आहार आणि पोषण

गरोदरपणात अक्रोड खाण्याचे फायदे आणि जोखीम

जेव्हा एखाद्या स्त्रीला ती गर्भवती असल्याचे समजते तेव्हा ती तिच्या आहाराबाबत काळजी घेते. तुम्ही गरोदर असल्यास, तुम्ही सुद्धा तुमच्या डॉक्टरांशी चर्चा करून तुमच्या आहारात योग्य तो बदल केलेला असेल. तुमच्या स्त्रीरोगतज्ज्ञांनी तुम्हाला फक्त पौष्टिक अन्नपदार्थ खाण्यास सांगितले असेल. तुम्ही बदाम, जर्दाळू आणि अक्रोड यांसारखे ड्रायफ्रूट्स आणि नट्स खाण्यास सुरुवात करावी, असेही त्यांनी तुम्हाला सुचवले असेल. या लेखात आपण अक्रोडबद्दल चर्चा करणार आहोत. अनेक गर्भवती स्त्रियांना  अक्रोडाच्या पौष्टिक फायद्यांविषयी माहिती नसते. चला तर मग, गरोदरपणात अक्रोडाचे फायदे पाहूया.

गरोदरपणात अक्रोड खाणे सुरक्षित आहे का?

हिंदीमध्ये अक्रोट म्हणून ओळखले जाणारे अक्रोड हे अत्यंत आरोग्यदायी आहे. गरोदरपणात अक्रोडाचे सेवन करणे संपूर्णतः सुरक्षित आहे. अक्रोड मेंदूसारखे दिसते आणि ते केवळ मेंदूसारखे दिसत नाहीत तर मेंदूच्या योग्य कार्यास देखील मदत करतात. याशिवाय, गरोदर असताना अक्रोड खाण्याचे इतर अनेक संभाव्य फायदे आहेत.

गरोदरपणात अक्रोड खाण्याचे पोषणविषयक फायदे

असे मानले जाते की गरोदरपणात अक्रोड खाणाऱ्या स्त्रियांना ऍलर्जी होण्याची शक्यता कमी असते. स्वादिष्ट आणि कुरकुरीत अक्रोडमध्ये भरपूर पोषक घटक असतात आणि ते गर्भवती स्त्रियांसाठी फायदेशीर असतात. गरोदरपणात अक्रोड खाण्याचे फायदे खाली दिले आहेत.

गरोदरपणात अक्रोड खाण्याचे आरोग्यविषयक फायदे

आता तुम्हाला अक्रोडाचे पौष्टिक मूल्य माहित झाले आहे, तर अक्रोड खाल्ल्याने गरोदरपणात तुम्हाला कसा फायदा होऊ शकतो याबद्दल अधिक जाणून घेऊया. 1. अक्रोडमध्ये ओमेगा-३ फॅटी ऍसिड आणि प्रथिने मुबलक प्रमाणात असतात. ही प्रथिने तुमच्या बाळाच्या डोळ्यांच्या आणि मेंदूच्या विकासात मदत करतात. 2. अक्रोडमध्ये प्लांट स्टेरॉल असतात आणि ते रक्तातील कोलेस्टेरॉलची पातळी नियंत्रित करण्यास आणि तुमच्या शरीरातील चांगल्या कोलेस्ट्रॉलची (एचडीएल) पातळी वाढवण्यास मदत करतात. 3. मध्यम प्रमाणात अक्रोड खाल्ल्याने गरोदरपणात लिपिड प्रोफाइल राखण्यात देखील मदत होते. 4. अक्रोडाचे तेल संपूर्ण शरीरातील रक्तवाहिन्यांमधील एंडोथेलियल पेशींचे कार्य टिकवून ठेवण्यासाठी फायदेशीर असल्याचे आढळले आहे. या पेशी रक्तवाहिन्यांच्या लवचिकतेमध्ये महत्त्वाची भूमिका बजावतात. त्यामुळे अक्रोडाच्या नियमित सेवनाने रक्तवाहिन्यांचे कार्य चांगले राहते. 5. अक्रोड रक्तवाहिन्यांना आराम देत असल्याने उच्च रक्तदाब नियंत्रित करण्यास देखील मदत होऊ शकते. 6. अक्रोड हे प्रथिने आणि तंतुमय पदार्थांचे चांगले स्त्रोत आहेत,  आणि ते गर्भवती स्त्रीसाठी महत्त्वपूर्ण आहेत. 7. अक्रोडमध्ये असलेले अँटिऑक्सिडंट्स गर्भवती स्त्रीची रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यास मदत करतात. तपकिरी आवारणासह अक्रोड खाणे चांगले असते. कारण अक्रोडमध्ये आढळणारे ९० टक्के अँटिऑक्सिडंट त्यामध्ये असतात. 8. अक्रोडातील लोहाचे प्रमाण गर्भाची योग्य वाढ आणि विकास करण्यास मदत करू शकतात. 9. अक्रोड मध्ये पॉलिफेनॉल आणि लोह देखील असते. आणि ते मुक्त रॅडिकल्स आणि कर्करोगापासून होणारे नुकसान टाळू शकतात. 10. प्रसूतीनंतरचे नैराश्य दूर ठेवण्यासाठी गरोदर स्त्रियांनी अक्रोड खाणे चांगले असते. अक्रोड मधील अल्फा-लिनोलेनिक ऍसिड हे पोस्टपर्टम डिप्रेशन, मॅनिक-डिप्रेसिव्ह सायकोसिस आणि अगदी डिमेंशियाशी लढण्यासाठी देखील चांगले असते. त्यामुळे, डिलिव्हरीनंतर तुम्ही अक्रोड खाणे सुरू ठेवू शकता. 11. अक्रोड मेलाटोनिनची पातळी नियंत्रित करण्यास देखील मदत करते. मेलाटोनिन मुळे झोप येते आणि त्यामुळे विशेषत: तिसऱ्या तिमाहीत अक्रोड खाणे खूप फायदेशीर ठरू शकते कारण त्या वेळी चांगली झोप येणे ही मुख्य चिंता असते. 12. अक्रोडमुळे तुम्हाला जास्त वेळ पोट भरल्यासारखे वाटू शकते आणितुम्ही जास्त खात नाही, त्यामुळे तुमचे वजन नियंत्रणात राहते. 13. अक्रोडमध्ये लोह असते आणि ते लाल रक्तपेशींच्या निर्मितीसाठी आवश्यक असते. ते ऊती  दुरुस्त करण्यास देखील मदत करते. 14. मॅंगनीज हे बाळाच्या हाडे आणि कूर्चेच्या विकासासाठी आवश्यक असलेले महत्त्वपूर्ण पोषक तत्व आहे. अक्रोडच्या एका सर्व्हिंगद्वारे दररोज आवश्यक असलेले मँगेनीज अर्ध्या प्रमाणात पुरवले जाऊ शकते.

