गर्भारपण

गरोदरपणात सूज येणे

गर्भारपण हा स्त्रीच्या आयुष्यातील एक जादुई टप्पा आहे. जर तुम्ही गरोदर असाल, तर तुम्हाला तुमच्या जवळच्या माणसांकडून भरपूर प्रेम मिळेल आणि त्यांचे तुमच्याकडे लक्ष राहील. परंतु गरोदरपणाच्या काही लक्षणांमुळे तुम्हाला जीवन कठीण वाटू शकते. त्यामुळे गरोदरपणाचा हा टप्पा तितकासा आनंददायी नाही असे तुम्हाला वाटू शकते. तुमच्या शरीरात बदल होत असल्याने तुम्हाला थोडे अस्वस्थ वाटू लागेल. आणि नंतर शरीराच्या विविध अवयवात सूज आल्यामुळे सुद्धा तुम्हाला अस्वस्थ वाटू शकते. सर्व गर्भवती स्त्रियांपैकी सुमारे ५० टक्के स्त्रियांच्या पायाला आणि घोट्याला सूज येते. विशेषत: गरोदरपणाच्या शेवटच्या काही महिन्यांत ही लक्षणे वाढतात आणि गरोदरपणाचा हा काळ कठीण वाटू शकतो. गरोदरपणात स्त्रियांच्या पायाला आणि घोट्याला सूज का येते हे जाऊन घेण्यासाठी हा लेख वाचा.

गरोदरपणात स्त्रियांचे हात, पाय आणि घोट्याला सूज का येते?

गरोदरपणात, वाढत्या बाळाच्या गरजा पूर्ण करण्यासाठी स्त्रीचे शरीर पन्नास टक्के अधिक शारीरिक द्रव तयार करते. या द्रवांमुळे सूज येऊ शकते. गरोदरपणात, स्त्रियांचे अंदाजे पंचवीस टक्के वजन हे अतिरिक्त द्रवपदार्थामुळे वाढते. ह्या काळात तुमचे पाय आणि घोट्याना सूज येऊ शकते.

गरोदरपणात सूज येणे किती सामान्य आहे?

गरोदरपण सूज येणे खूप सामान्य आहे. विशेषत: तुमच्या गरोदरपणाच्या शेवटच्या तिमाहीत तुमच्या पायांवर सूज दिसू शकते. गरोदरपणाच्या शेवटच्या काही महिन्यांमध्ये तुमच्या शरीरात पाणी टिकून राहिल्यामुळे ही सूज येते. शरीरातील एकूण रक्ताचे प्रमाण वाढल्यामुळे असे होते.

एडेमा कधी होतो?

गरोदरपणात एडेमा कधीही होऊ शकतो, परंतु सूज बहुतेकदा ५ व्या महिन्यात लक्षात येते आणि 3 ऱ्या तिमाहीत वाढू शकते. खालील घटकांमुळे सुद्धा गरोदरपणात सूज येऊ शकते.

गर्भवती महिलांमध्ये सूज (ओडेमा) येण्याची कारणे

शरीरात सूज येण्याचे मुख्य कारण म्हणजे शरीरात पाणी टिकून राहणे. गरोदरपणात पाणी धारण केल्याने पाय सुजतात. रक्ताच्या प्रमाणात बदल हे सुद्धा एक कारण आहे. वाढत्या गर्भाशयामुळे ओटीपोटाच्या नसा आणि व्हेना कावावर ताण येतो. या दाबामुळे पायांमध्ये रक्ताचा वेग कमी होतो आणि त्यामुळे काही भाग स्थिर होतात. यामुळे शिरामधून द्रव पाय आणि घोट्याच्या ऊतींकडे जबरदस्तीने जातो. पाणी उत्सर्जित करण्याची क्षमता कमी होते. जास्त प्रमाणात अम्नीओटिक द्रवपदार्थ असलेल्या किंवा पोटात एकापेक्षा जास्त बाळे असलेल्या स्त्रियांमध्ये गंभीर सूज दिसू शकते. दिवसाच्या शेवटी आणि उन्हाळ्यात ही सूज आणखी वाढू शकते.परंतु, प्रसूतीनंतर जेव्हा शरीरातून द्रव काढून टाकला जातो तेव्हा सूज त्वरीत जायला हवी. प्रसूतीनंतरच्या पहिल्या काही दिवसांत तुम्ही स्वतः लघवी करण्यासाठी वारंवार बाथरूममध्ये जाल आणि तुमहाला खूप घाम येत असल्याचे तुमच्या लक्षात येईल.

