गर्भारपण

गरोदरपणातील ग्लुकोज चॅलेंज टेस्ट (जीसीटी) आणि ग्लुकोज टॉलरन्स टेस्ट (जीटीटी)

गरोदरपणात मधुमेह होणे सामान्य आहे. जेव्हा गरोदर स्त्रीचे स्वादुपिंड आईच्या तसेच बाळाच्या गरजा पूर्ण करण्यासाठी पुरेसे इन्सुलिन तयार करू शकत नाही तेव्हा गर्भारपणात मधुमेह होतो. बाळाच्या जन्मानंतर परिस्थिती सामान्य होत असली तरीसुद्धा, त्याचे लवकर निदान करून गर्भावर आणि आईवर कोणतेही हानिकारक परिणाम होऊ नयेत म्हणून योग्य ती कारवाई करणे महत्त्वाचे आहे.

गरोदर असताना केली जाणारी ग्लुकोज स्क्रीनिंग टेस्ट म्हणजे काय?

गरोदरपणात केली जाणारी ग्लुकोज चाचणी ही गरोदर स्त्रीला गरोदरपणात होणारा मधुमेह तर नाही ना हे तपासण्यासाठी केली जाते. ह्या चाचणीद्वारे रक्तातील साखरेची पातळी तपासली जाते. गरोदर स्त्रियांची केली जाणारी ही सामान्य चाचणी आहे . ग्लुकोज स्क्रिनिंग चाचण्यांचे दोन प्रकार आहेत, आणि ते म्हणजे ग्लुकोज चॅलेंज टेस्ट आणि ग्लुकोज टॉलरन्स टेस्ट. ह्या चाचण्या गरोदरपणाच्या २४ व्या आठवड्यापासून २८ व्या आठवड्यादरम्यान घेतल्या जातात.

ग्लुकोज चॅलेंज टेस्ट कुणी करून घेणे गरजेचे आहे?

जर नियमित लघवीच्या चाचणीमध्ये उच्च ग्लुकोज पातळी आढळली, तर लवकरच ग्लुकोज चॅलेंज टेस्ट केली जाते. काही वेळा, ही चाचणी २४ व्या आठवड्यापूर्वी केली जाते. ज्या स्त्रियांचा बीएमआय (बॉडी मास इंडेक्स) जास्त आहे किंवा ज्यांना मधुमेहाचा कौटुंबिक इतिहास आहे त्यांनी ग्लुकोज चॅलेंज चाचणी घेणे आवश्यक आहे. वय जास्त असलेल्या गर्भवती महिलांनी, ३५ नंतर, देखील चाचणी करून घ्यावी.

गरोदरपणात आपल्याला जीसीटी करून घेण्याची आवश्यकता का असते?

जीसीटी किंवा ग्लुकोज चॅलेंज टेस्ट गरोदर महिलेला गरोदरपणातील मधुमेह आहे की नाही हे शोधण्यासाठी केली जाते. गरोदर स्त्रियांमध्ये गर्भावस्थेतील मधुमेहामुळे गुंतागुंत निर्माण होऊ शकते, जसे की गर्भाची अतिरिक्त वाढ किंवा प्रीक्लेम्पसिया नावाची समस्या इत्यादी. ह्या समस्येमध्ये उच्च रक्तदाब आणि लघवीमध्ये प्रथिनांची उपस्थिती आढळून येते. त्यामुळे जन्मजात समस्या निर्माण होऊ शकते. काही प्रकरणांमध्ये, सिझेरियन प्रसूतीची आवश्यकता असते. त्यामुळे ह्या चाचणीचे खूप महत्त्व आहे.

ग्लुकोज चॅलेंज टेस्ट कशी केली जाते?

