In this Article
- व्हिडिओ: गरोदरपणात खजूर खाणे सुरक्षित आहे का?
- खजूर आणि गर्भारपण
- खजूराचे पौष्टिक मूल्य
- गरोदरपणात खजूर खाण्याचे फायदे
- गर्भावस्थेच्या वेगवेगळ्या टप्प्यात खजूर खाणे
- गरोदरपणात खजुराचे सेवन करण्याचे वेगवेगळे मार्ग
- कुठल्या प्रकारचे खजूर खावेत?
- गरोदरपणात खजूर खाण्याचे काही हानिकारक परिणाम होतात का?
- घ्यावयाची खबरदारी
तुमच्या गरोदरपणाच्या नऊ महिन्यांच्या कालावधीत तुम्ही खजूर खाल्ल्यास प्रसूती सुलभ होण्यास मदत होते हे खरे आहे का? खजूर खाल्ल्याने प्रसूतीस कशी मदत होते? ह्या प्रश्नांची उत्तरे ह्या लेखात दिलेली आहेत. तसेच गर्भारपण आणि खजूर यांच्यातील संबंध ह्याविषयीची माहिती देखील आपण ह्या लेखाद्वारे घेणार आहोत.
व्हिडिओ: गरोदरपणात खजूर खाणे सुरक्षित आहे का?
खजूर आणि गर्भारपण
आई आणि बाळ दोघांसाठी खजूर फक्त सुरक्षित नाही तर फायदेशीरही आहे. खजुरामध्ये फ्रक्टोज असते त्याचे त्वरित विघटन होऊन ते खराब होते. रक्तातील साखरेची पातळी न बदलता त्वरित ऊर्जा प्राप्त होते. गरोदरपणात खजूर खाणे चांगले आहे कारण त्यामध्ये रेचक गुणधर्म असतात आणि ते गर्भाशयाच्या आकुंचनमध्ये मदत करतात. त्यामुळे प्रसूतीचा कालावधी कमी होण्यास मदत होते.
संशोधनात असे दिसून आले आहे की गरोदरपणात खजूर खाल्ल्याने प्रसूतीसाठी लागणारा कालावधी कमी होतो आणि प्रसूतीवर सकारात्मक परिणाम होतो.
खजूराचे पौष्टिक मूल्य
येथे एक तक्ता दिलेला आहे. ह्या तक्त्यामध्ये 100 ग्रॅम खजूरमधील पौष्टिक सामग्री दर्शवलेली आहे.
ऊर्जा | 227 Kcal |
फायबर | 6.7 g |
प्रथिने | 1.8 g |
लोह | 0.9 mg |
फोलेट | 15 mcg |
चरबी | 0.2 g |
व्हिटॅमिन के | 2.7 mcg |
पोटॅशियम | 696 mg |
मॅग्नेशियम | 54 mg |
गरोदर स्त्रियांना खजूर खाण्याची शिफारस केली जाते कारण त्यामुळे ऍनिमिया कमी होतो तसेच मॉर्निंग सिकनेसच्या आजाराचा सामना करण्यास मदत होते. रक्तदाब आणि रक्तातील साखरेचे प्रमाण नियंत्रित राहते, विषारी पदार्थांपासूनमुक्ती मिळते, प्रतिकारशक्ती वाढते. तसेच शरीरातील निरोगी कॅल्शिअमचे प्रमाण वाढते. खजुरामध्ये विविध पोषक तत्वे असतात आणि त्यामुळे स्त्रियांना त्याची मदत होते. त्यापैकी काही पोषक तत्वे इथे दिलेली आहेत.
- लोह: गर्भवती स्त्रियांना इतर स्त्रियांपेक्षा लोहाची गरज जास्त असते हे सर्वांना माहिती आहे – खजूर लोहाने समृद्ध असतात आणि तुमच्या रक्तामध्ये हिमोग्लोबिनचे प्रमाण वाढवून ऍनिमिया दूर ठेवण्यास खजूर खाल्ल्याने मदत होते. लोह तुमच्या शरीरातील विविध चयापचय प्रक्रियांना मदत करते. तुमची आणि तुमच्या बाळाची रोगप्रतिकारक शक्ती वाढवते.
