आहार आणि पोषण

गरोदरपणात गाजर खाणे: आरोग्यविषयक फायदे आणि धोके

जर तुम्ही गरोदर असाल, तर तुमच्या पोटातील बाळाच्या आरोग्यासाठी आणि तंदुरुस्तीसाठी, सगळे काही व्यवस्थित झाले पाहिजे असे तुम्हाला वाटत असते. सर्वात पहिली आणि मुख्य गोष्ट म्हणजे तुमचा गरोदरपणातील आहार आणि पोषण ह्याकडे तुम्ही लक्ष दिले पाहिजे. तुमच्या गरोदरपणाच्या दैनंदिन आहारात गाजराचा समावेश करणे हा एक चांगला पर्याय आहे का असा प्रश्न तुम्हाला पडत असेल तर पुढील लेख वाचा. आपण ह्या लेखामध्ये गरोदरपणात गाजर खाण्याचे विविध फायदे आणि जोखीम ह्यावर चर्चा करणार आहोत.

गाजरचे पौष्टिक मूल्य

गाजरामध्ये विविध जीवनसत्त्वे आणि खनिजे असतात. खालील तक्ता तुम्हाला गाजराच्या पौष्टिक मूल्यांची ओळख करून देईल.
पौष्टिक मूल्य प्रति 100 ग्रॅम
ऊर्जा 41 किकॅलरी
कर्बोदके 9.58 ग्रॅम
साखर 4.5 ग्रॅम
प्रथिने 0.93 ग्रॅम
चरबी 0.24 ग्रॅम
तंतुमय पदार्थ (आहारातील फायबर) 2.8 ग्रॅम
व्हिटॅमिन सी 6 मिग्रॅ
व्हिटॅमिन ए 5 मिग्रॅ
व्हिटॅमिन बी-6 0.135 ग्रॅम
व्हिटॅमिन के 13. 2 मायक्रोग्रॅ
कॅल्शियम 33 मिग्रॅ
सोडियम 69 मिग्रॅ
फॉस्फरस 35 मिग्रॅ
पोटॅशियम 320 मिग्रॅ
मॅग्नेशियम 12 मिग्रॅ
तांबे 0.045 मिग्रॅ
लोह 0.30 मिग्रॅ
जस्त 0.24 मिग्रॅ
मॅंगनीज 0.143 मिग्रॅ
सेलेनियम 0.1 मायक्रोग्रॅ
वर नमूद केलेली मूल्ये 100 ग्रॅम गाजरमध्ये उपस्थित असलेली अंदाजे मूल्ये आहेत.

गरोदरपणात गाजर खाण्याचे फायदे

गाजरामध्ये विविध जीवनसत्वे आणि खनिजे भरपूर प्रमाणात असतात. तुम्ही गाजर कच्चे किंवा शिजवून खाऊ शकता. तुमच्या गरोदरपणात गाजराचे तुमच्यासाठी खूप आरोग्यदायी फायदे आहेत

1. दृष्टीसाठी चांगले

व्हिटॅमिन ए चा समृद्ध स्रोत असल्याने, गरोदरपणात गाजर खाणे  तुमच्या डोळ्यांच्या आरोग्यासाठी खूप चांगले आहे. गरोदरपणात गाजर खाणे तुमच्या डोळ्यांसाठी चांगले असते तसेच गर्भाच्या डोळ्यांच्या विकासासाठी देखील ते फायदेशीर आहे.

2. रोगप्रतिकारक शक्ती मजबूत होते

गाजरांमध्ये व्हिटॅमिन सी भरपूर प्रमाणात असते. तुमची रोगप्रतिकारक शक्ती मजबूत करण्यासाठी गाजर अत्यंत फायदेशीर आहे. गरोदरपणात रोगप्रतिकारशक्ती कमी होते. गाजराचे नियमित सेवन केल्याने तुमची प्रतिकारशक्ती मजबूत होण्यास मदत होते.

3. गर्भाच्या विकासासाठी मदत होते

गाजराचे सेवन करणे गर्भाच्या वाढीसाठी आणि विकासासाठी खूप प्रभावी आहे कारण गाजरामध्ये कॅल्शियम आणि व्हिटॅमिन ए कॅरोटीन भरपूर प्रमाणात असते. हे व्हिटॅमिन गर्भाची हाडे आणि दातांच्या निर्मितीसाठी खूप महत्वाचे आहे.

4. ऍनिमिया रोखण्यासाठी मदत होते

तुमच्या गरोदरपणाच्या दैनंदिन आहारात गाजराचा समावेश केल्यास गरोदरपणाच्या काळातील अशक्तपणा दूर होण्यास मदत होते. कारण गाजरात केवळ लोहच नाही तर व्हिटॅमिन सी देखील असते आणि ते  शरीरात लोह शोषण्यास मदत करते.

5. बद्धकोष्ठता दूर करते

बद्धकोष्ठता ही गर्भवती महिलांना भेडसावणारी सर्वात सामान्य समस्या आहे. गाजरांमध्ये पुरेशा प्रमाणात फायबर असते आणि गाजराचे नियमित सेवन केल्याने तुमच्या बद्धकोष्ठतेच्या समस्येवर मात करता येते. गाजर खाल्ल्याने पचनाच्या इतर समस्या दूर होण्यास सुद्धा मदत होते.

