आहार आणि पोषण

गरोदरपणात जवस खाणे सुरक्षित आहे का?

गर्भारपण हा एक खूप नाजूक टप्पा आहे. या काळात पौष्टिक खाद्यपदार्थांची निवड करणे खूप आवश्यक असते. तुम्ही गरोदर असल्यास, तुमच्या बाळाची योग्य वाढ आणि विकासासाठी तुम्हाला पौष्टिक पदार्थ खावे लागतील. काही पदार्थ आरोग्यदायी असतात तरीही गरोदरपणात ते खाणे अगदी सुरक्षित नसते. उदाहरणार्थ, जवस खूप पौष्टिक असतात परंतु गरोदरपणात आरोग्यासाठी ते तितकेसे चांगले नसतात. जवसाचे सेवन करणे भारतात अजूनही असामान्य आहे, त्यामुळे गरोदरपणात जवसाचे सेवन करावे की नाही हे अनेकांना माहीत नसते. आपण गरोदरपणात जवस खाऊ शकता का त्याविषयी संपूर्ण माहिती ह्या लेखात दिलेली आहे.

जवस म्हणजे काय?

युरोप, आशिया आणि भूमध्यसागरीय भागात मुख्यत्वेकरून जवसाचे उत्पादन होते. जवस हे प्रभावी रेचक आहे. जवसाला भारतात ‘अल्सी’ म्हणून ओळखले जाते. जवस हे मॅग्नेशियम, पोटॅशियम, प्रोटीन, जस्त, व्हिटॅमिन बी ६ आणि ई ने समृध्द असतात. जवासामध्ये अल्फा-लिनोलेनिक ऍसिड म्हणून ओळखले जाणारे ओमेगा - ३ फॅटी अॅसिड देखील असतात, आणि ते कोलेस्ट्रॉलची पातळी कमी करण्यास मदत करतात. जवसामध्ये तंतुमय पदार्थ भरपूर प्रमाणात असल्यामुळे, जवसाच्या बिया खाल्ल्यास रक्तातील ग्लुकोज आणि कोलेस्टेरॉलचे नियमन करण्यास देखील मदत होते.

जवसाचे पौष्टिक मूल्य

प्रत्येक १०० ग्रॅम फ्लेक्ससीडमध्ये ५३४ कॅलरीज असतात. म्हणजेच एक चमचा (अंदाजे १० ग्रॅम) जवसाच्या बियांमध्ये कॅलरीजचे प्रमाण ५५ इतके असते. जवसाच्या बियांमध्ये ४२ % टक्के चरबी, २९ % कर्बोदके आणि १८ % प्रथिने असतात. जवसाच्या बियांमध्ये जवळजवळ पंचाण्णव टक्के तंतुमय पदार्थ असतात. त्यापैकी २० % ते ४० % सोल्युबल फायबर आणि ६० % ते ८० % इन्सोल्युबल फायबर असतात. फायबर हे नैसर्गिक रेचक असतात आणि त्यामुळे पचन चांगले होते.

गरोदरपणात जवस खाणे सुरक्षित आहे का?

गर्भारपण हा एक नाजूक काळ असतो म्हणून तुम्हाला तुमच्या आहाराबद्दल काळजी घ्यावी लागते. तुमच्या लहान बाळाची चांगली वाढ होण्यासाठी तुम्हाला पौष्टिक आहार घेणे गरजेचे आहे. गरोदरपणात तंतुमय पदार्थ खाण्याच्या उपयुक्ततेबद्दल आणि सुरक्षिततेबद्दल वैद्यकीय वर्तुळात मतभिन्नता आढळते. गरोदरपणात जवस खावे कि नाही हा प्रश्न जर तुमच्या मनात असेल तर त्याचे उत्तर नाही असे आहे. गरोदरपणात जवसाचे जास्त प्रमाणात सेवन करणे बाळासाठी हानिकारक ठरू शकते, म्हणून ते टाळणे चांगले.

गर्भवती महिलांसाठी जवस खाण्याचे फायदे

जवसामध्ये लिनोलेइक ऍसिड, अल्फा-लिनोलेनिक ऍसिड किंवा ओमेगा-3 पॉलीअनसॅच्युरेटेड फॅट असते. गरोदरपणात हे आवश्यक आहेत कारण ते गर्भाच्या मेंदूच्या विकासास मदत करतात. विशेषतः गरोदरपणाच्या पहिल्या काही महिन्यांत विशेष फायदा होतो. जवस हे फायबरचा चांगला स्रोत असल्याने, जवसाच्या बिया रक्तातील साखरेची पातळी नियंत्रित ठेवण्यास मदत करू शकतात. गर्भावस्थेतील मधुमेह असलेल्या स्त्रियांसाठी जवसाच्या बिया जास्त फायदेशीर ठरू शकतात. गरोदरपणात सामान्यपणे आढळणारी बद्धकोष्ठतेची समस्या सुद्धा जवसाच्या बिया खाल्ल्यास टाळता येते तथापि, जवसाचे दुष्परिणाम त्यांच्या फायद्यांपेक्षा जास्त आहेत, म्हणून गरोदरपणात जवस खाणे टाळले पाहिजे.