- फोलेट: फॉलिक ऍसिड हे सर्वात महत्वाचे पोषक तत्वांपैकी एक आहे. गरोदरपणात तुम्हाला फॉलिक ऍसिडचे सेवन करावे लागेल. फॉलिक ऍसिड बाळांच्या मेंदू आणि पाठीच्या कण्यातील जन्म दोष टाळते.
- व्हिटॅमिन के: व्हिटॅमिन के रक्त गोठण्यास मदत करते. तसेच ते तुमच्या बाळाच्या हाडांच्या संरचनेच्या विकासात देखील मदत करते. खजूर हे ह्या जीवनसत्वाच्या सर्वोत्तम स्त्रोतांपैकी एक आहेत. व्हिटॅमिन के ची कमतरता तुमच्या बाळाच्या आरोग्यासाठी हानिकारक असू शकते. खजूर खाऊन तुम्ही ही कमतरता भरून काढू शकता.
- तंतुमय पदार्थ: गरोदरपणात बद्धकोष्ठता होणे सामान्य आहे – तुम्ही खजूर खाऊन बद्धकोष्ठता टाळू शकता. खजुरामध्ये तंतुमय पदार्थ जास्त प्रमाणात असतात. त्यामुळे खजूर पचवणे सहज आणि सोपे जाते. खजूर शरीरातील खराब कोलेस्ट्रॉलची पातळीही कमी करते. खजूर खाल्ल्याने तुम्हाला तुमचे पोट भरलेले वाटेल, आणि त्यामुळे, शरीराचे वजन निरोगी राखण्यास मदत होईल, गरोदरपणात ते खूप महत्वाचे आहे.
- पोटॅशियम: पोटॅशियम शरीरातील मिठाचे संतुलन आणि रक्तदाब राखण्यास मदत करते. गरोदरपणात स्नायूंना पेटके येणे सामान्य आहे – तुमच्या शरीरात पोटॅशियमचे प्रमाण पुरेसे असल्याची खात्री करून तुम्ही त्यांना रोखू शकता. ह्या पोषक तत्वाच्या कमतरतेमुळे मूत्रपिंडाचा त्रास होऊ शकतो.
- फ्रक्टोज: वर नमूद केल्याप्रमाणे, खजूरामध्ये फ्रक्टोज असते, त्यामुळे खजूर खाल्ल्यानंतर तुमची ऊर्जेची पातळी नेहमीच जास्त असते. गरोदरपणात तुमच्या शरीरात होणाऱ्या बदलांचा सामना करण्यास सक्षम होण्यासाठी जास्त ऊर्जा असणे महत्त्वाचे आहे. खजूर खाल्ल्याने त्वरित ऊर्जा मिळते.
- साखर: ह्या टप्प्यावर तुम्हाला अधिक कॅलरीजची गरज भासेल, म्हणून जेव्हाही तुम्हाला भूक लागते तेव्हा दोन खजूर खा, कारण खजूर हे साखरेचे उत्तम स्रोत आहेत आणि तुमच्या वजनावर फारसा परिणाम न करता तुम्हाला आवश्यक असलेल्या कॅलरीज तुम्हाला खजुरातून मिळतात.
- मॅग्नेशियम: तुमच्या बाळाला हाडे आणि दात तयार करण्यासाठी मॅग्नेशियमची आवश्यकता असते. हे आपल्या रक्तातील साखर आणि रक्तदाब पातळी नियंत्रित करण्यास देखील मदत करते.
गरोदरपणात खजूर खाण्याचे फायदे
गरोदरपणात खजूर खाण्याचे काही फायदे येथे दिलेले आहेत.
- खजुरामध्ये प्रथिने असतात आणि ही प्रथिने शरीराच्या वाढीसाठी आवश्यक असतात.
