In this Article
जर तुम्ही बाळाचा विचार करत असाल, तर तुम्ही आतापर्यंत गरोदरपणाविषयीच्या किंवा पालकत्वासंबंधित काही मासिकांचे सदस्यत्व घेतलेले असेल. तसेच आतापर्यंत गर्भारपणाविषयीची सर्व माहिती गोळा करण्यासाठी तुम्ही इंटरनेटचा वापर केलेला असेल. आता तुम्ही या जगात एक नवीन जीवन आणण्याचा गंभीर विचार करत आहात आणि त्यासाठी तुम्ही शारीरिक दृष्ट्या तयार असणे गरजेचे आहे. स्त्री आणि पुरुष दोघांनाही मूल होण्यासाठी आवश्यक जीवनसत्त्वे आणि पोषक तत्वांची गरज असते. जीवनसत्त्वे म्हणजे आपल्या पौष्टिक आहाराचा एक महत्त्वाचा भाग आहेत. ही जीवनसत्वे अनेक शारीरिक कार्यांमध्ये, विशेषत: प्रजानानासारख्या महत्त्वाच्या गोष्टींमध्ये अपरिहार्य भूमिका बजावतात. जर तुम्ही गर्भधारणेचा प्रयत्न करत असाल तर तुम्ही काही जीवनसत्त्वांचे सेवन करण्याचा विचार करू शकता.
परंतु ज्याप्रमाणे तुमचे शरीर गर्भधारणेसाठी आणि बाळाच्या संगोपनासाठी तयार असणे आवश्यक आहे, त्याचप्रमाणे तुम्ही बाळ होण्यासाठी भावनिक आणि मानसिकदृष्ट्याही तयार असले पाहिजे. स्त्री आणि पुरुष दोघांनाही गर्भधारणा होण्यासाठी भरपूर जीवनसत्त्वे आणि खनिजद्रव्ये मिळणे आवश्यक आहे. येथे काही जीवनसत्त्वे आणि पोषक तत्वे दिलेली आहेत. गर्भधारणा होण्यासाठी ही जीवनसत्वे तुम्ही आणि तुमचे पती घेऊ शकता. परंतु, ही जीवनसत्वे घेण्याआधी तुम्ही त्याविषयी चांगली माहिती घेणे सुद्धा आवश्यक आहे. तसेच माहितीपूर्ण निर्णय घेण्यासाठी या पूरक आहाराचे फायदे आणि दुष्परिणाम समजून घ्या.
मानवी शरीराचे कार्य सुरळीतपणे चालू राहण्यासाठी जीवनसत्त्वे आणि खनिजे आवश्यक असतात. आदर्श आहारामध्ये सर्व आवश्यक पोषक घटकांचा समावेश कमी प्रमाणात असावा कारण हे पोषक घटक शरीराद्वारे मोठ्या प्रमाणात तयार केले जाऊ शकत नाहीत. जर तुम्ही खात असलेल्या सामान्य आहारमधून ही पोषक तत्वे मिळत नसतील, तर पौष्टिक आणि पूरक आहाराची मदत होऊ शकते. तुमच्या चांगल्या गर्भारपणासाठी, तुम्ही बरेच काही करू शकता, परंतु तुमच्या आहारात जीवनसत्त्वे आणि पोषक तत्वांचा समावेश करणे हा सर्वात सोपा उपाय आहे.
गर्भधारणेसाठी इच्छुक असणाऱ्या प्रत्येकासाठी हे अत्यंत आवश्यक आहे. फॉलिक ऍसिड, म्हणजेच बी ९ , हे गरोदरपणातील 'सुपरहिरो' जीवनसत्व आहे. प्रजननक्षम वयातील आणि गर्भधारणेच्या प्रयत्नात असलेल्या स्त्रीने एका दिवसात ४०० एमसीयु फॉलिक ऍसिडचे सेवन केले पाहिजे. हे बी-कॉम्प्लेक्स व्हिटॅमिन आहे आणि ते शरीराद्वारे लाल रक्त पेशी तयार करण्यासाठी वापरले जाते. स्त्रियांमध्ये प्रजननक्षमतेसाठी वापरल्या जाणाऱ्या सर्वात महत्वाच्या जीवनसत्त्वांपैकी ते एक आहे आणि ते न्यूरल ट्यूब दोष (बाळाच्या पाठीच्या कण्यातील समस्या) होण्याची शक्यता कमी करते. पुरुष देखील हे जीवनसत्व घेऊ शकतात कारण त्यामुळे त्यांना निरोगी शुक्राणू तयार करण्यास मदत होते. फॉलिक ऍसिड नैसर्गिक स्वरूपात तसेच सिंथेटिक व्हिटॅमिनमध्ये उपलब्ध आहे. जर तुम्ही नैसर्गिक पर्याय शोधत असाल तर तुम्ही लिंबूवर्गीय फळे, संपूर्ण धान्य आणि हिरव्या पालेभाज्या घेऊ शकता कारण ते फॉलिक ऍसिडचे चांगले स्त्रोत आहेत. गर्भधारणेसाठी इच्छुक स्त्रीने गरोदरपणाच्या किमान एक किंवा दोन महिने आधी ‘फॉलिक अॅसिड’ युक्त पदार्थांचे सेवन सुरू केले पाहिजे.