जवस खाण्याचे दुष्परिणाम

आधी सांगितल्याप्रमाणे गरोदरपणात जवस खाणे सुरक्षित नाही. मोठ्या प्रमाणात सेवन केल्यास ते बाळाच्या आरोग्यास संभाव्य हानी पोहोचवू शकतात. गरोदरपणात जवस खाण्याने होणाऱ्या दुष्परिणामांविषयी जाणून घेण्यासाठी वाचा.
  1. कच्च्या बियांचे सेवन गरोदरपणात तुमच्या रक्तदाबाची पातळी वाढवू शकते.
  2. जवस जास्त प्रमाणात खाल्ल्याने मळमळ आणि अतिसार होऊ शकतो.
  3. काही वेळा जवस खाल्ल्याने ओठांना सूज येऊ शकते.
  4. कच्च्या जवसाच्या बियांमध्ये सायनाइडचे प्रमाण कमी असते त्यामुळे विषबाधा होऊ शकते.
  5. विशेषत: गरोदरपणाच्या शेवटच्या दोन महिन्यांत जवसाचे  सेवन केल्यास बाळाचा अकाली जन्म होण्याचा धोका वाढू शकतो.

माझ्या आहारात जवसाच्या समावेश मी कसा करावा?

डॉक्टर जवसाच्या बिया कच्च्या खाऊ नका असे सांगतात कारण त्यात सायनाइडचे प्रमाण कमी असते. आपल्या आहारात फ्लॅक्ससीड्सचा समावेश करण्याचा सर्वोत्तम मार्ग म्हणजे त्या भाजून खाणे, कारण त्यामुळे त्यातील सायनाइड संयुगे नष्ट होतात. गरोदरपणाच्या आहारात जवसाच्या बियांचा समावेश न करणे चांगले आहे, तरीही तुम्हाला त्यांचे मध्यम प्रमाणात सेवन करायचे असल्यास, तुम्ही काय करू शकता ते येथे दिलेले आहे. आपण जवसाच्या बिया बारीक करून पावडर बनवू शकता. थेट सेवन टाळण्यासाठी तुम्ही ही पावडर स्मूदीमध्ये किंवा योगर्टमध्ये घालू शकता. तुमचे सॅलड किंवा सीरिअल सजवण्यासाठी तुम्ही जवसाची पावडर वापरू शकता. पण आहारात समाविष्ट करण्यापूर्वी तुमच्या पोषणतज्ञाशी संपर्क साधा. ताजेपणा टिकवून ठेवण्यासाठी आणि कुरकुरीत राहण्यासाठी जवसाच्या बिया हवाबंद डब्यात ठेवा.

मी गर्भवती असताना किती फ्लॅक्ससीड्स खाऊ शकते?

सामान्यतः दिवसाला सुमारे १.४ ग्रॅम इतक्या अल्फा-लिनोलेनिक ऍसिड (एएलए) ची आवश्यकता असते.  हे लक्षात घेऊन गरोदरपणात फ्लॅक्ससीड्सचे सेवन कमी प्रमाणात केले पाहिजे. म्हणजेच तुम्ही जवसाच्या बियांच्या पावडरचे एका चमच्यापेक्षा जास्त सेवन करू नये. जवस हे आपल्या दैनंदिन आहारातील सामान्य घटक आहेत. जवसाचा आपल्या आहारात समावेश करण्यापूर्वी आपल्या डॉक्टरांचा सल्ला घ्यावा. लक्षात ठेवा, गरोदरपणात जवस खाण्यासाठी सुरक्षित नाहीत. जवसाच्या फायद्यांपेक्षा दुष्परिणाम जास्त आहेत, म्हणून आपण जवस खाणे टाळणे चांगले. जर तुम्हाला जवस खायचे असेल तर ते वैद्यकीय देखरेखीखाली आणि माफक प्रमाणात खा. पौष्टिक आहार घ्या, नेहमीच सुरक्षित पर्यायांचा विचार करा. न घाबरता एका नवीन जीवाचे तुमच्या जीवनात स्वागत करा! आणखी वाचा: गरोदरपणात तीळ खाणे सुरक्षित आहे का गरोदरपणात मेथी दाण्यांचे सेवन (फेनुग्रीक सीड्स) करणे
Published by
मंजिरी एन्डाईत
Last Updated On

Recent Posts

All Rights Reserved