गर्भारपण

गरोदरपणातील औषधे: काय सुरक्षित आहे, पर्यायी उपचारपद्धती आणि बरंच काही

गरोदरपणात तुम्ही स्वतःची काळजी घेता आणि चांगल्या आरोग्यासाठी निरोगी सवयीचे पालन करता. त्यामुळे, गरोदरपणात तुम्हाला सर्दी आणि फ्लू किंवा इतर काही किरकोळ आजार झाल्यास तुम्हाला औषधे घेण्याची भीती वाटू शकते. गरोदरपणात, सामान्य आजारांसाठी बहुतेक औषधे वापरण्यास सुरक्षित असतात परंतु औषधे घेताना सावधगिरी बाळगणे आवश्यक असते.

गरोदरपणात सुरक्षित औषधे कशी निवडावीत?

तुम्ही गर्भवती नसताना सुद्धा औषधांशी संबंधित दुष्परिणाम आणि प्रतिक्रिया असतात. म्हणून, गरोदरपणात सामान्य आजारांसाठी पूर्णपणे सुरक्षित औषधे निवडण्याचा कोणताही मार्ग नाही. अशा प्रकारे, ओव्हर-द-काउंटर (ओटीसी) औषधे घेण्यापूर्वी तुम्ही डॉक्टरांशी संपर्क साधणे गरजेचे आहे. तुमच्या गरोदरपणाच्या पहिल्या तिमाहीत सर्व प्रकारची औषधे टाळण्याचा प्रयत्न करा कारण यावेळी तुमचे विकसनशील बाळ सर्वात असुरक्षित असते. जर तुम्ही तुमच्या गरोदरपणाच्या आधीपासून कोणतीही प्रिस्क्रिप्शन औषधे घेत असाल, तर ती औषधे चालू ठेवणे सुरक्षित आहे का ते तुमच्या डॉक्टरांना विचारा. अन्यथा, तुमचे डॉक्टर तुम्हाला औषधांचे इतर पर्याय लिहून देऊ शकतील.

गरोदरपणात कोणती औषधे घेणे सुरक्षित आहे?

प्रसवपूर्व जीवनसत्त्वे घेणे गरोदरपणात सुरक्षित आहेत आणि आवश्यक देखील आहेत. काही औषधे (ओटीसी) गरोदरपणात सुरक्षित मानली जातात तरीही तुमच्या डॉक्टरांशी ह्याविषयी बोलून घेतलेले चांगले . तुम्ही गरोदर असताना घेऊ शकता अश्या सामान्य औषधांची यादी खाली दिलेली आहे:
समस्या औषधे
पुरळ बेंझॉयल पेरोक्साइड
ऍलर्जी लोराटँडीन, डायफेनहायड्रॅमिन, सिट्रिझिन
बद्धकोष्ठता मिथाइलसेल्युलोज, डॉक्युसेट सोडियम, सेनोसाइड्स, कॅल्शियम पॉलीकार्बोफिल, मॅग्नेशियम हायड्रॉक्साईड, ज्यूसमध्ये खनिज तेल (30 मिली)
खोकला (अल्कोहोल-मुक्त सिरप) डेक्सट्रोमेथोरफान हायड्रोब्रोमाइड, डेक्स्ट्रोमेथोरफान, ग्वायफेनेसिन
जुलाब लोप्रामाइड
ताप पॅरासिटामोल
गॅस सिमेथिकॉन
छातीत जळजळ कॅल्शियम कार्बोनेट, फॅमोटीडीन, रॅनिटीडीन, विच हॅझेल
मूळव्याध हायड्रोकॉर्टिसोन, विच हॅझेल
मळमळ/उलट्या, मोशन सिकनेस डायमेनहायड्रीनेट, व्हिटॅमिन बी-6, डॉक्सिलामाइन सक्सीनेट
वेदना तुमच्या ओटीपोटात (पोटात) दुखत असल्यास क्लिनिकला कॉल करा. ऍसिटामिनोफेन
पुरळ तुम्हाला एलर्जीची प्रतिक्रिया असल्यास किंवा बरे वाटत नसल्यास तुमच्या डॉक्टरांना फोन करा. कोलोइडल ओटमील, हायड्रोकोर्टिसोन, डिफेनहायड्रॅमिन
सायनस आणि सर्दी क्लोरफेनिरामाइन, सलाईन (सोडियम क्लोराईड) अनुनासिक फवारण्या
झोपेची समस्या डायॉक्झिलामाईंन सक्सीनेट
घसा खवखवणे डायक्लोनाईन हायड्रोकलोराईड, बेन्झोकाइन,मेन्थॉल
योनीला होणारा यीस्ट संसर्ग बुटोकोनाझोल, क्लोट्रिमाझोल, मायकोनाझोल
Source: https://www.allinahealth.org/health-conditions-and-treatments/pregnancy-care/over-the-counter-medicines-safe-to-use-during-pregnancy/ जर तुम्हाला आधीचे काही आजार असतील आणि तुम्हाला सतत औषधोपचार घेण्याची गरज असेल तर तुमच्या डॉक्टरांच्या सूचनेनुसार ही औषधे घेत राहणे महत्वाचे आहे. बाळाला तुम्हाला असणाऱ्या आजारांचा धोका,  तुम्ही घेत असलेल्या औषधांपेक्षा जास्त असतो आणि त्यामुळे तुमचे डॉक्टर आजार नियंत्रणात ठेवण्यासाठी किमान आवश्यक डोस लिहून देऊ शकतात.