व्हिटॅमिन डी आणि प्रजनन क्षमता ह्यांचा खूप जवळून संबंध आह. व्हिटॅमिन डीची सामान्य पातळी असलेल्या महिलांमध्ये नैसर्गिकरित्या गर्भधारणा होण्याची शक्यता असते. हे चरबी-विद्रव्य जीवनसत्व आहे आणि ते पुनरुत्पादक संप्रेरकांसाठी आवश्यक आहे. व्हिटॅमिन डी फोर्टिफाइड डेअरी उत्पादने, सॅल्मन, मॅकरेल, ट्यूना, कॉड लिव्हर ऑइलमध्ये आढळू शकते. दिवसभरात तुमच्या पतीसोबत साधे चालल्यामुळे सुद्धा तुमच्या शरीराला सूर्यप्रकाश मिळवण्यास मदत होऊ शकते आणि तो व्हिटॅमिन डी चा चांगला स्रोत आहे.
जस्त हे स्त्री आणि पुरुष दोघांमध्ये प्रजनन क्षमता सुधारण्यासाठी एक आवश्यक खनिज आहे. जस्त महिलांचे पुनरुत्पादक आरोग्य सुधारते परंतु पुरुषांसाठीही ते तितकेच महत्त्वाचे आहे. जस्त शुक्राणूंची गुणवत्ता आणि शुक्राणूंची गतिशीलता सुधारण्यास मदत करते. पुरुषांसाठी दररोज ११ मिग्रॅ आणि महिलांसाठी ८ मिग्रॅ जस्ताची गरज असते. ऑयस्टरमध्ये झिंक जास्त असते, परंतु तुम्ही संपूर्ण धान्य, दुग्धजन्य पदार्थ, शेंगा, बीन्स, खेकडे आणि लॉबस्टर देखील खाऊ शकता.
गर्भधारणेमुळे स्त्रीच्या शरीरावर ताण येऊन तिला रक्तक्षय होऊ शकतो. परंतु बाळाच्या निर्मितीच्या प्रक्रियेदरम्यान लोहाचे जास्त प्रमाणात सेवन केल्यास स्त्रीच्या गर्भधारणेची शक्यता सुधारू शकते आणि तिला गर्भधारणेशी संबंधित अशक्तपणाचा सामना करण्यास मदत होऊ शकते. लोहाच्या कमी पातळीमुळे ऍनिमिया होतो आणि गर्भधारणेची शक्यता कमी होण्यासही हातभार लागतो. त्यामुळे जर तुम्ही गर्भधारणेची योजना आखत असाल, तर गर्भधारणेपूर्वी तुमच्या शरीरात योग्य प्रमाणात लोह मिळत असल्याची खात्री करणे आवश्यक आहे. स्त्रीने तिची लोह पातळी तपासण्यासाठी आवश्यक चाचण्या केल्या पाहिजेत आणि ती पातळी सामान्य करण्यासाठी पुरेसा पोषक आहार घेणे आवश्यक आहे. लोह शरीरातील रक्त पातळी वाढवते आणि प्रजननक्षमतेत मदत करते तसेच ओव्हुलेशन संतुलित करते. मांस, टोमॅटो, बीट, ब्रोकोली, पालक आणि भोपळा यांमध्ये लोह असते. लोहाची पातळी कमी असल्यास गोळी घेतली जाऊ शकते.