- संशोधनात असे सिद्ध झाले आहे की खजूर खाणाऱ्या 83% पेक्षा जास्त महिलांना रुग्णालयात दाखल केल्यावर त्यांच्या गर्भाशयाच्या मुखाचे आवरण शाबूत होते आणि यापैकी 28% पेक्षा कमी महिलांना प्रसूतीदरम्यान कृत्रिम ऑक्सिटोसिन किंवा प्रोस्टिन दिले गेले. दुसरीकडे, खजूर न खाणाऱ्या गरोदर महिलांपैकी 60% महिलांचा गर्भाशयाचा पडदा अखंड होता आणि त्यापैकी सुमारे 43% प्रोस्टिनची गरज होती.
- खजूर ऑक्सिटोसिनचा प्रभाव वाढवण्यास मदत करतात – त्यामुळे गर्भाशयाचे आकुंचन वाढते आणि त्यामुळे गर्भाशयाची संवेदनशीलता वाढते.
- खजूरामध्ये असलेले कॅल्शियम, सेरोटोनिन आणि टॅनिन हे गर्भाशयाच्या स्नायूंचे योग्य आकुंचन होण्यास मदत करतात.
- खजूरामध्ये ऊर्जा पुरवठा करणारे संतृप्त आणि असंतृप्त दोन्ही फॅटी ऍसिड असतात. ते प्रोस्टॅग्लॅंडिन तयार करण्यास देखील मदत करतात. ऑक्सिटोसिन आणि प्रोस्टॅग्लॅंडिन दोन्ही प्रसूतीसाठी आवश्यक आहेत.
- खजूर प्रसूतीच्या कालावधी कमी करतात कारण त्यात रेचक घटक असतात आणि ते गर्भाशयाच्या आकुंचनास मदत करतात.
गर्भावस्थेच्या वेगवेगळ्या टप्प्यात खजूर खाणे
गरोदरपणात खजूर केव्हा खावेत असा एक सामान्य प्रश्न गरोदर स्त्रिया विचारात असतात. गरोदरपणात खजूर कधी खाणे सुरू करावे हे माहिती करून घेण्यासाठी पुढे वाचा:
पहिल्या तिमाहीत खजूर खाणे
पहिल्या तिमाहीत खजूर खाणे महत्वाचे आहे कारण या काळात बद्धकोष्ठता ही एक मोठी समस्या आहे.पचन चांगले होण्यासाठी आणि अस्वस्थता टाळण्यासाठी खजूर खा. तथापि, जर तुम्हाला मधुमेह किंवा ग्रुप बी स्ट्रेप संसर्ग (गर्भवती महिलेच्या गुदाशय किंवा योनीमध्ये आढळलेला संसर्ग) असेल तर पहिल्या तिमाहीत खजुराचे सेवन मर्यादित प्रमाणात ठेवा.
दुस–या तिमाहीत खजूर खाणे
जर तुमच्या रक्तातील साखरेची पातळी जास्त असेल किंवा तुमची ग्लुकोज चाचणी सामान्य नसेल तर दुसऱ्या तिमाहीत खजूर खाणे टाळा कारण या काळात गरोदरपणातील मधुमेह होण्याची शक्यता खूप जास्त असते. परंतु तुम्ही तुमच्या डॉक्टरांशी बोलून निर्णय घेऊ शकता कारण थोडे खजूर खाल्ल्याने कोणतेही नुकसान होणार नाही.
तिसर्या तिमाहीत खजूर खाणे
तिसऱ्या तिमाहीमध्ये खजूर खाणे चांगले असते कारण त्यामुळे प्रसूतीसाठी लागणारा कालावधी कमी होतो तसेच प्रसूतीची संपूर्ण प्रक्रिया सुलभ होण्यास मदत होते. नैसर्गिक रेचक गुणधर्मांमुळे गर्भाशयाचे आकुंचन होण्यास मदत होईल. ३६ व्या आठवड्यापासून म्हणजे प्रसूतीच्या अपेक्षित तारखेपासून चार आठवडे दिवसभरात सहा खजूर खाण्यास सुरुवात करा.
उन्हाळ्यात खजूर खाणे
अनेक स्त्रिया उन्हाळ्यात खजूर खाणे टाळतात कारण त्यांना वाटते की यामुळे त्यांचे पोट खराब होईल. तथापि, हे वैज्ञानिकदृष्ट्या सिद्ध झालेले नाही.