6. गरोदरपणात पेटके येणे प्रतिबंधित करते

गरोदरपणात अनेक गर्भवती स्त्रियांना क्रॅम्पिंग आणि स्नायू कडक होणे इत्यादींचा अनुभव येऊ शकतो. गरोदरपणात येणाऱ्या ह्या खूप सामान्य समस्या आहेत परंतु त्यामुळे खूप अस्वस्थ वाटू शकते. गाजरामध्ये फॉस्फरस असते आणि ते गरोदरपणात स्नायूंचे योग्य कार्य करण्यास मदत करते आणि त्यामुळे कोणत्याही प्रकारचे पेटके येत नाहीत.

7. गरोदरपणातील उच्च रक्तदाब व्यवस्थापित करण्यात प्रभावी

काही गरोदर स्त्रियांना गरोदरपणात उच्च रक्तदाबाचा अनुभव येऊ शकतो. त्यामुळे गरोदरपणात विविध गुंतागुंत निर्माण होऊ शकतात. परंतु, जर गाजरांचे दररोज सेवन केले तर त्यामुळे गरोदरपणात उच्च रक्तदाबाचा धोका कमी होऊ शकते कारण त्यात तंतुमय पदार्थ आणि बीटा कॅरोटीन्स चांगल्या प्रमाणात असतात.

8. गर्भाची हाडे आणि कूर्चा तयार होण्यास मदत होते

गाजरांमध्ये मॅंगनीज असते. तुमच्या बाळामध्ये हाडे आणि कूर्चा तयार करण्यासाठी आवश्यक असलेले ते एक महत्त्वाचे खनिज आहे. तुमच्या गरोदरपणाच्या आहारात गाजराच्या रसाचा समावेश करून तुम्ही मॅंगनीजचे प्रमाण वाढवू शकता.

9. गर्भाच्या मज्जासंस्थेच्या विकासास मदत करते

गाजरातील व्हिटॅमिन बी आणि फॉलिक ऍसिड तुमच्या बाळाची मज्जासंस्था आणि मेंदूच्या विकासासाठी फायदेशीर आहे. दररोज गाजर खाल्ल्याने तुमच्या बाळाला स्पायना बिफिडा सारखे मज्जासंस्थेचे दोष निर्माण होण्याचा धोका देखील कमी होऊ शकतो.

10. कर्करोग प्रतिबंध करण्यास मदत करते

गाजरात बीटा-कॅरोटीन असते आणि ते कर्करोगाचा धोका कमी करण्यासाठी फायदेशीर आहे. बीटा-कॅरोटीन गर्भवती महिलेसाठी अँटिऑक्सिडंट म्हणून काम करते. तुमच्या शरीरातील मुक्त रॅडिकल्सचा प्रभाव कमी करते, त्यामुळे तुम्हाला आणि तुमच्या बाळाला कर्करोगाचा धोका निर्माण होत नाही. गाजर खाण्याचे अनेक फायदे आहेत. गरोदरपणात गाजर खाल्ल्यास त्याचा तुमच्या बाळाला आणि तुम्हाला फायदा होऊ शकतो.

गरोदरपणात गाजर खाण्याविषयक टिप्स

तुमच्या आहारात गाजराचा प्रभावीपणे कसा समावेश करता येईल ह्याचा जर तुम्ही विचार करत असाल, तर आमच्याकडे तुमच्यासाठी काही टिप्स आहेत. ह्या टिप्सच्या आधारे  तुम्हाला या भाजीचे सेवन कसे करावे आणि आहारात गाजराचा समावेश कसा करावा हे जाणून घेण्यासाठी मदत होईल:

गरोदर असताना गाजर किंवा गाजराचा रस पिण्याचे धोके

जरी गरोदरपणात कच्चे गाजर खाणे सुरक्षित मानले जात असले तरी सुद्धा तुम्हाला किंवा बाळाला कोणताही धोका नाही. तरीही गरोदरपणात गाजर किंवा गाजराच्या रसाचे सेवन करण्याचे काही धोके खालीलप्रमाणे आहेत.
काय चूक होऊ शकते यावर चर्चा करूया:

स्वादिष्ट गाजर सूप रेसिपी

हे सोपे गाजर सूप छान, आरोग्यदायी आणि थंड हवामानासाठी परिपूर्ण आहे. साहित्य: कसे शिजवायचे: गरोदर स्त्रीसाठी गाजरांचे खूप आरोग्यविषयक फायदे आहेत परंतु त्याचे संभाव्य धोके सुद्धा आहेत. जर तुम्ही तुमच्या गरोदरपणाच्या आहारात गाजराचा समावेश करण्याचा विचार करत असाल तर तुमच्या डॉक्टरांचा सल्ला घ्यावा. डॉक्टरांनी परवानगी दिल्यानंतर तुम्ही तुमच्या आहारात गाजराचा समावेश करू शकता. गरोदरपणात गाजराचे अनेक आरोग्य विषयक फायदे घेऊ शकता. परंतु, गाजराचे जास्त प्रमाणात सेवन करू नका, कारण त्यामुळे विविध गुंतागुंत निर्माण होऊ शकते आणि दुष्परिणाम होऊ शकतात. आणखी वाचा:  गरोदरपणात रताळे खाणे सुरक्षित आहे का गरोदरपणात बीटरूट खाणे: आरोग्यविषयक फायदे आणि दुष्परिणाम
Published by
मंजिरी एन्डाईत
Last Updated On

Recent Posts

All Rights Reserved