या क्षणाची वाट पाहण्यापेक्षा आणि जवळच्या हॉस्पिटल ची निवड करणाआधी, बाहेर पडा आणि तुमचे इतर सर्व पर्याय तपासून पहा. तुमची सर्वात जास्त काळजी जिथे घेतली जाईल आणि तुम्हाला आरामदायक वाटेल असे ठिकाण शोधा. तुम्ही तुमचा वैद्यकीय खर्च भरण्यासाठी विमा वापरणार असाल तर हॉस्पिटलमध्ये विमा स्वीकारतात का ते शोधा. एकदा तुम्हाला तुमच्या प्रसूतीसाठी आवडीचे हॉस्पिटल सापडले की कागदोपत्री कामाला सामोरे जावे लागू नये म्हणून पूर्वनोंदणी करून पहा.

15. तुमच्या बॅग पॅक करून ठेवा: तुम्हाला रुग्णालयात राहण्यासाठी स्वतःसाठी तयारी करून ठेवावी लागेल. एक पॅक केलेली बॅग तयार ठेवा कारण एकदा प्रसूती झाल्यावर तुम्हाला त्यासाठी वेळ मिळणार नाही. तुमच्यासाठी पॅक करण्याच्या महत्त्वाच्या गोष्टी म्हणजे विमा कार्ड, आरामदायक कपडे आणि प्रसाधन सामग्री, तुमच्या बाळासाठी घरी येताना घालण्यासाठी कपडे तसेच तुमचा फोन आणि चार्जर इत्यादी.

16. तुमचे घर स्वच्छ करा: हॉस्पिटलमध्ये राहिल्यानंतर, स्वच्छ घरामध्ये येणे तुमहाला नेहमीच चांगले वाटते. त्यामुळे तुमचे घर आधीच स्वच्छ करून ठेवणे तुमच्यासाठी फायदेशीर ठरेल कारण नंतर तुमच्याकडे छोटे बाळ असल्याने तुम्हाला ते करता येणार नाही.

17. लागणाऱ्या गोष्टींचा साठा करा: नवजात बाळाला घेऊन काहीही करणे सोपे नाही आणि तुमच्या बाळासोबत बाहेर जाणे टाळण्यासाठी आवश्यक घरगुती वस्तूंचा साठा करणे चांगले. पॅन्ट्रीच्या वस्तू, औषधे, टॉयलेट पेपर आणि तुम्हाला रोजच्या गरजेच्या इतर गोष्टींचा साठा करा. तसेच, तुमच्या लहान बाळाला आवश्यक असलेल्या सर्व गोष्टी तुमच्याकडे असल्याची खात्री करा.

18. तुमच्या मनोरंजनासाठी लागणाऱ्या गोष्टींचा साठा करा: तुमचे मन रमवणाऱ्या गोष्टींची निवड करा. मग ते आर्ट सप्लाईज खरेदी करणे असो किंवा काही नवीन पुस्तके खरेदी करणे असो, तुमच्या मुलाची काळजी घेऊन थोडी विश्रांती घेताना तुमचे मनोरंजन करण्यासाठी तुमच्याकडे काहीतरी असल्याची खात्री करा.

19. दररोज व्यायाम करा: गरोदरपणासाठी अनुकूल असे काही मूलभूत व्यायाम किंवा स्ट्रेचिंग करा. हे व्यायाम तुमच्यासाठी खरोखर चांगले आहेत कारण त्यामुळे तुमचे शरीर चांगले रहाते.

20. मुलांची किंवा पाळीव प्राण्यांच्या काळजी घेण्याविषयी व्यवस्था करून ठेवा: जर तुम्हाला मोठे मुले मूल असेल, तर तुम्ही आणि तुमचे पती हॉस्पिटलमध्ये असताना त्याची काळजी घेण्यासाठी काहीतरी व्यवस्था करणे गरजेचे आहे. तुमच्या पाळीव प्राण्यांना अन्न लागेल आणि त्यांना बाहेर घेऊन जाणे सुद्धा आवश्यक आहे. त्यासाठी आगाऊ योजना करणे उत्तम.