ग्लुकोज चॅलेंज टेस्ट किंवा जीसीटी ही साखर किंवा ग्लुकोजवर तुमच्या शरीराची प्रतिक्रिया मोजण्याची प्रक्रिया आहे. चाचणीदरम्यान तुम्हाला साखरयुक्त पेय घेण्यास सांगितले जाऊ शकते आणि ते ग्लुकोज पेय सुद्धा असू शकते. ही एक नॉन-फास्टिंग टेस्ट आहे म्हणजेच चाचणी करण्यापूर्वी तुम्हाला उपवास करण्याची गरज नाही. तुम्ही एक तास विश्रांती घ्या आणि विश्रांती नंतर, रक्तातील साखरेचे मूल्यांकन करण्यासाठी रक्त तपासणी केली जाते. चाचणीच्या निकालामध्ये साखरेची कमी, सामान्य किंवा उच्च पातळी दर्शवली जाते. उच्च पातळी म्हणजे ती व्यक्ती गर्भावस्थेतील मधुमेहाने ग्रस्त आहे. अशा परिस्थितीत, निदानाची पुष्टी करण्यासाठी ग्लुकोज सहिष्णुता चाचणी केली जाते.

चाचणी निकालाचा अर्थ कसा लावला जातो?

रक्तातील ग्लुकोजची पातळी एकतर मिलीग्राम प्रति डेसीलीटर किंवा मिलीमोल्स प्रति लिटरमध्ये मोजली जाते. ग्लुकोज चॅलेंज टेस्टचा उद्देश रक्तातील साखरेची पातळी निश्चित करणे हा आहे. चाचणी परिणामांचे मूल्यमापन सामान्य स्तरावरील विचलनाच्या आधारावर केले जाते. एखाद्या व्यक्तीमध्ये साखरेची सामान्य पातळी १४० एमजी/डीएल किंवा ७.८ मिलीमोल्स प्रति लिटर असते. जरी ही सामान्य श्रेणी सर्वत्र स्वीकारली जात असली तरी, काही प्रयोगशाळांमध्ये, ह्या श्रेणीपेक्षा थोडे कमी असलेले मूल्य देखील सामान्य मानले जाते. गरोदरपणातील जीसीटी चाचणीच्या सामान्य श्रेणीपेक्षा जास्त असलेली साखरेची पातळी गर्भावस्थेतील मधुमेहाची पुष्टी करते.

गरोदरपणात केली जाणारी जीटीटी चाचणी म्हणजे काय?

ग्लुकोज टॉलरन्स टेस्ट (ग्लुकोज सहिष्णुता चाचणी) किंवा जीटीटी ही चाचणी ओजीटीटी किंवा ओरल ग्लुकोज टॉलरन्स टेस्ट म्हणून देखील ओळखली जाते. शरीर साखरेच्या पातळीला कसा प्रतिसाद देते हे शोधण्यासाठी ही चाचणी केली जाते. ही चाचणी गर्भावस्थेतील मधुमेहाचे निदान करण्यासाठी केली जाते. काही वेळा, टाइप २ मधुमेहाचे निदान जीटीटीद्वारे देखील केले जाऊ शकते.

ग्लुकोज टॉलरन्स टेस्ट (ग्लुकोज सहिष्णुता चाचणी) ची तयारी कशी करावी?

चाचणीच्या एक दिवस आधीपर्यंत तुम्ही तुमचा नेहमीचा आहार घेऊ शकता. चाचणीसाठी तुम्हाला काही गोष्टी कराव्या लागतील:

गरोदरपणात ग्लुकोज टॉलरन्स टेस्ट (ग्लुकोज सहिष्णुता चाचणी) कशी केली जाते?

लॅब किंवा डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार चाचणी करण्याच्या पद्धतीत काही फरक असतील. गरोदरपणातील रक्ताची ग्लुकोज चाचणी किंवा जीटीटी ही एक फास्टिंग टेस्ट आहे. त्यामुळे, तुम्हाला चाचणीपूर्वी सुमारे ८ तास उपवास करणे किंवा कोणतेही ठोस अन्न न घेणे आवश्यक आहे. ही चाचणी सहसा सकाळी केली जाते त्यामुळे सकाळी चाचणीपूर्वी ८ तासांचे अंतर सुनिश्चित करण्यासाठी तुम्हाला रात्री उशिरा जेवण करण्यास सांगितले जाऊ शकते. सर्वात आधी, काहीही न खाता रक्ताचा नमुना घेऊन चाचणी केली जाते. रक्त काढल्यानंतर, तुम्हाला ग्लुकोज पेय किंवा इतर कोणतेही साखर पेय दिले जाईल. एका तासानंतर, रक्त नमुना पुन्हा घेतला जातो आणि ही प्रक्रिया किमान दोनदा केली जाऊ शकते.