गरोदरपणात, स्त्रीच्या शरीरात वेगवेगळ्या शारीरिक आणि हार्मोनल बदलांमुळे उष्णता निर्माण होते – जास्त खजूर खाल्ल्याने उष्णता वाढू शकते. कोणतीही गुंतागुंत टाळण्यासाठी गरोदरपणाच्या शेवटच्या टप्प्यात खजुराचे सेवन मर्यादित करा.
हिवाळ्यात खजूर खाणे
हवामान काहीही असो, खजूर जास्त प्रमाणात खाऊ नयेत. हिवाळ्यात तुम्ही खजुराचे सेवन वाढवू शकता कारण तयार होणारी उष्णता थंडीवर मात करण्यास मदत करेल आणि तुम्हाला आवश्यक पोषक तत्वे देखील प्रदान करेल.
नियमानुसार, गर्भाच्या योग्य विकासासाठी तुम्हाला दररोज 300 कॅलरीज अतिरिक्त लागतील. अशा प्रकारे, या सर्व कॅलरींच्या वापरासाठी आरोग्यदायी तसेच पोषक तत्वांनी भरलेले पर्याय निवडा. कमी पोषण आणि साखरेचे प्रमाण जास्त असलेले पदार्थ टाळा. फोलेट, लोह, कॅल्शियम आणि पोटॅशियम हे गरोदरपणात तुमच्या शरीराला आवश्यक असलेले सर्वात महत्वाचे पोषक घटक आहेत आणि खजुरापासून तुम्हाला ही सर्व पोषक तत्वे मिळतात.
गरोदरपणात खजुराचे सेवन करण्याचे वेगवेगळे मार्ग
गरोदरपणात खजूर खाण्याचे अनेक मार्ग आहेत. पहिला मार्ग म्हणजे अर्थातच खजूर आहेत तसे खाणे. तुम्ही खजूर कसे खाऊ शकता याबद्दल आणखी काही पर्याय इथे दिलेले आहेत.
- स्मूदी बनवा: एक कप दह्यात सहा खजूर घालून ब्लेंडर मध्ये एकत्र करून घ्या आणि स्मूदी बनवा.
- सिरप: दुधात काही खजूर मिसळून घरीच खजूर सिरप बनवा. आइस्क्रीम, टोस्ट, वॅफल्स किंवा ओटमीलवर हे मिश्रण वरून घाला.
- मिष्टान्न: खजुरापासून एखादा झटपट गोड पदार्थ बनवण्यासाठी तुम्ही शिऱ्यात खजूर घालून वरून थोडे मध सुद्धा घालू शकता अश्या प्रकारे पटकन एखादा गोड पदार्थ तुम्ही बनवू शकता.
- पाई क्रस्ट: खजूर आणि काजू ग्राइंडरमध्ये एकत्र करून घ्या. गुळगुळीत प्युरी बनवा. पौष्टिक आणि चवदार क्रस्ट साठी तुम्ही ते पाईच्या पीठात मिसळा.
- स्वीटनर: दुधात आणि इतर पेयांमध्ये साखरेच्या जागी खजूर घाला. सुक्रोजपेक्षा फ्रक्टोजचे सेवन हा उत्तम पर्याय आहे.
- कुकीज आणि मफिन: तुम्ही तुमच्या कुकी किंवा मफिन पिठात खजूर घालून चव वाढवू शकता.
- रॅप्स: आपण चिकन आणि ट्यूना रॅप्स आणि रोलमध्ये देखील खजूर घालू शकता त्यामुळे पदार्थाला एक सूक्ष्म, गोड चव येऊ शकते.
कुठल्या प्रकारचे खजूर खावेत?