महिलांमध्ये प्रजननक्षमतेसाठी व्हिटॅमिन ई आवश्यक आहे. तसेच पुरुषांमधील शुक्राणूंची गुणवत्ता देखील व्हिटॅमिन ई मुळे सुधारते. गर्भधारणेनंतर अंडी आणि शुक्राणूंच्या डीएनएचे एकत्रीकरणाचे संरक्षण करणे देखील महत्त्वाचे आहे. व्हिटॅमिन ई एक अँटिऑक्सिडेंट आहे आणि ते शरीराच्या मुक्त रॅडिकल्सपासून संरक्षण करते, हे मुक्त रॅडिकल्स तुमच्या पेशींना नुकसान पोहोचवू शकतात आणि त्यामुळे पुरुष आणि स्त्रिया संक्रमणास बळी पडतात. पुरुषांमध्ये, व्हिटॅमिन ईच्या कमी पातळीमुळे वृषणाचे नुकसान होऊ शकते आणि त्यामुळे शुक्राणूंच्या उत्पादनावर परिणाम होतो. स्त्रियांमध्ये, व्हिटॅमिन ई च्या कमतरतेमुळे ओव्हुलेशन टाळता येते आणि त्यामुळे गर्भधारणा होण्याची शक्यता वाढते. तुमच्या आहारात सूर्यफूल बिया आणि भोपळ्याच्या बिया यांसारख्या विविध प्रकारच्या बियांचा समावेश करून तुम्ही तुमचे व्हिटॅमिन ई चे रोजचे सेवन वाढवू शकता. तुम्ही बदाम, हेझलनट्स आणि पीनट बटर देखील खाऊ शकता. अगदी किवी आणि आंबा यांसारख्या फळांमध्येही व्हिटॅमिन ई भरपूर असते. व्हिटॅमिन ईचे प्रमाण वाढवण्यासाठी स्त्री आणि पुरुष दोघेही या पदार्थांचे सेवन करू शकतात. परंतु, डॉक्टरांनी सांगितल्याशिवाय व्हिटॅमिन ई सप्लिमेंट्स घेऊ नका.
ब गटातील सर्व जीवनसत्त्वे पुनरुत्पादनासाठी आवश्यक आहेत. त्यामध्ये थायमिन (बी १), रिबोफ्लेविन (बी २), पायरीडॉक्सिन (बी ६), आणि सायनोकोबालामिन (बी १२) यांचा समावेश होतो. बी व्हिटॅमिनचा गट गर्भधारणेसाठी महत्त्वपूर्ण आहे. विशेषत: स्त्रियांसाठी, हे व्हिटॅमिन जास्त गरजेचे आहे कारण त्यामुळे अंडाशयांना ओव्हुलेशनच्या आसपास अंडी सोडण्यास मदत होते. व्हिटॅमिन बी ६ स्त्रीच्या शरीरातील प्रोजेस्टेरॉनच्या पातळीला संतुलित ठेवण्यास मदत करते आणि ल्यूटियल फेज देखील सुधारू शकते. त्यामुळे ओव्हुलेशन आणि मासिक पाळी दरम्यान योग्य वेळ मिळू शकतो आणि तो यशस्वी गर्भधारणेचा अविभाज्य घटक आहे. बी १२ पुरुषांमध्ये शुक्राणूंच्या उत्पादनाची गुणवत्ता वाढवण्यासाठी ओळखले जाते आणि ते हार्मोन नियामक आहे. ब गटातील सर्व आवश्यक जीवनसत्वे चणे, संपूर्ण धान्य, पालेभाज्या, ट्यूना, केळी, क्लॅम्स, कॅविअर, फुलकोबी, मोहरीच्या हिरव्या भाज्या, चार्ड आणि अंडी ह्या अन्नपदार्थांमध्ये आढळतात.
मानवी शरीर बीटा-कॅरोटीनचे व्हिटॅमिन ए (रेटिनॉल) मध्ये रूपांतरित करते आणि ते त्वचा आणि केसांसाठी उत्तम आहे. निरोगी दृष्टी, श्लेष्मल त्वचा आणि रोगप्रतिकारक शक्तीसाठी देखील हे जीवनसत्व महत्वाचे आहे. गर्भधारणेसाठी, हे हार्मोन नियामक आहे आणि गर्भपात टाळण्यास मदत करते. हे जीवनसत्व गाजर, कॅनटालूप, रताळे, काळे, बटरनट स्क्वॅश आणि ब्रोकोलीमध्ये मुबलक प्रमाणात आढळू शकते.