जीटीटी चाचणीच्या निकालाचा अर्थ कसा लावला जातो?

जीटीटी चाचणी परिणामांचा तीन स्तरांवर अर्थ लावला जातो: पूर्व-मधुमेह, मधुमेह आणि गरोदरपणातील मधुमेह. ह्या टप्प्यावर टाइप २ मधुमेहाच्या प्रकरणाचे मूल्यांकन केले जात नाही परंतु डॉक्टर तुम्हाला दुसऱ्या दिवशी पुन्हा चाचणी घेण्यास सांगू शकतात. गणना करण्यासाठी रक्तातील ग्लुकोजचे एकक मीग्रॅ/डेसीलिटर असते.

खाली जीटीटी चाचणीच्या परिणामांचा अर्थ काय आहे हे दर्शविणारा तक्ता दिलेला आहे -

रक्तातील साखरेची श्रेणी

सामान्य रक्त शर्करा श्रेणी
६०-१०० मीग्रॅ/डीएल
प्री-डायबेटिक
१०१-१२६ मीग्रॅ/डीएल
मधुमेहाची श्रेणी
१२६ मीग्रॅ/डीएल पेक्षा जास्त

उच्च ग्लुकोज पातळी कारणे

येथे काही कारणे आहेत ज्यामुळे होणाऱ्या आईच्या रक्तातील पातळी जास्त असू शकते

साखरेची पातळी कमी असण्याची कारणे

खालील कारणांमुळे आईच्या रक्तातील साखरेची पातळी वाढू शकते

गरोदरपणात केल्या जाणाऱ्या ओजीटीटी चाचणीची जोखीम किंवा दुष्परिणाम

खाली ह्या चाचणीचे काही धोके दिलेले आहेत त्यावर तुम्ही लक्ष ठेऊ शकता

तुमचे चाचणीचे परिणाम असामान्य असल्यास काय?

प्रत्येक वेळी जेव्हा तुमचे रक्त काढले जाते तेव्हा चाचणीचे निकाल वेगळे असतात तेव्हा असामान्य परिणाम दिसून येतात. जर एखादे रिडींग सामान्य श्रेणीपेक्षा जास्त असेल तर तुमचे डॉक्टर फक्त खाण्याच्या सवयींमध्ये बदल सुचवू शकतात. तथापि, जर एकापेक्षा जास्त असामान्य रीडींग्ज असतील तर तुम्हाला गरोदरपणातील मधुमेह असण्याची शक्यता असते.

तुमच्या रक्तातील ग्लुकोजची पातळी कशी कमी करावी?

खाली काही उपाय दिलेले आहेत त्याद्वारे तुम्ही नैसर्गिकरित्या तुमच्या शरीरातील साखर कमी करू शकता

गरोदरपणात ग्लुकोज टॉलरन्स टेस्ट (GTT) आणि ग्लुकोज चॅलेंज टेस्ट (GCT) करायला सांगितली म्हणजे तुम्हाला मधुमेह आहेच असे नाही. गरोदरपणात तुमच्या शरीरातील साखरेच्या पातळीवर लक्ष ठेवणे हा त्यामागील उद्धेश असतो. गरोदरपणात तुम्हाला मधुमेहाची कोणतीही चिन्हे आढळल्यास स्वतःवर उपचार करून घेणे नेहेमीच चांगले असते.

आणखी वाचा:

गरोदर चाचणी केव्हा आणि कशी करावी? गरोदरपणातील चाचण्या: आरएच घटक आणि प्रतिपिंड तपासणी

Published by
मंजिरी एन्डाईत
Last Updated On

Recent Posts

All Rights Reserved