तुमच्या गरोदरपणाच्या आहारात अक्रोडाचा समावेश कसा करावा?

अक्रोड खाण्याचे अनेक मार्ग आहेत. तुम्ही अक्रोड आहे तसेच किंवा बारीक करून खाऊ शकता. भाजलेले पदार्थ, मांस, मासे, भाज्या आणि फळांच्या सॅलडसह विविध पदार्थांमध्ये तुम्ही अक्रोड घालू शकता. स्त्रिया देखील अनेक आरोग्य समस्यांवर उपाय म्हणून अक्रोडाचे सेवन करतात कारण गरोदरपणात औषधे खाण्याचा सल्ला दिला जात नाही.

गरोदरपणात अक्रोड खाण्याचे धोके काय आहेत?

गरोदरपणात अक्रोडाचे सेवन केले जाऊ शकते, परंतु तुम्ही हे अक्रोड जास्त प्रमाणात खाऊ नये. कोणत्याही गोष्टीचा अतिरेक तुमच्या आरोग्यासाठी हानिकारक ठरू शकतो आणि हे अक्रोडाच्या बाबतीतही खरे आहे. तुम्ही गरोदरपणात मध्यम प्रमाणात अक्रोड खाऊ शकता. गरोदर असताना एका दिवसात ३० ग्रॅम पेक्षा जास्त अक्रोड खाऊ नका. कारण जास्त प्रमाणात अक्रोड खाल्ल्याने आई आणि बाळासाठी समस्या निर्माण होऊ शकते. तुम्ही गरोदरपणात अक्रोडाचे जास्त सेवन केल्यास उद्भवू शकणार्‍या काही समस्या येथे दिलेल्या आहेत.

गरोदरपणात अक्रोडची ऍलर्जी

जर तुम्हाला अक्रोडची ऍलर्जी असेल,  तर तुम्ही गरोदरपणात आणि प्रसूतीनंतरही अक्रोड खाणे टाळावे. पण जर तुम्हाला अक्रोडाची ऍलर्जी नसेल तर तुम्ही अक्रोड मध्यम प्रमाणात खाऊ शकता. बऱ्याच स्त्रियांचा असा विश्वास आहे की गरोदरपणात अक्रोड खाणे असुरक्षित आहे आणि भविष्यात बाळाला अक्रोडची  ऍलर्जी होऊ शकते. परंतु, हा केवळ एक गैरसमज आहे. गरोदरपणात अक्रोड खाल्ल्याने तुमच्या बाळाला त्याची ऍलर्जी होण्याचा धोका वाढणार नाही. गरोदरपणात अक्रोड खाणे टाळणाऱ्या स्त्रियांच्या पोटी जन्मलेल्या बाळांनाही नंतर अक्रोडची ऍलर्जी होऊ शकते. म्हणून, आपण गरोदरपणात अक्रोड खाऊ शकता, फक्त ते कमी प्रमाणात खाण्याचे लक्षात ठेवा. आता तुम्हाला अक्रोडाच्या आरोग्यदायी फायद्यांविषयी माहिती मिळालेली आहे.  अक्रोडचा तुमच्या आहारात समावेश करताना खूप जास्त विचार करू नका. अक्रोडाच्या दुष्परिणामांची चिंता न करता तुम्ही गरोदरपणात दररोज 2-3 अक्रोड खाऊ शकता. जोपर्यंत तुम्ही अक्रोड मध्यम प्रमाणात खात आहात तोपर्यंत तुम्हाला कोणतीही समस्या उद्भवणार नाही. परंतु, अक्रोड खरेदी करताना, आयताकृती आणि पातळ कवच असलेले अक्रोड निवडा. काळे डाग असणाऱ्या अक्रोडची चव उग्र असते. असे अक्रोड खाणे टाळा. निरोगी गर्भारपणासाठी तुम्हाला शुभेच्छा! आणखी वाचा: गरोदरपणात खजूर खाणे गरोदरपणात सुकामेवा खाणे – फायदे आणि जोखीम
Published by
मंजिरी एन्डाईत
Last Updated On

Recent Posts

All Rights Reserved