खजूरचे अनेक प्रकार उपलब्ध आहेत. काही मऊ असतात आणि त्यात जास्त आर्द्रता असते, तर काही प्रकार कोरडे असतात आणि ते चघळता येऊ शकतात. खजुराचा प्रकार कोणताही असला तरी सुद्धा तुम्ही याचा वापर असंख्य स्नॅक्स आणि पाककृती बनवण्यासाठी करू शकता. गरोदरपणात तुम्ही कोणत्या प्रकारच्या खजूर खाऊ शकता ते पाहूया:
1. चीनी लाल खजूर
यामध्ये लोहाचे प्रमाण जास्त असते. अशा प्रकारचे खजूर ऍनिमिया टाळण्यास मदत करतात. असे खजूर आईच्या दुधाची गुणवत्ता सुधारण्यासाठी आणि प्रसूतीनंतर रक्तस्त्राव रोखण्यासाठी देखील ओळखले जातात.
2. मेडजूल खजूर
या विविध प्रकारच्या खजुरांमध्ये गर्भवती स्त्रीला आवश्यक असणारे सर्व पोषक घटक असतात. असे खजूर कार्बोहायड्रेट्सचे उत्कृष्ट स्त्रोत आहेत आणि त्यामध्ये चरबी कमी असलेले घटक असतात. ह्यामध्ये भरपूर प्रमाणात तंतुमय पदार्थ आणि प्रथिने असतात. अश्या प्रकारचे खजूर तुम्ही गरोदरपणात खाऊ शकता. मेडजूल खजूरमध्ये व्हिटॅमिनचे प्रमाण जास्त असते – फोलेट, नियासिन, पॅन्टोथेनिक ऍसिड, पायरिडॉक्सिन, रिबोफ्लेविन, थायामिन आणि ए, सी आणि के सारखी इतर जीवनसत्त्वे सुद्धा ह्यामध्ये भरपूर प्रमाणात असतात. अशा प्रकारच्या खजूरामधील लोहाचे प्रमाण खराब कोलेस्ट्रॉल कमी करण्यास मदत करते आणि तुमचे हृदय निरोगी ठेवते. अँटिऑक्सिडंट्स फ्री रॅडिकल्स काढून टाकतात आणि कॅन्सरलाही प्रतिबंध करतात.
गरोदरपणात खजूर खाण्याचे काही हानिकारक परिणाम होतात का?
गरोदरपणात खजूर खाणे असुरक्षित असल्याचे कुठल्याही अभ्यासाद्वारे निदर्शनास आलेले नाही. खरं तर, पहिल्या आणि तिसर्या तिमाहीत खजूर खाणे हे तुमच्या आरोग्यासाठी तसेच तुमच्या बाळाच्या आरोग्यासाठी उत्तम आहे. परंतु, जर तुम्ही जास्त प्रमाणात खजूर खाल्ले तर खालील परिणाम दिसू शकतात.
- वजन वाढणे
- गरोदरपणात मधुमेह होण्याची शक्यता
- रक्तातील साखरेचे प्रमाण वाढणे
- तोंडाची स्वच्छता नीट न राखल्यास दात किडणे
घ्यावयाची खबरदारी
आपण किती खजूर खात आहात याची काळजी घेणे आवश्यक आहे. जास्त खाल्ल्याने वजन वाढू शकते आणि आरोग्याच्या इतर समस्या उद्भवू शकतात.
खजुरामध्ये भरपूर पोषक तत्वे असतात आणि त्यामुळे खजूर खाणे सोपे असते. अनादी काळापासून गरोदर स्त्रियांसाठी खजूर हा एक चांगला अन्नपदार्थ आहे असे म्हटले जाते तसेच गर्भवती महिलांनी त्यांच्या दैनंदिन आहारात खजूर समाविष्ट करण्याची शिफारसही डॉक्टरांनी केली आहे. जर तुम्ही आई होणार असाल आणि तुमच्या आहारात खजूर समाविष्ट करण्याचा विचार करत असाल तर प्रथम तुमच्या डॉक्टरांचा सल्ला घ्या. सेंद्रिय खजूर देणारे ब्रँड शोधा कारण त्यामध्ये रासायनिक आणि संरक्षक घटक नसतात. ताज्या खजूरांचे सेवन करणे चांगले. ते मध्यम प्रमाणात खा आणि म्हणजे तुम्हाला कुठलाही त्रास होणार नाही!
आणखी वाचा:
गरोदरपणात अंजीर खाणे
गरोदरपणात सुकामेवा खाणे – फायदे आणि जोखीम