प्रजननक्षमता आणि गर्भधारणेसाठी ओमेगा -3 फॅटी ऍसिड हे अत्यंत आवश्यक आहे. हे स्त्रीच्या शरीराला अंडी सोडण्यास, गर्भाशयात रक्त प्रवाह वाढवण्यास आणि हार्मोन्स संतुलित करण्यास मदत करतात. इतकेच नाही तर गर्भधारणेनंतर गर्भाच्या मेंदूच्या विकासासाठी आणि बुद्ध्यांकासाठी ओमेगा -3 फॅटी ऍसिड उपयुक्त आहेत. जरी सर्व जीवनसत्त्वांमध्ये ओमेगा -3 फॅटी ऍसिडचा समावेश नसला तरी, तुम्ही ते पूरक म्हणून घेऊ शकता. ओमेगा3 समृध्द अन्नांमध्ये सब्जा, फ्लेक्स सीड्स, अँकोव्हीज, हेरिंग, अक्रोड, कॉड लिव्हर ऑइल, फ्लेक्ससीड ऑइल, सार्डिन यांचा समावेश होतो. जर तुम्हाला माशांची चव आवडत नसेल, तर तुम्ही डॉक्टरांशी बोलून पूरक गोळ्या सुरु करू शकता. ओमेगा 3 मध्ये दोन ऍसिड असतात. आणि ती म्हणजे डीएचए आणि इपीए. डीएचए ची पातळी कमी असल्यास बाळाचा अकाली जन्म, जन्मताच बाळाचे वजन कमी असणे आणि मुलांमध्ये अतिक्रियाशीलता इत्यादींशी संबंधित आह.
हे एक अँटिऑक्सिडेंट आहे आणि ते मूलत: अंडी आणि शुक्राणूंना मुक्त रॅडिकल्सपासून संरक्षण करण्यास मदत करते. त्यामुळे पेशी नष्ट होऊ शकतात. सेलेनियमची सामान्य पातळी पुरुषांमध्ये शुक्राणूंची गतिशीलता आणि स्त्रियांमध्ये इस्ट्रोजेन चयापचय वाढवते. हे पौष्टिकतेचे शक्तिशाली स्त्रोत आहेत आणि ते ब्राझिलियन काजू, पालेभाज्या, संपूर्ण धान्य आणि मासे इत्यादींमध्ये आढळू शकतात.
हे सप्लिमेंट घेतल्याने पुरुष आणि स्त्रियांमध्ये प्रजनन क्षमता सुधारण्यास मदत होते. हे फॅट सोल्युबल जीवनसत्वासारखे संयुग आहे आणि ते मानवी शरीरात नैसर्गिकरित्या आढळते. हे नैसर्गिकरित्या शरीराद्वारे तयार केले जात नाही म्हणून ते अन्नातून मिळणे आवश्यक आहे. पेशींच्या कार्यासाठी हा एक आवश्यक पदार्थ आहे. हे संयुग गर्भाची गुणवत्ता सुधारते आणि स्त्रियांमध्ये गर्भाधान दर उच्च आहे. हे संयुग शुक्राणूंची संख्या वाढवण्यासाठी देखील ओळखले जाते. शिफारस केलेला दैनिक डोस दिवसभरात ३०-२०० मिग्रॅ इतका असतो. हे व्हिटॅमिन मांस, फॅटी मासे, संपूर्ण धान्यांमध्ये आढळू शकते.
शुक्राणू आणि शुक्राणूंच्या परिपक्वतासाठी एक परिपूर्ण उर्जा स्त्रोत म्हणून हा पदार्थ ओळखला जातो तसेच तो शुक्राणूंची गतिशीलता वाढविण्यासाठी महत्त्वपूर्ण आहे. हे एक अमीनो आम्ल-सारखे संयुग आहे. ऊर्जा निर्माण करण्याचे त्याचे मुख्य कार्य आहे. हा पदार्थ दूध आणि दुग्धजन्य पदार्थांमध्ये जास्त प्रमाणात आढळतो.
होय, गर्भधारणा होण्यासाठी प्रजनन पूरक आहार घेता येतो, परंतु केवळ डॉक्टरांचा सल्ला घेतल्यानंतरच.
जरी खनिज झिंक पुरुषांमध्ये शुक्राणूंची गतिशीलता सुधारण्यासाठी उत्कृष्ट कार्य करत असले तरी, शुक्राणूंची संख्या आणि गतिशीलता दोन्ही वाढवण्यासाठी एल-कार्निटाइन आणि एल-अर्जिनाइन देखील तुम्ही घेऊ शकता.
जर तुम्ही गर्भधारणेचा प्रयत्न करत असाल, तर वर नमूद केलेली जीवनसत्त्वे आणि पोषक तत्त्वे घेतल्याने तुम्हाला मदत होईल. तुम्ही ह्या जीवनसत्वाची सप्लिमेंट्स देखील घेऊ शकता, परंतु यापैकी कोणतेही जीवनसत्त्वे आणि खनिजे घेण्यापूर्वी स्त्रीरोगतज्ञाचा सल्ला घ्या. डोसबद्दल तुमच्या डॉक्टरांशी बोला आणि सुरक्षित रहा!
आणखी वाचा:
तुमची प्रजनन क्षमता वाढवणारे उत्तम अन्नपदार्थ स्त्री आणि पुरुषांची प्रजनन क्षमता वाढविण्यासाठी घरगुती उपाय