जोखीम

जर पायांवर सौम्य सूज असेल तर ते सामान्य आहे आणि त्याचा काही त्रास होत नाही. काही स्त्रियांना गरोदरपणात सूज येत नाही. परंतु, जर तुमचे हात आणि/किंवा चेहरा सुजला आणि सूज एका दिवसापेक्षा जास्त काळ टिकून राहिली तर तुम्ही तुमच्या डॉक्टरांचा सल्ला घ्यावा. गरोदरपणात जास्त प्रमाणात सूज येणे हे प्रीक्लेम्पसियाच्या लक्षणांपैकी एक असू शकते. उच्च रक्तदाब, लवकर वजन वाढणे आणि लघवीतील प्रथिने आढळणे ह्यासारखी लक्षणे देखील असू शकतात. तुमचा रक्तदाब आणि लघवीच्या चाचण्या सामान्य असल्यास तुम्हाला काळजी करण्याची गरज नाही.

गरोदरपणात सूज आल्यास ते चिंतेचे कारण कधी असते?

पाय, घोट्यात किंवा पायांना हलकी सूज येणे ही सामान्य गोष्ट नाही. किंबहुना, काहींना त्यांच्या हातावरही हलकी सूज येऊ शकते. प्रीक्लॅम्पसियाची ही लक्षणे आढळल्यास आपण ताबडतोब आपल्या डॉक्टरांना कॉल करावे:

जर एक पाय दुसऱ्यापेक्षा जास्त सुजला असेल आणि पोटऱ्यांमध्ये किंवा मांडीमध्ये वेदना किंवा मऊपणा जाणवत असेल तर तुमच्या डॉक्टरांशी संपर्क साधा, कारण ते रक्तामध्ये गुठळ्या असल्याचे लक्षण असू शकते.

सुजेवर उपाय

इथे 'काही उपचार उपाय दिलेले आहेत ते वापरून तुम्ही सुजेपासून मुक्त होण्याचा प्रयत्न करू शकता.

समकालीन उपचार किंवा वैद्यकीय उपचार

खालील उपाय तुम्ही घरी करून पाहू शकता

येथे काही टिप्स किंवा उपाय आहेत. हे उपाय तुम्ही तुमच्या पायांची सूज कमी करण्यासाठी घरी करून पाहू शकता.

तुम्ही सूज कशी टाळू शकता?

निरोगी जीवनशैलीचा अवलंब करून गंभीर सूज टाळता येते. दररोज व्यायाम करा आणि संतुलित आहार घ्या. लक्षात ठेवा की तुमच्या आहारात मांस, अंडी, मासे, कडधान्ये किंवा बीन्स यांसारख्या प्रथिनेयुक्त पदार्थांचा समावेश असावा. आहारात फळांचा समावेश असणे देखील गरजेचे आहे. तुम्ही मीठ, साखर किंवा चरबीयुक्त पदार्थांचे सेवन मर्यादित केले पाहिजे. लिंबूवर्गीय फळे, लाल मिरची, खरबूज, बटाटे, सूर्यफुलाच्या बिया किंवा स्वीटकॉर्न यासारखे व्हिटॅमिन सी आणि ई समृद्ध असलेले पदार्थ गरोदरपणात चांगले असतात, म्हणून आपल्या आहारात त्यांचा समावेश करा आणि जंक फूड खाणे टाळा!

गरोदरपणात पाय किंवा घोट्यावर सूज येणे त्रासदायक असू शकते परंतु त्यामुळे तुम्ही निराश होऊ नका. सूज येणे ही एक सामान्य समस्या आहे आणि प्रसूतीनंतर ती लगेच कमी होते. तुमच्या पायाला आणि घोट्याला हलकी सूज येत असेल तर वर नमूद केलेले उपाय वापरून पहा. परंतु, प्रीक्लॅम्पसियाची लक्षणे दिसल्यास, लवकरात लवकर डॉक्टरांचा सल्ला घ्या.

आणखी वाचा:

गरोदरपणातील बधिरता: कारणे आणि उपाय गरोदरपणात पायांवर सूज येण्याच्या समस्येवर परिणामकारक घरगुती उपचार
Published by
मंजिरी एन्डाईत
Last Updated On

Recent Posts

All Rights Reserved