गर्भधारणेचे आठवडे

गरोदरपणाच्या १४ व्या आठवड्यातील अल्ट्रासाऊंड

गरोदरपणाच्या १४व्या आठवड्यात आईने दुसऱ्या तिमाहीमध्ये प्रवेश केलेला असतो. गरोदरपणाच्या १४ व्या आठवड्यापर्यंत सहसा मॉर्निंग सिकनेस, थकवा आणि इतर नको असलेली लक्षणे अदृश्य होतात आणि पोट दिसू लागते. गर्भाशयात आतापर्यंत बाळ पूर्णपणे तयार झालेले आहे, त्याची लांबी सुमारे ८.५ सेमी आणि वजन सुमारे ४२ ग्रॅम आहे. नियमित तपासणीचा एक भाग म्हणून, तुमचे बाळ निरोगी असल्याची आणि त्याचा विकास सामान्यपणे होत असल्याची खात्री करण्यासाठी तुमचे स्त्रीरोगतज्ज्ञ गरोदरपणाच्या १४ व्या आठवड्यांत अल्ट्रासाऊंडची शिफारस करतील.

ह्या लेखात, आम्ही गरोदरपणातील १४ व्या आठवड्यातील अल्ट्रासाऊंड ची गरज ह्यावर चर्चा करू आणि जर तुम्ही १४ आठवड्यांच्या गरोदर असाल तर तुम्‍हाला असलेल्‍या संबंधित प्रश्‍नांचे निराकरण करण्‍याचा प्रयत्‍न करू.

गरोदरपणाच्या १४ व्या आठवड्यातील अल्ट्रासाऊंडची गरज का आहे?

सर्व गर्भवती महिलांना त्यांचे बाळ गर्भात कसे वाढत आहे हे पाहण्याची इच्छा असते. आणि, बाळाची योग्य वाढ सुनिश्चित करण्यासाठी, स्त्रीरोगतज्ञ वेळोवेळी अल्ट्रासाऊंडची शिफारस करतात. गरोदरपणाच्या १४ व्या आठवड्यात अल्ट्रासाऊंड का आवश्यक आहे ते येथे आहे.

गरोदरपणाच्या १४ व्या आठवड्यातील अल्ट्रासाऊंडची तयारी कशी करावी?

गरोदरपणाच्या १४ व्या आठवड्यांनंतर, तंत्रज्ञ पोटाचा अल्ट्रासाऊंड करतील. त्यासाठी तुमचे मूत्राशय भरलेले असणे आवश्यक आहे कारण त्यामुळे रेडिओलॉजिस्टला बाळाची स्पष्ट प्रतिमा मिळविण्यात मदत होईल. तुमच्या अल्ट्रासाऊंडच्या सुमारे ३० ते ४० मिनिटे आधी काही ग्लास पाणी प्या, जेणेकरून तुमचे मूत्राशय भरले जाईल. तुम्ही तुमच्या बाळाच्या आरोग्याविषयी आणि विकासाबद्दल तंत्रज्ञांना तुम्हाला असलेले प्रश्न काढून ठेवू शकता.

अल्ट्रासाऊंडला किती वेळ लागतो?

गरोदरपणातील १४ व्या आठवड्यातील अल्ट्रासाऊंडला सुमारे २० ते ३० मिनिटे लागतील. जर तुम्हाला जुळे किंवा तिळे होणार असेल किंवा अंतर्गत अवयव आणि हातपाय दिसतील अशा स्थिती मध्ये बाळ नसेल तर अल्ट्रासाऊंड स्कॅन साठी वेळ लागू शकतो.

अल्ट्रासाऊंड कसे केले जाते?

गरोदरपणातील इतर कुठल्याही अल्ट्रासाऊंड प्रमाणेच, तुम्हाला पोट उघडे ठेवून टेबलवर झोपावे लागेल. रेडिओलॉजिस्ट तुमच्या पोटावर थोडी पाणीदार जेल टाकेल आणि मॉनिटरवर तुमच्या बाळाच्या प्रतिमा मिळविण्यासाठी अल्ट्रासाऊंड ट्रान्सड्यूसर वापरेल. काही वेळेला, ट्रान्सव्हजायनल स्कॅन केले जाऊ शकते. ह्या प्रकारच्या स्कॅनमध्ये गर्भाच्या स्पष्ट प्रतिमा मिळविण्यासाठी योनीमध्ये एक प्रोब घातले जाते. स्कॅन करण्याची ही प्रक्रिया वेदनादायक नाही आणि ह्या स्कॅनद्वारे सर्वात विश्वासार्ह प्रतिमा मिळते.

अल्ट्रासाऊंडवर काय पाहिले जाऊ शकते?

१४ आठवड्यांच्या अल्ट्रासाऊंडमध्ये बाळाचा आकार लिंबू किंवा पीच एवढा असतो. अल्ट्रासाऊंड मध्ये तुम्हाला काय दिसू शकेल ह्याची यादी खाली दिलेली आहे -

गर्भधारणेच्या १४व्या आठवड्यात काही विकृती आढळल्यास काय?

गरोदरपणाच्या १४ व्या आठवड्यांच्या अल्ट्रासाऊंड दरम्यान, काही विकृती आढळल्यास, डॉक्टर तुम्हाला पुढील चाचण्या करून घेण्याचा सल्ला देतील. बाळाला हृदयविकार असल्याचा संशय आल्यास स्त्रीरोगतज्ञ गर्भाच्या इकोकार्डियोग्राफी सारख्या चाचण्यांची शिफारस करू शकतात. अनुवांशिक विकार शोधण्यासाठी डॉक्टर अम्निओसेन्टेसिस, रक्त तपासणी किंवा कोरिओनिक विली सॅम्पलिंगची शिफारस देखील करू शकतात. चाचण्यांच्या निकालामध्ये काहीही असामान्य आढळल्यास डॉक्टर पुढील प्रक्रियेसाठी सल्ला देतील.

पहिल्या त्रैमासिकात न्युकल ट्रान्सलुसेंसी स्कॅन (एनटीएस) न झालेल्या मातांसाठी, ते करून घेण्याची ही शेवटची संधी आहे कारण १४ आठवड्यांनंतर मानेची त्वचा पारदर्शक रहात नाही. गरोदरपणाच्या १४ आठवड्यांपर्यंत, गर्भपाताचा धोका कमी होतो आणि बाळाची वाढ आणि विकास स्थिर गतीने होऊ लागतो. म्हणून,बाळ निरोगी असून त्याची वाढ चांगल्या रीतीने होत असल्याचे सुनिश्चित करण्यासाठी गरोदरपणाच्या १४ व्या आठवड्यातील स्कॅनची मदत होते.

मागील आठवडा: गरोदरपणाच्या १३ व्या आठवड्यातील अल्ट्रासाऊंड स्कॅन पुढील आठवडा: गरोदरपणाच्या १५ व्या आठवड्यातील अल्ट्रासाऊंड

Published by
मंजिरी एन्डाईत
Last Updated On

Recent Posts

All Rights Reserved