गर्भारपण

गरोदरपणातील कोरडा खोकला

गरोदरपणात कोरड्या खोकल्यामुळे श्वास घेण्यास त्रास होतो. आणि त्यामुळे ताप सुद्धा येऊ शकतो. कोरड्या खोकल्याची नीट काळजी घेतली गेली नाही तर झोपेमध्ये तसेच दैनंदिन कामात सुद्धा व्यत्यय येतो. गरोदरपणात रोगप्रतिकारक शक्ती कमकुवत होत असल्याने आणि बरे होण्यासाठी मदतीची गरज  असल्याने, आम्ही तुम्हाला ह्या आजाराची संपूर्ण माहिती ह्या लेखाद्वारे दिलेली आहे. आजार ओळखून त्यावर उपाय सुद्धा इथे दिलेले आहेत.

कोरडा खोकला म्हणजे काय?

कोरड्या खोकल्यामध्ये श्लेष्माचा स्त्राव होत नाही. ह्यामुळे स्त्रियांमध्ये निद्रानाश ते लघवीचा असंयम (UI) ह्यासारख्या अनेक समस्या उद्भवतात. गर्भावस्थेच्या अंतिम टप्प्यात, कोरडा खोकला नियमित श्वासोच्छवासात अडथळा आणू शकतो आणि त्यामुळे श्वास घेण्यास त्रास होऊ शकतो. थकवा ही गरोदरपणामध्ये कोरड्या खोकल्याशी संबंधित आणखी एक समस्या आहे.

कोरड्या आणि ओल्या खोकल्यामध्ये काय फरक आहे?

कोरड्या आणि ओल्या खोकल्यातील फरक म्हणजे कोरड्या खोकल्यामध्ये श्लेष्माचा स्त्राव नसतो. कोरड्या खोकल्यामध्ये कोणताही श्लेष्मा नसला तरी सुद्धा, तो फुफ्फुसांच्या आणि अनुनासिक मार्गाच्या अस्तरांमधून हानिकारक क्ष्मजंतू आणि ऍलर्जी निर्माण करणारे जीवाणू बाहेर काढून टाकत असतो.

गरोदर स्त्रियांना खोकल्याचा धोका अधिक का असतो?

गरोदर स्त्रिया विविध कारणांमुळे खोकल्याला बळी पडतात. त्यांच्या शरीरात इस्ट्रोजेनचे प्रमाण वाढणे हे त्यामागील प्राथमिक कारण आहे. गरोदरपणात रोगप्रतिकारक शक्तीची कार्यक्षमता कमी होते, त्यामुळे  शरीराची नैसर्गिक संरक्षण प्रणाली कमकुवत होते आणि ऍलर्जी आणि खोकला होण्याची शक्यता असते.

गरोदरपणात कोरड्या खोकल्याची कारणे

गरोदरपणात कोरड्या खोकल्याची अनेक कारणे आहेत. त्यापैकी मुख्य कारणे खालीलप्रमाणे आहेत:

चिन्हे आणि लक्षणे

तुम्ही कोरड्या खोकल्याच्या समस्येतून जात असताना दिसून येणारी चिन्हे आणि लक्षणे येथे दिलेली  आहेत:

गरोदरपणात कोरड्या खोकल्यासाठी घरगुती उपाय

गरोदरपणात कोरड्या खोकल्यासाठीच्या घरगुती उपचारांमध्ये, जीवनसत्त्वे आणि खनिजे समृद्ध आहार ह्यांचा समावेश करण्यात आलेला आहे. झिंकयुक्त पदार्थ रोगप्रतिकारशक्ती वाढवतात आणि कोरड्या खोकल्यापासून आराम देतात. दिवसभर हायड्रेटेड राहणे हा एक चांगला उपाय आहे. किवी, टोमॅटो, संत्री, द्राक्षे इत्यादीसारखे व्हिटॅमिन सी समृद्ध पदार्थ तुम्ही खाल्ले पाहिजेत. गरोदरपणात कफ सिरप घेणे हा खोकला आणि घसा खवखवण्यावर आणखी एक उपाय आहे. इतर काही सोपे उपाय खाली दिलेले आहेत.

