गर्भारपण

गरोदरपणात हिमोग्लोबिनची उच्च आणि कमी पातळी

जगभरातील सुमारे 20% गर्भवती महिला अशक्तपणा किंवा कमी हिमोग्लोबिन पातळीने ग्रस्त आहेत, असा संशोधकांचा विश्वास आहे. गरोदरपणातील ऍनिमियामुळे आई किंवा बाळाचा मृत्यू, अकाली प्रसूती आणि कमी जन्मदर यासारख्या समस्यांची शक्यता वाढते.

व्हिडिओ: गरोदरपणातील हिमोग्लोबिन पातळी - आपल्याला माहित असणे आवश्यक असलेली प्रत्येक गोष्ट

https://youtu.be/A18InRB7W5s

हिमोग्लोबिन म्हणजे काय?

हिमोग्लोबिन हे रक्तातील एक जटिल प्रथिने आहे. हे प्रथिन शरीराच्या विविध भागांमध्ये ऑक्सिजन आणि कार्बन डायऑक्साइड वाहून नेण्यास मदत करते. लोह हा लाल रक्तपेशींचा मुख्य घटक आहे, म्हणून हिमोग्लोबिन नाव - 'हेमो' म्हणजे लोह आणि 'ग्लोब्युलिन' हे प्रोटीनचे नाव आहे. महिलांमध्ये हिमोग्लोबिनची पातळी 12 ते 16 ग्रॅ/डीएल दरम्यान असावी.

गरोदरपणात हिमोग्लोबिनचे महत्त्व

जेव्हा एखादी स्त्री गरोदर असते तेव्हा तिला नेहमीपेक्षा जास्त ऑक्सिजनची गरज असते कारण गर्भालाही ऑक्सिजनची गरज असते. म्हणून, एखादी स्त्री गर्भवती होताच, तिच्या हिमोग्लोबिनच्या पातळीचा अंदाज लावला जातो - रक्ताची ऑक्सिजन वाहून नेण्याची क्षमता हिमोग्लोबिनच्या पातळीवर अवलंबून असते.

हिमोग्लोबिनची सामान्य श्रेणी

हिमोग्लोबिन ग्रॅम प्रति डेसीलिटरमध्ये मोजले जाते. प्रौढांमधील हिमोग्लोबिनची सामान्य श्रेणी खाली दिलेली  आहे.

गरोदरपणात हिमोग्लोबिनची पातळी का कमी होते?

गरोदरपणात हिमोग्लोबिन कमी होणे अपेक्षित आहे. खरं तर, गरोदरपणात हिमोग्लोबिन 10.5 ग्रॅ/डीएल  पर्यंत घसरणे सामान्य मानले जाते. त्यामागचे कारण अगदी सोपे आहे – जेव्हा एखादी स्त्री गरोदर असते, तेव्हा तिच्या रक्ताचे प्रमाण 50% वाढून विकसनशील बाळाला आवश्यक पोषक तत्वे पुरवतात. गरोदरपणाच्या 8व्या आठवड्यापर्यंत, गर्भवती स्त्रीच्या रक्तातील प्लाझ्माची पातळी लाल रक्तपेशींपेक्षा जास्त असते. रक्तातील लाल रक्तपेशींच्या प्रमाणात घट झाल्यामुळे, हिमोग्लोबिनची पातळी 10.5 ग्रॅ/डीएल  पर्यंत खाली येते. यापेक्षा कमी असलेल्या कोणत्याही गोष्टीकडे लक्ष देणे आवश्यक आहे.

कमी हिमोग्लोबिनचे परिणाम

10.5ग्रॅ /डीएल पेक्षा कमी हिमोग्लोबिन पातळी असल्यास गरोदर स्त्रीच्या आरोग्यावर परिणाम होऊ शकतो. त्यामुळे गरोदरपणात डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार लोह पूरक औषधे घेणे गरजेचे आहे. गरोदरपणात  हिमोग्लोबीनची पातळी कमी असल्यास त्याचे काही दुष्परिणाम येथे दिलेले आहेत:
  हिमोग्लोबिनमध्ये आणखी घट झाल्याने ही स्थिती बिघडू शकते. जर हिमोग्लोबिन 6 ग्रॅ/डीएल पर्यंत घसरले, तर गर्भवती आईला एनजाइना होऊ शकतो. ह्या परिस्थितीत, गर्भवती स्त्रीला छातीत तीव्र वेदना जाणवतात. ही वेदना हृदयाकडे रक्ताचा अपुरा प्रवाह झाल्यामुळे हळूहळू हात, खांदे आणि मानेकडे सरकते.

तुम्हाला हिमोग्लोबिन कमी होण्याचा धोका आहे का?