21. बाळाच्या आगमनासाठी पाळीव प्राण्यांची तयारी करून ठेवा: बहुतेक लोक त्यांच्या पाळीव प्राण्यांना मुलांप्रमाणे वागवतात. परंतु आता तुम्हाला बाळ होणार आहे. तुम्हाला तुमच्या पाळीव प्राण्यांकडे आधीसारखे लक्ष देणे शक्य होणार नाही. त्यामुळे ह्या बदलांमुळे ते गोंधळून जातील आणि घरात नवीन आलेल्या पाहुण्याबद्दल त्यांना उत्सुकता वाटेल. पाळीव प्राण्यांना ही नवीन जीवनशैली कशी सोपी जाईल ह्याकडे लक्ष द्या तसेच त्याची तुमच्या बाळाशी ओळख करून देण्याचा सर्वोत्तम मार्ग कोणता हे सुद्धा शोधून काढा.

22. तुमच्या गरोदरपणाचा आनंद घ्या: तुम्ही तुमच्या बाळासोबत घालवू शकता असा अत्यंत जिव्हाळ्याचा असा हा काळ आहे, त्यामुळे ह्या काळाचा आनंद घेण्यास विसरू नका! तुम्ही जसे आहात तसे स्वतःचे फोटो प्रोफेशनल फोटोग्राफर कडून काढून घ्या. जेणेकरून तुमच्या आयुष्यातील हा संस्मरणीय काळ तुमच्या कायम लक्षात राहील.

तिसऱ्या तिमाहीमध्ये तुम्ही टाळल्या पाहिजेत अश्या गोष्टी

तिसऱ्या तिमाहीमध्ये प्रसूतीची तयारी करण्यासाठी तुमची भरपूर ऊर्जा खर्च होत असते. त्यामुळे तुमच्या गरोदरपणाची तिसरी तिमाही हा सर्वात अवघड टप्पा असतो. स्वतःच्या शू लेसची गाठ बांधण्यासारखी दररोजची कामे करणे सुद्धा अवघड होते. तुमच्या गरोदरपणाच्या तिसऱ्या तिमाहीमध्ये कुठल्या गोष्टी टाळल्या पाहिजेत ह्याची यादी ह्या लेखामध्ये दिलेली आहे.

1. जड वस्तू उचलणे टाळा: तुमच्यासाठी एखादी जड वाटणारी कोणतीही वस्तू उचलणे टाळा. तुम्हाला तुमच्या लहान बाळाची काळजी घ्यायची असल्याने तुम्ही त्याला दुसऱ्या कुणाकडे तरी देऊ शकता. तुम्ही एकतर तुमच्या पतीला किंवा जवळच्या नातेवाईकाला बाळाला घेऊन जाण्याची जबाबदारी देऊ शकता. सुरुवातीला तुम्हाला हे कठीण जाऊ शकते, परंतु तुम्ही हार मानल्यास तुम्हाला नक्कीच ताण जाणवेल आणि ह्या महत्वाच्या काळात तुम्ही अनावश्यक कुठलीही जोखीम घेऊ नये.

2. खूप वेळ बसणे किंवा प्रवास करणे: दीर्घ काळासाठी प्रवास केल्यास तुम्हाला अस्वस्थ वाटू शकते. शक्य असल्यास ह्या गोष्टी टाळणे चांगले. परंतु, जर तुम्हाला जास्त वेळ बसण्याची गरज असेल तर, स्ट्रेचिंग करण्यासाठी दर दोन तासांनी जागेवरून उठा. कारण त्यामुळे बाळाचे रक्ताभिसरण होण्यास मदत होईल.

3. जड जेवण: आता, तुमच्या पोटातील बाळ खाली सरकलेले आहे आणि तुम्ही एकाच वेळी भरपूर खाल्ले तर पचन थोडे कठीण होऊ शकते. जड जेवणामुळे ऍसिडिटी सारख्या समस्या उद्भवू शकतात कारण त्यामुळे बाळ वर ढकलले जाऊ शकते. तुम्ही एकाच वेळी खूप खाण्यापेक्षा थोडे थोडे खाणे चांगले असते.