कोणत्या पर्यायी उपचारांना सुरक्षित मानले जाते?

काही सोप्या घरगुती उपायांच्या मदतीने तुम्ही सर्दी, ऍलर्जी, ताप, वेदना आणि पचनाच्या समस्या ह्यासारख्या सामान्य आजारांपासून सुटका करून घेऊ शकता. बहुतेकवेळा असे आजार तुम्ही औषधांनी पूर्णपणे टाळू शकता. पूरक आणि पर्यायी औषधे देखील आता पसंतीस उतरत आहेत. होमिओपॅथी, किनेसियोलॉजी, रिफ्लेक्सोलॉजी आणि संमोहन यासारख्या पर्यायी उपचारपद्धतीचा विचार केला जात आहे.

1. सर्दी आणि ताप

गरोदरपणात सर्दी आणि फ्लू झाल्यास भरपूर विश्रांती आणि कोमट द्रवपदार्थ घेतल्यास त्वरित आराम मिळू शकतो. जर तुमची लक्षणे आणखीनच वाढली, तर तुम्ही बंद झालेल्या नाकासाठी सलाईन थेंब, ह्युमिडिफायर आणि सायनसच्या वेदना कमी करण्यासाठी गरम किंवा थंड पॅक वापरू शकता. तुम्हाला घसा खवखवण्याचा त्रास होत असल्यास, थोडे मध किंवा लिंबू घालून डिकॅफिनेटेड चहाचा एक कप घेऊन पहा.

2. वेदना

तुमच्या शरीरात होणाऱ्या विविध शारीरिक बदलांमुळे गरोदरपणात स्नायू दुखणे आणि ताण येणे हे खूप सामान्य आहे. अस्वस्थता कमी करण्यासाठी कोल्ड कॉम्प्रेसचा वापर आणि विश्रांती घेणे उपयुक्त ठरू शकते. प्रशिक्षित किंवा प्रमाणित व्यावसायिकांद्वारे प्रशासित केलेले प्रसवपूर्व मालिश हा देखील एक सुरक्षित पर्याय आहे.

3. छातीत जळजळ

छातीत जळजळ होणे ही तक्रार गरोदरपणात दिसून येते. खूप जेवण करणे, तळलेले आणि मसालेदार अन्न टाळा. तसेच जेवणानंतर लगेच झोपल्याने छातीत होणारी जळजळ कमी होण्यास मदत होते.

4. बद्धकोष्ठता आणि मूळव्याध

गरोदरपणात ह्या दोन समस्या सामान्य असतात. फायबर युक्त अन्न खाऊन आणि भरपूर पाणी पिऊन सजलीत राहिल्यास ह्या समस्या टाळता येतात.

5. मॉर्निंग सिकनेस

मळमळ कमी करण्यासाठी आल्याची मदत होते आणि मॉर्निंग सिकनेस चांगल्या प्रकारे हाताळण्यास मदत होऊ शकते.

6. निद्रानाश आणि तणाव

लैव्हेंडर आणि गुलाब ह्यासारख्या आरामदायी तेलांमुळे तुम्हाला लवकर शांत वाटू शकते.

कोणत्या पर्यायी उपचार पद्धती टाळल्या पाहिजेत

सर्व पर्यायी उपचार पद्धती सौम्य किंवा आक्रमक नसतात. तसेच, बाजारात भरपूर नैसर्गिक उपाय उपलब्ध आहेत परंतु हे सर्व गरोदरपणात सुरक्षित असू शकत नाही. तुमच्या गरोदरपणात कोणते पर्यायी उपचार सुरक्षितपणे वापरले जाऊ शकतात याबद्दल मार्गदर्शन करण्यासाठी तुमचे डॉक्टर  त्यासाठी सर्वोत्तम व्यक्ती आहेत. गरोदर असताना काही आजार होण्याचा धोका कमी करण्यासाठी तुम्ही काही खबरदारी घेऊ शकता. गरोदरपणात तुमची रोगप्रतिकारक शक्ती कमकुवत होते आणि म्हणूनच तुम्हाला सावधगिरी बाळगणे आवश्यक आहे. आपले हात वारंवार धुवा, चांगली झोप घ्या, निरोगी खा, नियमित व्यायाम करा आणि गरोदर असताना तणाव टाळा. या काळात फ्लूची लस घेणे देखील उपयुक्त ठरू शकते. गरोदरपणात  औषधे घेणे टाळणे केव्हाही चांगले असते परंतु तुम्हाला गरोदरपणात त्याचा परिणाम भोगावा लागेल असा त्याचा अर्थ होत नाही. म्हणून, डॉक्टरांच्या सूचनांचे पालन करणे आणि खबरदारी घेणे हा सर्वोत्तम उपाय आहे. अस्वीकरण: ही माहिती केवळ एक मार्गदर्शिका आहे आणि पात्र व्यावसायिकांच्या वैद्यकीय सल्ल्याचा पर्याय नाही आणखी वाचा: गरोदरपणातील झोपेची समस्या – कारणे आणि उपाय गरोदरपणातील ‘मोशन सिकनेस'- कारणे आणि उपाय
Published by
मंजिरी एन्डाईत
Last Updated On

Recent Posts

All Rights Reserved