कोरड्या खोकल्यासाठी लसीकरण

विकार आणि आरोग्यविषयक गुंतागुंत टाळण्यासाठी गरोदरपणात काही लशी सुरक्षितपणे घेतल्या जाऊ शकतात. यामध्ये हिपॅटायटीस बी आणि हंगामीची लस ह्या दोन लशींचा समावेश आहे. हिपॅटायटीस हा एक संक्रमणीय आजार आहे आणि तो आईद्वारे  गर्भापर्यंत पसरू शकतो. फ्लूची लस तुम्हाला आणि तुमच्या बाळाला सुरक्षित ठेवते. जास्तीत जास्त परिणामकारकतेसाठी फ्लूची लस शॉटच्या स्वरूपात (निष्क्रिय स्वरूप असलेले) दिल्या गेल्या पाहिजेत. . तुम्हाला डांग्या खोकल्याचा अनुभव येत असल्यास, तुम्हाला डॉक्टरांकडून Tdap लस लिहून दिली जाईल.

कोरड्या खोकल्याचा बाळावर परिणाम होऊ शकतो का?

नाही, कोरडा खोकला फक्त आईची प्रतिकारशक्ती कमी करतो, बाळाची नाही. गर्भ निसर्गात: लवचिक असतो आणि प्लेसेंटाद्वारे संरक्षित असतो. परंतु, खोकला, सर्दी किंवा फ्लूवर दीर्घकाळ उपचार न केल्याने बाळाच्या संज्ञानात्मक विकासावर परिणाम होऊ शकतो आणि जन्मादरम्यान समस्या निर्माण होऊ शकते. सावधगिरीचा उपाय म्हणून, निरोगी खा आणि नियमित तपासणीसाठी जा.

कोरड्या खोकल्यामुळे कोणत्या प्रकारची गुंतागुंत निर्माण होऊ शकते?

उपचार न केल्यास कोरडा खोकला, गरोदरपणाच्या नंतरच्या टप्प्यात गुंतागुंत निर्माण करू शकतो:

तुम्ही डॉक्टरांचा सल्ला कधी घ्यावा?

कोरडा खोकला योग्य आहार आणि औषधोपचाराने कमी केला जाऊ शकतो, परंतु गुंतागुंत झाल्यास  अनपेक्षितपणे डॉक्टरकडे जाण्याची आवश्यकता भासू शकते. तुम्हाला अनुभव आल्यास तुम्ही डॉक्टरांचा सल्ला घ्यावा: वरीलपैकी कोणतीही लक्षणे दिसू लागताच डॉक्टरांना भेटणे महत्वाचे आहे. ही लक्षणे वाढून तुमचे शरीर कमकुवत होईपर्यंत वाट पाहू नका. विशेषत: वरील लक्षणे कायम राहिल्यास आणि घरगुती उपचार करूनही बरे होत नसल्यास डॉक्टरांकडे जा.

कोरड्या खोकल्यासाठी ओव्हर-द-काउंटर औषधे येतील का?

कोरड्या खोकल्याचा सामना करण्यासाठी तुम्ही ओव्हर-द-काउंटर औषधे घेऊ शकता. स्वतःच्या मनाने औषध घेण्यापूर्वी खालीलटिप्स लक्षात ठेवा: गरोदरपणात कोरडा खोकला सामान्य असला तरी, त्याचे निरीक्षण करणे आणि तो कायम राहिल्यास डॉक्टरांना भेटणे महत्त्वाचे आहे. निरोगी आहार आणि पुरेशी झोप घेऊन तुम्ही कोरडा खोकला टाळू शकता आणि बरा करू शकता. आणखी वाचा: गरोदरपणात होणारी सर्दी: कारणे, लक्षणे आणि उपचार गरोदरपणातील खोकल्यासाठी परिणामकारक घरगुती उपचार
Published by
मंजिरी एन्डाईत
Last Updated On

Recent Posts

All Rights Reserved