आधी सांगितल्याप्रमाणे, गरोदरपणात हिमोग्लोबिनमध्ये थोडीशी घसरण होणे सामान्य आहे. परंतु गर्भधारणा होण्यापूर्वीच हिमोग्लोबिनची पातळी सामान्यांपेक्षा कमी असेल तर तुम्हाला गरोदरपणात  हिमोग्लोबिन कमी होण्याचा धोका जास्त असू शकतो. गर्भधारणेपूर्वीचे काही घटक स्त्रीमधील  हिमोग्लोबिन कमी होण्यास कारणीभूत ठरू शकतात: गरोदरपणात तुम्हाला 3 प्रकारच्या हिमोग्लोबिन समस्यांचा सामना करावा लागू शकतो:
  1. लोहाच्या कमतरतेमुळे निर्माण होणारा अशक्तपणा- जेव्हा शरीरात हिमोग्लोबिन तयार करण्यासाठी पुरेसे लोह नसते तेव्हा ही समस्या उद्भवते.
  2. फोलेटच्या कमतरतेमुळे निर्माण होणारा अशक्तपणा- शरीराला अधिक आरबीसी तयार करण्यासाठी फोलेटची आवश्यकता असते, आणि ते शरीराच्या ऊतींमध्ये ऑक्सिजन वाहून नेण्यास मदत करते. हिरव्या पालेभाज्या पुरेशा प्रमाणात न खाल्ल्याने हिमोग्लोबिनसह फोलेटशी संबंधित समस्या उद्भवू शकतात.
  3. व्हिटॅमिन बी 12ची कमतरता - शरीराला निरोगी लाल रक्त पेशी तयार करण्यासाठी पुरेसे व्हिटॅमिन बी 12 आवश्यक आहे. व्हिटॅमिनची कमतरता असलेल्या आहारामुळे हिमोग्लोबिनच्या पातळीवर थेट परिणाम होऊ शकतो.

गर्भवती असताना हिमोग्लोबिन कसे वाढवायचे?

गरोदरपणात हिमोग्लोबिनची पातळी कमी होण्याची शक्यता असते त्यामुळे तुम्ही डॉक्टरांच्या सल्ल्याने लोहपूरक औषधे घेण्यास सुरुवात करावी. तसेच, तुमच्या आहारातील बदल तुम्हाला लोह, फॉलिक ऍसिड, व्हिटॅमिन बी 12 आणि व्हिटॅमिन सी पुन्हा भरण्यास मदत करू शकतात, नाहीतर तुम्हाला हिमोग्लोबिनची कमतरता येऊ शकते. असे आढळून आले आहे की कॅल्शियम, ग्लूटेन आणि कॅफिनचे जास्त सेवन केल्यास शरीरामध्ये लोहाचे शोषण नीट होत नाही. म्हणून, गरोदरपणात, एखाद्या व्यक्तीने खालील गोष्टींचे सेवन मर्यादित केले पाहिजे:
  1. कॉफी/चहा
  2. दारू
  3. पास्ता आणि गहू उत्पादने (ग्लूटेन)
  4. कोथिंबीर (पार्सले) (ऑक्सॅलिक ऍसिड)
  5. दुग्धजन्य पदार्थ

गरोदरपणात हिमोग्लोबिनची पातळी केव्हा वाढते?

गरोदरपणात हिमोग्लोबिनची पातळी हृदय, फुफ्फुस आणि मूत्रपिंड यांच्याशी संबंधित समस्यांमुळे वाढू शकते. गर्भवती महिलेमध्ये हिमोग्लोबिन खालील कारणांमुळे वाढू शकते:

1. निर्जलीकरण

गरोदरपणात द्रव पदार्थ किंवा पाण्याचे सेवन कमी झाल्यास, तुम्हाला हिमोग्लोबिनमध्ये अचानक वाढ होऊ शकते. जेव्हा तुमचे द्रव सेवन वाढते तेव्हा तेच नियंत्रणात येते.

2. एरिथ्रोसाइटोसिस

ही समस्या उद्भवल्यास, लाल रक्तपेशींमध्ये अचानक वाढ दिसून येते. गरोदरपणात, काही कारणास्तव, शरीर ऑक्सिजनची मागणी पूर्ण करू शकत नसल्यास, लाल रक्तपेशींच्या उत्पादनात वाढ होते. त्यामुळे साहजिकच शरीरातील हिमोग्लोबिनचे प्रमाण वाढते.

3. लोह पूरक औषधे जास्त प्रमाणात घेतल्यास

शरीरात लोहाची पातळी वाढल्याने हिमोग्लोबिनची पातळी अचानक वाढते. त्यामुळे तुमच्या डॉक्टरांचा सल्ला घेतल्याशिवाय लोह पूरक औषधे घेऊ नका.

उच्च हिमोग्लोबिन पातळीचे परिणाम

तुम्हाला आश्चर्य वाटेल, परंतु गरोदरपणात हिमोग्लोबिनचे प्रमाण खूप वाढल्यास ते धोकादायक असू शकते. गरोदरपणात उच्च हिमोग्लोबिनचे काही दुष्परिणाम इथे दिलेले आहेत:

हिमोग्लोबिनची पातळी वाढल्यास त्यावर उपचार

गरोदरपणात हिमोग्लोबिनची पातळी वाढल्यास त्यावर कोणतेही  घरगुती उपाय नाहीत. ह्या समस्येवर तज्ञांकडून उपचार घेतले पाहिजेत. तुमच्या लक्षणांवर आधारित डॉक्टर उपचार पद्धती ठरवतील आणि  तुमचे बारकाईने निरीक्षण केले जाईल. तुमच्या गरोदरपणाचा पुरेपूर आनंद घेण्यासाठी, तुम्ही काय खाता याकडे लक्ष द्या,  तुमच्या शरीराचे आणि विशेषतः तुमच्या डॉक्टरांचे ऐका. थोडीशी शंका असल्यास ताबडतोब डॉक्टरांचा सल्ला घ्या. आणखी वाचा:  गरोदरपणातील रक्तक्षय (अ‍ॅनिमिया) गरोदरपणातील रक्तक्षय (आयर्न-डेफिशिएन्सी अ‍ॅनिमिया)
Published by
मंजिरी एन्डाईत
Last Updated On

Recent Posts

All Rights Reserved