4. उंच टाचेच्या चपला: पार्टीला जाताना उंच टाचेच्या चपला घालणे छान वाटते परंतु तुमच्या शरीराच्या स्थितीसाठी ते चांगले नाही. तुम्ही उंच टाचेच्या चपला घातल्यास ते तुमच्या पाठीसाठी फारसे चांगले नाही कारण त्यामुळे पाठीवर थोडासा दाब येतो. अनावश्यक ताण आणि वेदना टाळण्यासाठी, अधिक आरामदायक असे फ्लॅट शूज घाला.

5. उंच ठिकाणी जाणे टाळा: हवेतील ऑक्सिजनची पातळी कमी झाल्यामुळे उंचावरच्या ठिकाणी श्वास घेणे कठीण होते. जास्त उंची असलेल्या ठिकाणी उड्डाण करणे किंवा प्रवास करणे टाळा कारण यामुळे तुमच्या बाळाला ऑक्सिजन कमी पडू शकतो.

6. जड व्यायाम: गर्भवती स्त्रियांना दररोज व्यायाम करण्याचा सल्ला दिला जातो. व्यायाम करण्याच्या आधी तुमच्या दिनचर्येविषयी डॉक्टरांचा सल्ला घ्या. विशेषत: जर तुम्हाला आधीच काही वैद्यकीय समस्या असतील तर तुम्ही हे नक्की करा. तुम्हाला थकवा येईल किंवा बाळाला हानी पोहचेल बाळाला हानी पोहचेल असे व्यायाम करू नका.

7. घरातील जड काम: तुमच्या घरातील कामांसाठी मदत घ्या. धुळीमुळे तुम्हाला त्रास होऊ शकतो. कोणतेही रासायनिक डिटर्जंट टाळा आणि त्याऐवजी नैसर्गिक डिटर्जंट वापरा.

8. मांजरीची घाण साफ करणे किंवा कच्चे मांस हाताळणे: मांजरीची घाण आणि कच्चे मांस ह्यावर परजीवी जिवाणू असतात. त्यामुळे टॉक्सोप्लाज्मोसिस होतो म्हणून ते हाताळणे टाळा कारण ते तुमच्या पोटातील बाळासाठी खूप हानिकारक असू शकते.

9. शारीरिक संबंध: गरोदरपणात शारीरिक संबंध ठेवायला खूप प्रोत्साहन दिले जाते. तुम्हाला त्यामुळे थकवा येत असेल किंवा तुम्हाला अकाली प्रसूती होण्याचा धोका असेल तर तुमच्या डॉक्टरांनी सांगेपर्यंत थांबणे चांगले असते.

तुम्हाला भारावून गेल्यासारखे वाटत असेल तर काळजी करू नका. काही स्त्रियांच्या बाबतीत ह्या कालावधीत मॉर्निंग सिकनेस पुन्हा डोके वर काढतो, त्यामुळे तिसऱ्या तिमाहीत बऱ्याच गोष्टी करणे कठीण होते. थकवा आणि अस्वस्थतेशी सामना करा. शक्य असल्यास मदत घ्या. तुम्हाला मदतीची गरज आहे हे लक्षात आल्यावर तुमचे पती, मित्र आणि कुटूंब हे सर्व तुम्हाला मदत करण्यास तयार असतील. तुम्ही ज्या बाळाचे पोटात प्रेमाने पालनपोषण करत आहात, त्याला लवकरच तुम्ही तुमच्या मांडीवर घेणार आहात. ज्या लहानशा चेहऱ्याला तुम्ही पाहण्यास उत्सुक आहात त्या गोड चेहऱ्याची लवकरच तुम्ही पापी घेणार आहात. सगळं सहजतेने घेण्याचा प्रयत्न करा आणि पुढे जा. तुम्ही प्रसूतीच्या दिवसाच्या अगदी जवळ आहात!

आणखी वाचा:

गर्भधारणेची तिसरी तिमाही – गर्भधारणेच्या शेवटच्या टप्प्यातील प्रणयाचा आनंद
गरोदरपणाच्या तिसऱ्या तिमाहीमध्ये कसे झोपावे – झोपेच्या स्थिती आणि सुरक्षिततेसाठी टिप्स

RELATED ARTICLES
MORE FROM AUTHOR
संपादकांची पसंती
Please Wait Updating Your Article